मुंबई - राज्यात कोरोना रुग्णसंख्येत आज (दि. 11 जानेवारी) पुन्हा घट झाली आहे. दिवसभरात 34 हजार 424 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली ( New Corona Patients in Maharashtra ) असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. पण, सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार असल्याने चिंता वाढली ( Active Corona Patients in Maharashtra ) आहे. ओमायक्रॉनचे ( New Omicron Patients in Maharashtra ) आज 34 रुग्ण आढळून आले. सर्वाधिक पुणे महापालिकेमध्ये 25 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत एकही ओमायक्रॉन रुग्ण आढळला नाही, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
आज 18 हजार 967 जण कोरोनामुक्त - राज्यात मागाील आठवडाभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला ( Maharashtra Corona Update ) होता. सुमारे 44 हजार रुग्ण सापडत होते. मागील 24 तासांत 34 हजार 425 नव्या रुग्णांची नोंद ( New Corona Cases in Maharashtra ) झाली. त्यामुळे 69 लाख 87 हजार 938 इतकी झाली आहे. आज 18 हजार 967 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचा आकडा 66 लाख 21 हजार 70 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 94.74 टक्के इतका आहे. दिवसभरात 22 रुग्ण दगावले असून मृत्यूदर घटून 2.2 टक्के इतका झाला आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 9 लाख 28 हजार 954 चाचण्या केल्या. या चाचण्यांपैकी 09.85 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 14 लाख 68 हजार 987 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 3 हजार 32 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. 2 लाख 21 हजार 477 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रॉनचे आज 34 रुग्ण - राज्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार आज (दि. 11 जानेवारी) 34 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली. सर्वाधिक 28 रुग्ण पुणे महापालिका, पुणे ग्रामीण 6, सोलापूर 2 आणि पनवेलमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 1 हजार 281 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. 1 डिसेंबरपासून आजपर्यंत 2 लाख 63 हजार 562 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमान तळावर उतरले. एकूण 76 हजार 995 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 484 आणि इतर देशातील 553, अशा एकूण 1 हजार 37 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर आजपर्यंतच्या 4 हजार 92 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. त्यापैकी 80 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
- विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
- मुंबई महापालिका - 11 हजार 647
- ठाणे महापालिका - 2 हजार 199
- ठाणे - 874
- नवी मुंबई पालिका - 1 हजार 969
- कल्याण डोंबिवली महापालिका - 1 हजार 107
- वसई विरार महापालिका - 798
- नाशिक - 374
- नाशिक महापालिका - 1 हजार 26
- अहमदनगर - 263
- अहमदनगर महापालिका - 129
- पुणे - 962
- पुणे पालिका - 3 हजार 531
- पिंपरी चिंचवड पालिका - 1 हजार 668
- सातारा - 365
- नागपूर महापालिका - 706
- ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण
- मुंबई - 606
- पुणे महापालिका - 276
- पिंपरी चिंचवड - 69
- सांगली - 59
- नागपूर - 51
- ठाणे महापालिका - 48
- पुणे ग्रामीण - 40
- कोल्हापूर - 18
- पनवेल - 18
- उस्मानाबाद - 11
- नवी मुंबई - 10
- सातारा - 10
हेही वाचा - Mumbai Corona Pandemic to Endemic : मुंबईत लवकरच कोरोना संपणार; पालिका प्रशासनाने व्यक्त केला विश्वास