ETV Bharat / state

Breaking News : शिवसेनेचे माजी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख मदन कदम यांच्या गोळीबारात दोन ठार, एक जखमी - महाराष्ट्र क्राईम न्यूज

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Mar 19, 2023, 6:31 AM IST

Updated : Mar 19, 2023, 10:45 PM IST

22:44 March 19

मीरा भाईंदरमधील बागेश्वर धामच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी

बागेश्वर धाम सरकारचा मीरा रोड कार्यक्रम संपल्यानंतर चेंगराचेंगरी झाली.

मीरा रोड येथे आयोजित केलेल्या २ दिवसीय कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. मीरा रोड पोलिसांनी लाठीचार्ज केला.

22:38 March 19

शिवसेनेचे माजी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख मदन कदम यांच्या गोळीबारात दोन ठार, एक जखमी

सातारा - ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख मदन कदम यांनी पाटण तालुक्यातील मोरणा खोऱ्यात केलेल्या गोळीबारात दोघे जण ठार झाले असून एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना पवनचक्कीच्या जुन्या व्यवहारातून झाल्याची चर्चा आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मदन कदम हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळाकडे रवाना झाला आहे. स्थानिकांनी मदन कदम यांच्या घराभोवती वेढा दिला आहे. गोळीबारात ठार झालेला एकजण उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा कार्यकर्ता असल्याचे समजते.

21:04 March 19

दहिसरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

भाजप पदाधिकाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला

भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी

दहिसर पोलिसांनी दोघांना केली अटक

20:51 March 19

अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ; वांद्रे पोलिसांनी दाखल केला गुन्हा

मुंबई - अभिनेता सलमान खानला ईमेलद्वारे धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. वांद्रे पोलिसांनी आयपीसीच्या कलम ५०६(२), १२०(बी) आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

याआधी शनिवारी मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानच्या कार्यालयाला धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गुंडांवर तुरुंगात गुन्हा दाखल केला.

20:47 March 19

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी; अनेकजण जखमी

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या अंबरनाथ शहरातील शिव फेस्टिवल मध्ये तुफान गर्दी, गर्दीचा रेट वाढल्याने चेंगराचेंगरी होऊन अनेक नागरिक जखमी,

जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी केला दाखल

19:52 March 19

कोकणी माणून धनुष्यबाणाच्या पाठिशी - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांचे खेडमध्ये भाषण

ठाकरेंवर जोरदार टीका

कोकणी माणून धनुष्यबाणाच्या पाठिशी

कोकणवासी बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करतात

17:57 March 19

धीरेंद्र शास्त्री यांच्या मीरा रोड येथील दरबाराचा आजचा शेवटचा दिवस

जय श्री राम क्या आप हिंदू राष्ट्र बनाने के लिये तय्यार है?

बागेश्वर बाबांच्या दरबारात गीता जैन यांचं वक्तव्य

धिरेंद्र शास्त्री यांच्या मीरा रोड येथील दरबाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. धिरेंद्र बाबाचे सत्संग ऐकण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून श्रद्धाळू मीरा रोड इथं आली आहेत.

या उपस्थितांना मार्गदर्शन करताना गीता जैन यांनी हे हिंदू राष्ट्रबाबत वक्तव्य केले आहे

17:45 March 19

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी वनडे; भारताचा लाजीरवाणा पराभव

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी कोलमडली. विशाखापट्टणमच्या मैदानात सुरु या सामन्यात भारतीय संघ अवघ्या 117 धावांत सर्वबाद झाला आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 31 तर अक्षर पटेलनं नाबाद 29 धावा केल्या आहेत.

17:33 March 19

भांडुप पश्चिम येथील श्रीराम कॉलेजसमोरील गार्मेंटला आग

दुपारी ३.५१ वाजताची घटना

आग विजवण्याचे प्रयत्न सुरू

आगीमध्ये कोणीही जखमी नाही

16:36 March 19

पवन खेडा आक्षेपार्ह विधान प्रकरण; 20 मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली - काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने त्यांच्याविरोधात आसाम आणि उत्तर प्रदेशमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावर पवन खेडा यांनी दोन्ही प्रकरणे एकमेकांशी जोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी 20 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.

15:35 March 19

हुंड्यासाठी पत्नीची हत्या केल्याचा आरोप, कुटुंबातील पाच जणांची निर्दोष मुक्तता

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील न्यायालयाने हुंड्यासाठी पत्नीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

14:17 March 19

रेल्वेमंत्र्यांचा दिल्ली-अजमेर शताब्दी एक्सप्रेसने प्रवास

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली-अजमेर शताब्दी एक्स्प्रेसने प्रवास केला. त्यांनी प्रवाशांकडून रेल्वे प्रवासाबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.

14:11 March 19

भावनिकरित्या दोषी ठरवण्याची कायद्यात तरतूद नाही, सबळ पुराव्याअभावी पाच जणांची निर्दोष मुक्तता

ठाणे जिल्ह्यातील न्यायालयाने 2014 मध्ये हुंड्यासाठी पत्नीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरला आहे आणि एखाद्याला भावनिकरित्या दोषी ठरवण्याची कायद्यात तरतूद नसल्याची टिप्पणीदेखील न्यायालयाने केली आहे.

14:05 March 19

उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे काय देणार प्रत्युत्तर, आज घेणार खेडमध्ये सभा

उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला एकनाथ शिंदे आज खेडमध्ये काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

14:04 March 19

पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, अमृतपालच्या साथीदारांना अटक करून जप्त केला सहा शस्त्रे

अजनाळा एफआयआर संदर्भात पंजाब पोलिसांनी कारवाई करत अमृतपाल सिंगच्या 7 साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून 12 बोअरची सहा शस्त्रे व काडतुसे जप्त करण्यात आली असून ती सर्व बेकायदेशीर आहेत. अमृतपालला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास अमृतसर एसएसपी (ग्रामीण) सतींदर सिंग यांनी व्यक्त केला.

13:29 March 19

दिल्ली पोलिसांनी चौकशी केल्यानंतर राहुल गांधी घराबाहेर निघाले...

दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त सागर प्रीत हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली पोलिसांच्या पथकाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर काही वेळाने काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या निवासस्थानावरून निघून गेले.

13:15 March 19

पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मनेषकुमार खोलवडीकर यांना मारहाण

पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मनेषकुमार खोलवडीकर यांना रुग्णाकडून पेण पोलिसांच्या समोरच मारहाण करण्याची घटना शनिवारी पहाटे घडली. विशेष म्हणजे सदर रुग्ण राजू पाटील हा डॉक्टर मनेषकुमार खोलवडीकर यांना मारहाण करताना व नर्स, सुरक्षा रक्षक यांना अर्वाच्च व अरेरावीची भाषा वापरत असताना तेथे उपस्थित असलेल्या दहा ते बारा पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. पोलिसांच्या समोर ही घटना घडल्याने पेण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. रात्री उशिरा राजू पाटील विरोधात पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

12:14 March 19

धाराशिवच्या जिल्हा सरकारी वकीलावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

धाराशिवच्या जिल्हा सरकारी वकीलावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी उस्मानाबाद येथील जिल्हा सरकारी वकीलाविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

12:13 March 19

वेश्याव्यवसायासाठी भाग पाडल्याच्या आरोपावरून नालासोपारा येथे २७ वर्षीय तरुणाला अटक

महिलांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली.

11:39 March 19

अमृतपालच्या अटकेसाठी पंजाब पोलिस अधिक सक्रिय, अफवांना आळा घालण्याकरिता इंटरनेटसह सर्व सेवा राहणार बंद

अमृतपालच्या अटकेसाठी पंजाब पोलिसांनी आज मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशात अफवांना आळा घालण्यासाठी पंजाब सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व मोबाइल इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा (बँकिंग आणि मोबाइल रिचार्ज वगळता) आणि मोबाइल नेटवर्कवर प्रदान केलेल्या सर्व डोंगल सेवा, व्हॉईस कॉल वगळता उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात येणार आहेत.

11:26 March 19

भरधाव कारने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुंबईतील वरळी परिसरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. कारचा चालकही जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे वरळी पोलिसांनी सांगितले.

11:12 March 19

बागेश्वर दरबारात चोरी हे गृहमंत्र्यांचे अपयश-दिलीप वळसे पाटील

बागेश्वर दरबारात चोरी हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे. शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. मात्र कर्मचारी संपावर असल्याने पंचनामे होत नसल्याची टीका माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

10:28 March 19

कायदेमंत्री किरण रिजिजूंचा न्यायालयावर दबाव-संजय राऊत

कायदेमंत्री वारंवार न्यायालयावर दबाव आणतात. न्यायव्यवस्था टाचेखाली आणण्याचा सत्ताधार्यांचा प्रयत्न असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

08:58 March 19

आंबेगाव तालुक्यामधील गंगापूर गावामध्ये अफुची शेती, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील गंगापूर गावामध्ये अफुची शेती करणाऱ्या विरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे. यावेळी दोन लाखाचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे. घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कार्यवाही करण्यात आली आहे. आठ दिवसांमध्ये ही दुसरी कारवाई आहे .

07:57 March 19

दोन परीक्षांमध्ये नापास झाल्याच्या भीतीने १५ वर्षीय मुलाची आत्महत्या

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या दोन परीक्षांमध्ये नापास झाल्याच्या भीतीने एका 15 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. मृत काही दिवस तणावाखाली होता. ज्या दिवशी त्याची आई गेली होती त्याच दिवशी त्याने आत्महत्या केली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

06:24 March 19

वारी पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंग फरार घोषित

वारी पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंग फरार घोषित करण्यात आल्याची माहिती जालंधरचे आयुक्त कुलदीप सिंग चहल यांनी दिली. त्याचे वडील तरसेम सिंग म्हणाले, की आमच्याकडे त्याच्याबद्दल माहिती नाही. पोलिसांनी आमच्या घराची ३-४ तास झडती घेतली. त्यांना काहीही बेकायदेशीर आढळले नाही. तो घरातून निघून गेल्यावर पोलिसांनी त्याला अटक करायला हवी होती.

06:23 March 19

न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम सर्वोत्तम प्रणाली-सरन्यायाधीश

न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी आम्ही विकसित केलेली कॉलेजियम सर्वोत्तम प्रणाली, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

06:22 March 19

Maharashtra Breaking News : खासगी बसचा पुण्यातील बावधनजवळ अपघात, पाच जण जखमी

मुंबई: मुंबईहून बंगळुरूकडे जाणाऱ्या खासगी बसला पुण्यातील बावधनजवळ मुंबई-बंगळुरू महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले. पुणे अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

Last Updated : Mar 19, 2023, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.