ETV Bharat / state

Maharashtra Breaking news श्रद्धाची खांडोळी केल्यानंतर आफताब २० जणींना घरी घेऊन आला होता? - Etv Bharat Maharashtra news

Maharashtra Breaking news
Maharashtra Breaking news
author img

By

Published : Nov 18, 2022, 6:47 AM IST

Updated : Nov 18, 2022, 7:22 PM IST

19:02 November 18

श्रद्धाची खांडोळी केल्यानंतर आफताब २० जणींना घरी घेऊन आला होता?

मुंबई - श्रद्धाच्या शरीराची खांडोळी करून फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर आफताब २० जणींना घरी घेऊन आला होता अशी माहिती पुढे येत आहे. आता आफताबला दिल्ली पोलीस लवकरच मुंबईत आणणार आहेत. श्रद्धाचा मोबाईल मुंबईत टाकल्याची माहिती मिळाल्याने तो शोधण्यासाठी त्याला मुंबईत पोलीस घेऊन येणार आहे.

17:53 November 18

कोळीवाड्याजवळ समुद्रात ५ जण गेले वाहून, दोघांचा मृत्यू

मुंबई - वरळी कोळीवाड्याजवळ समुद्रात ५ जण वाहून गेले होते. या ५ जणांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यामधील एका १३ वर्षीय मुलीला परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या प्रकृतीची माहिती अद्याप मिळालेली नाही. यातील दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

17:50 November 18

आदित्य ठाकरे यांची विद्यमान शिंदे फडणवीस सरकारवर टीका

मुंबई - माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्यमान शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. मुंबई महानगरपालिकेत या सरकारकडून मनमानी आणि हुकुमशाही सुरू असल्याचे ते म्हणाले आहेत. सत्य समोर आणणाऱ्या पत्रकारांना एचएमव्ही म्हटले जाते हे योग्य नसल्याचेही ठाकरे म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

15:47 November 18

पंजा मारल्याशिवाय वाघ म्हणणार नसाल तर आम्ही पंजा मारू - राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर - राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा. सरकारला आमच्या आंदोलनाची दाखल घ्यावी वाटत नसेल तर आम्ही मंत्र्याना मैदानात भेटू असा दिला इशारा. सारकारला जागे करण्यासाठी 25 नोव्हेंबरला आम्ही राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे, असे शेट्टी म्हणाले आहेत. पंजा मारल्याशिवाय आम्हाला वाघ म्हणणार नसाल तर आम्ही पंजा मारू, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

15:42 November 18

मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी चिखलीत अडवले

बुलडाणा - मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी चिखलीत अडवले. औरंगाबादवरुन निघालेले कार्यकर्ते अडवले. संदिप देशपांडेंनाही अडवले. राहुल गांधी यांची यात्रा अडवण्यासाठी मनसे कार्यकर्ते या ठिकाणी गेले आहेत.

15:23 November 18

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे यांचा जामीन मंजूर, मात्र मुक्काम तुरुंगातच

मुंबई - सचिन वाजे यांनी सीआरपीसी कलम 88 अंतर्गत जामीन अर्ज दाखल केला होता. सचिन वाजे यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध दर्शवला होता. सचिन वाजे प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्याने या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा ईडीने केला होता. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असल्याने जामीन देऊ नये सत्र न्यायालयात ईडीने युक्तिवाद केला होता. मात्र जामिन मिळूनसुद्धा इतर प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याने वाजे यांचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे.

14:58 November 18

श्रद्धा खून प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांचे पथक वसई पालघरला पोहोचले

पालघर - श्रद्धा खून प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांचे पथक वसई, पालघर येथे पोहोचले आहे. या पथकाने स्थानिक माणिकपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून तपासात त्यांची मदत घेतली जात आहे.

14:40 November 18

डॉक्टरचे अपहरणकर्त्याच्या विरोधात २६ दिवसांनी ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे - फिल्मी स्टाईलने भर रस्त्यातून ३८ वर्षीय डॉक्टरचे अपहरण केले होते. नंतर तीस लाखाची खंडणी घेऊन जंगलात पळून गेलेल्या चार अपहरणकर्त्याच्या विरोधात २६ दिवसांनी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अपहरणकर्त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

14:16 November 18

श्रद्धा वालकरवर नालासोपारामध्ये डॉक्टरांनी केले होते उपचार

श्रद्धाला खांदे आणि पाठीत तीव्र वेदना होत असल्याने तिला दाखल करण्यात आले, तिने कारण सांगितले नाही. तिच्यावर फारशी जखम आढळली नाही. प्रवेशावेळी आफताब उपस्थित होता. तिचे कुटुंब पाहिल्याचे आठवत नाही, अशी माहिती डॉ एसपी शिंदे यांनी दिली.

12:15 November 18

दहशतवादी हिंसाचार पसरवत आहेत- केंद्रीय गृहमंत्री

दहशतवादी हिंसाचार पसरवत आहेत, तरुणांना कट्टरपंथी बनवत आहेत आणि आर्थिक स्त्रोतांसाठी नवीन मार्ग शोधत आहेत. आपली ओळख लपवण्यासाठी आणि कट्टरतावादी साहित्य पसरवण्यासाठी दहशतवादी डार्क नेट वापरत आहेत. क्रिप्टोकरन्सीसारख्या आभासी मालमत्तेचा वापरही वाढत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

11:49 November 18

गुजरात पाकिस्तानातआहे का? - मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा सवाल

गुजरात पाकिस्तानातआहे का? हे आपलेच आहे, मतभेद कुठून येतात? जेव्हा सरदार सरोवर बांधले गेले तेव्हा गुजरातला पाणी मिळाले आणि एमपीला वीज मिळाली, असा टोला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लगावला.

10:28 November 18

सावरकरांच्या मुद्यावरुन महा विकास आघाडीमध्ये फूट पडू शकते - संजय राऊत

मुंबई - सावरकरांच्या मुद्यावरुन महा विकास आघाडीमध्ये फूट पडू शकते असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. केंद्रात भाजपचे सरकार असूनही वीर सावरकर यांना भारत रत्न अजून का मिळाले नाही असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच बाळासाहेब ठाकेर यांनी सावरकरांचे विचार जपले असेही राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

10:12 November 18

राहुल गांधी यांच्यासोबत गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांचासुद्धा भारत जोडो यात्रेत सहभाग

अकोला - राहुल गांधी यांच्यासोबत गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांचासुद्धा भारत जोडो यात्रेत सहभाग आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे.

10:08 November 18

तीर्थपुरी पहाटे सशस्‍त्र दरोडा ४० तोळे सोने लंपास

जालना - जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे उल्हासराव पवार यांच्या घरी (खिडकीचा मळा) आज (शुक्रवार) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सशस्‍त्र दरोडा पडला. यामध्ये पती-पत्नीला मारहाण करून जवळपास ४० तोळे सोने लंपास करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

09:56 November 18

इलॉन मस्कच्या 'हार्डकोर' अल्टीमेटमने ट्विटरमध्ये राजीनाम्याची लाट

इलॉन मस्कच्या 'हार्डकोर' अल्टीमेटमने ट्विटरमध्ये राजीनाम्याची लाट आली आहे. मस्कने कर्मचार्‍यांना राहायचे असल्यास मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. त्याबाबतचा ईमेल कर्मचाऱ्यांना पाठविला आहे. त्यानंतर इलॉन मस्कच्या ट्विटरला नवीन धक्का बसला आहे. नवीन मालकाच्या हार्डकोर कामाच्या वातावरणासाठी वचनबद्ध होण्याच्या अल्टीमेटमच्या अंतिम मुदतीपूर्वी शेकडो कर्मचार्‍यांनी गुरुवारी राजीनामा दिला.

09:51 November 18

बाजार उघडताच सेन्सेक्स तेजीत, 180 अंकांची वाढ

मुंबई - सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 179.28 अंकांनी 61,929.88 वर पोहोचला. तर निफ्टी 50.7 अंकांनी 18,394.60 वर पोहोचला.

09:36 November 18

राहुल गांधी यांच्या यात्रेत शेकडो लोक सहभागी

अकोला - काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा बाळापूर, महाराष्ट्रातून आज सकाळी सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेत शेकडो लोक सहभागी होत आहेत.

08:28 November 18

राहुल गांधींविरोधात पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल

बाळासाहेबांची शिवसेनेच्या (शिंदे गट) वंदना सुहास डोंगरे यांनी राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. स्वातंत्र्य सैनिकाची बदनामी केली आणि स्थानिकांच्या भावना दुखावल्या, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आयपीसी 500 आणि 501 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

07:34 November 18

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या बाहेर युवक काँग्रेसची पोस्टर बाजी

पुणे : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यभर राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. तर राहुल गांधी हे आपल्या विधानावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यात युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारका बाहेर माफीवीर असे फलक लावले आहे.

07:08 November 18

जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग- भारताने संयुक्त राष्ट्रसंघात पुन्हा मांडली भूमिका

आम्ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या समितीमधील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी भेटत असताना, पाकिस्तानच्या एका प्रतिनिधीने पुन्हा जम्मू काश्मीरचा अवास्तव संदर्भ दिला आहे. पाकिस्तान प्रतिनिधी काय मानतात याची पर्वा नाही, जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी प्रतीक माथूर यांनी सांगितले.

06:58 November 18

सर्वसामान्य शेतकरीदेखील लढू शकणार बाजार समितीची निवडणूक

सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतील. यासंदर्भात महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या सुधारणेमुळे कृषि उत्पन्न बाजार समितीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व तसेच कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे. या अधिनियमाच्या 13 (1)(अ) या कलमामध्ये सुधारणा करुन कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

06:34 November 18

Maharashtra Breaking news श्रद्धा वालकरवर नालासोपारामध्ये डॉक्टरांनी केले होते उपचार

मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकराविरोधात वक्तव्य केल्याचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. शिंदे गटाच्या नेते व कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दुसरीकडे भाजपचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

Last Updated : Nov 18, 2022, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.