ETV Bharat / state

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी 'या' तारखेला मतदान, सहारियांची घोषणा - maharashtra cricket association election

देशातील सर्व राज्य अथवा विभागांच्या क्रिकेट असोसिएशनच्या शिखर परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून माजी राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने दिले होते. त्या अनुषंगाने सहारिया यांची या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी 'या' तारखेला मतदान, सहारिया यांची घोषणा
author img

By

Published : Sep 26, 2019, 6:42 PM IST

मुंबई - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) शिखर परिषदेच्या (Apex Council) सदस्य आणि विविध पाच पदाधिकाऱ्यांच्या पदांसाठी २ ऑक्टोबर २०१९ ला मतदान होणार आहे. याच दिवशी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे, याची घोषणा निवडणूक अधिकारी तथा माजी राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.

देशातील सर्व राज्य अथवा विभागांच्या क्रिकेट असोसिएशनच्या शिखर परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून माजी राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने दिले होते. त्या अनुषंगाने सहारिया यांची या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

सहारिया यांनी सांगितले, की 'शिखर परिषदेच्या एकूण १८ सदस्य आणि विविध ५ पदाधिकाऱ्यांच्या विविध पदांसाठी ही निवडणूक होत आहे. शिखर परिषदेच्या सदस्य पदासाठी २८ सप्टेंबर २०१९ला सकाळी ११ पासून २९ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. त्यांची छाननी ३० सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. छाननीनंतर त्याच दिवशी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन तासांचा अवधी असेल.'

'उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान २ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पार पडेल. त्यानंतर दुपारी २.३० वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ४.१५ वाजता एमसीएची सर्वसाधारण सभा होईल व त्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या पाच पदांसाठी मतदान होईल. ही प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केले जातील, असे सहारिया यांनी सांगितले.

'या' दिवशी होणार मतदार यादी जाहीर -
सहारिया यांनी मतदार यादीचाही कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २६ सप्टेंबर २०१९ला सकाळी १०.३० वाजता एमसीएच्या सूचना फलकावर व संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप यादीप्रमाणे १६४ मतदार आहेत. या यादीवर २७ सप्टेंबर २०१९ला सायंकाळी ५ वाजेपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी २८ सप्टेंबर २०१९ ला सकाळी साडेदहा वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा - आयपीएल प्रेमींसाठी मोठी बातमी, 'या' महिन्यात होणार लिलाव

हेही वाचा - '...अन् मी सलामीवीर बनलो', वाचा सचिनची कहाणी...

Intro:Body:
mh_mum_mca_sahariya_mumbai_7204684

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनसाठी
2 ऑक्टोबर रोजी मतदान
-सहारिया यांची घोषणा
मुंबई: राजकीय आणि आर्थिक दृष्टीनं महत्वाची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) शिखर परिषदेच्या (Apex Council) सदस्य आणि विविध पाच पदाधिकाऱ्यांच्या पदांसाठी 2 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल, अशी घोषणा निवडणूक अधिकारी तथा माजी राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.

देशातील सर्व राज्य अथवा विभागांच्या क्रिकेट असोसिएशनच्या शिखर परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून माजी राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने भातीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने दिले होते. त्याअनुषंगाने श्री. सहारिया यांची या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, शिखर परिषदेच्या एकूण 18 सदस्य आणि विविध पाच पदाधिकाऱ्यांच्या विविधपदांसाठी ही निवडणूक होत आहे. शिखर परिषदेच्या सदस्यपदासाठी 28 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 पासून 29 सप्टेंबर 2019 रोजी सायंकाळी 5 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यांची छाननी 30 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. छाननीनंतर त्याच दिवशी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन तासांचा अवधी असेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. मतदान 2 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत पार पडेल. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता मतमोजणी सुरू होईल.
निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच दिवशी 2 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी 4.15 वाजता एमसीएची सर्वसाधारण सभा होईल व त्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या पाच पदांसाठी मतदान होईल. ही प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केले जातील.
मतदार यादी जाहीर
सहारिया यांनी मतदार यादीचाही कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 26 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता एमसीएच्या सूचना फलकावर व संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रारूप यादीप्रमाणे 164 मतदार आहेत. या यादीवर 27 सप्टेंबर 2019 रोजीय सायंकाळी 5 वाजेपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी 28 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता जाहीर केली जाईल.
---------

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.