मुंबई - आज (शुक्रवारी) राज्यात ५,९६५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,१४,५१५ वर पोहचला आहे. तसेच ७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६,९८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.५९ टक्के एवढा आहे. याबरोबरच राज्यात आज एकूण ८९,९०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
८९,९०५ अॅक्टिव्ह रुग्ण -
राज्यात आज ३,९३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर एकूण १६,७६,५६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०७,२२,१९८
प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,१४,५१५ नमुने म्हणजेच १६.९२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२८,४६२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ७,११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा - जाणून घ्या एखादी लस तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? प्रक्रिया काय?
कधी किती रुग्ण आढळून आले -
राज्यात जून महिन्यादरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, यानंतर ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे.
राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.