ETV Bharat / state

सत्तेच्या हव्यासापोटीच महाराष्ट्राचा 'रेमडेसिवीर'चा पुरवठा थांबवला; सचिन सावंत यांचा आरोप

राज्याला निर्यात करणाऱ्या रेमडेसिवीर कंपन्यांना औषधाचा पुरवठा करू नये, असे आदेश देत परवाना रद्द करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. हा प्रकार निंदनीय असून मानवतेला काळिमा फासणारा प्रकार आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर केला.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Apr 17, 2021, 7:07 PM IST

मुंबई - महाराष्ट्रातील सत्तेच्या हव्यासापोटी मोदी सरकारने राज्याला निर्यात करणाऱ्या रेमडेसिवीर कंपन्यांना औषधाचा पुरवठा करू नये, असे आदेश देत परवाना रद्द करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. हा प्रकार निंदनीय असून मानवतेला काळिमा फासणारा प्रकार आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर केला.

मोदी सरकार किती लोकांचा बळी घेणार

राज्यात कोविडची रुग्णसंख्या वाढली आहे. परिणामी रेमडेसिवीरची कमतरता भासत आहे. केंद्राने राज्याला रेमडेसिवीरचा पुरवठा करावा, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. परंतु, रेमडेसिवीरची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना मोदी सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करू नये, असे आदेश देताना आदेशाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार महाविकास आघाडी सरकारने उघडकीस आणला आहे. तसेच मादी सरकारच्या कार्यपध्दतीवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचे पाऊल अत्यंत क्रूर आणि भयंकर असून मानवतेला काळिमा फासणारे आहे, अशी घणाघाती टीका सावंत यांनी केली. तसेच सत्तेच्या हव्यासापोटीच मोदी सरकार महाराष्ट्रातील किती लोकांचा बळी घेणार, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राला सापत्न वागणूक

कोरोनाच्या संकटाचा मोदी सरकार राजकीय संधी म्हणून वापर करत आहे. मानवतेच्या समोर असलेल्या या संकटामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून एकत्रितपणे मुकाबला करणे अपेक्षित असताना मोदी सरकार मात्र महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकारची बदनामी कशी होईल, यासाठी केंद्रातील मंत्री ट्रोलच्या भूमिकेत शिरले आहेत. महाराष्ट्राला वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा वेळेवर व पुरेशा प्रमाणात केला जात नाही. लस आणि ऑक्सीजनच्या पुरवठ्यातही महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली जात आहे, असा आरोप सावंत यांनी केला. तसेच आता महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनही मिळू नये, याकरता केंद्र सरकार रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांचे हार पिरगाळत असतील तर या पेक्षा अमानवीय कोणतेही सरकार असू शकत नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी याचा जाहीर निषेध करते, असे सावंत म्हणाले.

संबंधित कंपन्यांवर कारवाई करा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून राज्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याची मागणी केली. परंतु पंतप्रधान पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे मुख्यमंत्र्यांना कळवण्यात आले. यातूनच हे आधुनिक निरो देश जळत असताना निवडणूक प्रचारात मग्न आहेत, अशीच नोंद इतिहास घेईल, अशी टिका केली. तसेच केंद्र सरकार जर राज्याला रेमडेसिवीरचा पुरवठा होऊ देणार नसेल तर महाराष्ट्र सरकारने या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.