ETV Bharat / state

Maharashtra Corona Update: पुन्हा वाढतोय कोरोनाचा कहर; मागील तीन वर्षात 'या' वयोगटात सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू - mumbai news

मुंबईमध्ये कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. मार्च २०२० पासून गेल्या तीन वर्षात ३० ते ३९ वर्षातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल ४० ते ४९, त्यानंतर २० ते २९ आणि ५० ते ५९ वयातील रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६० ते ६९ वयातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. त्या खालोखाल ७० ते ७९ आणि ५० ते ५९ वयातील रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

Maharashtra Corona Update
कोरोना रुग्ण
author img

By

Published : Apr 12, 2023, 7:29 AM IST

मुंबई : गेल्या तीन वर्षाचा अनुभव पाहता पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ९ वर्षाखालील २३ हजार ८३६, १० ते १९ वयातील ६१ हजार ८७५, २० ते २९ वयातील १ लाख ९० हजार ३४६, ३० ते ३९ वयातील २ लाख ३३ हजार १०७, ४० ते ४९ वयातील १ लाख ९४ हजार ९३८, ५० ते ५९ वयातील १ लाख ८० हजार ७५८, ६० ते ६९ वयातील १ लाख ३२ हजार ६६५, ७० ते ७९ वयातील ७७ हजार ५६६, ८० ते ८९ वयातील २८ हजार ८६८ तसेच ९० वर्षावरील ४ हजार ५५६ रुग्ण नोंद झाले आहेत.

'या' वयातील रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू : ९ वर्षाखालील ३१, १० ते १९ वयातील ६७, २० ते २९ वयातील २३९, ३० ते ३९ वयातील ६८१, ४० ते ४९ वयातील १७७३, ५० ते ५९ वयातील ३९५६, ६० ते ६९ वयातील ५३०२, ७० ते ७९ वयातील ४८०६, ८० ते ८९ वयातील २४७८ तसेच ९० वर्षावरील ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये एकूण १९ हजार ७४९ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ५० वर्षांवरील १६ हजार ९२० मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत १.७० टक्के इतका मृत्यू दर आहे.

३५ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३ व्हेंटिलेटरवर : मुंबईमध्ये गेल्या तीन वर्षात ११ लाख ५८ हजार ९८३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ११ लाख ३७ हजार ७७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या तीन वर्षात १९,७५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये सध्या १४५४ सक्रिय रुग्ण आहेत. १०२ रुग्ण हॉस्पिटलमध्ये असून त्यातील ३५ रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज पडली आहे. सध्या ३ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.

आयुक्तांनी मास्क लावण्याचे केले आवाहन : गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी मुंबईमध्ये पालिकेच्या सर्व रुग्णलयात तसेच कार्यालायात सुरक्षेचा उपाय म्हणून मास्क लावण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी केले आहे. ६० वर्षांवरील वयोवृद्धांनी तसेच ज्यांना इतर आजार आहेत, अशा नागरिकांनी मास्क लावावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

हेही वाचा : Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना रुग्णसंख्या एका दिवसात तीन पटीने वाढली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.