ETV Bharat / state

Breaking News राज्यातील 25 लाख हेक्टर शेती नुकसान भरपाई शासन देणार - ईटीव्ही भारत लाईव्ह

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Nov 2, 2022, 6:29 AM IST

Updated : Nov 2, 2022, 7:59 PM IST

19:57 November 02

राज्यातील 25 लाख हेक्टर शेती नुकसान भरपाई शासन देणार

मुंबई - राज्यातील 25 लाख हेक्टर शेती नुकसान भरपाई शासन देणार आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या शेतीची देखील नुकसानभरपाई मिळणार आहे. सरकारच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

19:49 November 02

दिवाळीच्या काळात चार कोटी जनतेने केला एसटीने प्रवास

मुंबई - दिवाळीत एसटीने मोठी कामगिरी केल्याचे समोर आले आहे. या दिवाळीच्या काळात चार कोटी जनतेने एसटीने प्रवास केला. त्यामुळे एसटीचे उत्पन्न 275 कोटी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

19:47 November 02

पाच वर्षीय चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय नराधमाचा बलात्कार

ठाणे - पाच वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजार धर्माला काळिमा फासणारी ही घटना टिटवाळा भागात घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र नराधम फरार झाला आहे. त्याच्या शोधात पोलिसांचे पथके रवाना करण्यात आले आहे.

19:32 November 02

मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या शंभरच्या खाली

मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या खाली आली आहे. आज ८५ नव्या रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या अडीच वर्षात १५० हून अधिक वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. त्यातही घट होऊन ५८४ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

18:22 November 02

मेघालयच्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग

तुरा येथून जाताना खराब हवामानामुळे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांचे हेलिकॉप्टर तात्काळ उतरवण्या आले. उमियाम, शिलाँग येथील युनियन ख्रिश्चन कॉलेज येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

18:12 November 02

टी-२० वर्ल्डकप भारत-बांग्लादेश सामन्यात भारताचा बांग्लादेशवर ५ धावांनी विजय

टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि बांग्लादेश यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ५ धावांनी विजय मिळवला. भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील आजचा चौथा सामना होता. मागील दोन सामने भारताने जिंकले आहेत. तिसऱ्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेने पराभव केला. आजच्या सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बांग्लादेशवर विजय मिळवल्याने भारत आता गुप्र एमध्ये अव्वल स्थानी पोहचला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमवत १८४ धावा केल्या.

18:00 November 02

सलमान खानच्या केतन कक्कड विरोधातील याचिकेवर 9 नोव्हेंबरला निर्णय

मुंबई - अभिनेता सलमान खान याने पालघर येथील शेजारी केतन कक्कड विरोधात दाखल केलेल्या मानहानी याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार होते. मात्र अद्यापही ऑर्डर डिक्टेशन झाली नसल्याने आज निर्णय लांबणीवर पडला आहे. आता या याचिकेवर 9 नोव्हेंबर रोजी निर्णय देण्यात येणार आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयाला दिवाळीनिमित्त सुट्ट्या असल्याने केवळ सुट्टीकालीन कोर्टात सुरू आहे.

17:34 November 02

अमली पदार्थ विरोधी कारवाईत मुख्य आरोपीची 19.58 कोटी रुपये किमतीची संपत्ती केली जप्त

मुंबई - पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने 2400 kg पेक्षा जास्त वजनाचा एमडी ड्रग्स जप्त केलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीची 19 कोटी 58 लाख 44 हजार 550 किमतीची संपत्ती जप्त केली आहे.

17:06 November 02

मॉलमध्ये घसरगुंडीवर खेळताना साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

मुंबई - घाटकोपर परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना पुढे आली आहे. येथे मॉलमध्ये घसरगुंडीवर खेळताना एका साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरच्या नील योग मॉलमध्ये किड्स झोनमध्ये खेळत असताना तोल जाऊन या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

16:30 November 02

इंटरसेप्टर AD-1 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी

भुवनेश्वर - ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन किल अल्टीट्यूड ब्रॅकेटसह फेज-II बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स (BMD) इंटरसेप्टर AD-1 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी आज यशस्वीरित्या घेण्यात आली. सर्व BMD शस्त्र प्रणाली घटकांच्या सहाय्याने ही उड्डाण चाचणी घेण्यात आली.

16:16 November 02

गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीच्या जंगलात 3 गायींचे मृतदेह सापडले

मुंबई - गोरेगाव परिसरातील आरे कॉलनी युनिट 17 जवळच्या जंगलात 3 गायींचे मृतदेह सापडले आहेत. वनराई पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. 429 IPC अंतर्गत अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत.

15:47 November 02

गोव्याचे विमानतळ बंद करण्याचा विचार नाही - नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री सिंग

पणजी (गोवा) - नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी बुधवारी स्पष्ट केले की गोव्याचे विद्यमान विमानतळ बंद करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. नवीन विमानतळामुळे पूर्वीचे विमानतळ बंद होणार नाही, असे राज्यमंत्री सिंग यांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भातील अफवांचे खंडन केले.

15:03 November 02

धार्मिक भावना भडकावल्याबद्दल विविध राज्यांतील चार मुस्लिम धर्मगुरूंविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई - डोंगरी भागात एका कार्यक्रमादरम्यान प्रक्षोभक भाषण करताना धार्मिक भावना भडकावल्याबद्दल JJ मार्ग पीएस येथे विविध राज्यांतील चार मुस्लिम धर्मगुरूंविरुद्ध IPC कलम 153 आणि 295 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.

14:04 November 02

काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी सांगितली आपबिती, म्हणाले पोलिसांच्या धक्क्याने पडलो

नागपूर - काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी ते पडले तेव्हा नेमके काय झाले त्याची सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'मी भारत जोड यात्रेत होतो, आम्ही चार मिनार आधीच पार केला होता. मी स्टेजकडे जात असताना राहुल गांधींचा ताफा आला. पोलिसांनी घाबरून मला धक्काबुक्की केली. मी एका बॅरिकेडजवळ पडलो आणि जखमी झालो. मला रक्तस्त्राव सुरू झाला आणि शेवटी रुग्णालयात नेण्यात आले'

13:44 November 02

ममता बॅनर्जींच्या राष्ट्रगीत अवमान प्रकरणी 16 नोव्हेंबरला निकाल

मुंबई - ममता बॅनर्जींच्या राष्ट्रगीत अवमान प्रकरणी 16 नोव्हेंबरला निकाल देण्यात येणार आहे. एका कार्यक्रमात ममता बॅनर्जींवर राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी याबाबत सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती.

12:30 November 02

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबर रोजी निर्णय

मुंबई - संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबर रोजी निर्णय. संजय राऊत यांच्या प्रकरणात आज ईडीने लेखी उत्तर सादर केले. त्यानंतर कोर्टने आदेश राखून ठेवला.

12:15 November 02

ट्विटरच्या ब्लू टिकसाठी 8 डॉलर मोजावेच लागतील - मस्क

ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी आज स्पष्टच केले आहे की ट्विटरच्या ब्लू टिकसाठी 8 डॉलर मोजावेच लागतील. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सर्व तक्रारकर्त्यांसाठी तक्रार करत राहा परंतु ब्लू टिकची किंमत 8 डॉलर असेल. ती द्यावीच लागेल.

11:59 November 02

वेदांत प्रकल्पावरून सरकार भ्रम निर्माण करत आहे - अंबादास दानवे

मुंबई - सरकारचे लोक चुकीची माहिती देत आहेत. वेदांत प्रकल्पासाठी मविआ सरकारने सर्व प्रयत्न केले त्याची माहिती देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत बैठक घेतली त्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. एकप्रकारे मविआ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय.

11:55 November 02

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी

मुंबई - संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे. संजय राऊत हेदेखील सुनावणीसाठी कोर्टात हजर राहणार आहेत. संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनील राऊत, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि मुलगी कोर्टरूममध्ये हजर आहेत. कोर्टरूमबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. विशेष PMLA कोर्टात न्यायमूर्ती देशपांडे यांच्या कोर्टसमोर होणार सुनावणी होईल.

11:49 November 02

रुपी सहकारी बँक अवसायनात, धनंजय डोईफोडे अवसायक नियुक्त

पुणे -भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशानुसार रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द होऊन ती अवसायनात काढण्यात आली आहे. धनंजय डोईफोडे यांची बँकेचे अवसायक म्हणून सहकार आयुक्तांनी नियुक्ती केली आहे. बँकेचे प्रशासकीय मंडळ बरखास्त झाले आहे. रुपी बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्याचे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने ८ ऑगस्ट रोजी दिले होते. या आदेशाविरोधात बँकेने अर्थमंत्रालयाकडे दाद मागितली होती. मात्र, त्यावर सुनावणी होऊन केंद्रीय अर्थमंत्रालयाने बँकेची मागणी सोमवारी फेटाळली. त्यामुळे बँक अवसायनात काढण्यात आली. डोईफोडे यांची अवसायक म्हणून सहकार आयुक्त कवडे यांनी नियुक्ती केली आहे.

11:30 November 02

मोरबी पूल दुर्घटनेमधील आरोपींचे केस न घेण्याचा बार असोसिएशनचा निर्णय

मोरबी पूल दुर्घटनेमधील नऊ आरोपींना (ओरेवा कंपनीचे) अटक करण्यात आली आहे. मोरबी बार असोसिएशन आणि राजकोट बार असोसिएशनने त्यांची केस न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही बार असोसिएशनने हा ठराव पास केला आहे.

10:21 November 02

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे मनस्ताप, तिसऱ्या वर्षाची परीक्षा रखडली

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत विधी अभ्यासक्रमासाठी परीक्षा अर्ज जनरेट झाला नाही. विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे चौथ्या सत्राचे गुण संकेतस्थळावर नोंदवले गेलेच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडली. मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या साठी विद्यार्थी परीक्षा अर्ज करिता प्रवेश नोंदवत आहेत. मात्र विद्यापीठाच्या तांत्रिक गोंधळामुळे अनुभवलेली समस्या त्यामुळे चौथ्या सत्राचे गुण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दिसतच नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण झालेली आहे.

09:53 November 02

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीची नोटीस

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 3 नोव्हेंबर रोजी बेकायदेशीर खाण प्रकरणी चौकशीसाठी रांचीस्थित कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

09:05 November 02

माजी ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत भारत जोडो यात्रे दरम्यान जखमी

माजी ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत भारत जोडो यात्रे दरम्यान जखमी झाले आहेत. भारत जोडो यात्रे दरम्यान गर्दीचा धक्का लागल्याने नितीन राऊत रस्त्यावर कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम झाली आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना जवळील रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती ठीक आहे

08:48 November 02

पंतप्रधान मोदी दिल्लीत 3024 सदनिकांच्या चाव्या नागरिकांना सुपूर्द करणार

पंतप्रधान मोदी कालकाजी, दिल्ली येथे ‘इन-सिटू स्लम रिहॅबिलिटेशन’ प्रकल्पांतर्गत झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी बांधलेल्या 3024 सदनिकांचे उद्घाटन करणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना आज एका कार्यक्रमात चाव्या सुपूर्द करणार आहेत.

08:47 November 02

हैदराबाद शहरातून आज भारत यात्रेला सुरुवात, पूजा भट्टही सामील

अभिनेत्री-चित्रपट निर्माती पूजा भट्ट काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत सामील झाली. तेलंगणातील हैदराबाद शहरातून आज सकाळी यात्रेला पुन्हा सुरुवात झाली.

08:31 November 02

आज राज्यमंत्री मंडळाची बैठक, उद्योगांबाबत आज बैठकीत चर्चा

आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातून बाहेर पडत असलेल्या उद्योगांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर केवळ तीन महिन्यात पाच मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले आहेत. राज्यात होणारे प्रकल्प गुजरातमध्ये नेमके जातात कसे असा सवाल विरोधकांनी उठवत राज्य सरकारला घेण्याचा प्रयत्न केला आहे.

08:25 November 02

आरपीएफच्या जवानाने महिलेसह मुलाचे वाचविले प्राण

मानखुर्द रेल्वे स्थानकावर चढल्यानंतर प्रवाशांच्या धक्क्यामुळे चालत्या लोकल ट्रेनमधून पडलेल्या महिला आणि तिच्या मुलाचे प्राण आरपीएफच्या (रेल्वे संरक्षण दल) गुन्हे शाखेच्या दोन जवानांनी वाचवले.

08:10 November 02

राज्यात नऊ नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 विशेष मतदार नोंदणी, अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना संधी

राज्यात नऊ नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 विशेष मतदार नोंदणी आहे. अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना संधी आहे.. जानेवारी 2023 पासून एप्रिल व जुलै आणि ऑक्टोंबर महिन्यातदेखील नोंदणी होणार आहे. राज्यामध्ये मतदार नोंदणीसाठी या शासनाने महत्त्वाचा बदल करत नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी घोषणा केलेली आहे 18 वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांची नोंदणी 9 नोव्हेंबर ते आठ डिसेंबर या काळामध्ये विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ नोंदणी करता येईल.

07:37 November 02

कोल्हापुरात लव्ह जिहाद? आमदार नितेश राणे करणार आंदोलन

गेल्या अठरा दिवसापासून कोल्हापुरातून एक मुलगी बेपत्ता आहे. याप्रकरणी या मुली सोबत लव्ह जिहादचा प्रकार घडला आहे का अशी शंका उपस्थित होत आहे. मुलगी ही अल्पवयीन आहे. याबाबतची तक्रार मुलीच्या पालकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र 18 दिवस उलटूनही अद्याप कोणतेच कारवाई झालेले नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी जुना राजवाडा पोलिसांना याबाबत जाब विचारला.

06:56 November 02

ब्ल्यू टिक्ससाठी किती पैसे भरावे लागणार, एलॉन मस्क यांनी जाहीर केली किंमत

ट्विटरचे नवीन मालक मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ब्लू टिक्ससाठी वापरकर्त्यांना $8 (₹660) फी म्हणून भरावे लागतील. मात्र, देशानुसार शुल्क वेगवेगळे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

06:53 November 02

इंधन निर्यातीवरील शुल्कात वाढ

सरकारने 2 नोव्हेंबरपासून इंधनावरील कर सुधारित केला आहे. क्रूड पेट्रोलियमवरील निर्यात शुल्क 11,000 रुपये प्रति टन वरून 9500 रुपये प्रति टन करण्यात आले आहे. एटीएफवरील निर्यात शुल्क 3.50 रुपये प्रति लीटरवरून 5 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. डिझेलवरील निर्यात शुल्क 12 रुपये प्रति लिटरवरून 13 रुपये प्रति लीटर केल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

06:35 November 02

गुजरातचे जिल्हाधिकारी विदेशातील हिंदू, शीख आदी लोकांना नागरिकत्व देणार

गृहमंत्रालयाने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांसाठी नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. या अंतर्गत, या लोकांची चौकशी करून त्यांना नागरिकत्व देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे, अशी माहिती गुजरातमधील आनंदचे जिल्हाधिकारी डी एस गढवी यांनी दिली.

06:34 November 02

मंकीपॉक्स ही अद्याप जागतिक आरोग्य आणीबाणी

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की मंकीपॉक्स ही अद्याप जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून राहावी, असे आपत्कालीन समितीने ठरवले आहे.

06:33 November 02

उत्तर कोरियाने डागले अज्ञात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र

उत्तर कोरियाने पुन्हा आगळीक केली आहे. उत्तर कोरियाने अज्ञात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे.

06:21 November 02

Breaking News मोरबी पूल दुर्घटनेमधील आरोपींचे केस न घेण्याचा बार असोसिएशनचा निर्णय

मुंबई मुंबईतील गोदरेज कंपनीतील कर्मचाऱ्यांनी 2001 मध्ये कंपनीविरुद्ध विरोधात पुकारलेल्या संपामध्ये झालेल्या दंगलीमध्ये गोदरेज कंपनीतील आंदोलन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये 411 कर्मचाऱ्यांवर दंगल सुदृश्य स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्यातील सुनावणी दरम्यान गैरहजर राहिलेल्या 224 कर्मचाऱ्यांविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट काढला आहे.

Last Updated : Nov 2, 2022, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.