ETV Bharat / state

#MHCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर... - कोरोना लाईव्ह महाराष्ट्र बातमी

corona live
कोरोना लाईव्ह
author img

By

Published : Jun 18, 2021, 6:39 AM IST

Updated : Jun 18, 2021, 3:03 PM IST

14:20 June 18

राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी पाच स्तरावर आखणी करण्यात आली आहे. या आठवड्यातही कोल्हापूर अजूनही डेंजर झोनमध्ये आहे. राज्यातील पॉझीटिव्हिटी रेट किती आहे, यावर ही आखणी करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्य सरकारने नव्याने आकडेवारी जाहीर केली आहे. यात कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक म्हणजेच 13.77% इतका आहे. त्याखालोखाल रायगड जिल्ह्यामध्ये 12.77% पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर तिथेच कोल्हापूरमध्ये ऑक्सिजन बेड हे 54.78 टक्के भरले आहेत. तर रायगडमध्ये त्यामानाने ऑक्सिजन बेड हे केवळ 14.6 टक्के इतकेच भरलेले आहेत.

14:19 June 18

मुंबई - राज्य सरकारकडून जिल्ह्याचे पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. गोंदियाचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वात कमी तर कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यात सर्वात अधिक आहे. गेल्या आठवड्यापेक्षा मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

12:28 June 18

रत्नागिरी - राज्यातील अन्य जिल्ह्यांसह मुंबई, पुण्यात रुग्णसंख्या कमी होत असताना, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोमवार 21 जूनला रत्नागिरी दौर्‍यावर येत आहेत.

09:37 June 18

देशातील कोरोनाची सद्यस्थिती -

एकूण रुग्णसंख्या - 2,97,62,793 

एकूण बरे झालेले रुग्ण - 2,85,80,647 

एकूण मृत्यू - 3,83,490 

सक्रिय रुग्ण - 7,98,656 (73 दिवसांनंतर 8 लाखांच्या खालची संख्या)

एकूण लसीकरण - 26,89,60,399

09:36 June 18

मागील 24 तासांत देशात 62,480 नविन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 88,977 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, याबरोबरच 1,587 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 

07:30 June 18

औरंंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, तरी दुसरीकडे म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील रुग्णांना लागणारे औषध रुग्णालयात मिळत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत घेतली. या रुग्णांना वेळेवर औषधांचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना करण्यात आली.

रुग्णालयाचे प्रशासनाकडे बोट -

गेल्या काही दिवासांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली ही समाधानकारक बाब असली तरी म्यूकोरमायकोसिस बाधितांची संख्येत वाढ होत आहे. यातच शहरातील एका खासगी रुग्णालयात रुग्णांना औषध मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी औषध का मिळत नाही, विचारणा केली असता खासगी रुग्णालयात औषध नसल्याचे कारण सांगत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखवले जात आहे.

06:59 June 18

नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांमध्ये घट होताना दिसत आहे. मात्र, रुग्णसंख्येसोबतच शहारासह ग्रामीण भागात मृत्युदर घटल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसात सातत्याने ग्रामीण भागातील मृत्युदर कमी होऊन पाच दिवसात एकही रुग्ण न दगावल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. यासोबत रुग्णालयात केवळ 300च्या जवळपास रुग्ण उपचार घेत आहेत. या प्रकृती गंभीर असणाऱ्या रुग्णाची संख्या अल्प होत असल्याने दिलासा मिळाला आहे. 

06:09 June 18

राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती

राज्यात काल (गुरुवारी) 9830 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 5890 जण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, याबरोबरच 236 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1,39,960 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील एकूण बाधितांची संख्या 59,44,710 इतकी झाली आहे.

Last Updated : Jun 18, 2021, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.