ETV Bharat / state

#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

maharashtra-corona-update-live-24th-june-2021
#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
author img

By

Published : Jun 24, 2021, 8:01 AM IST

Updated : Jun 24, 2021, 10:27 PM IST

22:22 June 24

राज्यात गुरुवारी १९७ मृतांची नोंद

मुंबई - राज्यात दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा सातत्याने बदलताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात १९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील मृतांचा एकूण आकडा १ लाख १९ हजार ८५९ इतका झाला आहे. राज्याचा मृत्यूदर २ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गुरुवारी दिवसभरात ९ हजार ८४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या आजपर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांचा आकडा आता ६० लाख ७ हजार ४३१ इतका झाला आहे. 

14:12 June 24

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज - सुरेश काकाणी

मुंबई - कोविड म्हणजेच कोरोना विषाणू संसर्गाच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेचा सामना करण्‍यासाठी जम्बो कोविड सेंटर्ससह सर्व कोरोना काळजी केंद्रांमधील बेड सुसज्ज ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयासह जम्‍बो सेंटर्समध्‍ये लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. लहान मुलांची नागरिकांनी विशेष काळजी घ्‍यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने काकाणी यांनी केले आहे.

11:37 June 24

'डेल्टा प्लस रुग्णाबाबत उदय सामंत माहिती लपवत आहेत'

सिंधुदुर्ग - कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यसरकार, जिल्हाप्रशासन तसेच सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आणि आमदार यांच्याकडून सातत्याने बेजबाबदार कृत्य होत आहेत. एका बाजूला आरोग्यमंत्री रत्नागिरीत कोरोनाचा डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याचे सांगत असताना रत्नागिरीचे स्थानिक आमदार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे सांगतात, की रत्नागिरीला पेशंटच नाहीत. परंतु, त्याचवेळी सिंधुदुर्गातही डेल्टा प्लसचा रुग्ण आढळून येतो. मग पालकमंत्री ही बाब लपवून का ठेवत आहेत ? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

कोरोनाची दुसरी लाट संपून आता तिसरी लाट येवू पाहतेय. ती येवू नये म्हणून सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्याबाबतीत सत्य लपवून आणि लोकांना फसवून काहीच अर्थ नाहीय. सगळ्याच बाबतीत हातसफाई करून उपयोग नाही. हे जर रोखायचे असेल, तर बाधीत रुग्णाच्या संक्रमण मार्गाचा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेवून तिसरी लाट कशी थांबवता येईल, यादृष्टीने जिल्हाप्रशासनाने काम केले पाहिजे आणि पालकमंत्र्यांनी जबाबदार पद्धतीने पालकत्व निभावले पाहिजे, असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

10:36 June 24

देशात 54,069 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली - गेल्या २४ तासांत देशात 54,069 नवीन रुग्ण आढळलेले आहेत. तर 68,885 हे बरे झालेले आहेत. तर 1,321 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर देशात आतापर्यंत 3,00,82,778 कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात 6,27,057 सक्रिय रुग्ण आहेत. तर 2,90,63,740 रुग्ण हे आतापर्यंत बरे झाले आहेत. तर 3,91,981 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाले आहेत. 30,16,26,028 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

कोरोनाचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 96.61% झाले आहे. तर साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 3.04% आणि दिवसाचा पॉझिटीव्हीटी दर हा 2.91% आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

08:04 June 24

नागपुरात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट

नागपूर - जिल्ह्यात रुग्णसंख्या चाचणीच्या तुलनेत कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी आलेल्या अहवालात 9 हजार 413 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये 46 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले. यात शहरी भागात 25 तर ग्रामीण भागात 20 बाधित रुग्णांचा समावेश आहे. शहर आणि ग्रामीणमध्ये शून्य मृत्यू तर बाहेर जिल्ह्यातील एक रुग्ण दगावला आहे. मागील 24 तासात 97 जणांपैकी शहरातील 62 तर ग्रामीणचे 35 जण कोरोना मुक्त झाले आहे. सक्रिय रूग्णांमध्ये 196 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 462 रुग्ण हे गृहविलगिकरणामध्ये आहेत. जिल्ह्याच्या पॉझिटीव्हीटी दर हा 0.50 इतका आहे. तर रिकव्हरी रेट 97.96 म्हणजे 98 टक्क्यावर आलेला आहे.

06:12 June 24

Corona LIVE: राज्यात १० हजारांहून अधिक नवे रुग्ण

मुंबई - राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १०,०६६ नवे रुग्ण आढळले. तर मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. गेला आठवडाभर रुग्णसंख्या कमी होत गेली. पण गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून ती पुन्हा १० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. दिवसभरात १६३ जणांचा मृत्यू झाला.

Last Updated : Jun 24, 2021, 10:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.