ETV Bharat / state

शेअर बाजार सुरळीत सुरुच राहणार, गुंतवणूकदार तज्ञानी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे केले स्वागत

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे यात कोणताही वाद नाही. मुंबईत घडलेल्या छोट्या मोठ्या घटनांचे पडसाद शेअर बाजारवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करत असतात. आता बाजारातील व्यवहार बंद केले असते तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम झालाअसता, असे जैस्वाल यांनी सांगितले.

maharashtra cm decision on business
शेअर बाजार सुरळीत सुरुच राहणार, गुंतवणूकदार तज्ञानी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे केले स्वागत
author img

By

Published : Mar 21, 2020, 4:03 AM IST

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कार्यालयातील उपस्थिती 25 टक्के तर खाजगी क्षेत्रातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी शेअर बाजारातील व्यवहारांवर कोणत्याही बंदीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले नसल्याने या निर्णयाचे स्वागत शेअर बाजाराच्या अभ्यासकांनी केले आहे.

शेअर बाजार सुरळीत सुरुच राहणार, गुंतवणूकदार तज्ञानी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे केले स्वागत
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे यात कोणताही वाद नाही. मुंबईत घडलेल्या छोट्या मोठ्या घटनांचे पडसाद शेअर बाजारवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करत असतात. आता बाजारातील व्यवहार बंद केले असते तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम झालाअसता, असे जैस्वाल यांनी सांगितले. शेअर बाजाराशी सेबी, एन.एस.ई ही जोडले आहेत. या विभागातील बदलही अर्थ व्यवस्थेवर परिणाम करणारे आहेत. या विभागाचे कामकाज ही मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने सुरळीत चालणार आहेत. सेबी आणि इतर आर्थिक संस्थांची कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय आर्थिक घडीवर परिणाम करणारा ठरेल याची जाणीव ही मुख्यमंत्र्यांना आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारी कार्यालये 25 टक्के तर खाजगी क्षेत्रातील कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला तरी आता शेअर बाजाराचे कामकाज सुरूच राहील याबाबत आम्ही त्यांचे अभिनंदन करतो, असेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.