मुंबई - राज्यात रविवारी कोरोना विषाणूच्या ५ हजार ५०८ रुग्णांची नोंद झाली. सोमवारी त्यात घट होऊन ४ हजार ५०५ रुग्णांची नोंद झाली. त्यात मंगळवारी वाढ होऊन ५ हजार ६०९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल सोमवारी ६८ मृत्यूंची नोंद झाली होती त्यात मंगळवारी वाढ होऊन १३७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात गेले काही दिवस रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार सुरू आहे.
राहुल गांधी यांना संपवण्याचा कट; नाना पटोले यांचा आरोप
21:57 August 10
मंगळवारी ५६०९ नवे कोरोना रुग्ण, १३७ मृत्यू
20:33 August 10
राहुल गांधी यांना संपवण्याचा कट - नाना पटोले
नाशिक - राहुल गांधी असतानाच बॉम्बस्फोट झाले त्याची चौकशी करावी. तसेच राहुल गांधी यांना संपवण्याचा कट होता, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच याची चौकशी करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. बाबासाहेबांनी संविधान दिल नसतं, तर तुम्ही चहा विकू शकले नसते. चहा विकता विकता तुम्हाला देश विकायची परवानगी दिली आहे का? असा सवाल पटोले यांनी केला आहे. रामाच्या नावाने टोल गोळा करण्याचे काम सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
19:18 August 10
काँग्रेस मंत्र्यांचा नाशिक दौरा
नाशिक - शिवसेना, राष्ट्रवादी मंत्र्यांपाठोपाठ काँग्रेस मंत्र्यांनीही नाशिक दौरा सुरू केला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. शहरातील हुतात्मा स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले. जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर, हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
19:12 August 10
लोकल प्रवासासाठी कोविड लसीकरण ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया उद्यापासून सुरू
मुंबई - सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा यासाठी उद्या (११ ऑगस्ट) सकाळी ७ वाजेपासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर कोविड लसीकरण ऑफलाईन पडताळणी व मासिक रेल्वे पास प्रक्रिया सुरु होणार आहे. नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोविड लसीकरण दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, छायाचित्र, ओळखपत्र पुरावा आणणे आवश्यक आहे. पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना १५ ऑगस्टपासून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५३ रेल्वे स्थानकांवर ३५८ मदत कक्ष उघडणार आहेत. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात एकूण १०९ स्थानकांवर मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये कक्ष कार्यरत राहणार आहे.
17:01 August 10
नंदुरबार : शहरातील बिस्मिला चौक परिसरात दोन गटात दगडफेक
नंदुरबार - शहरातील बिस्मिला चौक परिसरात दोन गटात दगडफेक झाली. काल रात्री आणि आज दुपारी पुन्हा दगडफेक करण्यात आली. दोन युवकांच्या लघुशंका करण्याच्या जागेवरुन हा वाद सुरु झाला होता. रात्रीच्या घटनेमध्ये दोन गाड्यांच्या जाळपोळीसह एक पोलीस वाहनाची तोडफो़ड करण्यात आली. रात्रीच्या दगडफेक आणि बाटलीफेक प्रकरणी ३३ जणांवर गुन्हा दाखल, तर ६ जणांना ताब्या घेतले आहे. आज दुपारच्या दगडफेकीतील आरोपींच्या मागावर पोलीस आहेत. परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
16:26 August 10
उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करणार - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई - २८ में २०२१ रोजीचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. निकष तपासून पुढील निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. न्यायालयाच्या निकालाचा आम्ही अभ्यास करू, न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. निकालाचे पत्र आम्हाला आले नाही. पत्र येताच यावर आम्ही बोलू, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
15:37 August 10
अकरावी प्रवेशासाठीची CET मुंबई हायकोर्टाकडून रद्द
मुंबई - अकरावी प्रवेशासाठीची CET हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. 28 मे चा यासंदर्भातला अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे हायकोर्टाने सांगितले आहे. राज्य सरकारनं निकालाला स्थगिती देण्याची याचिका केली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे.
13:56 August 10
20 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या :
ठाणे - "लंबू, लंबू' चिडविण्याच्या वादातून 20 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह त्रिकटू गजाआड
13:12 August 10
आरोग्यमंत्र्यांची पत्रकार परिषद :
मुंबई - रेल्वेबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात. तिसरी लाट आली तर आली तर ऑक्सिजन, डॉक्टर पुरेसे असावे यासाठी आज बैठक होणार आहे. घाई गडबडीने अनर्थ होऊ नये, यासाठी थोडी वेळ पाहावी. राज्यात डेल्टा प्लसचे 45 रुग्ण आहेत. बीड जिल्ह्यातील महिलांच्या पिशव्या काढल्याचा तक्रार आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात संक्रमण करण्याचे गुण त्याच्यामध्ये आहे. तिसऱ्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी आत्मविश्वासाने तयार आहोत. तिसरी लाट येऊ नये, तिची तीव्रता कमी असावी, यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सहमतीने आणि मान्यतेने शाळा आणि काॅलेज संदर्भात संबॅधित विभाग निर्णय घेतील. कोरोना अनुंसंघाने निर्णय घेतील. सर्व गावातील मॅनेजमेंटने धुळे, नंदुरबारचे अनुकरण करावे. दर आठवड्याला नमुने तपासले जात आहेत. शाळा, कॉलेज सुरू करण्याचे अधिकार आम्ही शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आमच्याकडे त्यांनी सल्ला मागितला तर आम्ही देऊ, असेही त्यांनी सांगितले.
13:10 August 10
सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण -
मुंबई - सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरणात आणखी दोन साखर कारखान्यांचे व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत. नंदुरबार येथील पुष्परेंद्धेश्वर आणि अमरावती येथील अंबादेवी सहकारी साखर कारखान्याची कागदपत्रं ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली.
12:05 August 10
बेकायदेशीर बांधकामांना दिलेली मुदत -
मुंबई - राज्यभरातील बेकायदेशीर बांधकामांना दिलेला दिलासा महिनाअखेरपर्यंत
- मुंबई उच्च न्यायालयानं कोरोनाकाळात कारवाईला दिलेली स्थगिती 31 ऑगस्टला संपणार
- प्रशासनानं कायद्यानुसार कार्यवाही सुरू करावी - उच्च न्यायालय
- पुणे मेट्रो संदर्भातील याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाचे निर्देश
12:02 August 10
विदर्भवाद्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन :
नागपूर - विदर्भवाद्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू असताना दुसऱ्याच दिवशी विदर्भ राज्य समितीचे अध्यक्ष वामनराव चटप, राम नेवले, यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
यात काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा विरोध व्यक्त केल्याने पुन्हा अटक करण्यात आला. यामध्ये तहसील पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. आंदोलनासाठी परवानगी मागून नाकारल्याने पहिल्या दिवशी आंदोलन चाललेले मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कारवाई केली. यात पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप करण्यात आला. पण हा लढा असाच सुरू राहील असेही चटप म्हणाले.
11:48 August 10
बीएचआर आर्थिक गैरव्यवहार प्रकरण :
राज्यातील बहुचर्चित बीएचआर गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख संशयित सुनील झंवर याला पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे. हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर सुनील झंवर फरार होता. दरम्यान, झंवर याला अटक झाल्यानंतर आता या गैरव्यवहार प्रकरणातील तपासाला गती मिळण्याची शक्यता असून, अजून बडे मासे रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
09:31 August 10
15 वर्षाच्या मुलीने केला आईचा खून
नवी मुंबई (ठाणे) - आई अभ्यास कर असा सतत तगादा लावतेय म्हणून 15 वर्षांच्या मुलीने आईचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये ही घटना घडली. कराटेच्या पट्ट्याने आपल्या आईचा गळा आवळला. तर आत्महत्या केली असा बनावही तिने केला.
09:16 August 10
नंदुरबार शहरातील बिस्मिली चौकात तुफान दगडफेक
नंदुरबार - शहरातील बिस्मिली चौकात मध्यरात्री 1 वाजता तुफान दगडफेक
- मध्यरात्री दोन गट समोरासमोर आल्याने वाद वाढला
- दंगल खोरांकडून विद्युत पुरवठा खंडित
- पोलिसांकडून जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
- या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात