पुणे - आमचे 'डबल हॉर्सपॉवर' सरकार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व शक्तीनिशी काम करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Breaking News : आमचे डबल हॉर्सपॉवर सरकार सर्व शक्तीनिशी काम करेल - देवेंद्र फडणवीस - महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या
21:26 February 18
आमचे डबल हॉर्सपॉवर सरकार सर्व शक्तीनिशी काम करेल - देवेंद्र फडणवीस
19:58 February 18
स्पाइसजेटच्या मुंबई-तिरुपती फ्लाइटच्या उड्डाण वेळेत बदल; फ्लाइट रद्द केल्याची केवळ अफवा
मुंबई-तिरुपती फ्लाइट रद्द करण्यात आली असल्याची अफवा पसरली होती. मात्र, ही फ्लाईट रद्द झाली नसून, फ्लाइटच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आली आहे.
19:38 February 18
आमचा धनुष्यबाण चोरला, या चोरांचा पर्दाफाश करू - संजय राऊत
मुंबई - आमचा 'धनुष्यबाण' चोरीला गेला आहे. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. आम्ही किंगपिन शोधून त्यांना लोकांसमोर आणू. आम्हाला नंतर पक्षाची नवीन चिन्ह मिळेल, परंतु त्यापूर्वी आम्ही या चोरांचा पर्दाफाश करू, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.
19:22 February 18
भिवंडीत आणखी चार बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करून अटक
ठाणे : भिवंडीतील कामगार वस्तीच्या शहरात असंख्य झोपडपट्टी विभागांमधून बोगस डॉक्टर सर्रासपणे सर्वसामान्य नागरिकांवर औषध उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळ करीत आहेत. याबाबत अनेक तक्रारी महापालिका आरोग्य विभागाकडे आल्या आहेत. अशाच एका तक्रारीनंतर भिवंडी शहरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आणखी चार बोगस डॉक्टरवर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत चारही बोगस डॉक्टरांना अटक केली आहे.
19:01 February 18
18:48 February 18
18:38 February 18
मानपाडा परिसरात डॉक्टरने केली आत्महत्या; आत्महत्येपूर्वी दिला होता नोकरीचा राजीनामा
ठाणे -मानपाडा परिसरातील हॅप्पी व्हॅली सोसायटीमध्ये राहणाऱ्या आणि मुंबईच्या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरने शनिवारी सकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली. चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
18:19 February 18
शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर ठाण्यात ठाकरे गटाच्या बैठका सुरू
शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्या नंतर ठाण्यात ठाकरे गटाच्या बैठका..
ठाकरे गट शिंदे गटाला उत्तर देण्याच्या तयारीत ठाकरे गटाच्या महत्वाच्या पदाधिकारी व जुन्या शिवसैनिकांची बैठक..
उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रेरनेतून ठाण्यात ठाकरे गटाकडून खरी शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करणार...
17:37 February 18
भंडारा जिल्ह्यात महाप्रसाद घेणाऱ्या भाविकांना चारचाकीने उडवले, 7 जण जखमी
भंडारा - तुमसर महामार्गावर मोहाडी येथे अनियंत्रित चारचाकी वाहनांने धडक दिल्याने सात नागरीक जखमी झाले आहे. आज महाशिवत्री असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी महाप्रसाद वाटप सुरू आहे. मोहाडी शहारातील महादेव मंदिरात सुध्दा महाप्रसाद वाटप सुरु होते. नागरिक मोठया संख्येने महाप्रसाद घेण्यासाठी आले होते, त्याच वेळेवर भंडारा कडून तुमसर च्या दिशेने जाणाऱ्या वॅगनार गाडी क्र. MH 12GF 3008 अनियंत्रित होऊन महाप्रसाद घेत असलेल्या नागरिकांना जोरदार धडक देत समोर उभ्या असलेल्या दुचाकीवर जावून थांबली. त्यामध्ये सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार मोहाडी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
16:55 February 18
राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन
मुंबई - नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले आहे. बैस यांनी आज सकाळी पदाची शपथ घेतली आहे.
16:32 February 18
कव्वाली स्पर्धेत मुंबई विद्यापीठ अव्वल राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत मुंबईने पहिला मान मिळवला
मुंबई - इंडियन युनिव्हर्सिटीजने आयोजित केलेल्या पाचव्या आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. १६ ते १७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान शारदा विद्यापीठ, नोएडा, नवी दिल्ली येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचा एक भाग म्हणून कव्वालीच्या विविध प्रकारांना प्रोत्साहन आणि या कव्वालीच्या विविध प्रकारांना टिकवून ठेवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यामध्ये महाराष्ट्राने आपली मान उंचावलेली आहे आणि मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे.
16:32 February 18
स्टेट बँकेच्या भोंगळ कारभारामुळे 90 टक्के एसटी कामगारांना वेतन नाही; कर्मचारी संघटनांचा आरोप
मुंबई - एसटी महामंडळाकडून 90,000 कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन वेळेवर होत नाही. अनेक एसटी कामगार कर्मचाऱ्यांच्या घरातील चुली पेटणार कशा .हा प्रश्न निर्माण झाला. काही एसटी चालक आणि वाहक यांनी आंदोलन करण्याच्या नोटिसा महामंडळा दिल्या होत्या. अशातच कवठेमहांकाळच्या एका कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. "शासनाने 208 कोटी रुपये जारी केले खरी. मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तांत्रिक दोषामुळे अद्यापही 90 टक्के एसटी कर्मचारी कामगारांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे शासनाने लवकर वेतन रक्कम बँकेला दिले नाही . बँकेचा तांत्रिक भोंगळ कारभार यामुळे 90 टक्के कामगारांना वेतन अद्यापही प्राप्त झालेले नाही, असा आरोप श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.
16:16 February 18
आम्हाला गुवाहाटीची कामाख्या देवी पावली - आमदार अनिल बाबर
सांगली - आम्हाला गुवाहाटीची कामाख्या देवी पावली आहे,अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शिंदे गटाचे सांगलीचे जेष्ठ आमदार अनिल बाबर यांनी दिली आहे.
15:35 February 18
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आरएसएस हेडक्वार्टरला भेट
नागपूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागपुरातील RSS हेडक्वार्टरमध्ये जाऊन RSS संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि लेखक एमएस गोळवलकर यांना श्रद्धांजली वाहिली.
15:10 February 18
अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याजवळ महिलेचा विनयभंग; ऑटोरिक्षात घडला प्रकार
मुंबईतील जुहू येथे ऑटोरिक्षात बसून एका महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याजवळ ही घटना घडली. अरविंद अजय वाघेला याला अटक केली आहे. आयपीसी कलम 354 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे, याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
14:57 February 18
उद्धव ठाकरे यांचे संबोधन मशाल चिन्ह सुद्ध हे काढून टाकतील आता लढाई सुरू झाली खचून जायचं नाही, यांना निवडणुकीतून उत्तर द्या
उद्धव ठाकरे यांचे संबोधन
मशाल चिन्ह सुद्ध हे काढून टाकतील
आता लढाई सुरू झाली
खचून जायचं नाही, यांना निवडणुकीतून उत्तर द्या
14:01 February 18
Breaking News : मुळ शिवसेना असल्याने शिंदे गट शिवसेनेच्या सर्व कार्यालयांवर हक्क सांगणार? -सुत्र
मुंबई : मुळ शिवसेना असल्याने शिंदे गट शिवसेनेच्या सर्व कार्यालयांवर हक्क सांगणार आहे अशी सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, कार्यालये ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत अशीही माहिती समोर आली आहे.
13:25 February 18
Breaking News : थोड्याच वेळात ठाकरे गटाची बैठक, खासदार, आमदार मातोश्रीवर पोहचले
मुंबई : मातोश्रीवर ठाकरे गटाचे खासदार, आमदार पोहचले असून थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्याने ही तातडीची बैठक बोलवल्याची प्राथमिक माहिती आहे.
12:41 February 18
Breaking News : रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पद व गोपनियतेची शपथ घेतली
मुंबई : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी शपथ घेतली आहे. उच्य न्यायालयाच्या मुख्य न्यामुर्तींनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
12:21 February 18
Breaking News : ठाकरे गटाला मशाल चिन्ह कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीनंतर वापरता येणार नाही
मुंबई : ठाकरे गटाला आता मशाल चिन्हही कायमस्वरूपी वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. हे चिन्ह फक्त कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीपुरतेच वापरता येणार. त्यानंतर ते वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.
12:01 February 18
Breaking News : पत्राचाळ घोटाळा प्रकरण! राऊतांचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी ईडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर सध्या सुनावणी सुरू झालेली आहे.
11:18 February 18
Breaking News : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता - सुत्र
मुंबई : राज्यात बऱ्याच दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. आता शिंदे यांच्या बाजूने पक्ष आणि नाव आल्याने हा मार्ग मोकळा झाला आहे अशा चर्चांना उधान आले आहे. तसेच, काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी सुत्रांची माहिती आहे.
10:34 February 18
Breaking News : विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ आली -राऊत
मुंबई : ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला अधिकार दिले मग तुम्ही असे निर्णय कसे घेऊ शकता असाही प्रश्न विचारला आहे. याचवेळी लोक आमच्यासोबत आहेत असा दावाही त्यांनी केल आहे. याचवेळी दुसऱ्याच्या लग्नात अब्दुल्ला दिवाना म्हणत त्यांनी राणे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली आहे.
10:16 February 18
Breaking News : उद्धव ठाकरे यांच्याकडून मशाल चिन्ह काढून घेण्याची समता परिषदेची मागणी
मुंबई : सध्या उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह आहे. परंतु, हे मशाल चिन्ह आमचे आहे असा दावा करत ते ठाकरे यांच्याकडून काढून घ्यावे अशी मागणी समता परिषदेकडून करण्यात आली आहे. नुकतेच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. दरम्यान, आता मशाल चिन्हही काढून घेण्याची मागणी केली जात आहे.
10:02 February 18
Breaking News : अमित शहा थोड्याच वेळात डॉ. हेडगेवार व गोलवलकर गुरुजी यांच्या स्मृति स्थळास भेट देणार
नागपूर : केंद्रिय गृहमंत्री अमित शाह आज नागपूरमध्ये असून ते डॉ. हेडगेवार व गोलवलकर गुरुजी यांच्या स्मृति स्थळास भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शाह आज नागपूर दौरा आटोपून पुणै दौऱ्यावर येत आहेत.
08:48 February 18
Breaking News : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आमदार खासदारांची बैठक बोलावली
मुंबई : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज आमदार खासदारांची बैठक बोलावली आहे. दुपारी १ वाजेच्या सुमारास मोतोश्रीवर ही बैठक होणार आहे. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच आपल्या गटातील आमदारांची बैठक घेत आहेत.