ETV Bharat / state

#COVID19 : काळजी घ्या...! अन्यथा, महाराष्ट्राची वाटचाल होणार 'या' दिशेने

देशातील परिस्थिती बघता, कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. केंद्रिय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 11201 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. 1748 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 437 रूग्णांचा मृत्यू झाला आहे आणि एकाला स्थलांतरीत करण्यात आहे.

maharashtra corona update mumbai
maharashtra corona update mumbai
author img

By

Published : Apr 17, 2020, 11:16 AM IST

मुंबई - जगभरासह देशात कोरोना विषाणूमुळे दिवसेंदिवस अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होत आहे. भारतात महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. सुरुवातीला महाराष्ट्र आणि केरळ हे दोन राज्य आघाडीवर होते. मात्र, हळूहळू महाराष्ट्राने केरळला मागे टाकले आणि देशात सर्वात जास्त कोरोनाचे रूग्ण हे राज्यात आढळत आहेत. राज्यात शेवटची आकडेवारी हाती आली असता, 3205 रूग्णांना कोरोनाची लागणी झाली आहे. तर यात 76 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. तसेच 300 रूग्णांना निदान करण्यात आले आहेत. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहेत. तर 194 रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

देशातील परिस्थिती बघता, कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. केंद्रिय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 11201 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. 1748 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 437 रूग्णांचा मृत्यू झाला आहे आणि एकाला स्थलांतरीत करण्यात आहे.

maharashtra corona update mumbai
केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली आताची आकडेवारी.

यासंदर्भात सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी सतत माहिती देत आहेत. राज्यातील, देशातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गुरूवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. राज्यात कंटेनमेंट कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने कोरोना रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा दोन दिवसांवरून सहा दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर राज्यात अजून सहा ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा निर्माण होणार असल्याने राज्यातील प्रयोगशाळांची संख्या ३६ होईल,अशी माहितीही त्यांनी दिली.

राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात जास्त आहे. त्यातील ८३ टक्के मृत्यू हे रुग्णाला पूर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मुत्रपिंडाचा विकार यामुळे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत झालेल्या ५१ हजार चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या ह्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. एकूण झालेल्या चाचण्यांपैकी अडीच टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्या शासकीय २१ आणि खासगी १५ चाचणी प्रयोगशाळा आहेत त्यात अजून सहा प्रयोगशाळांची भर पडून ही संख्या ३६ होईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - टाटाकडून मोलाची मदत; १५० कोटींच्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

कोरोनामुळे सुरूवातीला 21 दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती. मात्र, एकंदरीत परिस्थिती बघत हा कालावधी पुन्हा 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा, शेती याबाबत टाळेबंदीत शिथीलता आणण्याबाबत केंद्र शासनाकडून ज्या सूचना दिल्या जातील त्याचे पालन केले जाईल. २० एप्रिल नंतर परिस्थिती पाहून टाळेबंदीमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे राज्याची वाटचाल अत्यंत भयंकर दिशेने होत आहे. जनतेने यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा राज्याला एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असे चित्र आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.