ETV Bharat / state

Breaking News उस्मानाबादमधील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न सोडवा - अंबादास दानवे - मुंबईत 81 ठिकाणी छठ पूजा

Maharashtra Breaking News
Maharashtra Breaking News
author img

By

Published : Oct 29, 2022, 6:33 AM IST

Updated : Oct 29, 2022, 7:38 PM IST

19:33 October 29

उस्मानाबादमधील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न सोडवा - अंबादास दानवे

मुंबई - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न सुटला नसल्याने स्थानिक शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे गेल्या ५ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे कृषिमंत्री या नात्याने शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करुन शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळवून द्यावी. तसेच आमदार कैलास पाटील यांचे उपोषण सोडवावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना पत्र लिहून केली आहे.

19:25 October 29

इराणमधील शिराझ येथील दर्ग्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध - भारत

इराणमधील शिराझ येथील शाह-ए-चेराग दर्ग्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही पीडितांच्या कुटुंबियांबद्दल आणि इराणच्या लोकांप्रती खोल शोक व्यक्त करतो.

19:04 October 29

मंत्रालयात विनयभंग प्रकरणातील अधिकाऱ्याला ताबडतोब कार्यमुक्त करा - नीलम गोऱ्हे

मुंबई - मंत्रालयात वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी नि:पक्षपातीपणाने चौकशी व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ कार्यमुक्त करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधिमंडळाच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलेली आहे.

18:52 October 29

शासनाने कापूस-धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करावी - नाना पटोले

मुंबई - शासनाने कापूस आणि धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. धान खरेदीसाठी ऑनलाइन सेवांमुळे शेतकऱ्यांना त्रास झाला. त्यामुळे ऑफलाईन सेवा सुरू करावी असेही ते म्हणाले. शेतकऱ्याला सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी पटोले यांनी केली.

17:15 October 29

नात नव्याला बिनलग्नाचे मूल झाल्यास हरकत नाही - जया बच्चन

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी लग्नाआधी शारीरिक संबंध या निषिध्द मानल्या जाणाऱ्या विषयावर सडेतोड भाष्य केले आहे. जया म्हणाल्या की, ते अनेकांना 'आक्षेपार्ह' वाटू शकते परंतु नातेसंबंधात शारीरिक आकर्षण आणि अनुकूलता खूप महत्वाची आहे. जया बच्चन असेही म्हणाल्या की, त्यांची नात नव्या नवेली नंदा लग्नाआधी आई होऊ इच्छित असल्यास आपल्याला काही हरकत नाही.

17:00 October 29

कंगना रनौत 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढण्यास तयार

मुंबई - कंगना रनौतने 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढायला आवडेल असे तिने म्हटले आहे. भाजप आपल्याला तिकीट देणार असेल तर नक्कीच निवडणूक लढवेन असे ती म्हणाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी महापुरुष असल्याचे तिने म्हटले आहे.

16:47 October 29

शर्लीन चोप्राचा जबाब घेण्यासाठी मुंबई पोलिसांत सक्षम महिला अधिकारी नाही?

मुंबई - साजिद खानवर अत्याचाराचे आरोप करणाऱ्या शर्लीन चोप्राचा जबाब लिहून घेण्यासाठी मुंबई पोलिसांना सक्षम महिला अधिकारी मिळाली नाही. ती पोलिसात जबाब देण्यास गेली असता तिला सांगण्यात आले की ज्या पोलिस अधिकाऱ्याकडे केस सोपवण्यात आली आहे तो हजर नाही. तिने विनंती केली की एक महिला अधिकारी द्या, म्हणजे मी माझे म्हणणे मांडू शकेन. आपल्याला निष्पक्ष चौकशी हवी आहे. जर त्यांना माझा जबाब घ्यायचा नसेल तर ते स्पष्टपणे सांगू शकतात असेही शर्लिन चोप्राने स्पष्ट केले. ती जुहू पोलीस स्टेशनच्या बाहेर पत्रकारांशी बोलत होती.

16:18 October 29

समर्थांच्या देवघरातील प्रभूश्रीरामचंद्र आणि सीतामातेच्या मूर्ती शोधणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन - देवेंद्र फडणवीस

जांबसमर्थ (जालना) येथील समर्थांच्या देवघरातील प्रभूश्रीरामचंद्र आणि सीतामातेच्या चोरीला गेलेल्या ऐतिहासिक मूर्ती सापडल्या. राज्यातील 11 हून अधिक जिल्हे आणि शेजारच्या कर्नाटक राज्यात तपास करून आरोपींना अटक करून, ही कामगिरी चोख बजावणार्‍या सर्व पोलिसांचे मन:पूर्वक अभिनंदन! या शब्दात उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

16:04 October 29

दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सांगोपांग चर्चा - कंबोज

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रातील भारत सरकारच्या स्थायी प्रतिनिधी आणि दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्षा रुचिरा कंबोज यांनी शनिवारी सांगितले की भारतात आयोजित या दहशतवादविरोधी बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू चर्चा करणे होता. दहशतवादी गटांद्वारे नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि गैरवापर कसा रोखता येईल यावर सांगोपांग चर्चा झाली.

15:48 October 29

लोकमान्य टिळक टर्मिनस कानपूर सेंट्रल एक्सप्रेस वेळेत बदल

मुंबई - मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर सेंट्रल जाणारी ट्रेन क्रमांक ०४१५ वेळापत्रक बदलण्यात आले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर सेंट्रल जाणारी ट्रेन आज सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी सुटणार होती. मात्र काही कारणास्तव आजच रात्री आठ वाजता ती लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रयाण करेल. प्रवाशांनी या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी. तसेच वेळापत्रक बदलल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली.

15:28 October 29

चार प्रकल्प राज्यातून निघून गेल्यानंतर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का - आदित्य ठाकरे

मुंबई - राज्यात परतीच्या पावसामुळे फटका बसला आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने करत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मदत दिली गेली पाहिजे. घटनाबाह्य सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातून चार प्रकल्प बाहेर गेले. गुंतवणूकदारांना या सरकारवर विश्वास नाही. सरकारमध्ये काही आमदार नाराज असल्याची देखील माहिती समोर येत आहे. एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे महाराष्ट्राला फटका बसतोय. केवळ घाणेरड्या राजकारणावर सत्ताधारी लक्ष केंद्रित करत आहेत. शेतीत नुकसान झाला आहे. मात्र मंत्री बांधावर अद्यापही जात नाहीत. राज्यात शेतीची गंभीर परिस्थिती असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेणार का, असा सवाल त्यांनी केला. तसेच चार प्रकल्प राज्यातून निघून गेल्यानंतर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

15:10 October 29

शेतकऱ्यांची मदत केल्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार - अब्दुल सत्तार

नंदुरबार - परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत केली असून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा आभार मानतो, असे मंत्री अब्दुल सत्ता यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री लोकप्रिय झाले आहे म्हणून काही लोकांचा पोटात दुखात आहे, अशी टीका त्यांनी केली.

14:52 October 29

छठपूजा आयोजनावरुन आमदार आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी

रांची - झारखंड सिद्धगोरा येथील सूर्य मंदिरात छठपूजा आयोजित करण्यावरून आमदार सरयू राय आणि माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रघुबर दास यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. राय समर्थकांनी दास समर्थकांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाजवळ भक्तांसाठी छावणी उभारली होती, त्यानंतर हाणामारी झाली. यात छावणीतील मंडपाची मोडतोडही करण्यात आली.

14:47 October 29

नागपूर दूरदर्शनचे कार्यक्रम विभागाचे संपादक विलास आगलावे यांचे निधन

नागपूर - दूरदर्शनचे कार्यक्रम विभागाचे संपादक विलास आगलावे यांचे ह्रदय विकाराच्या धक्याने निधन. अंबाझरी येथील रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

13:44 October 29

ठाण्यात दिवाळीच्या सणात विदेशी बनवटीची 30 लाखाची दारू जप्त

ठाणे - ऐन दिवाळीच्या सणात विदेशी बनवटीच्या 30 लाखाची दारू जप्त. ठाणे उत्पादन शुल्क विभागाची मोठी कामगिरी. दमण येथून नाशिकला जाणारा दारूचा कंटेनर पोलिसांनी केला जप्त. एकूण 45 लाखाचा मुद्देमाल केला जप्त. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय. पोलिसांचा तपास सुरू.

13:00 October 29

गुजरात राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार

गांधीनगर - गुजरात राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार आहे. त्यासाठी सर्व पैलूंचे मूल्यांकन करण्याकरता गुजरात सरकार उत्तराखंडप्रमाणेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करणार आहे. त्यासाठीचा सरकारी प्रस्ताव राज्यसरकार ठेवण्याची शक्यता आहे.

12:26 October 29

मुंबईच्या अतुलजवळ आज पुन्हा वंदे भारत ट्रेनला गुरांची धडक, नोजहुड तुटले

मुंबई - मुंबई सेंट्रल विभागातील अतुलजवळ आज सकाळी 8.17 वाजता वंदे भारत ट्रेन जात असताना या रेल्वेला गुरांची धडक बसली. ही ट्रेन मुंबई सेंट्रल ते गांधीनगर असा प्रवास करत होती. या घटनेनंतर सुमारे 15 मिनिटे ट्रेन रोखून धरण्यात आली. यामुळे गाडीच्या पुढील हुडले नुकसान झाले. इतर काही तांत्रिक बिघाड झाला नाही. त्यामुळे ही गाडी काही वेळातच पुढच्या प्रवासाला निघाली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

12:10 October 29

ऊसतोड मजुरांचा ट्रक पलटी, लहान मुलांच्यासह 15 जण जखमी

सांगली - ऊस तोडणी मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अपघात झाला आहे. जतमध्ये गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. यामध्ये 15 ऊस तोड मजूर जखमी झाले आहेत. ज्यामध्ये महिलांसह लहान मुलांचा देखील समावेश आहे. सर्व जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

11:56 October 29

आयर्नमॅन हार्दिक दयानंद पाटील यांचे दोन नवीन साहसी विक्रम

पालघर - विरार येथील आयर्नमॅन हार्दिक दयानंद पाटील यांचे दोन नवीन साहसी विक्रम. १७ वी 'कॅलिफोर्निया आयर्नमॅन स्पर्धा २०२२' यशस्वीरित्या पूर्ण. 'T C S पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा ' तब्बल नव्यांदा जिंकली.

11:49 October 29

इंटरनेट पुरवठ्यासाठी भागीदारी मॉडेलवर काम करण्याची सरकारची इच्छा

आपल्या सर्व नागरिकांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेटच्या उद्देशाने इंटरनेटवरील सर्व मोठ्या, लहान परदेशी आणि भारतीय कंपन्यांसोबत भागीदारी मॉडेलवर काम करण्याची सरकारची इच्छा आहे. ही माहिती केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली.

11:17 October 29

आम्ही महाराष्ट्राची नाही गुजरातची सेवा प्रामाणिकपणे करतो आहे सांगून टाका- नाना पटोले

वेदांत फॉक्स कॉन या उद्योगानंतर टाटा एअरबस हा हवाई दलासाठीचा विमान निर्मितीचा प्रकल्प देखील गुजरातला गेला. याआधी मल्टिपलक ड्रग्स हा प्रकल्प देखील गुजरातला गेला त्यामुळे शिंदे फडणवीस शासनाला विरोधी पक्षांनी आणि जनतेने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

11:04 October 29

मग तुम्ही पुजारींना महिना १८ हजार देणार का-अनुराग ठाकूर

दिल्लीचे मुख्यमंत्र दिल्लीतील मुस्लिम धर्मगुरूंना 18,000 रुपये प्रतिवर्षी देतात. हेच 18,000 रुपये तुम्ही पुजारी, गुरुद्वाराचे ग्रंथ आणि ख्रिश्चन धर्मगुरू यांनाही देणार का? तुम्ही ते का करू शकले नाही?: भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी-भगवान गणेश चित्रांसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

10:57 October 29

संजय राऊतांनतर मी टार्गेट-किशोरी पेडणेकर

दबावतंत्राला बळी पडणार नाही. किरीट सोमैय्या नेहमीच आरोप करतात. गाळे दाखवा, मी कुलूप लावेन. सोमैय्यांनी जतनतेला सत्य दाखवावे. हिशोब तर द्यावाच लागणार आहे. मी आज चौकशीला जाणार नाही, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

10:41 October 29

भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालणाऱ्या व्यक्तींवर २०० रुपये दंड, या महापालिकेचा निर्णय

नागपूर महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करुन सार्वजनिक ठिकाणी मोकाट/भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालतांना आढळुन आल्यास किंवा त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास मोकाट/भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालणाऱ्या व्यक्तींवर २०० रुपये दंड आकारून वसूल करण्यात येईल,नागरिकांना निर्देशित केले आहे.

10:02 October 29

भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या विरोधात 200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल

मुंबई एनसीबीने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या विरोधात 200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यांना 2020 मध्ये ड्रग्सच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.

09:20 October 29

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक मिनिटाचे मौन

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची आज दुसऱ्या दिवशी बैठक सुरू झाली आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी जमलेल्या आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सदस्यांनी दहशतवादातून वाचलेल्या आणि बळी पडलेल्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्मरणार्थ एक मिनिटाचे मौन पाळले.

09:03 October 29

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बच्चू कडू आज देणार नोटीस

आमदार रवी राणा यांनी माझ्या विरोधात जे बिन बुडाचे आरोप केले आहेत. त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी शनिवारी नोटीस बजावणार आहे. मी गुवाहाटीला जाऊन पैसे घेतले असेल तर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावे, असेदेखील बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

08:11 October 29

बंगळुरुला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाचा मोठा अपघात टळला

28 ऑक्टोबर रोजी बंगळुरुला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाचा मोठा अपघात टळला आहे. विमानातील १७७ प्रवासी आणि सात कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर उड्डाणादरम्यान इंडिगोच्या विमानाच्या इंजिनला आग लागली होती. या घटनेनंतर हे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

07:47 October 29

दिल्ली एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता खूप खराब, प्रदुषणाचा विळखा सुटेना

संपूर्ण दिल्ली एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता खूप खराब श्रेणीत आहे. दिल्ली विद्यापीठ परिसरात AQI 355, मथुरा रोड परिसरात 340 तर नोएडामध्ये 392 आहे.

06:55 October 29

भारत जोडो यात्रेला तेलंगणातील धर्मपूर येथून पुन्हा सुरुवात

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह तेलंगणातील धर्मपूर येथून 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू केली.

06:43 October 29

...तोपर्यंत आम्हाला सिक्युरिटी घेऊन फिरण्याची गरज नाही- आमदार सतेज पाटील

भाजप शिंदे सरकारने महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यामुळे आता महाविकास आघाडी तील नेत्यांची प्रतिक्रिया येत आहेत. जोपर्यंत जनता आमच्या सोबत आहे, तोपर्यंत आम्हाला सिक्युरिटी घेऊन फिरण्याची गरज नाही, असे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे. तसेच सरकारने घेतलेल्या या निर्णयावर त्यांनी अनेक प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत

06:33 October 29

तिरुमला तिरुपती देवस्थानकडून टोकन प्रणाली परत आणण्याचा निर्णय

तिरुमला तिरुपती देवस्थानमने (TTD) शुक्रवारी भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी स्लॉटेड सर्व दर्शन (SSD) किंवा टोकन प्रणाली पुन्हा सुरू केली. भाविकांना त्रासमुक्त दर्शन देण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानम्स (TTD) ने 1 नोव्हेंबरपासून सुरू होणारी टोकन प्रणाली परत आणण्याचा निर्णय घेतला.

06:23 October 29

Breaking News इंटरनेट पुरवठ्यासाठी भागीदारी मॉडेलवर काम करण्याची सरकारची इच्छा

मुंबई - मुंबईत 81 ठिकाणी छठ पूजा साजरी केली जाणार आहे. जुहू चौपाटीसारख्या ठिकाणी गर्दी असेल त्यामुळे त्यानुसार व्यवस्था करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरला पहाटे समुद्राला भरती येणार असल्याने जीवरक्षक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

Last Updated : Oct 29, 2022, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.