ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचे अवघे 782 रुग्ण; तर 2 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Feb 27, 2022, 7:00 PM IST

राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी घट झाली ( Corona Patients Decreased Maharashtra ) असून आज दिवसभरात अवघे ७८२ बाधित सापडले आहेत. तर केवळ दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे. ( Maharashtra Corona Update 27th February 2022 )

maharashtra corona update on 27th february 2022
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी घट झाली ( Corona Patients Decreased Maharashtra ) असून आज दिवसभरात अवघे ७८२ बाधित सापडले आहेत. तर केवळ दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे. ( Maharashtra Corona Update 27th February 2022 ) सक्रिय रुग्ण ७२२८ इतके असून १ हजार ३६१ ठणठणीत बरे झाले आहेत. तर दुसरीकडे ओमयक्रोनचा आज एक ही रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ( Maharashtra Heath Department Corona Update )

राज्यात आजपर्यंत एकूण कोरोनावर मात केलेल्या संख्या संख्या ७७,१०,३७६ इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०३ % एवढे झाले आहे. आज राज्यात ७८२ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर बाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७८,२४,८५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६५,२९८ (१०.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,३६,४४५ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर ७४४ व्यक्ती संस्थातमक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा - Aditya Thackeray on Marathi Bhasha Diwas : 2024 ला दिल्ली सर करणारच; मराठी भाषा गौरव दिनी मंत्री आदित्य ठाकरेंचा निर्धार

ओमायक्रॉनबद्दल माहिती

आजपर्यंत राज्यात एकूण ४६२९ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४४५६ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ९३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी ८३३३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. तर १०४९ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान, राज्यातील एकूण सक्रिया रुग्णांची संख्या ७२२८ इतकी आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.