ETV Bharat / state

Marathi Breaking News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अभिनेते विक्रम गोखले यांच्या कुटुंबियांची भैट - Maharashtra crime news

Maharashtra Breaking News
Maharashtra Breaking News
author img

By

Published : Nov 28, 2022, 6:49 AM IST

Updated : Nov 28, 2022, 7:43 PM IST

19:42 November 28

दिल्लीत आरोपी अफताबवर हल्ला

दिल्लीत आरोपी अफताबवर हल्ला करण्यात आला आहे.

19:42 November 28

आफताबला गांजा पुरवणारा ड्रग्ज पेडलरला सुरत येथून अटक

मुंबई : श्रद्धा हत्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. सुरतमध्ये आफताबशी संबंध असल्याच्या संशयावरून अमली पदार्थ विकणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांनी ड्रग्स तस्कर फैजल मोमीन याला सुरतमध्ये ड्रग्जच्या छाप्यादरम्यान अटक केली आहे. फैसल हा आफताबचाही ड्रग्ज सप्लायर असल्याचा संशय आहे. तो वसई पश्चिमेतील आफताबच्याच घरात राहिला होता.

19:41 November 28

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अभिनेते विक्रम गोखले यांच्या कुटुंबियांची भैट

पुणे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेते विक्रम गोखले यांच्या कुटुंबियांची भैट घेतली. तसेच गोखले यांना यावेळी त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

16:51 November 28

एक डिसेंबरला हजर राहा, संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाकडून समन्स

कोल्हापूर : संजय राऊत यांनी बेळगाव कोर्टाकडून समन्स पाठवण्यात आले आहे. सीमाभागाच्या संदर्भात बेळगाव येथे एका कार्यक्रमात 30 मार्च 2018 मध्ये बोलत असताना प्रक्षोभक भाषण केल्याने समन्स जारी केले आहे. 1 डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे समन्स आहे. बेळगाव येथे एका वेब पोर्टल च्या उद्घाटनासाठी आले असता आयोजित कार्यक्रमातील भाषणात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी टीळकवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

16:25 November 28

मराठी बांधवांवर अन्याय सहन करणार नाही - संजय राऊत

उद्धव ठाकरेंचे बोलून बेळगाव कोर्टात हजर राहणार

मराठी बांधवांवर अन्याय सहन करणार नाही

जीवाची पर्वा न करता या प्रकरणात लढत राहील

हजारोच्या संख्येने आम्ही बेळगाव कोर्टात स्वतःला अटक करून घेऊ

बेळगावसाठी 170 वा हुतात्मा होण्याची माझी तयारी आहे

16:22 November 28

मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांच्या मुलाला जामीन मंजूर

मनी लाँड्रिंग प्रकरण - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला पीएमएलए कोर्टातून जामीन मिळाला आहे.

14:57 November 28

दिल्लीतील फुटवेअर कंपनीला आग

दिल्लीतील फुटवेअर कंपनीला आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

14:56 November 28

​​राज्यपालांच्या पदमुक्तीचे संकेत धांदात खोटे, हा एक ​खोडसाळपणा - राजभवन

मुंबई - सतत वादात सापडले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परत जाण्याचे संकते दिल्याचे वृत्त प्रसारीत होताच, राजकीय वतुर्ळातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. मात्र, राज्यपालांच्या पदमुक्तीचे संकेत​ दिल्याचे वृत्त धांदात खोटे असून हा​ ​एक ​खोडसाळपणा​ आहे. कोणतेही​ यात​ तथ्य ​नसल्याची माहिती राजभवन सचिवालय विभागाने दिली.

13:30 November 28

अमली पदार्थ तस्कराला अटक, 20 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त

एका अमली पदार्थ तस्कराला अटक केली असून त्याच्या ताब्यातून 20 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्याला १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे दिंडोशी पोलिसांनी सांगितले.

11:52 November 28

पतीच्या हत्येप्रकरणी एका महिलेसह तिच्या मुलाला अटक

पतीच्या हत्येप्रकरणी एका महिलेसह तिच्या मुलासह तिला दिल्लीतील पांडवनगर येथे गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांनी शरीराचे अनेक तुकडे केले, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले आणि ते तुकडे जवळच्या मैदानात विल्हेवाट लावण्यासाठी वापरले, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली आहे.

11:34 November 28

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही मंत्री 03 डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगावीला भेट देणार आहेत.

11:22 November 28

पुणे ते नागपूर जाणारी हमसफर ट्रेन आज उशिराने धावणार

पुणे ते नागपूर जाणारी हमसफर ट्रेन आज उशिराने धावत आहे. सकाळी दहा वाजून 40 मिनिटाऐवजी सायंकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी पुण्याहून सुटणार आहे. पुणे ते नागपूर हमसफर ट्रेन ही पुणे पनवेल कल्याण भुसावळ मार्गे नागपूरला जाते मध्य रेल्वेने या ट्रेनच्या काही कारणास्तव वेळापत्रक बदललेले आहे .त्यामुळे आज सकाळी दहा वाजून 40 मिनिटांनी ही ट्रेन पुण्यावरून नागपूर साठी रवाना होणार होती. परंतु आता ती आज सायंकाळी उशिराने म्हणजे सहा वाजून 45 मिनिटांनी पुण्याहून नागपूर साठी रवाना होणार आहे. ट्रेन अचानक वेळ बदलल्यामुळे पुणे ते नागपूर जाणाऱ्या प्रवाशांना मात्र मनस्ताप झालेला आहे.

11:04 November 28

'भारत जोडो यात्रे' दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधींनी चालविली सायकल

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 'भारत जोडो यात्रे' दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधींनी सायकल चालविली.

11:03 November 28

10:21 November 28

आरोपी आफताबची आजही होणार पॉलीग्राफ चाचणी

आरोपी आफताबला पॉलीग्राफ चाचणीसाठी एफएसएल रोहिणी येथे आणण्यात आले. त्याची आजही चाचणी सुरू राहणार आहे.

09:24 November 28

अमृता फडणवीस यांच्यासमवेत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी स्वच्छता मोहिमेला दाखविला हिरवा झेंडा

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अमृता फडणवीस यांच्यासमवेत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी पंजीम येथील मिरामार बीच येथे स्वच्छता मोहिमेला हिरवा झेंडा दाखवत आहेत.

09:23 November 28

काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेला इंदूरमधून सुरुवात

काँग्रेस पक्षाच्या 'भारत जोडो यात्रे'ला बडा गणपती चौक, इंदूर येथून सुरुवात झाली आहे.

09:00 November 28

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये घेणार सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावनगरमधील पालिताना, कच्छमधील अंजार, जामनगर आणि राजकोटमध्ये सभा घेणार आहेत.

08:59 November 28

चीनने शून्य कोविड धोरणावर जनेता दबाव, पत्रकाराला सरकारने घेतले ताब्यात

चीनने शून्य कोविड धोरणावर जनेता दबाव आहे. अशातच बीबीसी पत्रकाराला मारहाण करण्यात आली आहे. या पत्रकाराला चीनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.

07:57 November 28

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी ऑलिम्पियन पीटी उषा यांची बिनविरोध निवड

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्षपदी ऑलिम्पियन पीटी उषा यांची बिनविरोध निवड झाली आहे. ऑलिम्पिक संघटनेच्या ( ९५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला अध्यक्ष बनली आहे. 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत त्या एकमेव उमेदवार आहेत, मात्र निवडणुकीपूर्वीच तिच्या नावावर सर्वांचे एकमत झाले आहे. 1984 ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत 58 वर्षीय उषा, अनेक आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेती असून त्या चौथ्या स्थानावर राहिल्या होत्या.

07:38 November 28

बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील रिक्षाचालकांचे आजपासून बेमुदत उपोषण

पुणे :- बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील रिक्षा संघटना आक्रमक झाल्या आहेत. आजपासून रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. तसेच रिक्षा बंदमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक सहभागी होणार आहेत. शहरातील विविध रिक्षा संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

07:17 November 28

भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांच्या हाताला आणि गुडघ्याला दुखापत

इंदूरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान खाली पडल्याने काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या हाताला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे.

07:04 November 28

केजरीवाल सरकारच्या बेजबाबदार आश्वासनांसाठी लोकांना उत्तर देण्याची संधी-पियूष गोयल

केजरीवाल सरकारच्या बेजबाबदार, भ्रष्ट, खोट्या आश्वासनांसाठी आणि लोकांची दिशाभूल केल्याबद्दल लोकांना आता उत्तर देण्याची संधी आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल दिल्लीच्या आनंद विहमध्ये जाहीर सभेत बोलत होते.

07:03 November 28

हरियाणात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा संप सुरुच

बाँड धोरणामुळे विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त होईल. सरकारने अद्याप विद्यार्थ्यांना रोजगाराचे आश्वासन दिलेले नाही. 27 दिवसांहून अधिक काळ संप सुरू आहे. परंतु आम्हाला कोणतेही सकारात्मक परिणाम दिसले नाहीत. या धोरणामुळे शिक्षणाच्या अधिकाराला बाधा येईल, असे बाँड पॉलिसीवरील एका विद्यार्थ्याने सांगितले.

06:33 November 28

Maharashtra Breaking New महाराष्ट्राची समिती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेणार जाणार कर्नाटकच्या दौऱ्यावर

मुंबई तुम्ही वीकेंडला ड्रिंक आणि चटपटीत चकण्यासाठी बारमध्ये जात असाल तर सावधान...कारण नुकताच सायन पोलिसांनी एका सेवा निवृत्त लष्कर अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. जिथे रेस्टॉरंट आणि बार मध्ये थेट कबुतरांचा स्टार्टर साठी वापर होत आहे. निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी केलेले दावे खोटे की खरे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Last Updated : Nov 28, 2022, 7:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.