ETV Bharat / state

Breaking News : कोरेगावातील धोम डावा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया; शेती, रस्ता जलमय - आजच्या ताज्या बातम्या

MAHARASHTRA CRIME POLITICAL BREAKING NEWS LIVE UPDATES TODAY
वाचा महाराष्ट्रातील बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्स..
author img

By

Published : Feb 25, 2023, 7:07 AM IST

Updated : Feb 25, 2023, 10:45 PM IST

22:43 February 25

कोरेगावातील धोम डावा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया; शेती, रस्ता जलमय

सातारा - कोरेगाव तालुक्यातील बर्गेवाडी गावानजीकचा धोम डावा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. कालव्यानजीकची शेती आणि रस्ता जलमय झाला. जलसंपदा विभागाने तातडीने पाणी बंद केल्यामुळे संभाव्य हानी टळली. कालव्याची वेळेवर देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने असे प्रसंग वारंवार उ्द्धवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

21:59 February 25

नांदेडमध्ये जुन्या वादातून युवकाचा खून

नांदेड - सिडको भागात एका युवकाचा खून. करण्यात आला. 23 वर्षीय युवक जागीच ठार झाला आहे. जुन्या वादातून घटना घडली आहे. सिडको भागातील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर ही घटना घडली. 7 ते 8 हल्लेखोरांनी हा हल्ला. केला. राज सरपे असे मृत युवकाचे नाव आहे.

21:27 February 25

ठाण्यात अस्तित्व टिकविण्यासाठी ठाकरे गटाची शिवगर्जना रॅली तर रविवारी मेळावा

ठाणे -शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडुन राज्यभर शिवसंवाद यात्रा तसेच प्रबोधन यात्रा काढण्यात आली होती. आता,शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे गटाने शिवगर्जना यात्रेचा बिगुल फुंकला असुन शनिवारी ठाणे शहरात शिवगर्जना रॅली काढली. तर या अभियानाचा शुभारंभ रविवारी सकाळी गडकरी रंगायतनमध्ये जाहीर मेळावा घेऊन होणार असुन या मेळाव्याला खा.अरविंद सावंत, आ.भास्कर जाधव आदी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

20:21 February 25

मोदींची कबर खोदू, या काँग्रेसच्या घोषणेवर भडकले राम कदम

मुंबई - काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केलेल्या घोषणाबाजीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कबर खोदली जाईल असे वक्तव्य करण्यात आले. काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्याचा भाजपकडून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. याबाबत भाजप प्रवक्ते, आमदार राम कदम यांनी काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

19:50 February 25

निरोप समारंभाच्या काही तास आधी दुचाकी अपघातात दहावीचा विद्यार्थी ठार, दोघे जखमी

सातारा - पाटण तालुक्यातील मरळी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. दहावीच्या निरोप समारंभाच्या काही तास आधी दुचाकी अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. प्रतिक रमेश पाटील (रा. मरळी, ता. पाटण), असे मृत मुलाचे नाव आहे. प्रतिक आणि त्याचे दोन मित्र एका दुचाकीवरून फिरत होते. त्यावेळी समोरून आलेल्या टाटा सुमो गाडीला त्यांच्या दुचाकीने धडक दिली.

19:38 February 25

कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान

पुणे - कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

19:32 February 25

भारत 5 वर्षात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार - गोयल

पुणे - भारत पुढील पाच वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तसेच 2047 पर्यंत आजच्या अमेरिकेच्या स्तरावर भारत जाईल, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी येथे सांगितले. येथे एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2023 कार्यक्रमात ते बोलत होते.

19:27 February 25

ठाण्यात कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 116 जणांना अटक, 129 गुन्हे दाखल

ठाणे - शहरात गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. यामध्ये एकूण 116 जणांना अटक करण्यात आली. तसेच 129 गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. शुक्रवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या या मोहिमेत 223 अधिकारी आणि 1,054 कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले होते, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी सांगितले.

19:25 February 25

लातूरमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक

लातूर - शहरात वेश्याव्यवसाय रॅकेट चालवल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. एका बनावट ग्राहकाद्वारे टीप मिळाली होती. त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने टाकलेल्या छाप्यात एका महिलेचीही सुटका करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.

18:44 February 25

अजित पवार पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका - नारायण राणे

कोल्हापूर - विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी शेलकी टीका केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे.

18:30 February 25

जेजे हॉस्पिटल उडवून देण्याचा खोटा कॉल, पोलिसांनी केले एकाला अटक

मुंबई : काल दुपारी दक्षिण मुंबई नियंत्रण कक्षात अज्ञात इसमाने फोन करून बंदर परिसरात ९० किलो एमडी व स्फोटके उत्तरविण्यात आली आहेत, असे सांगितले. या स्फोटकांचा वापर जे.जे. रूग्णालय, भेंडीबाजार व नळबाजार या परिसरात बॉम्ब स्फोट घडवून आणल्याची माहिती फोन करणाऱ्याने दिली. यावेळी त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने नाव सांगण्यास नकार दिला. याबाबत अधिक माहिती विचारली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली आणि फोन कट केला. या कॉलरला १० तासांच्या आत दक्षिण नियंत्रण कक्षाने डहाणू येथून अटक केली आहे. अश्विन महिसकर असे अटक आरोपीचे नाव आहे.

18:24 February 25

मुंबईत परदेशी बनावटीच्या ई सिगारेटचा अवैध साठा जप्त

मुंबई - भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या परदेशी बनावटीच्या ई सिगारेटचा अवैध साठा गुन्हे शाखेच्या कक्ष दहाकडून जप्त करण्यात आला आहे.

17:26 February 25

नितीन गडकरी यांच्या सभेत पैशांचा पाऊस, कोट्यवधींचे निधी मंजूर

हिंगोली - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे हिंगोली जिल्हा दोऱ्यावर आले होते. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक रस्त्याचे लोकार्पण केले तर कोट्यवधी रुपयांच्या निधीला देखील मंजुरी दिली. तर दुसरीकडे सभेस येणाऱ्यावर देखील पैशांची उधळण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

17:17 February 25

नावे बदलल्याने बेरोजगारीसारखे प्रश्न सुटतील का - जलील

ठाणे - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) महाराष्ट्र प्रमुख इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केल्याने तेथील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या दूर होतील आणि बेरोजगारीसारख्या समस्याही दूर होतील का, असा सवाल विचारला आहे. नामांतर करुन मूलभूत प्रश्न सुटत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

16:59 February 25

10 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून महिला डॉक्टरसह तिघांना लावला 1 कोटी रुपयांचा चुना

ठाणे - एका गावातील डॉक्टर आणि त्याच्या तीन साथीदारांना 10 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून चेन्नई येथील एका कंपनीने एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी ही माहिती दिली. पीडित महिला डॉक्टर डोंबिवलीजवळील सोनारपाडा गावातील असल्याचे त्यांनी सांगितले.

16:57 February 25

सासूच्या हत्येप्रकरणी नराधमाला अटक

पालघर - पोलिसांनी शनिवारी विरार येथून एका व्यक्तीला त्याच्या 60 वर्षीय सासूची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. खुनाची घटना शुक्रवारी घडल्याचे त्यांनी सांगितले.

16:27 February 25

सक्रिय राजकारणापासून सध्या तरी दूर राहणार - भगतसिंह कोश्यारी

डेहराडून - सक्रिय राजकारणापासून थोडे दूर असायला हवे असे मी म्हटले आहे, अशी प्रतिक्रिया माजी राज्यपाल भगतसहिं कोश्यारी यांनी एएनआयला दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार उत्तराखंडच्या विकासासाठी काम करत आहेत. आमचे तरुण अजूनही मुंबई आणि दिल्लीला जातात. येथील लोक स्वयंरोजगारासाठी पुढे जावेत यासाठी माझा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.

14:51 February 25

आव्हाड यांच्या समर्थनार्थ मुंब्रामध्ये मूकमोर्चा

ठाणे - मुंब्रामध्ये मूक मोर्चा काढण्यात आला आहे. राष्ट्रवादी आणि स्थानिक नागरिक त्यामध्ये सहभागी झाले आहेत. ठाणे महापालिका साह्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. लवकरात लवकर त्यांना निलंबीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना आलेल्या धमकीबाबत राष्ट्रवादी पुन्हा दाद मागितली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ हा मूक मोर्चा काढण्यात आला. आव्हाड याच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

14:32 February 25

कळवामध्ये 4 मजली इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर पडले, 2 मुले किरकोळ जखमी

ठाणे - कळवा येथिल एका अनधिकृत 4 मजली साई निवास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचे प्लास्टर पडल्याने घरातील 2 लहान मुल किरकोळ जखमी झाली. ही इमारत 15 वर्षे जुनी आहे. पाहिल्या मजल्यावरील ज्या घरात स्लॅब कोसळला आहे त्या रूमला तडेही गेल्याने त्याठिकाणी राहणाऱ्या भाडेकरू सिंग कुटुंबाला ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. त्यांची नातेवाईकांकडे तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात आली. भाडेकरू सिंग यांच्या दोन्ही मुलांवर छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी महापालिकेतर्फे पुढील कारवाई करण्यात येत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आलीय.

14:19 February 25

पोलिसांनी एकाला चौकशीसाठी उचलल्यानंतर, त्याच्या वृद्ध वडिलांचा पोलिस स्टेशनमध्ये मृत्यू

ठाणे - कल्याण शहरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कोम्बिंग ऑपरेशननंतर पोलिसांनी त्याच्या मुलाला चौकशीसाठी आणले होते. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

14:07 February 25

लोकशाही टिकण्यासाठी 40 गद्दार अपात्र ठरण्याची गरज - आदित्य ठाकरे

मुंबई - लोकशाही टिकण्यासाठी 40 गद्दार अपात्र ठरण्याची गरज. ते अपात्र ठरतील अशी अपेक्षा ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे आपले लक्ष असल्याचे ते म्हणाले. लवकरात लवकर नवडणुकीही झाल्या पाहिजेत असे ठाकरे म्हणाले.

13:59 February 25

पोलिसांनी दिले आश्वासन, धंगकेर यांचे उपोषण मागे

पुणे - महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उपोषण मागे घेतला आहे. पोलिसांनी त्यांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

13:24 February 25

भाजपकडून पैसेवाटप.. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांचे उपोषण मागे, कारवाईचे आश्वासन

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून पैसेवाटप करण्यात येत असल्याचा आरोप करत उपोषणाला बसलेले काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांचे उपोषण माघारी घेण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे.

12:31 February 25

भारतीय सैन्याला अंदमानातही फुग्यासारख्या वस्तू आकाशात दिसल्या होत्या

नवी दिल्ली - भारतीय संरक्षण दलांनी एका वर्षापूर्वी अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांच्या प्रदेशांवर आकाशात अमेरिकन हवाई दलाने फोडलेल्या कथित चिनी गुप्तचर फुग्यासारख्या वस्तू पाहिल्या होत्या, अशी माहिती आता पुढे आली आहे. तथापि, फुग्यासारख्या वस्तूचे मूळ आणि हेतू किंवा स्पष्ट झाला नसल्याने कोणतीही कारवाई केली गेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

12:14 February 25

पैसे घेतल्याचा आरोप करुन काँग्रेसचे उमेदवार कसब्यातील मतदारांचा अपमान करत आहेत - भाजप

पुणे - कसब्याच्या मतदारांवर पैसे घेतल्याचा आरोप करून काँग्रेसचे उमेदवार कसब्यातील मतदारांचा अपमान करत आहेत, असा आरोप भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. खोटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयन्त करत आहेत, असेही मुळीक म्हणाले. प्रचार संपला असतानाही उपोषण करून धंगेकर स्टंटबाजी करत असल्याचा भाजपने आरोप केला आहे. देव त्यांना सुबुद्धीनल देवो यासाठी भाजप पदाधिकारी गणपती मंदिर आणि पुण्येश्वर मंदिरात महाआरती करणार आहेत.

12:04 February 25

सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर चकमक, 3 जवान शहीद

रायपूर - छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी पोलिसांची मोठी चकमक झाली आहे. माओवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला आहे. यामध्ये 3 जवान शहीद झाले आहेत.

12:00 February 25

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवगर्जना अभियानाला सुरुवात

मुंबई - शिवसेसा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवगर्जना अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात निष्ठावान शिवसैनिकांना साद घालण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरेंच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी विभागवार उपनेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर या अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

11:38 February 25

औरंगाबादसह इतर जागांवर एमआयएम निवडणूक लढवणार - ओवेसी

मुंबई - पुढील लोकसभा निवडणूक आम्ही औरंगाबाद आणि इतर जागांवरून लढवू आणि इतर काही पक्षांसोबत युती करण्याच्या शक्यतेचा विचार करू, असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत बोलत होते. पुढच्या निवडणुकीत आम्ही कोणासोबत जाणार यावर भाष्य करणे आताच थोडे घाईचे आहे, असेही असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केले.

11:06 February 25

अहमदनगरचं नामांतरण अहिल्यानगर होणारच.. गोपीचंद पडळकर

11:03 February 25

पुण्यात राजकीय वातावरण तापलं, रवींद्र धंगेकरांच्या उपोषणाला परवानगी नाकारली

पुणे : पुण्यात राजकीय वातावरण तापलं, रवींद्र धंगेकरांच्या उपोषणाला परवानगी नाकारली.. जमावबंदी असल्याने परवानगी नाही

10:47 February 25

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल

09:29 February 25

संपूर्ण जिल्ह्याचं नाव संभाजीनगर होणार : देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर: केंद्र सरकारने काढलेल्या पत्रकानुसार शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. त्यात जिल्हा औरंगाबाद असे नमूद करण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामध्ये दिलेले नाव औरंगाबाद तालुक्यापुरते मर्यादित आहे की, जिल्ह्याचे पूर्ण नाव बदलले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विरोधीपक्षनेते दानवे यांनी सवाल उपस्थित केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिल असून, संपूर्ण जिल्ह्याचं नाव संभाजीनगर होणार असे ते म्हणाले.

07:46 February 25

मुंबईत बॉम्ब ठेवल्याची अफवा.. आरोपीला पोलिसांनी केली अटक

बॉम्ब असल्याची अफवा पसरवणारा हॉक्स कॉलरला मुंबई पोलिसांच्या साउथ कंट्रोल रूम ने दहा तासात केली अटक. अश्विन महिसकर असे आरोपीचे नाव

07:19 February 25

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की घेणार चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटण्याची योजना आखत आहेत, एएफपीच्या वृत्तानुसार

07:16 February 25

मध्यप्रदेशातील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये तर गंभीर जखमींना 2 लाख रुपये मदत

एमपी| सिधी जिल्ह्यातील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये तर गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि मध्यम जखमींना 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत. पात्रतेनुसार मृतांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्या दिल्या जातील: मुख्यमंत्री एसएस चौहान

07:15 February 25

तुर्की भूकंपात मृतांची संख्या ५० हजारांच्या पार

6 फेब्रुवारीच्या भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मृतांची एकत्रित संख्या 50,000 च्या पुढे गेली आहे; 5,20,000 अपार्टमेंट्स असलेल्या 1,60,000 पेक्षा जास्त इमारती या प्रदेशात कोसळल्या आहेत किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असा अहवाल रॉयटर्सने दिला आहे

07:11 February 25

भाजप जिंकल्यास गोमांस खाण्यावर कोणतेही बंधन असणार नाही: भाजपच्या नेत्याची घोषणा

मेघालय | आम्ही जिंकलो तर भाजप खाण्याच्या सवयी बदलणार नाही, कोणतेही बंधन (गोमांस खाण्यावर) असणार नाही. सत्तेत आल्यानंतर राज्यात पायाभूत सुविधांचा विकास करू. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात असलेल्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू: राज्य भाजपचे प्रमुख अर्नेस्ट मॅवरी

06:56 February 25

MAHARASHTRA CRIME POLITICAL BREAKING NEWS LIVE UPDATES TODAY

ताज्या बातम्यांसाठी हे पेज रिफ्रेश करत राहा

रविवारी (२६ फेब्रुवारी) मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Last Updated : Feb 25, 2023, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.