मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोनाचा प्रसार आटोक्यात (corona spread under control in Mumbai) आला आहे. गेले तीन ते चार दिवस एक आकडी रुग्णांची नोंद होत होती. आज त्यात वाढ होऊन १६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद (16 new corona patients registered) झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद (zero corona deaths record) झाली असून अडीच वर्षांत १८२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या (number of active corona patients) वाढली होती. (Latest news from Mumbai) त्यातही घट होऊन ५१ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
Breaking News : मुंबईत कोरोनाचे १६ नवे रुग्ण, शून्य मृत्यू
20:30 December 04
मुंबईत कोरोनाचे १६ नवे रुग्ण, शून्य मृत्यू
20:30 December 04
नदीपात्रात दूषित पाणी सोडल्याने हजारो माशांचा मृत्यू
बीड - शहराला वरदान धरलेली बिंदुसरा नदीत ( Bindusara river in Beed ) एमआयडीसीचे दूषित पाणी ( Contamination of Bindusara River MIDC ) सोडल्यामुळे नदीपात्रातील हजारो मासे मरून पडले ( Fish die off in Bindusara river ) आहे. तसेच एका कुत्र्याचाही मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर हेच पाणी गावकऱ्यांना पिण्यासाठी विहीर, बोअर, हातपंपाला येत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दूषित पाण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यानिमित्ताने प्रशासन याची दखल घेणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
18:53 December 04
पश्चिम रेल्वेच्या बांद्रा रेल्वे स्थानकात डाऊन दिशेला पाच डिसेंबर रोजी अल्पसा दुरूस्ती ब्लॉक
मुंबई - पश्चिम रेल्वेवर बांद्रा रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी महत्त्वाच्या देखभाल दुरुस्ती कामासंदर्भात 5 डिसेंबर रोजी महत्त्वाचा छोटा मेगाब्लॉक दुपारी घेण्यात येणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मेगाब्लॉक नसेल. मात्र बांद्रा रेल्वे स्थानकात ऐतिहासिक वास्तूची देखभाल दुरुस्ती संदर्भात दुपारी पश्चिम रेल्वे मार्गावर डाऊन दिशेला दीड ते सायंकाळी साडेचार या काळामध्ये पाच डिसेंबर रोजी अल्पसा मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेवर करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या वेळापत्रकाची दखल घ्यावी असे आवाहन पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांनी केलेले आहे.
17:57 December 04
विशाखापट्टणम येथे नौदल दिन सोहळा सुरू; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची उपस्थिती
विशाखापट्टणम - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे नौदल दिनाच्या सोहळ्याला उपस्थित आहेत. याठिकाणी नौदलातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
16:40 December 04
जुळ्या बहिणींशी लग्न करणे नवरदेवाला पडले महागात, गुन्हा दाखल
सोलापूर - जुळ्या बहिणींचे 2 डिसेंबर रोजी एकत्र लग्न केल्याप्रकरणी अतुल आवताडे याच्या विरोधात आयपीसी कलम 494 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न अकलूज शहरात झाले होते, ्अशी माहिती एसपी सोलापूर शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.
16:31 December 04
गुप्तांगास सिगारेटचे चटके देऊन महिलेवर केला गँगरेप, कुर्ल्यातील संतापजनक घटना
मुंबई : मुंबईत एकामागून एक संतापजनक गुन्हे घडत असून ते थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. एका ४२ वर्षीय महिलेवर तिच्या घरात घुसून तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना कुर्ला येथे घडली आहे. पीडितेवर धारदार शस्त्राने वार केले आणि सिगारेटने तिच्या गुप्तांगास चटके दिल्याचे वैद्यकीय तपासात उघडकीस आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
15:50 December 04
मुख्यमंत्र्यांचे स्टेअरिंग देवेंद्र फडणवीसांच्या हाती, बुलडाण्यात दोघेही फ्रंट सीटवर

बुलडाण्याच्या मेहकर येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वीकरला सत्कार
यावेळी देवेंद्र फडणवीस हे गाड़ी चालवत होते, तर एकनाथ शिंदे बाजूला बसले
14:12 December 04
बीकॉम शिक्षण घेणाऱ्या तरुणाकडे अडीच लाखांच्या बनावट नोटा
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी शहरांमध्ये बनावट नोटा चालविणाऱ्या महाविद्यालयीन तरुणास सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले आहे. त्याच्याकडून अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.महाविद्यालयीन तरुणांना पैशाचे अमिश दाखवून कुर्डवाडीत बनावट नोटांचा धंदा सुरू होता. हर्षल शिवाजी लोकरे (वय २०, रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि सुभाष दिगंबर काळे (वय ३६, रा. भोसरी, ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.ह
12:27 December 04
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरला राष्ट्रवादी विराट मोर्चा काढणार
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 19 डिसेंबरला नागपूरला विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते
11:27 December 04
दिल्ली महानगरापालिकेत सकाळी साडेदहा वाजेपर्यंत ९ टक्के मतदान
दिल्ली महानगरापालिकेत सकाळी साडेदहा वाजेपर्यंत ९ टक्के मतदान झाले आहे.
10:47 December 04
दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांचे नाव मतदार यादीतून गायब
दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी दावा केला की रविवारी दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. तेव्हा त्यांना मतदार यादीतून त्यांचे नाव गायब असल्याचे आढळले.
10:25 December 04
दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात सुकाणू समितीची बैठक
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, केसी वेणुगोपाल, पी चिदंबरम आणि पक्षाचे इतर नेते एआयसीसी कार्यालयात काँग्रेस सुकाणू समितीच्या बैठकीला उपस्थित होते.
10:10 December 04
दिल्लीतील लोक मोठ्या संख्येने मतदान करतील- हर्ष वर्धन
मला पूर्ण विश्वास आहे की दिल्लीतील लोक मोठ्या संख्येने मतदान करतील. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने देशाला नवीन उंचीवर नेले आहे, मला आशा आहे की लोक त्यानुसार मतदान करतील. दिल्लीने गेल्या 15 वर्षात भाजपचे काम पाहिले आहे, असे माजी आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.
08:42 December 04
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार समृद्धी महामार्गाचा दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार समृद्धी महामार्गाचा दौरा करणार आहेत. सकाळी ९ वाजता मुंबईतील निवसस्थानावरून ते विमानतळाकडे निघतील सकाळी 10.30 पासून समृद्धी महामार्गाचा ( झिरो माईल गार्डनपासून) पाहणी दौरा सुरू होईल. नागपूर ते शिर्डी आशा 520 किलोमीटर लांबीच्या नागपूर-शिर्डी मार्गाची समृद्धी महामार्गावर रस्तेमार्गाने पाहणी करून संध्याकाळी 5.30 वाजता शिर्डी येथे पोहोचतील. शिर्डीवरून दिल्लीला जी-20 परिषदेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पार पडणाऱ्या विशेष बैठकीसाठी रवाना होतील.
08:14 December 04
दिल्ली महानगरपालिकेच्या २५० वॉर्डसाठी मतदान सुरू
दिल्ली महानगरपालिकेसाठी मतदान करण्यासाठी काँग्रेस नेते अजय माकन राजौरी गार्डनमधील मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. २५० वॉर्डसाठी मतदान सुरू झाले आहे.
07:38 December 04
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील वाहतूक व्यवस्थापनात होणार बदल
मुंबई : 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे चैत्यभूमी आणि आसपासच्या परिसरातील रस्त्यांच्या वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेता ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत वाहतूक व्यवस्थापनासाठी योग्य ते आदेश काढण्यात आले आहेत.
07:00 December 04
६वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात, रात्रीच्या मॅरेथॉनला उस्फूर्त प्रतिसाद
पुणे : देशातील सर्वात जुनी व पहिली पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा ३६वे वर्ष साजरे करीत असून यंदा होणाऱ्या ‘नाईट मॅरेथॉन’चे रविवार 4 डिसेंबर ००.०० वाजता म्हणजे दि. ३ डिसेंबर रात्री १२ वाजता सारस बागे जवळील सणस मैदान येथे कारगिलच्या लडाख स्वायत्त हिल विकास परिषदेचे चेअरमन / चीफ एक्झिक्युटिव्ह काउंसिलर फिरोज अहमद खान यांच्या शुभ हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आले. सकाळी ८ वाजता या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ सणस मैदान येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल.
06:57 December 04
राज्यपाल नियुक्तीबाबत निकष असावेत- उद्धव ठाकरे
राज्यपाल नियुक्तीबाबत निकष असावेत, असे शिवसेनेचे ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यपालांनी शिवाजी महाराजांबाबत अवमानास्पद वक्तव्य केल्याने राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहेत.
06:54 December 04
भारतीय विमान वाहतूक सेवेने जागतिक सुरक्षा क्रमवारीत ४८व्या क्रमांकावर घेतली झेप
आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या अहवालात भारतीय विमान वाहतूक सुरक्षा क्रमवारीत ४८व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
06:53 December 04
हल्ला झाल्यास मातृभूमीच्या प्रत्येक इंचाचे रक्षण करू- पाकचे लष्करप्रमुख
हल्ला झाल्यास मातृभूमीच्या प्रत्येक इंचाचे रक्षण करू, असे पाकचे लष्करप्रमुख मुनीर यांनी म्हटले आहे
06:53 December 04
अर्जेंटिनाचा उपांत्यपूर्व निश्चित
अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाला २-१ ने हरवले आहे.
06:52 December 04
नासाच्या अंतराळवीरांनी स्पेस स्टेशनवर बसविले नवीन रोल-आउट सोलर
नासाच्या अंतराळवीरांनी स्पेस स्टेशनवर नवीन रोल-आउट सोलर अॅरे यशस्वीरित्या स्थापित केले आहे.
06:50 December 04
अपंग कल्याण विभागाचे स्वतंत्र विभाग असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य
अपंग कल्याण विभागाचे स्वतंत्र विभाग असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. यामुळे अनेक प्रश्न एकाच ठिकाणी सोडवले जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने दिव्यांगांच्या सोयीसाठी एक चांगले पाऊल उचलले आहे. प्रहार क्रांती संघटना, मुंबईचे अध्यक्ष बी काणे यांनी सांगितले.
06:47 December 04
दिल्ली महापालिका निवडणुकीला आज होणार मतदान
आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. दिल्लीतील लक्ष्मी नगर येथील एमसी प्राथमिक शाळेत मतदानाची तयारी सुरू आहे.
06:26 December 04
Breaking News
मुंबई : शिवसेनेत सर्व प्रकारची पदे भोगून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले प्रमुख आमदार व नेत्यांना लक्ष्य करण्याची रणनीती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. बंजारा समाजाच्या मतांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या संजय राठोड यांनी गटात गेले आहेत. मात्र, बंजारा समाज, महंतांची फौज ठाकरेंकडे आजही कायम आहे. माजी आमदार गिरधर राठोड यांचा मुलगा अनिल राडोठ यांनी देखील शिवबंधन बांधल्याने संजय राठोड यांची पुर्णतः नाकेबंदी होण्याची शक्यता आहे.