ETV Bharat / state

Maharashtra Corona Update: कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकार सज्ज; नवे ४८३ कोरोना रुग्ण तर ३ मृत्यूंची नोंद - कोरोना विषाणू

राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा सुरू झाला आहे. बुधवारी राज्यात तब्बल ४८३ रुग्णांची तर ३ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही १३५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Maharashtra Corona Update
कोरोना विषाणूचा प्रसार
author img

By

Published : Mar 30, 2023, 8:14 AM IST

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, सांगली या सहा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. तर चार आठवड्यापूर्वी असलेल्या पॉजीटिव्हीटी रेटमध्ये सहा पटीने वाढ झाली आहे. पनवेल पालिका येथे १ आणि कोल्हापूर येथे २ अशा एकूण ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ३१७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८१ लाख ४२ हजार ९९२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७९ लाख ९२ हजार ०४५ रुग्ण बरे झालेले आहेत. १ लाख ४८ हजार ४४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सहा जिल्ह्यातील पॉजीटिव्हीटी रेट अधिक : राज्यात चार आठवड्यापूर्वी १.०५ इतका पॉजीटिव्हीटी रेट होता. त्यात आता सहा पटीने वाढ झाली आहे. २२ ते २८ मार्च दरम्यान ६.१५ टक्के इतका
पॉजीटिव्हीटी रेट झाला आहे. सोलापूरमध्ये २०.०५ टक्के, सांगली १७.४७ टक्के, पुणे १२.३३ टक्के, कोल्हापूर १५.३५ टक्के, नाशिक ७.८४ टक्के, अहमदनगर ७.५६ टक्के इतका पॉजीटिव्हीटी रेट आहे.
राज्यात एकून ऑक्सीजन प्लांट ५२३ यात ५५२ एमटी ऑक्सीजन निर्मिती करु शकतात. तसेच एकून ३७० लिक्वीड ऑक्सीजन टॅक आहेत. जंबो सिलेंडर - ५६५५१, छोटे सिलेंडर - २०,००० आणि डयुरा सिलेंडर १००० उपलब्ध आहेत.

उपचार सुविधा : सध्या १५८९ कोविड रुग्णालये आहेत. ५१, ३८० आयसोलेशन खाटा उपलब्ध आहेत. ४९, ८८९ ऑक्सीजन बेड आहेत. १४, ४०६ आयसीयु बेड आहेत. ९२३५ व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. लसीकरणाचा पहिला डोस ९,१६,७०,७५९ इतक्या नागरिकांनी घेतला आहे. लसीकरणाचा दुसरा डोस ७,६६, २५, ०९८ इतक्या नागरिकांनी घेतला आहे. लसीकरणाचा बुस्टर डोस ९६,५६,६६४ इतक्या नागरिकांनी घेतला आहे. आतापर्यंत १७,७९,५२,५२१ कोरोना लसीचे डोस देण्यात आलेले आहे.

मुंबईत १३९ रुग्ण : मुंबईत बुधवारी १३९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा ११ लाख ५६ हजार ७२४ वर पोहचला आहे. बुधवारी मुंबईत एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूचा आकडा १९ हजार ७४७ वर स्थिरावला आहे. ११ लाख ३६ हजार २४६ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या ७३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ५७ रुग्ण रुग्णालयात दाखल आहे. त्यापैकी ३६ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. राज्यात २५०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा : Corona Update : सावधान! कोरोनाने वाढवली चिंता; राज्यातील 'हे' विभाग आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.