ETV Bharat / state

Breaking News : बैठकीत महाराष्ट्रातील जनतेच्या हितावर चर्चा करू - एकनाथ शिंदे

author img

By

Published : Dec 14, 2022, 6:44 AM IST

Updated : Dec 14, 2022, 8:06 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

19:58 December 14

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

19:54 December 14

बैठकीत महाराष्ट्रातील जनतेच्या हितावर चर्चा करू - एकनाथ शिंदे

नवी दिल्ली -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. बैठकीत महाराष्ट्रातील जनतेच्या हितावर चर्चा करू. मला आशा आहे की ही बैठक सकारात्मक परिणामांसह सकारात्मक होईल, असे शिंदे यांनी सांगितले.

19:40 December 14

समृद्धी एक्स्प्रेस वेवर एमएसआरटीसी नागपूर-शिर्डी, नागपूर-औरंगाबाद स्लीपर कोच सेवा सुरू करणार

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) गुरूवारपासून नव्याने उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावरून नागपूर-शिर्डी मार्गावर स्लीपर कोच बस सेवा सुरू करणार आहे.

19:33 December 14

प्रेमसंबधातून प्रियकराने केली विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या

ठाणे : प्रेमसंबधातून शेजारी राहणाऱ्या विवाहित प्रेयसीची धारदार ब्लेडने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण शीळ रोड टाटा नाका परिसरातील एका चाळीत घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे प्रेयसीची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संदीप अहिरे असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

19:11 December 14

अशोक चव्हाण यांनी घेतली हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट

नवी दिल्ली - राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी नांदेड कोल्हापूर विमानसेवेबाबत त्यांच्याकडे आग्रही भूमिका मांडली. यासंदर्भात ट्विट करुन चव्हाण यांनी माहिती दिली. ते ट्विटमध्ये म्हणतात की, 'देशाच्या नकाशावर नांदेड शहराचे स्थान महत्वपूर्ण असल्याची मला जाणीव असून, येथील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालेन, असा शब्द नागरी उड्डयणमंत्री यांनी दिला आहे. आज सायंकाळी नवी दिल्ली येथे झालेल्या भेटीत त्यांनी ही सकारात्मक भूमिका घेतली.'

19:07 December 14

मुंबईतील 17 डिसेंबरचा MVA चा निषेध मोर्चा विराट असेल - नसिम खान

मुंबई - राज्यातील विरोधी महाविकास आघाडीने (एमव्हीए) छत्रपती शिवाजी महाराजांविरोधातील वक्तव्यासह विविध मुद्द्यांवर मुंबईत 17 डिसेंबर रोजी निषेध मोर्चा आयोजित केला आहे. हा मोर्चा विराट मोर्चा असेल, असे एका काँग्रेस नेते नसिम खान यांनी म्हटले आहे.

18:45 December 14

590 किलो गांजा तस्करी करणारे बीडमधील गुन्हेगार अटकेत, रचकोंडा कमिशनर महेश भागवत यांची कामगिरी

हैदराबाद - ओडिशातून आलेला गांजा तेलंगणातील मलकानजीगिरीमार्गे तस्करी प्रकरणी रचकोंडा पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी 590 किलो गांजाची तस्करी केली होती. हा गांजा रचकोंडा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

18:23 December 14

कोबाड गांधींच्या पुस्तकाच्या अनुवादासाठी पुरस्कार नाकारणे योग्यच - दीपक केसरकर

मुंबई - माओवादी विचारवंत कोबाड गांधी यांच्या स्मृतिग्रंथाच्या मराठी अनुवादासाठी पुरस्कार नाकारण्याच्या निर्णयाचे सरकारने समर्थन केले आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी या निर्णयाचा बचाव केला. ते म्हणाले की हा या पुस्तकाला देणे म्हणजे नक्षलवादावर सरकारच्या मान्यतेचा शिक्कामोर्तब झाल्यासारखे होईल. त्यामुळे हा पुरस्कार रद्द करण्यात आला आहे.

18:03 December 14

भारतीय आदरातिथ्य हा एक उत्तम अनुभव - हानवेन तांग

मुंबई - येथे भारतीय आदरातिथ्य अनुभवणे हा एक उत्तम अनुभव आहे. भारताची संस्कृती खूप समृद्ध आहे. G20 भारत आणि चीन यांना एकत्र बसून जगाला चिंता करणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करते. असे चीनचे प्रतिनिधी हानवेन तांग यांनी सांगितले.

17:56 December 14

पतंग काढण्यासाठी गेलेला 13 वर्षीय मुलाचा शॉक लागून जागीच मृत्यू

बुलडाणा - शहरातील वावरे ले आऊट येथील वावरे यांच्या बिल्डिंगचे बांधकामाव सुरू आहे. या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर पतंग काढण्यासाठी तेरा वर्षीय प्रणव विनोद बोरकर गेला होता. या मुलाने पतंग काढण्यासाठी लोखंडी सळी घेतली व तो पतंग काढत असताना ती लोखंडी सळी विद्युत तारेला लागली. त्यात मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना पोलिसांना कळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून मुलाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता आणले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

17:43 December 14

उद्धव ठाकरेंच्या बंगल्यांचा ४८ तासात अहवाल देण्याचे मंत्र्यांचे आदेश - सोमैयांची माहिती

मुंबई - उद्धव ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले कुठे गेले, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत विचारला होता. या प्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ४८ तासात या प्रकरणी चौकशी अहवाल पूर्ण करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत अशी माहितीही सोमय्या यांनी दिली.

17:11 December 14

हिंदू मुस्लिम का साथ छूट जायेगा तो हिंदुस्तान तूट जायेगा - अबू आझमी

मुंबई - कायदा केल्यावर याचा फायदा फक्त मुस्लिम नसलेल्या लोकांनाच होणार आहे. कायदा बनवल्यावर सर्वच समजाला याचा फायदा व्हायला पाहिजे. नितेश राणे मंत्री बनण्यासाठी काही वक्तव्ये करत आहेत. हिंदू मुस्लिम का साथ छूट जायेगा तो हिंदुस्तान तूट जायेगा, अशी प्रतिक्रिया यावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दिली आहे.

16:47 December 14

गोराईत व्हायग्रा विकणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

मुंबई - गोराई येथे व्हायग्रा विकणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा मुंबईतील बोरिवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 13 हार्ड डिस्क आणि 2 कॉम्प्युटर जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

16:42 December 14

आंतरराष्ट्रीय शालेय विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये महाराष्ट्रच्या देवेश माहेश्वरीला सुवर्ण पदक

मुंबई - कोलंबियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय शालेय विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये महाराष्ट्रच्या देवेश माहेश्वरीसह इतर ६ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळाले आहे. या स्पर्धेत भारत अव्वलस्थानी राहिला.

16:38 December 14

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी तिघांना जामीन

पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तिघांना कोर्टाने जामिन दिला आहे. या प्रकरणी तीन जणांवर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर घोषणाबाजी करत शाई फेकण्यात आली होती. या प्रकरणी मनोज भास्कर घरबडे समता सैनिक दल संघटक, धनंजय भाऊसाहेब इजगज समता सैनिक दल सदस्य आणि विजय धर्मा ओव्हाळ वंचित बहुजन आघाडी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता पुणे कोर्टाने त्यांना जामिन मंजूर केला आहे.

16:22 December 14

शरद पवार धमकी प्रकरणी आरोपीला 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई - शरद पवार धमकी प्रकरणी आरोपी नारायण कुमार सोनीला 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गिरगाव कोर्टात त्याला करण्यात आले होते. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी गेल्या 4-5 महिन्यांपासून सतत फोन केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी ipc 294, 506 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बिहारमध्ये त्याला अटक केली होती. आज आरोपी नारायण कुमार सोनी याला गिरगाव कोर्टात केले. तो विक्षिप्त असल्याची माहिती कोर्टात पोलिसांनी दिली आहे.

16:00 December 14

परमबीर सिंह यांनी अर्णब गोस्वामींविरोधातला अब्रुनुकसानीचा दावा घेतला मागे

मुंबई - टीआरपी घोटाळा प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अर्णब गोस्वामींविरोधात केलेला अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी, अर्णव गोस्वामींनी त्यांच्या चॅनलवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणी विरोधात दावा दाखल केला होता. मात्र अचानक आपला दावा मागे घेतल्याने परमबीर सिंह यांना कोर्टाने दीड हजारांचा दंड केला. मुंबई सत्र न्यायालयाने हा दंड केला. दंडाची रक्कम थेट अर्णब गोस्वामींना देण्याचे आदेश परमबीर सिंह यांना दिले आहेत.

15:40 December 14

लक्ष्मीकांत देशमुख यांचा भाषा सल्लागार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई - लक्ष्मीकांत देशमुख यांनी भाषा सल्लागार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांना खरमरीत पत्र लिहून आपला राजिनामा दिला आहे. त्यामध्ये भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणताना लोकशाही मूल्यांची पायमल्ली झाली असल्याचा थेट आरोप देशमुख यांनी केला आहे. तसेच त्याचा गांभिर्याने विचार करावा असा सल्लाही मंत्र्यांना दिला आहे.

15:18 December 14

डी कंपनी टेरर फंडिंग प्रकरणी सलीम फ्रुटसह इतरांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई - डी कंपनी टेरर फंडिंग प्रकरणी सलीम फ्रुटसह इतर दोन आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाकडून न्यायालयीन कोठडीत वाढ केली. या सर्व आरोपींची 29 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणात दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुट, आरिफ अबुबकर शेख आणि शब्बीर अबुबकर शेख यांना अटक करण्यात आले होते.

15:06 December 14

मजीद मेमन यांचा टीएमसीमध्ये प्रवेश

नवी दिल्ली - राष्ट्रवादीचे माजी खासदार मजीद मेमन यांनी पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन आणि सौगता रॉय यांच्या उपस्थितीत टीएमसीमध्ये प्रवेश केला.

14:40 December 14

मुंबईत G20 बैठकीच्या पार्श्वभूमिवर विस्तृत सुरक्षा वाहतूक व्यवस्थेची तयारी

मुंबई - शहरात 13 ते 16 डिसेंबर दरम्यान मुंबईत G20 ची पहिली बैठक होत आहे. त्यासाठी विस्तृत सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेमुळे जनतेची कोणतीही गैरसोय होणार नाही याचीही आम्ही काळजी घेत आहोत, असे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी स्पष्ट केले. पुढीलवर्षी पुणे, औरंगाबाद आणि राज्यातील इतर शहरांमध्ये 7-8 बैठका होतील. त्या पार्श्वभूमिवर गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी आम्ही केंद्रीय यंत्रणांच्या नियमित संपर्कात आहोत, असेही फणसळकर यांनी सांगितले.

14:20 December 14

आयआयटी मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

मुंबई - विकसनशील देशातील परिवहन प्रणालीचे नियोजन आणि अंमलबजावणी यासंदर्भात आय आय टी मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन इस्रोचे संचालक डॉक्टर व्ही आर नारायणन करणार आहेत. 120 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन निबंध आयआयटी मुंबईकडे मिळाले आहेत. 19 ते 21 डिसेंबर तीन दिवस ही आंतरराष्ट्रीय परिषद चालणार आहे.

14:07 December 14

अल्पवयीन मुलाचा गाईशी लैंगिक संबंध

पुणे : पुण्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. एका अल्पवयीन मुलाने गाईशी लैंगिक संबंध केलेला आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणी एकाला अटक केली आहे.

14:00 December 14

औरंगाबादमधील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई - औरंगाबाद जिल्ह्यातील तीन तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्री येथे शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. नव्याने पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना परिवारात स्वागत केले. चिकटगावकर यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

13:15 December 14

लव्ह जिहाद पार्श्वभूमीवर समितीची स्थापना

मुंबई - लव्ह जिहाद पार्श्वभूमीवर समितीची स्थापना करण्यात आली आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. लोढांच्या अध्यक्षतेखालील समितीत 13 सदस्यांची नेमणूक केली आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती म्हणून ही समिती काम करेल. मुलींचा कुटुंबाशी संपर्क तुटू नये यासाठी समिती दक्षता घेणार आहे. आंतरधर्मीय विवाहातून कुटुंबाशी संपर्क तुटल्यास समिती मदत करणार अशी ग्वाही मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

12:38 December 14

साहित्य पुरस्कार निवड समितीच्या तीन सदस्यांचा राजीनामा

मुंबई - कथित माओवादी विचारवंत कोबाड घंडी यांच्या स्मृतिग्रंथाच्या मराठी अनुवादासाठी दिलेला पुरस्कार काढून घेण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावरून वाद उठला आहे. यामुळे आता पुरस्कार निवड समितीच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. लोकशाही प्रक्रियेचा बाधा आल्याचे कारण देत या तिघांना राजीनामा दिला आहे. यामध्ये लेखिका प्रज्ञा पवार यांच्यासह इतर दोघांचा समावेश आहे.

12:31 December 14

चंद्रपुरातील तेलंगणा सीमेवरील १४ गावांची तेलंगणात सामील होण्याची इच्छा

चंद्रपूर - तेलंगणा सीमेवर वसलेल्या महाराजगुडा, नाके वाडा यांसह १४ गावांतील ग्रामस्थांनी तेलंगणात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सीमाभागाचा प्रश्न महाराष्ट्रात तापलेला असताना ही मागणी पुढे आली आहे. मात्र स्थानिक आमदारांनी मात्र असे काही नसल्याचे म्हटले आहे.

12:08 December 14

सहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करू नये - अजित पवार

मुंबई - सहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करू नये, अशी भूमिका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मांडली आहे. फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या रद्द केलेल्या पुरस्कारावरुन अजित पवार यांची सरकारवर टीका. साहित्य क्षेत्रातील सरकारचा हस्तक्षेप हा निषेधार्ह आहे असे ते म्हणाले. एकप्रकारे अघोषित आणीबाणीच सरकार लादू पाहात आहे असा थेट आरोप पवार यांनी केला.

11:56 December 14

अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, नराधमावर गुन्हा दाखल

यवतमाळ - अल्पवयीन पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे आधी लैंगिक शोषण केले. आता या मुलीने बाळाला जन्म दिला आहे. शारीरिक अत्याचार करून मातृत्व लादणाऱ्या युवकावर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

11:54 December 14

हायवाच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार

नांदेड : भरधाव हायवा टिप्परने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एक विवाहित महिला जागीच ठार झाली. ही घटना डेरला पाटीजवळ काल सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

11:31 December 14

मुंबईतील बेस्ट बसेसवर कर्नाटकच्या जाहिराती यावर विचार व्हावा - रोहित पवार

मुंबई - मुंबईतील बेस्ट बसेस वर कर्नाटकाच्या जाहिराती आहेत. त्यावर आ. रोहित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे. कर्नाटकच्या लोकांना विरोध नाही, परंतु सीमा भागातील मराठी भाषिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता तसेच सीमाप्रश्नावरून मराठी अस्मिता दुखावण्याचे व महाराष्ट्राला आव्हान देण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण बघता मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते. आपल्या सरकारने विचार करायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.

11:25 December 14

चॉईस उद्योग समूहाच्या विभागावर प्राप्तिकर विभागाची छापेमारी

पुणे: पुण्यात आयकर विभागाची मोठी छापेमारी करण्यात आली आहे. चॉईस उद्योग समूहाच्या विभागावर मोठी छापेमारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्याकडून सुरू आहे. नामांकित चॉईस ग्रुप हा बांधकाम व्यवसायामध्ये एक महत्त्वाचा उद्योग समूह आहे पुण्यातील अनेक भागांमध्ये ज्या भागात प्राईम लोकेशन आहेत. तेथे या ग्रुपचे बांधकाम प्रोजेक्ट सुरू आहेत. या ग्रुपचे प्रमुख अशोक अग्रवाल हे आहेत. त्यांच्यावरच पुण्यात आज पहाटेपासूनच आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे.

10:56 December 14

संजय राऊतांवरील अब्रु नुकसानीचा खटला, पुढील सुनावणी 6 जानेवारीला

भाजपा नेते किरीट सौमैया आणि त्यांची पत्नी मेधा सोमैया शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टात दाखल झाले आहेत. मेधा किरीट सोमैया यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणी संजय राऊत दिल्लीत अधिवेशनात असल्याने आज उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे यावरची पुढील सुनावणी 6 जानेवारीला होणार आहे.

09:20 December 14

भाजपा नेते किरीट सौमैया आणि त्यांची पत्नी मेधा कोर्टात दाखल

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कॅनॉल मध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मंगळावर दि.13 रोजी रात्री 11वाजण्याच्या सुमारास करकंब येथील देशमुख वस्ती जवळील उजनीच्या 33 नंबर फाट्यामध्ये ट्रॅक्टर जाऊन पलटी झाला. ट्रॅक्टर ट्रॉली तर पूर्ण उलटी झाली होऊन त्यातील काही जण त्याखाली अडकले होते.

08:22 December 14

रघुराम राजन काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत सामील

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले. राजस्थानमधील सवाई माधोपूरच्या भदोती येथून आज सकाळी यात्रेला सुरुवात झाली.

07:18 December 14

रुग्णवाहिकेतून14 कोटींहून अधिक किमतीचे 200 ग्रॅम हेरॉइन जप्त

गुवाहाटी शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री एका रुग्णवाहिकेतून 50,000 याबा गोळ्या आणि 14 कोटींहून अधिक किमतीचे 200 ग्रॅम हेरॉइनसह मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित औषधे जप्त केली आणि या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केल्याचे सह पोलिस आयुक्त पार्थ सारथी महंता यांनी सांगितले.

07:18 December 14

फिफा विश्वचषकाच्या इतिहासात मेस्सी ठरला सर्वाधिक गोल करणारा खेळाडू

फिफा विश्वचषकाच्या इतिहासात मेस्सी अर्जेंटिनासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे

07:17 December 14

वाहनांच्या तपासणीदरम्यान 10 लाख रुपये किमतीचा 140 किलो गांजा जप्त

एलुरु जिल्ह्यातील पोलासनीपल्ली महामार्गावर वाहनांच्या तपासणीदरम्यान पोलिसांनी एका कारमधून 10 लाख रुपये किमतीचा 140 किलो गांजा जप्त केला. चार जणांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

06:43 December 14

सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने नागपुर आयकर विभागाच्या 9 अधिकाऱ्यांना केली अटक

अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर आरोप आहे की 2012-14 मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत डमी उमेदवारांना बसवले होते. सीबीआयने याप्रकरणी 2018 मध्ये गुन्हा दाखल केला आला होता. तब्बल चार वर्षे तपास केल्यानंतर आरोपींविरोधात भक्कम पुरावे सापडल्यानंतर आज अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

06:28 December 14

Breaking News : Breaking News : जी २० परिषदेच्या विविध बैठका आणि त्याच्या नियोजनाबाबत चर्चा

मुंबई - जी २० परिषद कार्यगटाच्या बैठकांना सुरूवात झाली आहे. त्यानिमित्त मुंबई दौऱ्यावर आलेले परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जी २० परिषदेच्या विविध बैठका आणि त्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. मुंबईतील पहिल्या बैठकीच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कांत यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Last Updated : Dec 14, 2022, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.