ETV Bharat / state

यंदा वाढदिवस साजरा करणार नाही; जनआरोग्य शिबिरे अन् प्लाझ्मादान करण्याचे ठाकरेंचे आवाहन - ddhav Thackeray Will Not Celebrate His Birthday

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना साथीच्या आजाराने ग्रस्त लोकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत, रक्त आणि प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 24, 2020, 8:25 AM IST

मुंबई - देशभरामध्ये कोरोना विषाणूनाचा प्रसार झाला आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वांत जास्त प्रकोप पाहायला मिळत आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना साथीच्या आजाराने ग्रस्त लोकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत, रक्त आणि प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे.

सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट आहे. या संकटात कोणीही कार्यालयात किंवा 'मातोश्री' निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच वाढदिवसाला कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये. त्याऐवजी नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. मोठ्या प्रमाणावर रक्तदान, प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले आहे.

गेल्या 4 महिन्यांभपासून राज्य सरकार हे नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे आणि आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे. आपण दिलेल्या शुभेच्छा मी सर्व कोविड योद्धांना समर्पित करीत आहे, असे आवाहन मुख्यमत्र्यांनी केले आहे.

दरम्यान येत्या 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.