हानेगाव :- खासगी कंपनीत नोकरीस असलेल्या पतीसोबत हैदराबाद येथे राहण्याच्या हट्टातून पत्नी आणि पतीत झालेला वाद दोन चिमुकल्यांच्या जिवावर बेतला. खुद्द जन्मदात्रीनेच आपल्या तीन वर्षांच्या मुलासह चार महिन्याच्या चिमुकलीलाही विहिरीत फेकून दिले. त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला. ही मन सुन्न करणारी घटना देगलूर तालुक्यातील गुत्ती तांडा येथे घडली.
Breaking News : हैदराबादला राहण्याच्या हट्टातून वाद; लेकरांना फेकले विहिरीत, दोघांचा मृत्यू
22:18 January 20
हैदराबादला राहण्याच्या हट्टातून वाद; लेकरांना फेकले विहिरीत, दोघांचा मृत्यू
21:38 January 20
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप; चोकशीसाठी समिती स्थापन
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सदस्य मेरी कोम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि दोन वकील आहेत.
20:39 January 20
केजच्या नायब तहसीलदारांना भररस्त्यात पेटविण्याचा प्रयत्न
केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर आज दुपारी जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. या हल्ल्यातून त्या थोडक्यात वाचल्या आहेत. त्यांच्यावर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेने बीड जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
19:43 January 20
सोमवारी लेखी उत्तर आल्यास निवडणूक आयोग निकालाची तारीख देणार
आजचा दोन्ही गटांचा युक्तिवाद संपला

लेखी उत्तर द्या, निवडणूक आयोगाचे दोन्ही गटांना निर्देश; पुढची सुनावणी सोमवारी
तब्बल 4 तासांपासून निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद सुरू; निकाल राखून ठेवणार - सूत्र
4 तासांपासून निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद सुरू होता
18:34 January 20
धनुष्यबाणाचा अंतिम फैसला आज; जेठमलानींचा जोरदार युक्तिवाद

धनुष्यबाणाचा अंतिम फैसला आज होण्याची शक्यता आहे. जेठमलानींचा जोरदार युक्तिवाद सध्या सुरू आहे.
प्रतिनिधी सभा अंतिम निर्णय घेऊ शकते - कामत
शिंदेंचा पक्ष बेकायदेशीर - ठाकरे गट
18:32 January 20
मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने मानखुर्द येथून 23 वर्षीय ड्रग्ज तस्कराला अटक केली
मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने मानखुर्द, मुंबई येथून 23 वर्षीय ड्रग्ज तस्कराला अटक केली असून त्याच्याकडून 23 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली
18:14 January 20
ठाकरे-शिंदे दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरू; प्रतिनिधी सभेवरून शाब्दिक वाद रंगला
जेठमलांनी-कामत यांच्यात आयोगाने केली मध्यस्थी
प्रतिनिधी सभेच्या मुद्द्यावरून दोन्ही गटात जोरदार युक्तिवाद
कामत यांच्या युक्तिवादावर जेठमलानी यांचा आक्षेप
एकनाथ शिंदेंचे मुख्य नेतेपद बेकायदेशीर - सिब्बल
17:57 January 20
माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात; सावंतांना केले रुग्णालयात दाखल
मुंबई-घोडबंदर महामार्गावर डंपर वाहनाने माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या कारला धडक दिली. यात सावंत जखमी झाले आहेत. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सावंत हे पालघरला जात असताना हा अपघात झाला. काशिमीरा पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे.
17:37 January 20
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण; शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू

आम्ही सादर केलेली घटनाच योग्य - सिब्बल
सुप्रीम कोर्ट निकालापर्यंत आयोगाचा निकाल नको
मूळ पक्ष ठाकरेंसोबत - कामत
17:11 January 20
शिवसेनेत फूट पडली असे म्हणता येणार नाही - सिब्बल

आम्ही सादर केलेली कागदपत्रे योग्यच
ठाकरे गटच खरी शिवसेना
पक्ष सोडून गेलेले सदस्य सभेचा भाग होऊ शकत नाही
16:18 January 20
धनुष्यबाणावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू

कपिल सिब्बल करत आहेत युक्तिवाद
एकनाथ शिंदेंच्या भाषणाची क्लिप ठाकरेंच्या वकिलांनी आयोगात केली सादर
15:49 January 20
मुंबई उच्च न्यायालयाने रॅपिडो टॅक्सीची याचिका फेटाळली

राज्य सरकारनं बाईक टॅक्सीची सेवा बंद करण्याच्या निर्णयाला आव्हान देत दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली
विनापरवाना कुणालाही राज्यात अश्याप्रकारची सेवा देण्याचा अधिकार नाही
राज्य सरकारची भूमिका उच्च न्यायालयानं स्वीकारली
रॅपिडो विनापरवाना जर रिक्शा आणि डिलिव्हरीसारख्या अन्य काही सेवा विनापरवाना पुरवत असेल तर त्यावर राज्य सरकार योग्य ती कारवाई करू शकतं - उच्च न्यायालय
14:58 January 20
उद्योगपती अविनाश भोसले यांच्या आरोग्य तपासणींसाठी विशेष मेडिकल बोर्डसाठी सीबीआयचा आग्रह
भ्रष्टाचार प्रकरणात अटक उद्योगपती अविनाश भोसले यांच्या आरोग्य तपासणींसाठी विशेष मेडिकल बोर्ड साठी सीबीआयचा आग्रह
नेव्ही हॉस्पिटलचे तज्ञ् डॉक्टर्सच करतील, अविनाश भोसले यांची वैद्यकीय तपासणी
सीबीआयची अत्यंत आग्रही भूमिका, अखेर विशेष कोर्टानं केली मान्य
यापूर्वी जेजे हॉस्पिटल डोकटर्सच्या टीमने केलं आहे, अविनाश भोसले यांची वैद्यकीय तपासणी
जेजेच्या अहवालात अविनाश भोसले यांना रुग्णालयात उपचारांची आवश्यकता
अविनाश भोसले यांच्या वकिलांनी सीबीआयच्या मागणीवर घेतली जोरदार हरकत
सीबीआयनं घेतली ठाम भूमिका
विशेष सत्र न्यायाधीश एम जी देशपांडे यांनीही, सीबीआयच्या वकिलांना केले सवालजवाब
13:59 January 20
डीजीसीएने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड
विमानातील लाजिरवाण्या वर्तनप्रकरणी डीजीसीएने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याच वेळी, विमानाच्या पायलट-इन-कमांडचा परवाना त्याच्या कर्तव्यात अयशस्वी झाल्याबद्दल 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. एअर इंडियाच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सर्व्हिसेसवर 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. नुकतेच एअर इंडिया (AI) प्रवाशाने लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
13:49 January 20
बेस्ट विरोधात आंदोलन प्रकरणातील आरोपीविरोधात न्यायालयाने जामीन पात्र वॉरंट जारी
बेस्ट विरोधात आंदोलन प्रकरणात आज गैरहजर असलेले आरोपी शीतल गंभीर, नाना आंबोले यांच्या विरोधात न्यायालयाने जामीन पात्र वॉरंट जारी केले आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा सत्र न्यायालयात हजर झाले होते. लोढा आणि नार्वेकर यांच्यासह अन्य 20 जणांवर विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता
13:48 January 20
माजी मंत्री दीपक सावंत यांच्या वाहनाचा अपघात, पाठीला झाली दुखापत
माजी मंत्री दीपक सावंत यांच्या गाडीला डंपरने धडक दिली आहे. अपघातात त्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. अंधेरी पश्चिमेतील क्रिटिकेयर एशिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काशीमीरा हद्दीतील दिल्ली दरबार हॉटेल समोरील सिग्नल जवळ अपघात झाला आहे.
13:47 January 20
मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सत्र न्यायालयाकडून जामीन पात्र वॉरंट जारी, छगन भुजबळ काही वेळातच न्यायालयात दाखल
महाराष्ट्र सदन घोटाळा मनी लॉन्ड्रींग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज तारखेला हजर न झाल्याने सत्र न्यायालयाकडून जामीन पात्र वॉरंट जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी वॉरंट काढण्याचे निर्देश देताच काही वेळात छगन भुजबळ सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
12:59 January 20
पंचगंगा नदीचे पूर्ण शुद्धीकरण करण्याबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतला आढावा
कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा एक महत्वाच्या समस्येला तोंड देत आहे. ते म्हणजे पंचगंगा नदी प्रदूषण आणि त्याच पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आजच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथील ताराराणी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच संबंधित अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत.
12:54 January 20
खासदार नवनीत राणा यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम
खासदार नवनीत राणा जात पडताळणी प्रकरणात शिवडी कोर्टाकडून सुरू असलेली कारवाई थांबण्यासाठी राणा यांच्या अर्जाला सरकारी वकिलांचा विरोध आहे. खासदार नवनीत राणा यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
12:53 January 20
जातनिहाय जनगणना करण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
बिहार सरकारच्या संपूर्ण राज्यात जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायालय याचिकाकर्त्यांना संबंधित उच्च न्यायालयात जाण्याची आणि कायद्यानुसार योग्य उपाय शोधण्याचे स्वातंत्र्य देत असल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
11:28 January 20
ठाण्यात नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा
मुंब्रामध्ये राष्ट्रवादी नगरसेवकाच्या वाढदिवसानिम्मित शिंदे गटाचे बॅनर लावण्यात आले आहे. शिंदे गटाच्या बॅनरवरून जितेंद्र आव्हाड यांच्या जवळचे राष्ट्रवादी नगरसेवक नजीब मुल्ला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले आहेत. नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. तर मुंब्रा परिसरातील आणखीन काही नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागण्याची शक्यता. नजीब मुल्ला हे अजित पवार यांच्या जवळचे आहे. तर येत्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नजीब मुल्ला यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
11:24 January 20
रोजगार मेळा' ही आपल्या सुशासनाची ओळख - पंतप्रधान नरेंद्र मोदी
'रोजगार मेळा' ही आपल्या सुशासनाची ओळख बनली आहे. आमची वचने पाळण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा हा पुरावा आहे. एक काळ असा होता की नियमित पदोन्नतीही विविध कारणांमुळे अडथळे येत होती. केंद्र सरकारच्या भरती प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. आता, केंद्र सरकारमधील भरती प्रक्रिया अधिक कालबद्ध आणि सुव्यवस्थित असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
11:11 January 20
बॉक्सर विजेंदर सिंग जंतरमंतरवर दाखल
बॉक्सर विजेंदर सिंग दिल्लीतील जंतरमंतर येथे भारतीय कुस्ती महासंघाविरुद्ध कुस्तीपटूंच्या निषेधात सामील झाला. मी आज कुस्तीपटूंना भेटायला आलो असल्याचे ते म्हणाले.
11:04 January 20
व्हिडिओकॉन समूहाचे व्यवस्थापक वेणूगोपाल धूत यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
व्हिडिओकॉन समूहाचे व्यवस्थापक वेणूगोपाल धूत यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. 1 लाखाच्या जामीनावर तात्काळ कारागृहातून सुटका करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. तपासात सहकार्य करावं, साक्षी पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
10:37 January 20
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सदस्यांविरोधात एनआयएची मोठी घोषणा
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) दोन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) सदस्य - कोडाजे मोहम्मद शेरीफ, 53, आणि मसूद KA, 40, दोघेही कर्नाटकातील कन्नड जिल्ह्यातील रहिवासी यांच्या विरोधात प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
09:48 January 20
खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी
खासदार व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रेचा जम्मू काश्मीरमध्ये समारोप होत आहे.
09:26 January 20
गुगल इंडियाला 1,337 कोटी 76 लाख भरण्यासाठी एका आठवड्याची मुदत
नॅशनल कंपनी लॉ अपील ट्रिब्युनल (NCLAT) च्या आदेशाचे पालन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गुगल इंडिया एका आठवड्याची मुदत दिली आहे. कंपनीला स्पर्धात्मक विरोधी पद्धतींबद्दल भारतीय स्पर्धा आयोगाने ठोठावलेल्या रु. 1,337.76 कोटी दंडाच्या 10% रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
08:50 January 20
ब्रिजभूषण शरण सिंह आज घेणार पत्रकार परिषद
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आज दुपारी 12 वाजता उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील नवाबगंज येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्रात पत्रकार परिषद घेणार आहेत.
07:59 January 20
लक्झेंबर्गचे पंतप्रधानही मोदी भक्त आहेत-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लक्झेंबर्गचे पंतप्रधान मला आणि म्हणाले की ते मोदी भक्त आहेत. त्यांनी माझ्यासोबत एक फोटो क्लिक केला आणि तो पंतप्रधान मोदींना दाखवण्यास सांगितले. मी जर्मनी आणि सौदीतील अनेक लोकांना भेटलो आणि त्यांनी मला विचारले की मी पंतप्रधान मोदींसोबत आहे का? मी म्हणालो मी फक्त त्यांचा माणूस आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते विविध कामांच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
07:52 January 20
एमबीबीएस विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी लाईफगार्डचे काम करणाऱ्या आरोपीला अटक
सदिच्छा साने या एमबीबीएस विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी मिट्टू सुखदेव सिंग या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये बांद्रा बॅंडस्टँड येथून मुलीचे अपहरण करण्यात आले होते. जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या आरोपीने पोलिसांना सांगितले की त्याने तिचा खून करून तिचा मृतदेह समुद्रात टाकला. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
07:36 January 20
88 वर्षीय व्यक्तीने जिंकली 5 कोटी रुपयांची लॉटरी
पंजाबमधील डेराबस्सीमध्ये 88 वर्षीय व्यक्तीने 5 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. मी गेल्या 35-40 वर्षांपासून लॉटरी खरेदी करत असल्याचे महंत द्वारका दास यांनी सांगितले.
07:35 January 20
महिला पोलीस हवालदारांनी बँक लुटण्याचा प्रयत्न हाणून पाडला
बिहारमधील हाजीपूर येथे एका बँकेचे रक्षण करणाऱ्या महिला पोलीस हवालदारांनी तीन सशस्त्र दरोडेखोरांशी मुकाबला करताना बँक लुटण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
06:56 January 20
Breaking News : रोजगार मेळा' ही आपल्या सुशासनाची ओळख - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 71,000 नियुक्ती पत्रांचे वितरण करणार आहेत. या प्रसंगी पंतप्रधान या नियुक्त्यांना संबोधित करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.