कोल्हापूर - कोल्हापूरच्या सहा वारकऱ्यांचा सांगली मिरज मार्गावर अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
Breaking News कोल्हापूरच्या सहा वारकऱ्यांचा सांगली मिरज मार्गावर अपघातात मृत्यू
19:52 October 31
कोल्हापूरच्या सहा वारकऱ्यांचा सांगली मिरज मार्गावर अपघातात मृत्यू
19:03 October 31
मोबाईल चोरट्याचा प्रतिकार करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात चाकूने सपासप वार
ठाणे - तिघी मैत्रिणी कामावर चालत जात असताना एका चोरट्याने त्यांना रस्त्यात अडवले. एका मैत्रिणीचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या मैत्रिणीने चोरट्याचा प्रतिकार केला. त्यानंतर चोरट्याने तिच्यावर भरस्त्यात नागरिकांसमोरच चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना भिवंडीतील काटईनाका परिसरात घडली आहे. या प्रकरणी हल्लेखोर चोरट्या विरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कमाल मोहमद अब्बास अन्सारी (२८ रा.काटई) असे हल्लेखोर चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे.
18:31 October 31
पॉर्नस्टार करण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच केला मैत्रिणीचा व्हिडिओ पोर्न वेबसाईटवर व्हायरल
पुणे:- सध्या तरुण तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चुकीचे प्रकार घडलेले आपण पाहतच आहोत.पुणे शहरात सेक्सटॉर्षण च्या घटना ताजे असताना पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.पुण्यातील वारजे परिसरात पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ पोर्न वेबसाईटवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात ते दोघेही जण अल्पवयीन असल्याचे तपासातून पुढे आले आहे.
18:15 October 31
माजी आमदार हर्षवर्धन जाधवांवर महिलेला बेदम मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
औरंगाबाद - माजी आमदार हर्षवर्धन जाधवांवर त्यांच्या मैत्रिणीला आणि दुसरी पत्नी म्हणून वावरत असलेल्या महिलेला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ या महिलेने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
17:58 October 31
फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत खोटेपणाचा कळस - आदित्य ठाकरे
मुंबई - आज जी पत्रकार परिषद झाली यामध्ये एवढं खोटं सांगण्यात आलं हे मी आजवर पाहिलं नाही, या शब्दात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आज उपमुख्यमंत्री यांनी वेदांताबाबत चुकीची माहिती दिली, असे ते म्हणाले. त्यांना त्यांच्या टीमने चुकीची माहिती दिली. वेदांता फॉक्सकॉन आणि वेदांता हे दोन्ही वेगळे आहे. हे सरकार खोटे बोलत आहे. हे खोके सरकार आहे, खोटे सरकार आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
17:24 October 31
आमदार बच्चू कडू यांनी कोणताही सौदा केला नाही
मुंबई - आमदार बच्चू कडू यांनी कोणताही सौदा केला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आपण फक्त एक फोन केला होता. सरकार बनवत असल्याने आपण साथीला यायला पाहिजे असे फोनवरुन बच्चू कडू यांना सांगितले होते असे फडणवीस म्हणाले. त्यानंतर ते गुवाहाटीला आले असे फडणवीस यांनी सांगितले. त्यांना कोणतेही आमिष दिले नव्हते, की त्यांनी कशाचीही मागणी केली नव्हती असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
17:09 October 31
हिवाळी अधिवेशनात देशद्रोह कायद्यात बदल - सरकार
नवी दिल्ली - केंद्राने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की सरकार संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात भारतीय दंड संहितेच्या कलम 124 (ए) अंतर्गत देशद्रोह कायद्यात बदल करू शकते. देशद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावेळी केंद्राने ही बाब स्पष्ट केली.
16:50 October 31
आमदार बच्चू कडूंचे अमरावतीत मंगळवारी शक्तीप्रदर्शन, भूमिका जाहीर करणार
अमरावती - राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर अमरावती जिल्ह्यात बडनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या वाद उफाळून आला आहे. या वादावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांची समजूत घातली असताना मंगळवारी आमदार बच्चू कडू अमरावती शहरातील नेहरू मैदान येथे शक्ती प्रदर्शनाद्वारे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.
16:25 October 31
सोलापूर आरटीओ कार्यालयात शेतकरी संघटनेचे आंदोलन, स्वतःला घेतले कोंडून
सोलापूर - सोलापूर आरटीओ कार्यालयात शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील अवैध ऊस वाहतूक रोखण्यात यावी. सोलापूर आरटीओ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रेलरवर कारवाई करावी अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली होती. 28 ऑक्टोबर रोजी आरटीओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या मागणीला यश आले नाही. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नाही म्हणून ऊस दर संघर्ष समितीचे पदाधिकारी सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आरटीओ कार्यालयात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांसोबत चर्चा केली. चर्चेमध्ये काहीही सकारात्मक निर्णय न झाल्याने सर्व पदाधिकऱ्यांनी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर यांच्या कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले.
15:55 October 31
राम नदीजवळ कचरा भूमी प्रकल्पाला कोर्टाची अंतरिम स्थगिती
मुंबई - पुणे महानगरपालिकेला राम नदीजवळ कचरा भूमी प्रकल्प उभारण्याकरता परवानगी देण्यात आली होती. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही पर्यावरण तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने प्रकल्पाला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेला मोठा धक्का बसला आहे. या याचिकेवर पुणे महानगरपालिकेला उत्तर सादर करण्याचे निर्देश देत 11 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावनी ठेवली आहे.
15:48 October 31
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उद्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार
रंगा रेड्डी - काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उद्या तेलंगणातील भारत जोडो यात्रेत सामील होतील. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ही माहिती दिली.
15:08 October 31
सरकारसंदर्भात फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात येत आहे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई - आमचे सरकार येऊन तीन महिने झाले तरीही फेक naretive तयार करण्यात येत आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हा महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आहे असेही ते म्हणाले. सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार होता, आता आम्ही विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
14:38 October 31
वादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या फिलीपिन्समध्ये किमान 100 जण ठार
मनिला - फिलीपिन्समध्ये यावर्षी आलेल्या सर्वात विनाशकारी वादळांपैकी सुमारे 100 लोक मरण पावले आहेत. गावकरी चुकीच्या दिशेने पळाल्याने अनेक दुर्घटना घडल्या. तसेच दगडांनी भरलेल्या चिखलात गाडले गेल्यानंतर डझनभरापेक्षा अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.
14:03 October 31
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केंद्रीय गृहविभागाचे विशेष पदक जाहीर
सातारा - गडचिरोलीतील विशेष ऑपरेशन्स यशस्वी केल्याबद्दल साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केंद्रीय गृहविभागाचे विशेष पदक जाहीर झाले आहे. तेलंगाणातील १३, पंजाबमधील १६, दिल्लीतील १९, जम्मू काश्मीरमधील ४ तर महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष ऑपरेशन पथकाने सन्मानित करण्यात आले आहे.
13:50 October 31
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरातमधील मोरबीला भेट देणार
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, १ नोव्हेंबर रोजी गुजरातमधील मोरबीला भेट देणार आहेत. तेथील पूल पडल्याने ते घटनास्थळाला भेट देतील, असे सांगण्यात आले आहे. हा झुलता पूल कोसळल्याने किमान 130 जणांचा मृत्यू झाला आहे.
13:19 October 31
जम्मू काश्मीर पोलीस आणि सैन्याने दोन दहशतवाद्यांना केली अटक
जम्मू काश्मीर पोलीस आणि सैन्याने 30 ऑक्टोबर रोजी चक केलर येथे दोन दहशतवाद्यांना अटक केली. गौहर मंजूर आणि आकिब हुसैन नंदा, दोघेही द्राबगाम, पुलवामा येथील रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून युद्धजन्य दुकाने जप्त करण्यात आली. त्यांना पोलीस स्टेशन, केलर: पीआरओ (संरक्षण) श्रीनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे
13:09 October 31
रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मान्यता
मुंबई - भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स विषयक राष्ट्रीय धोरणांतर्गत पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मान्यता दिली आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अत्यंत आभारी आहे, असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. रांजणगाव येथील हे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर 297.11 एकरमध्ये पसरले जाईल. विकासासाठी 492.85 कोटी रुपये खर्च केले जातील. ( यातील २०७.९८ कोटी हे भारत सरकारचे योगदान आहे). या EMC चे ₹2000 कोटी गुंतवणूक आकर्षित करणे आणि 5000 रोजगार संधी निर्माण करण्याचे लक्ष्य आहे.
12:35 October 31
शरद पवार यांची प्रकृती खालावली, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना २ नोव्हेंबरला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४ ते ५ नोव्हेंबर रोजी शिर्डीत होणाऱ्या पक्षाच्या शिबिरात ते सहभागी होतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.
12:32 October 31
प्रत्येक प्रकल्प गुजरातला जात आहे हे योग्य नाही - राज ठाकरे
मुंबई - प्रत्येक प्रकल्प गुजरातला जात आहे. हे योग्य नाही. पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
12:24 October 31
ठाण्यातील कळवा परिसरात स्लॅब कोसळून 3 जखमी
ठाणे - ठाण्यातील कळवा परिसरात इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळून 3 जखमी तर एक गंभीर. आयुष धामणे नामक तरुणाच्या डोक्यावर पडला स्लॅब. डोक्यावर स्लॅब पडल्याने दवाखान्यात उपचार सुरू.
12:10 October 31
हबीब इस्माईल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
मुंबई - डोंगरी येथील हबीब इस्माईल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षाविरुद्ध 32 वर्षीय शिक्षिकेने अध्यक्षांनी शिवीगाळ आणि विनयभंग केल्याचा आरोप केल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IPC (A), 509,506,504 आणि इतर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. डोंगरी पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
11:46 October 31
कुठलीही चौकशी सूडबुद्धीने आकसापोटी केली जात नाही - मुख्यमंत्री
मुंबई - १२ हजार कोटींच्या भ्रष्टाचारामध्ये जे काही असेल ते कॅगच्या चौकशीमध्ये समोर येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु कुठलीही चौकशी सूडबुद्धीने किंवा कुठल्या आकसापोटी केली जात नाही, हे लक्षात ठेवावे. यामध्ये पारदर्शकता असेल व हा अहवाल आल्यानंतरच पुढची तपासणी केली जाईल, असेही ते म्हणाले आहेत.
11:33 October 31
माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांना सीबीआयच्या न्यायालयात करण्यात आले हजर
पश्चिम बंगाल स्कूल सर्व्हिस कमिशन (WBSSC) घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अलीपूरच्या विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. कोलकाता येथील सुधारगृहाने चटर्जी यांच्या आभासी हजेरीसाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आणि आज त्यांच्या प्रत्यक्ष हजेरीचे आदेश दिले.
10:55 October 31
रवी राणा म्हणाले, माझे शब्द मी मागे घेतो...
ज्या पद्धतीने गेल्या ८ दिवसापासून चॅनेलच्या माध्यमातून जे दाखवल जात होत. शब्द शब्दातून अनेक शब्द बाहेर निघाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे दोन्ही माझे नेते आहेत. त्यांनी काल मला बोलावले व जवळपास साडेतीन तास वर्षा निवासस्थानी बैठक झाली. काही वाक्य न पटणारी होती त्यावर चर्चा झाली. बच्चू कडू हे माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यामध्ये आमदार आहेत. मी सुद्धा आमदार आहे. आम्ही दोघे सरकार सोबत आहोत. जेव्हा एखादा मतभेद होतो तेव्हा बोलता बोलता तोंडातून जे काही निघाल आहे. एकनाथ शिंदे सोबत जे कोणी आहेत ते आम्ही सहकारी आहोत मी जे काही बोललो आहे ते शब्द मी परत घेतो, असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
10:38 October 31
वाद मिटेना... अपक्ष आमदार बच्चू कडूदेखील मांडणार भूमिका
आमदार रवी राणा यांच्या भूमिकेनंतर अपक्ष आमदार बच्चू कडू हे आपली भूमिका मांडणार आहेत. या संदर्भात ते उद्या भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
10:08 October 31
उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा...शिंदे गटाकडून पुण्यात बॅनरबाजी
पुणे : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी तसेच विरोधक हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला सरकार स्थापन करताना नंतर 50 खोके आणि आत्ता राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जाऊ लागल्याने विरोधक हे आक्रमक होत सत्ताधारी शिंदे सरकारवर टिका करत आहे. अश्यातच पुण्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून पुण्यात बॅनरबाजी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत टीका करण्यात आली आहे.
09:54 October 31
आमदार रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना
आमदार रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. गेली काही दिवस आमदार बच्चू कडू व राणा यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे.
09:50 October 31
शेअर बाजारात सकाळच्या सत्रात निर्देशांक 601.66 अंशांनी वधारला
शेअर बाजारात सकाळच्या सत्रात निर्देशांक 601.66 अंशांनी वधारला. सध्या 60,561.51 निर्देशांकवर पोहोचला आहे.
09:12 October 31
सरदार वल्लभभाई पटेल नसते तर काय झाले असते? धर्मेंद्र प्रधान यांचा सवाल
सरदार वल्लभभाई पटेल नसते तर काय झाले असते? आम्ही भाग्यवान आहोत की आज आम्हाला भारताचा एकसंध चेहरा पाहायला मिळत आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'रन फॉर युनिटी' कार्यक्रमात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान बोलत होते.
08:19 October 31
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयंतीनिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांना वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभ भाईपटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे आदरांजली वाहिली.
07:53 October 31
ज्यांचा मृत्यू झाला त्यांना शांती लाभो-अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, गुजरातमधील कालच्या घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सर्व प्रथम, मी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. ज्यांचा मृत्यू झाला त्यांना शांती लाभो, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले.
07:35 October 31
200 हून अधिक लोकांनी रात्रभर काम केले-गृहमंत्री हर्ष संघवी
सर्वांनी रात्रभर काम केले. नौदल, एनडीआरएफ, वायुसेना आणि लष्कर तातडीने पोहोचले. 200 हून अधिक लोकांनी रात्रभर काम केले,अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली.
07:12 October 31
भारतीय सैन्य रात्री तीन वाजता पोहोचले, पाण्यातून मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरू
मोरबी केबल पूल दुर्घटनेत शोध आणि बचाव कार्य चालू आहे. भारतीय सैन्य रात्री तीनच्या सुमारास येथे पोहोचले होते. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. एनडीआरएफच्या टीमदेखील बचाव कार्य करत असल्याचे मेजर गौरव यांनी सांगितले.
06:43 October 31
उत्सव छठ पूजेची सांगता, भाविकांनी उगवत्या सूर्याला दिले अर्घ्य
चार दिवस चाललेल्या लोकश्रद्धेच्या उत्सव छठ पूजेची सांगता आज सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन झाली. आज बिहारमधील सर्वच जिल्ह्यात भाविकांनी विविध घाटांवर उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले. छठ व्रतामध्ये पूर्ण धार्मिक विधींनी पूजा करून उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले. त्यामुळे विविध घाटांवर भाविक आणि त्यांच्या कुटुंबीयांची संख्याही मोठी होती.
06:20 October 31
पुलाच्या व्यवस्थापन टीमवर गुन्हा दाखल, घटनास्थळी मदतकार्य सुरू
मोरबी केबल पूल कोसळल्या दुर्घटनेत पोलीस, स्थानिक प्रशासन, एसडीआरएफ, भारतीय तटरक्षक दल आणि अग्निशमन विभाग शोध आणि बचाव कार्य करत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी मोरंबी येथील अपघात स्थळाची पाहणी केली. केबल पूल कोसळल्याने 100 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांना उपचारानंतर त्यांच्या घरीही पाठवण्यात आले आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. नदीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू, असल्याचे गुजरात राज्याचे आरोग्य मंत्री रुषिकेश पटेल यांनी सांगितले.
मोरबी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री, खासदार, आमदार, प्रशासकीय यंत्रणा, पोलिस यंत्रणा, आरोग्य सेवा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. अपघाताच्या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेतला आणि आवश्यक मार्गदर्शन केले, असे ट्विट गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी केले. पंतप्रधान कार्यालयाने बचाव कार्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. एसडीआरएफ आणि पोलिस आधीच घटनास्थळी आहेत. पुलाच्या व्यवस्थापन टीमवर भादंवि कलम ३०४, ३०८ आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले.
06:12 October 31
Breaking News जम्मू काश्मीर पोलीस आणि सैन्याने दोन दहशतवाद्यांना केली अटक
मुंबई : गुजरातमधील मोरबी केबल ( Morabi cable collapsed ) पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत पहाटेपर्यंत 100 हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. सुमारे 177 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. १९ जणांवर उपचार सुरू आहेत. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एनडीआरएफ, फायर ब्रिगेड सर्च ऑपरेशन करत आहेत, असे गुजरात माहिती विभागाने म्हटले आहे.