नागपूर - राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू झाले आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारला घेरण्याची क्षमता या विरोधकांमध्ये नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते अतिशय ताकतीने महाराष्ट्राचा विकास करता आहेत. उलट विरोधकांनी त्यांच्या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राला मागे नेल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
Maha Budget Session 2023 LIVE Updates : अभिभाषणात मविआ सरकारच्या कामांचा समावेश - आदित्य ठाकरे
16:24 February 27
शिंदे आणि फडणवीस सरकारला घेरण्याची क्षमता या विरोधकांमध्ये नाही- चंद्रशेखर बावनकुळे
16:24 February 27
अभिभाषणात मविआ सरकारच्या कामांचा समावेश - आदित्य ठाकरे
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली असून राज्याचे नवे राज्यपाल रमेश भाई यांच्या अभिभाषणातून राज्य सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा आणि भविष्यात सरकारकडून केल्या जाणाऱ्या विकास कामाचा उल्लेख अभिभाषणात करण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने नव्या राज्यपालांची दिशाभूल केली आहे राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाचा समावेश करण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी विधान भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा आरोप केला.
15:56 February 27
राज्यपालांचे भाषण हिंदीत, तेही राजभाषा दिनी, हा महाराष्ट्राचा अपमान - जितेंद्र आव्हाड
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभेच्या संयुक्त सभागृहात राज्यपाल आपले पहिले भाषण हिंदीत करतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणावर आपली नाराजी व्यक्त केली.
15:42 February 27
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 'तेरी भी चूप मेरी भी चूप'
मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात नेहमीच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर विविध प्रश्नांसंदर्भात हल्लाबोल केलेला पाहायला मिळतो. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांकडून विविध आंदोलन केली जातात. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस तेरी भी चूप मेरी चूक मध्येच गेला.
15:26 February 27
महाराष्ट्राचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी बिघडवलं - भास्कर जाधव
मुंबई - महाराष्ट्रात राजकारण हे सुसंस्कृत होतं. केवळ आणि केवळ राजकारण केलं जात नव्हतं. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती होते. मात्र ते बिघडवण्याचं काम या महाराष्ट्रात केवळ एकच नेत्यांनी केल, ते नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घाणाघाती टीका केली आहे. आपल्याच पक्षातील अनेक नेत्यांना संपवण्याचा काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अशा प्रकारचे राजकारण महाराष्ट्रात कधीही राजकारण करण्यात आले नव्हते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राजकारण बिघडवण्याचे काम केलं असल्याचे विधानभवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
14:59 February 27
मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी पंतप्रधानांना भेटणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
मुंबई - मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या दहा वर्षांपासून राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत मात्र अद्यापही तो मिळत नसल्याबाबत आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या शिष्टमंडळाला घेऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याची घोषणा सभागृहात केली.
13:05 February 27
मराठी भाषा संस्कृतपेक्षाही जुनी, अभिजात दर्जा द्या: छगन भुजबळांची विधानसभेत मागणी

12:16 February 27
मुख्यमंत्र्यांविरोधात विधानपरिषदेत घोषणाबाजी
मुंबई - मुख्यमंत्री विरोधकांना देशद्रोही कसे म्हणू शकतात, असा सवाल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. त्यांनी देशद्रोही नेमके कोण याची माहिती द्यावी. असे सांगून विरोधकांनी मुख्यमंत्री विरोधात जोरदार घोषणाबाजी विधानपरिषदेत केली. सरकारचा धिक्कार.. तानाशाही नही चलेगी अशी जोरदार घोषणाबाजी.
12:05 February 27
मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी पंतप्रधानांना साकडे घालणार - मुख्यमंत्री
मुंबई - मराठी भाषेसंदर्भात सर्व सदस्यांच्या भावना सारख्याच आहे. त्यांचा सकारात्मक विचार केला पाहिजे. त्यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री यासंदर्भात पंतप्रधानांना भेटून विनंती करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न करु असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
12:00 February 27
खूप प्रयत्न करुनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का नाही - भुजबळ यांचा सवाल
मुंबई - मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आपण खूप प्रयत्न केले. त्यासाठी १८८५ साली भागवत यांनी संशोधन केले. दुर्गा भागवत यांच्या संशोधनानुसार संस्कृतपेक्षा जुनी मराठी भाषा आहे. २५०० वर्षापेक्षा जुनी भाषा आहे. गाथा सप्तशती सर्वात जुनी आहे. सात वर्षांपूर्वी केंद्राला यासंदर्भात पत्र पाठवले आहे. मात्र केंद्राने अजूनही मान्य केले नाही. आतापर्यंत मराठी भाषेला अभिजात दर्जा का दिला नाही असा सवाल माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
11:57 February 27
मराठी भाषा भवन उभारणार - राज्यपाल
मुंबई - मराठा आरक्षण प्राप्त करून देण्यासाठी काम करणार आहे, असे राज्यपालांनी भाषणात सांगितले. मराठी भाषा भवन उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चार विभागांना एकत्र आणणार असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.
11:26 February 27
राज्यपालांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे.. पहा काय म्हणाले नवे राज्यपाल
- महाराष्ट्र माझा राज्यगीतला मान्यता. सीमावर्ती भागातील लोकांसाठी विविध योजना लागू केल्या आणि अंमलबजावणी सुरू आहे.
- कोविड नंतरच्या अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न.
- 75 हजार कर्मचारी भरती करणार .
- मराठा समाजाला 1553 जागा भरण्याचे विचाराधीन.
- युवा तरुणांसाठी गोंदिया आणि गडचिरोली येथे औद्योगिक संस्था तयार केली.
- आधुनिक यंत्रणा. स्वतंत्र सेनानीसाठी आर्थिक मदत.
- पेशन देखील 10 हजार रुपयांवरुन 30 हजार केल.
- महाराष्ट्र प्रमुख औद्योगिक राज्य. 2026 - 27 पर्यंत जीडीपी वाढवणार .
- उद्योगात मैत्री नावाची यंत्रणा कार्यान्वित केली..
- वडाळा ते सीएसटी पर्यंत वाहतूक व्यवस्थेसाठी जाळे विणले जात आहे.
- बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे.
- नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग सुरू केला.
- 7 लाख वाहनांनी आतापर्यंत ये - जा केली.
- राज्यात सडक निर्माण कार्य हाती घेतले आहे.
- बळीराजा जल संजीवनी योजना राबवत आहोत.
- 2 लाख 73 पर्यंत क्षेत्र .
- शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो आहे.
- पोलिसांसाठी आवास योजना .
- म्हाडा अंतर्गत मुंबईकरना घर उपलब्ध करून देणार .
- ग्रामिण भागात अटल भूजल योजना .
- वन्य प्राण्यांच्या हल्लात होणाऱ्या घटनांत मदतीची रक्कम वाढवली .
- मृत्यू झाल्यास 15 वरून 20 लाख केली.
- हिंगोली जिल्ह्यात हळदी उत्पादन केंद्र, शासन निधी देणार .
- संपूर्ण कोकणात फल फसल योजना आणली असून 1 कोटी तरतूद केली आहे.
11:08 February 27
राज्यात ७५ हजार सरकारी जागांची भरती होणार: राज्यपाल रमेश बैस
- राज्यात ७५ हजार सरकारी जागांची भरती होणार: राज्यपाल
- मैत्री योजनेच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या
- स्वातंत्र्यसैनिकांनी पेन्शन १० हजारांवरून २५ हजार रुपये केली
- उद्योगांना चालना देण्यासाठी विविध योजना
- सरकारने मेट्रोच्या नवीन योजना हाती घेतल्या आहेत
11:04 February 27
राज्यात नवी नोकर भरती होणार: राज्यपाल, मराठा समाजासाठी सरकारकडून विशेष योजना
सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी विविध योजना सुरु
राज्यात विविध क्षेत्रात भरती सुरु
आमचं सरकार जनतेच्या हितासाठी झटणारे
राज्यात नवी नोकर भरती होणार: राज्यपाल
मराठा समाजासाठी सरकारकडून विशेष योजना: राज्यपाल
गोंदिया आणि गडचिरोलीत नवीन प्रशिक्षण संस्था
11:01 February 27
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, राज्यपाल रमेश बैस यांचं भाषण सुरु..

10:40 February 27
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षाचे आमदार सभागृहात दाखल
मुंबई: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षाचे आमदार सभागृहात दाखल... शिवरायांना केलं अभिवादन
10:31 February 27
ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदेंच्या शिवसेनेकडून व्हीप जारी, न पाळल्यास होणार कारवाई : प्रतोद भरत गोगावले

08:51 February 27
Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates
मुंबई: आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. ९ मार्च रोजी सभागृहात अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तत्पूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. अर्थसंकल्पीय अधिवेशन 30 दिवसाचं आहे, दीड महिन्याचं हवं अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. राज्याचे प्रश्न अनुउत्तरीत आणि जसेचे तसे आहेत. सर्व क्षेत्रातील अनुशेष अजूनही जशाच्या तसा आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, हतबल झाला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात उद्भवलेला दिसून येत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही कुठलाही उपयोग होत नाही. राज्यातली यंत्रणाही कुणाच्यातरी दबावाखाली काम करते. त्यामुळे या अधिवेशनात मी आक्रमक भूमिका घेणार आहे, अशी प्रतिक्रियाही एकनाथ खडसेंनी दिली आहे.