मुंबई - शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल. गेले चार दिवसापासून शरद पवार ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Breaking news शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री ब्रिच कँडी रुग्णालयात - Maharashtra live update
19:54 November 04
शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री ब्रिच कँडी रुग्णालयात
19:20 November 04
सिटी बेकरीमागे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीनजीक युवकाची हत्या
मुंबई - वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिटी बेकरीमागे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीनजीक एका 24 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. दीपक राजबार वय वर्ष 24 असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव सोनू वय वर्ष 27 असे आहे. ही घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास घडली असून आज सकाळी परळी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
19:17 November 04
ट्विटरने भारतातील अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकले
नवी दिल्ली - ट्विटरने भारतातील अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि इतर काही विभागांमधील कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे.
18:57 November 04
मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यांसोबत विनयभंग करणारा अधिकारी कार्यमुक्त
मुंबई - मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यांसोबत विनयभंग करणाऱ्या पुरुष अधिकार्याला केले कार्यमुक्त. मंत्रालयातील अवर सचिव आनंद अर्जुन माळी यांना केले कार्यमुक्त. विधिमंडळ उपसभापती नीलम ताई गोरे यांच्या पाठपुराव्याला यश.
18:24 November 04
मुंबईत मराठी साईनबोर्ड सक्तीच्या नियमाची सक्त कारवाई करू नका, सुप्रीम कोर्टाचे आदेश
मुंबईत मराठी साईनबोर्ड सक्तीचा नियम करण्यात आला आहे. यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणीदरम्यान किरकोळ विक्रेत्यांवर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे दिले आहेत.
17:52 November 04
मुंबई सत्र न्यायालयात आरोपीने स्वतःचे डोके घेतले आपटून
मुंबई - सत्र न्यायालय परिसरात एका आरोपीने डोके आपटून स्वतःला जखमी करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेसाठी हजर पोलिसांनी तातडीने आरोपीला पकडल्याने अनर्थ टळला. गुड्डू मुन्ना शेख असे आरोपीचे नाव आहे. या आरोपीची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सेशन कोर्टातील, विशेष टाडा न्यायालयात आज हजेरी होती. विशेष न्यायाधीश बी डी शेळके यांच्या कोर्ट परिसरात,अचानक डोके आपटायला त्याने सुरुवात केली होती.
17:22 November 04
सूटकेसच्या अस्तरात लपवून आणलेले 46.24 लाख रुपये किमतीचे सोने चेन्नई विमानतळावर जप्त
चेन्नई - ट्रॉली सूटकेसच्या बाहेरील अस्तरात लपवून ठेवलेले 46.24 लाख रुपये किमतीचे 1038 ग्रॅम सोने चेन्नई विमानतळावर कोलंबोहून आलेल्या प्रवाशाकडून जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे बॅगच्या झाकणामध्ये सोन्याची तार अशी काही फिट करण्यात आली होत की कुणलाही संशय येणार नाही. मात्र कस्टम अधिकाऱ्यांच्या चाणाक्ष नजरेतून हे सुटले नाही. त्यांनी हे सोने जप्त केले.
17:02 November 04
जिओ प्लॅटफॉर्म्सला लंडनमधील प्रतिष्ठित क्लाउड नेटिव्ह अवॉर्ड
लंडन/नवी दिल्ली - लंडनमध्ये आयोजित वर्ल्ड कम्युनिकेशन अवॉर्ड्सच्या 24 व्या आवृत्तीत जिओ प्लॅटफॉर्मला क्लाउड नेटिव्ह अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. दूरसंचार क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील सर्वोत्कृष्ट कंपन्या आणि वरिष्ठ अधिकारी या पुरस्कार कार्यक्रमात सहभागी झाले होते. जिओ प्लॅटफॉर्मला त्याच्या कॉम्बो 5G/4G कोअर नेटवर्क सोल्यूशनसाठी क्लाउड नेटिव्ह अवॉर्ड मिळाला. या पुरस्कार विजेत्या नेटवर्क सोल्यूशनच्या आधारे रिलायन्स जिओ भारतात 5G लाँच करणार आहे. जिओ ने अनेक शहरांमध्ये 5G च्या युजर ट्रायल सुरु केल्या आहेत.
16:55 November 04
शरद पवार हॉस्पिटलमधून व्हिसीद्वारे शिर्डीच्या अभ्यास शिबीरात सहभागी
शिर्डी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शिर्डी येथील अभ्यास शिबीरात सहभागी झाले आहेत. ते शिर्डीला जाणार होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. ते अजूनही रुग्णालयातच आहेत. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते शिबीरात सहभागी झाले.
16:11 November 04
DCP सौरभ त्रिपाठीला उच्च न्यायालयाचा दिलासा
अंगडीया व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली प्रकरण DCP सौरभ त्रिपाठीला उच्च न्यायालयाचा दिलासा. 15 नोव्हेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण. तपास अधिकाऱ्यांसमोर 9 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश. तपासात सहकार्य करण्याचे बंधन. याप्रकरणी पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला. या प्रकरणात DCP सौरभ त्रिपाठी आहे निलंबित.
16:05 November 04
धमकीच्या पार्श्वभूमिवर हाजी अली दर्ग्याची कसून तपासणी, काही आढळले नाही
मुंबई - हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला होण्याची धमकी काल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती. कसून तपासणी केली असता घटनास्थळी काहीही आढळून आले नाही. चौकशीत कॉलर हा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे आढळून आले.
15:41 November 04
शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या
अमृतसर - शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या. भर दिवसा सर्वांच्या समोर त्यांची हत्या करण्यात आली.
15:20 November 04
गुजरात निवडणुकीसाठी इसुदान गढवी AAP चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
नवी दिल्ली - गुजरात निवडणुकीसाठी इसुदान गढवी हे AAP चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील अशी घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. या घोषणेनंतर आपच्या गुजरातमधील प्रचाराला आता आणखी जोर येणार आहे. केजरीवाल यांनी लोकांना एसएमएस, व्हॉट्सअप, व्हॉइस मेल आणि ई-मेलद्वारे पक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. राज्यात पक्षाचा मुख्यमंत्री उमेदवार कोण असावा हे त्यांना कळवा असे आवाहन त्यातून करण्यात आले होते. त्यांनी लोकांना 3 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे मत देण्यास सांगितले होते. ज्याच्या आधारावर पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार 4 नोव्हेंबरला जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. आज त्यांनी उमेदवार जाहीर केला.
14:02 November 04
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यात मुदतवाढ
मुंबई - एसएससी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरणा मुदतवाढ देण्यात आली आहे. 11 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. शाळांनी 1 डिसेंबर 2012 पर्यंत शुल्कासह प्रक्रिया पूर्ण करायची आहे. बारावीसाठी नियमित शुल्काकरिता विद्यार्थी 6 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर अर्ज भरू शकतात. तर उशिरात उशिरा 16 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरणा करायचा आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांसाठी उशिरा उशिरा 2 डिसेंबर 2022 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करायची आहे
13:58 November 04
पुणे - जबरदस्तीने चेक घेतल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, एकाला अटक
पुणे - व्याजाने खासगी स्वरूपात पैसे घेतलेले परत देण्यासाठी गुंड पाठवून घरात धमकावणे, शिवीगाळ करणे, तसेच जबरदस्तीने चेक घेणे, यासाठी पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
13:35 November 04
दिल्लीच्या प्रदुषणावर कडक उपाय, 50 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम
राजधानी दिल्लीच्या प्रदुषणावर कडक उपाययोजना करण्यात येत आहे. प्राथमिक शाळांना अनिश्चित काळासाठी सुट्टीवर पाठवले आहे. त्याचबरोबर आता सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयामध्ये केवळ 50 टक्केच उपस्थिती असेल. इतर 50 टक्के कर्मचारी घरून काम करतील. खासगी संस्थानांही अशा प्रकारे काम करवून घेण्याच्या सूचना सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
13:21 November 04
बिबट्याचा लोकवस्तीत घुसून काही लोकांवर हल्ला
म्हैसूरच्या कनका नगरमध्ये बिबट्याने घुसून काही लोकांवर हल्ला केला, नंतर त्याला वनविभागाने जेरबंद करून सोडवले.
13:12 November 04
शेतकऱ्यांच्या हातात दमडी नाही- अजित पवार
शिर्डीच्या अधिवेशनात सगळे सांगणार आहे. शेतकऱ्यांच्या हातात दमडी नाही, असेही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
12:55 November 04
महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कर्नाटकच्या राज्यपालांमध्ये दोन्ही राज्यांबाबत महत्वपूर्ण बैठक सुरू
कोल्हापूर - रेसिडन्सी क्लब येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्यामध्ये दोन्ही राज्यांबाबत महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद सुरू आहे. अनेक आंदोलने सुरू आहेत. मात्र आता या बैठकीतून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या महत्त्वाच्या मुद्यावरून काय निर्णय होईल का, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. शिवाय अलमट्टी धरणाच्या उंचीबाबतसुद्धा यावेळी चर्चा होईल असे बोलले जात आहे. त्यानुसार आता आणखी 1 तास ही बैठक सुरू राहणार आहे. त्यामध्ये दोन्ही राज्यातील जवळपास 10 जिल्हाधिकारी तसेच पदाधिकारीसुद्धा उपस्थित आहेत.
12:37 November 04
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक साक्षीदार फितूर
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक साक्षीदार फितूर. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 28 वा साक्षीदार फितूर. आरोपी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या संबंधित होती साक्ष.
12:19 November 04
टिपू सुलतान जयंती साजरी करण्याला शिवप्रतिष्ठानचा विरोध
सांगली - टिपू सुलतान जयंती वरून संभाजी भिडे यांची शिवप्रतिष्ठान संस्था आक्रमक. सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात टिपू सुलतान जयंती साजरी करण्याला शिवप्रतिष्ठानचा विरोध. प्रशासनाला निवेदन देण्यासाठी शिवप्रतिष्ठानकडून काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीला पोलिसांनी नाकारली परवानगी. टिपू सुल्तान जयंती साजरी करू न देण्याबाबत संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन.
12:04 November 04
पंढरपूर ऊस दर आंदोलन पेटले, टायर जाळून केला निषेध
पंढरपूर - ऊस दर आंदोलन पेटले. रस्त्यावर टायर जाळून केला निषेध व्यक्त. भंडीशेगाव येथे ऊस वाहतुकीचे टायर फोडले.
11:58 November 04
तांत्रिक अडचणींमुळे सर्व अप आणि डाऊन जलद लोकल १५ ते २० मिनिटे धावत आहेत उशिराने
मुंबई - तांत्रिक अडचणींमुळे सर्व अप आणि डाऊन जलद उपनगरीय लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. 6 लोकल रद्द, किमान 70 लोकल विलंबाने. लांब पल्ल्याच्या सहा गाड्यांनाही सुमारे ३० मिनिटे उशीर झाला आहे.
11:47 November 04
दिल्लीतील प्राथमिक शाळा उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंद
नवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानीतील प्रदूषणाची स्थिती सुधारेपर्यंत दिल्लीतील प्राथमिक शाळा उद्यापासून बंद राहतील. सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीत प्रदूषण पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
10:20 November 04
जे जे रुग्णालयात 130 वर्षे जुन्या इमारतीत एक भुयार सापडले
राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या राज्यातील सर्वात मोठ्या जे जे रुग्णालयात 130 वर्षे जुन्या इमारतीत एक भुयार सापडले आहे. या इमारतीचे नाव डी. एम. पेटीट असून नर्सिंग क़ॉलेजचा भाग आहे. मुंबईत याआधी राजभवन, सेंट जॉर्ज रुग्णालय तसेच किल्ल्यांमध्ये भुयार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता जे जे रुग्णालयात सापडलेल्या भूयारामुळे अनेकांचीच उत्सुकता आणि कुतूहल शिगेला पोहोचलं आहे.B
09:37 November 04
बैतूलमध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत पंतप्रधानांकडून जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैतूलमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. बसच्या धडकेत 11 लोकांचा मृत्यू झाला. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
09:29 November 04
थोड्याच वेळात कर्नाटकचे राज्यपाल अंबाबाई दर्शनाला येणार
थोड्याच वेळात कर्नाटकचे राज्यपाल अंबाबाई दर्शनाला येत आहेत.
09:29 November 04
ईडीचे पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये छापे
ईडी पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये भारतीय लष्कराच्या जमिनींवर बेकायदेशीरपणे कब्जा करणाऱ्यांविरोधात सुमारे एक डझन ठिकाणी शोध घेत आहे. शोधण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये कोलकाता येथील व्यावसायिक अमित अग्रवाल आणि इतर काहींच्या निवासी आणि कार्यालयाच्या जागेचा समावेश आहे.
08:45 November 04
ट्विटर कर्मचार्यांना कामावर काढले की नाही, हे ई-मेलद्वारे कळणार
ट्विटर कर्मचार्यांना शुक्रवारी ईमेलद्वारे कामावरून काढून टाकण्यात आले आहे की नाही हे कळविणार आहे. एलोन मस्कने ट्विटर कंपनी ताब्यात घेतल्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
08:05 November 04
यूजीसी-नेटचा निकाल 5 नोव्हेंबर रोजी जाहीर करणार
यूजीसी-नेटचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) 5 नोव्हेंबर रोजी जाहीर करणार आहे. ही माहिती यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी दिली.
07:53 November 04
कारला झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू
झालर पोलीस ठाण्याजवळ कारला झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एसपी बैतुल सिमाला प्रसाद यांनी दिली.
07:00 November 04
गुणवंत विद्यार्थ्याला सातवीच्या मुलाला थेट नववीत प्रवेश, शिक्षण मंडळाचा निर्णय
कानपूर येथील गुणवंत 11 वर्षीय यशवर्धन सिंग याला चालू सत्रातच इयत्ता 7 वी पासून 9वी मध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यांची उच्च बौद्धिक पातळी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
06:31 November 04
वडिलांसोबत बोलताना पाय घसरल्याने शेततळ्यात पडून विवाहित महिलेचा मृत्यू
सांगली : शेततळ्यात पडून एका विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील मेंढीगिरी येथे ही घटना घडली आहे. वडिलांसोबत मोबाईलवर बोलत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. सविता सचिन वाघमोडे,वय असे या विवाहित महिलेचे नाव आहे.
06:07 November 04
Breaking news मुंबई सत्र न्यायालयात आरोपीने स्वतःचे डोके घेतले आपटून.. झाला जखमी
मुंबई : पंढरीच्या वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे. पंढरपूर मध्ये सध्या कार्तिकी एकादशीचा सोहळा सुरू असून, कार्तिकी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा 4 ऑक्टोबर रोजी पहाटे संपन्न झाली.Body:शासकीय महापूजा संपन्न होत असताना उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर मानाचे वारकरी म्हणून दर्शना रांगेतील मानाचे वारकरी श्री उत्तमराव माधवराव साळुंखे व सौ कलावती उत्तमराव साळुंखे यांना यावर्षी कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला.