नांदेड - 'भारत जोडो यात्रा'ला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. यात्रा फक्त श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये थांबेल आणि आम्ही तिथे तिरंगा राष्ट्रध्वज फडकावू. देशाला जोडणे हा यात्रेचा उद्देशः काँग्रेस खासदार राहुल गांधी
Breaking News Live : 'भारत जोडो यात्रे'ला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही - राहुल गांधी
22:03 November 07
'भारत जोडो यात्रे'ला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही - राहुल गांधी
21:53 November 07
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गृह विभागाचे आदेश
मुंबई : महाराष्ट्र पोलीस अधिनियम अनुसार भारतीय आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि प्रतीक्षेत असलेल्या एकूण 109 अधिकाऱ्यांना आज गृह विभागाने पदस्थापना दिली आहे. त्यानुसार सोलापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची नेमणूक मुंबई शहर उपायुक्त पदी करण्यात आली आहे. तर मनोज पाटील यांचीही तेथेच बदली करण्यात आली आहे.
21:31 November 07
काँग्रेसची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल
नांदेड - तेलंगणातून काँग्रेसची भारत जोडो यात्रा नांदेड, महाराष्ट्रात दाखल झाली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत चालत आहेत.
19:56 November 07
चिमुरडीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षाचा कारावास
ठाणे - पाच वर्षीय चिमुरडीला शीतपेयाचे आमिष दाखवीत तिचे अपहरण केले. त्यानंतर निर्जनस्थळी तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ठाणे पॉक्सो न्यायलायच्या न्यायमूर्ती व्ही.व्ही. वीरकर यांनी सबळ पुराव्याच्या आधारे १० वर्षाच्या कारावासासह 25 हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. अनिल भोला यादव (वय ३६ ) असे शिक्षा ठोठावलेल्या नराधमाच नाव आहे.
18:40 November 07
सुप्रिया सुळे यांची माफी मागा, मुख्यमंत्र्यांचे मंत्री सत्तार यांना आदेश?
मुंबई -मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अर्वाच्च भाषेत वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात विविध ठिकाणी आक्रमक आंदोलन के आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अब्दुल सत्तार यांच्यावर संतापले आहेत, अशी माहिती मिळत आहे. अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे यांची माफी मागण्यास सांगितल्याचेही वृत्त आहे.
18:08 November 07
नगरसेविकेवर चोरट्यांनी भरदिवसा चाकू हल्ला करून लाखाचा ऐवज लुटला
सातारा - लोणंदच्या नगरसेविकेवर चोरट्यांनी भरदिवसा चाकू हल्ला करून लाखाचा ऐवज लुटला. राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ माजली आहे. नगरसेविका तृप्ती घाडगे या आपल्या दुचाकीवरुन लोणंद-निंबोडी रोडवरील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मिटिंगसाठी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांचा विनानंबरच्या दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी पाठलाग करत चाकूचा धाक दाखवून घाडगे यांना गाडी थांबविण्यास भाग पाडले. अचानक झालेल्या या प्रकाराने घाबरून त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, रस्त्यावर कोणी नव्हते.
17:41 November 07
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली प्रवक्त्यांची बैठक, सत्तार यांच्या वक्तव्यावरून पक्षात नाराजी
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली प्रवक्त्यांची बैठक. एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक. सत्तार यांच्या वक्तव्यावर बोलावली बैठक. मुख्यमंत्री काय आदेश देतात याकडे प्रवक्त्यांचे लक्ष. सत्तार यांच्या वक्तव्यावरून पक्षात नाराजी.
17:28 November 07
मुंबई विमानतळावर परदेशी नागरिकाकडून 6 किलो हेरॉईन जप्त
मुंबई - केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने मुंबई विमानतळावर एका परदेशी नागरिकाकडून 6 किलो हेरॉईन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 18 कोटी रुपये आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
17:09 November 07
औरंगाबादमध्ये सत्तार यांच्या पुतळ्याची तिरडीवरुन मिरवणूक
औरंगाबाद - कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बेताल वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी क्रांतीचौकात आंदोलन केले. सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडीवरुन मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांचा पुतळा जाळून रोष व्यक्त केला. अशा मंत्र्याला त्याच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
17:00 November 07
होय उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बेईमानीचा बदला घेतला - देवेंद्र फडणवीस
मुंबई - उद्धव ठाकरे यांनी आपल्याबरोबर केलेल्या बेईमानीचा बदला घेतल्याची स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ते एका कार्यक्रमात मुलाखतीमध्ये बोलत होते. एकनाथ शिंदे हे वेगळे होत असल्याचे समजताच त्यांच्या बरोबरीने आपण आपल्याबरोबर झालेल्या फसवणुकीचा बदला घेतल्याचे ते म्हणाले आहेत.
16:40 November 07
अब्दुल सत्तारांविरोधात महेश तपासेंची तक्रार, घरासमोर जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन
मुंबई - एमआरए पोलीस ठाण्यात अब्दुल सत्तारांविरोधात महेश तपासे यांनी तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. त्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
16:16 November 07
मंत्री सत्तार म्हणाले सॉरी, सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भातील विधानावर व्यक्त केली दिलगिरी
औरंगाबाद - मंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात अर्वाच्च भाषा वापरली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विविध ठिकाणी आंदोलन सुरू केले. त्याचबरोबर सत्तारांच्यावर कारवाईची मागणी सर्वस्तरातून होऊ लागली. त्यानंतर सत्तार यांनी सॉरी म्हटले आहे.
16:03 November 07
अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी 65 वर्षीय अरबी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई - शिवडी पोलीस ठाण्यात 65 वर्षीय अरबी शिक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आहे. आयपीसी कलम 376, 506 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. शिवडी परिसरातून आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
15:38 November 07
दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी भारताचा दबदबा - राजनाथ सिंह
बैजनाथ - पाकिस्तानला वाटत होते की ते दहशतवादाने भारताला कमकुवत करू शकतात. पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यानंतर आणि मी गृहमंत्री असताना त्यांनी 10 मिनिटांतच निर्णय घेतला आणि आमचे सैनिक दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीवर गेले. त्यामुळे भारताचा दबदबा निर्माण झाला आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते बैजनाथमध्ये बोलत होते.
15:10 November 07
नवनीत राणांना अटक करा, पोलीस मॅनेज झाले का, न्यायालयाचा संतप्त सवाल
मुंबई - बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणा यांना अद्याप अटक का झाली नाही, असा सवाल उपस्थित करीत पोलीस मॅनेज झाले आहेत का, आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? असे प्रश्न उपस्थित करीत न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. खासदार नवनीत राणा बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज पोलिसांना खडे बोल सुनावले. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असताना नवनीत राणा यांना अद्याप का अटक झाली नाही? नवनीत राणा जर महाराष्ट्रातच आहेत तर त्यांना अटक का होत नाही? पोलीस मॅनेज झाले आहेत का? असा गंभीर सवालही न्यायालयाने यासंदर्भात उपस्थित केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार जयंत वंजारी यांनी न्यायालयासमोर नवनीत राणा यांच्या विरोधात जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवर कोणतीही कारवाई केली जात नाही. तसेच पोलीस नवनीत राणा यांना अटक करत नाहीत हा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता.
14:57 November 07
10 टक्के EWS आरक्षणामुळे नवीन शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील - देवेंद्र फडणवीस
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदींच्या 10 टक्के EWS आरक्षण कोट्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना EWS आरक्षण दिले जाईल. जे कोणत्याही जातीच्या आरक्षणात समाविष्ट नाहीत, असे उपमुख्यमंत्री डी फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यात मराठा आरक्षण देण्यासाठीही आम्ही काम करत आहोत. दरम्यान, राज्यातील पात्र लोक 10% EWS आरक्षण कोट्याअंतर्गत लाभ घेऊ शकतात हे त्यांनी स्पष्ट केले.
14:28 November 07
संभाजी ब्रिगेडने हर हर महादेव चित्रपटाचा शो पाडला बंद
पिंपरी चिंचवड - संभाजी ब्रिगेडने विशाल ई स्केवरमध्ये सुरू असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो पाडला बंद पाडला. दुपारच्या शोला कार्यकर्त्यांनी चित्रपट गृहात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी शो बंद पाडला.
14:15 November 07
महामार्गावर रस्त्याच्या कडेला भगदाड, मोठ्या अपघाताची शक्यता
पालघर - वाघोबा खिंडीच्या पालघर बाजूकडील चौथ्या वळणावर रस्ता खचला आहे. रस्त्याच्या कडेला तीन ते चार फूट खोल खड्डा पडला आहे. रस्त्यालगत दोन ते तीन फूट उंचीचे गवत वाढलेले असल्यामुळे खचलेला रस्ता दिसून येत नाही. खचलेल्या ठिकाणी असलेला संरक्षक लोखंडी रेलिंग तुटून पडलेली असल्याने रस्ता अधिकच धोकादायक झाला आहे.
13:48 November 07
आयपीएस देवेन भारती यांच्याविरुद्धचा चौकशी अहवाल महाराष्ट्र सरकारने फेटाळला
मुंबई - महाराष्ट्राचे माजी डीजीपी संजय पांडे यांनी आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्याविरुद्ध दाखल केलेला चौकशी अहवाल महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने फेटाळला आहे. देवेन भारती यांचा डी-गँग गुन्हेगारांशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
13:00 November 07
वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, रक्तबंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह
नागपूर - रामटेक तालुक्यातील नाहबी गावात वाघाच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. नंदू लक्ष्मण सलया असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. नंदू सलया शेतात गवत कापायला गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
12:47 November 07
महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी लांगूलचालन - आशिष शेलार
मुंबई - अधोगतीचा रोज नवीन अध्याय उद्धव ठाकरे दाखवत आहेत, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. आम्ही जागर मुंबईचा सुरू केला आहे. त्यांनी सत्तेसाठी विश्वासाघात केला. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी लांगूलचालन व तुष्टिकरण सुरू आहे. मी माझे कुटुंब, माझा मुलगा व मला भेटणारी सत्ता यासाठी वाटेल ते करण्याची तयारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सुरू आहे, असाही टोला त्यांनी लगावला.
12:38 November 07
दोन बसचा भीषण अपघात, 2 प्रवासी गंभीर, 20 जखमी
पालघर - जव्हार-सेलवास मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक व जळगाव आगाराच्या दोन बसचा सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात नाशिकच्या चालक व वाहकासह 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
12:24 November 07
पोलिसांविरोधात शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
जालना - चंदनझिरा पोलिसांविरोधात शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर राॅकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा केला प्रयत्न. जिल्हाधिकारी कार्यालयतील सुरक्षेस आसलेल्या पोलिसाच्या सर्तकतेने आत्मदहन करणारे पाटोळे यांना प्रतिबंधित करण्यात यश. त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे.
11:57 November 07
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज पुण्यात मोर्चा
पुणे - दोन तुकड्यातील एफआरपीचा केलेला कायदा रद्द करून पुन्हा FRP एकरकमी करा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज पुण्यात मोर्चा आयोजित केला आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहेत. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अल्का चौक ते साखर संकुल राज्यव्यापी धडक मोर्चा असणार आहे. मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये, दोन तुकड्यातील एफआरपीचा केलेला कायदा रद्द करून पुन्हा एकरकमी करावे. काटामारी संपुष्टात आणण्यासाठी साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन करावे. मागील वर्षाची एफआरपी + २०० रूपये तातडीने द्यावे. सर्व ऊस तोडणी कामगार तोडणी महामंडळामार्फतच साखर कारखान्यांना पुरवावेत. गतवर्षीच्या सरासरी रिकव्हरीस आधारित चालू हंगामात एक रक्कमी एफआरपी व हंगाम संपल्यानंतर ३५० रूपये उचल द्यावी. तोडणी मशिनने तुटलेल्या उसाला पालापाचोळ्याची कपात ४.५० टक्याऐवजी १.५० टक्के करावी. या मागण्याचा समावेश आहे.
11:44 November 07
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात
नांदेड - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज रात्री महाराष्ट्र राज्याच्या सीमेत प्रवेश करणार आहे, नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहराच्या मार्गे ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होतेय. त्यासाठी देगलूर शहराला आकर्षकरित्या सजवण्यात आले असून ठिकठिकाणी नयनरम्य अशी रोषणाई केलीय.
11:17 November 07
सर्वोच्च न्यायालयाने अब्दुल्ला आझम खान यांनी दाखल केलेले अपील फेटाळले
सर्वोच्च न्यायालयाने समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान यांनी दाखल केलेले अपील फेटाळले.
10:48 November 07
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. ३१ ऑक्टोबरला रुग्णालयात दाखल झाले होते. राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिरात दुसऱ्या दिवशी झाले होते सहभागी. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल झाले होते.
09:52 November 07
पुण्याहून बेंगळुरूला जाणारे एअरएशिया इंडियाचे फ्लाइट तांत्रिक कारणामुळे टेक ऑफ रद्द
पुणे रात्री पुण्याहून बंगळुरूला जाणारे एअर एशियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण करू शकले नाही. एअर एशिया इंडियाचे फ्लाइट i5-1427 तांत्रिक बिघाडामुळे रद्द करावे लागल्याचे सांगण्यात आले. विमान धावपट्टीवरून परत आणावे लागले. विलंब झाल्याबद्दल विमान कंपनीने प्रवाशांची माफी मागितली आहे.
08:46 November 07
छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठातील भ्रष्टाचारप्रकरणी एकाला अटक
कानपूर येथील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू विनय पाठक यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी युपी एसटीएफने रविवारी अजय जैन याला अटक केली. विनय पाठक यांच्या कमिशनच्या रकमेचे व्यवस्थापन केल्याच्या आरोपावरून मिश्राला अटक करण्यात आली होती.
07:58 November 07
आसाममध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश
आसाममधील चायगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कामरूप जिल्हा पोलिसांच्या पथकाने बनावट भारतीय चलनाच्या रॅकेटचा पर्दाफाश करून 5 जणांना अटक केली. बनावट नोटा, 1 प्रिंटिंग मशीन, 8 फोन आणि इतर आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
07:08 November 07
अल्पवयीन मुलाने घरातील ४ जणांची केली हत्या
धलाई जिल्ह्यातील घराबाहेरील खड्ड्यातून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ३ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. आरोपी अल्पवयीन असून तो एकाच कुटुंबातील आहे.
07:07 November 07
शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येनंतर मिठाईचे वाटप, पोलिसांनी दाखल केला गुन्हा
शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येनंतर एका व्यक्तीने मिठाई वाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त कौस्तुभ शर्मा यांनी दिली.
07:03 November 07
भारत जोडो यात्रेला तेलंगणातील कामारेड्डी येथून पुन्हा सुरुवात
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह तेलंगणातील कामारेड्डी येथून 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू केली.
06:47 November 07
बोधगयामध्ये बौद्ध भिक्खूंकडून जागतिक शांततेसाठी विशेष प्रार्थना
बोधगया मंदिर व्यवस्थापन समितीने आयोजित केलेल्या वस्त्र अर्पण समारंभात बोधगयामध्ये बौद्ध भिक्खूंनी जागतिक शांततेसाठी विशेष प्रार्थना आयोजित केली.
06:45 November 07
चेन्नईमधून वंदे भारत एक्सप्रेस सुरू
चेन्नई-म्हैसूर वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेण्यात आली. आज चेन्नई एमजी रामचंद्रन मध्य रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली.
06:21 November 07
Breaking News सर्वोच्च न्यायालयाने अब्दुल्ला आझम खान यांनी दाखल केलेले अपील फेटाळले
मुंबई : पुण्यातील डॉक्टर गणेश राख यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने बेटी बचाओ मिशन राबवित आहेत. ते रुग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या जन्मासाठी रुग्णालयाचे शुल्क माफ करतात. त्यांनी बेटी बचाओ मिशन हे ११ वर्षांपूर्वी सुरू केले होते. रुग्णालयात मुलीचा जन्म झाला तर ते संपूर्ण बिल माफ करतात. केक कापून आनंद साजरा करतात.