ETV Bharat / state

...अन् रॉबर्टसेठचा दणदणीत पराभव झाला! सचिन सावंतांची भाजपावर टीका - सचिन सावंत भाजपा टीका

१ डिसेंबरला राज्यात झालेल्या विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. यात महाविकास आघाडीने भाजपाचा पराभव केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाची तुलना 'अमर-अकबर-अँथनी' चित्रपटातील खलनायक रॉबर्ट शेटशी केली आहे.

sachin sawant
सचिन सावंत
author img

By

Published : Dec 4, 2020, 5:36 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारला भारतीय जनता पार्टी 'अमर-अकबर-अँथनी'चे सरकार म्हणून हिणवत होता. हा चित्रपट जसा हिट झाला, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे 'कॉम्बिनेशन'ही हिट झाल्याचे विधान परिषदेच्या निकालावरून स्पष्ट झाले. या 'अमर-अकबर-अँथनी'नेच रॉबर्ट शेटचा दणदणीत पराभव केला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली.

सचिन सावंतांनी भाजपावर टीका केली

फडणवीसांच्या भ्रमाचा भोपळा फुटला -
विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना सचिन सावंत बोलत होते. भाजपाच्या रुपाने लोकशाही समोर मोठे संकट उभे आहे. यातून मार्ग काढण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. देशहितासाठी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्राला एक स्थिर सरकार दिले आहे. विधान परिषदेचे निकाल हे या तीन पक्षांच्या एकोप्याचे फळ आहे. भाजपाचे १०५ आमदार कामी आले नाहीत. त्यांना एक जागा मिळाली तीही पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यामुळे. मस्तवालपणात वागणाऱ्या भाजपासाठी ही मोठी चपराक आहे. दोन दिवसांपूर्वीच १०५ चे १५० होतील अशा वल्गना करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या भ्रमाचा भोपळा आजच्या निकालामुळे फुटला आहे, असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

भाजपाला मतदारांनीच नाकारले -
वर्षानुवर्षे भाजपाच्या ताब्यात असलेला नागपूर पदवीधर मतदारसंघही त्यांच्या हातून निसटला आहे. फडणवीसांच्या वारसाहक्काच्या या मतदार संघातून त्यांचे वडील लढले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २५ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. असे असूनही त्यांना ही जागा राखता आली नाही. ५५ वर्षांपासूनचा भाजपाचा हा बालेकिल्ला आता ढासळला आहे. फडणवीसांना आपला गड सांभाळता आला नाही आणि महाराष्ट्राच्या सत्तेची स्वप्ने त्यांना पडत आहेत, अशी टीका सचिन सावंत यांनी केली. विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडी सरकारवर लोकांनी दाखवलेला विश्वास आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतचा हा सुशिक्षित मतदार बेरोजगारी, आर्थिक संकटाच्या गर्तेत लोटलेला असून हे नरेंद्र मोदी सरकारमुळेच झालेले आहे. सुशिक्षित मतदारांचा आक्रोश आणि राग मतदारांनी या निवडणुकीतून व्यक्त केलेला आहे, असेही सावंत म्हणाले.

भाजपाच महाराष्ट्र द्रोही -
मागील एक वर्षापासून भाजपा महाराष्ट्र द्रोहाचे काम करत आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी, अभिनेत्री कंगणा रणौत यांच्याबरोबर हा पक्ष वाहवत जात आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही भाजपाने मुंबई पोलीसांची मानहानी केली गेली. मुंबईची पाकिस्तानशी तुलना करणाऱ्या कंगना रणौतला भाजपा नेते झाशीची राणी म्हणतात. महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेला सातत्याने राज्याचा अवमान सहन झाला नाही, निवडणुकीच्या निकालातून तोच संताप त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपाला आता भविष्यातील नामुष्की स्पष्ट दिसत असल्याने ऑपरेशन कमळला आता वेग येईल. ईडी, इन्कमटॅक्ससारख्या यंत्रणांना चवताळून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सोडले जाईल, असेही सावंत म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.