ETV Bharat / state

Breaking News : महापालिका, नगर परिषदांमधील 40000 पदे भरणाचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

author img

By

Published : Jan 11, 2023, 6:54 AM IST

Updated : Jan 11, 2023, 7:33 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News

19:31 January 11

महापालिका, नगर परिषदांमधील 40000 पदे भरणाचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई - राज्यातील महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील 40000 रिक्त पदांच्या भरतीबाबत कार्यवाही सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता ही पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

19:24 January 11

दाभोलकर हत्या प्रकरणी हायकोर्टाने सीबीआयला मागितला तपासाचा रिपोर्ट

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास कुठपर्यंत आला आहे, त्याची वस्तुनिष्ठ माहिती 30 जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला आज दिले. न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती पी डी नाईक यांच्या खंडपीठासमोर दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने हे आदेश दिले.

19:14 January 11

आत्महत्येपूर्वी तुनिषाचा शेवटचा फोन तिच्या आईला

पालघर - आत्महत्या करण्यापूर्वी अभिनेत्री तुनिषा शर्माने तिच्या आईला शेवटचा फोन केला होता. तिने आईला चंदीगडचे तिकीट बुक करण्यास सांगितले होते, असे वकिलांनी कोर्टात सांगितले. शीझानच्या जामिनावर निकाल लागला नाही. पुढील सुनावणी १३ जानेवारीला होणार आहे.

19:09 January 11

अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये धमकीचा कॉल प्रकरणी अजूनही कुणाला अटक नाही

मुंबई : धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये मंगळवारी धमकीचा कॉल आला होता. अज्ञात कॉलरने शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अजूनही कुणाला अटक करण्यात आली नाही.

18:59 January 11

कवाडेंना महायुतीमध्ये घेताना विश्वासात न घेतल्याने आठवले गट नाराज

मुंबई - भाजप शिवसेनेची युती होती रिपब्लिकन पक्ष त्यात सामील झाल्यापासून युतीची महायुती झाली आहे. मात्र आता कवाडे गटाला युतीमध्ये सामिल करुन घेतले आहे. त्यावर आठवले गटाने नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला विश्वासात घेतले नाही असे आठवले गटाचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी म्हटले आहे.

18:41 January 11

अमेरिकेत हवाई आणिबाणीसारखी? तांत्रिक बिघाडामुळे 400 हून अधिक उड्डाणे रद्द

मुंबई - अमेरिकेत हवाई आणिबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे 400 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. संगणक प्रणालीमध्ये बघाड झाल्याने विमानांचे उड्डाण थांबवावे लागले. मात्र यामुळे भारत-अमेरिका विमानांवर कोणताही परिणाम झाला नाही, असे सांगण्यात आले आहे.

18:31 January 11

विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे पाचही जागांवर एकमत

मुंबई - विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. मराठवाड्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर नागपूरची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, कोकणातील जागा शेतकरी कामगार पक्ष व अमरावती आणि नाशिक कॉंग्रेस लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

18:27 January 11

मुंबईत दीड कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त, एकाला अटक

मुंबई - कस्टम अधिकार्‍यांनी दीड कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांना एकाला अटक केली आहे.

18:20 January 11

राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैसल यांना 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैसल यांना कावरट्टी येथील न्यायालयाने 2009 च्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे. फैजल 2014 पासून राष्ट्रवादीचे खासदार आहेत. न्यायालयाने फैजल आणि इतर तीन दोषींचा जामीन रद्द केला.

16:50 January 11

दारू पार्टीत कौटुंबिक वाद, चाकूने कापले सहकाऱ्याचे लिंग

ठाणे - खोलीत एकत्र राहणाऱ्या चार सहकाऱ्यांमध्ये दारू पार्टीत कौटुंबिक वाद होऊन सहकाऱ्याचे धारदार चाकूने लिंग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवलीजवळ गोळवली गावातील एका चाळीच्या खोलीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात लिंग कापणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

16:04 January 11

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच जवान जखमी

चाईबासा (झारखंड) - सीआरपीएफचे पाच जवान नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत आयईडी स्फोटात जखमी झाले आहेत. या भागाला पिंजून काढण्यात येत आहे.

15:37 January 11

शिक्षिकेकडून शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

जालना - येथील बदनापूर शहरात शिक्षिकेकडून शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात या 58 वर्षाच्या शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या चार वर्षापासून महिला शिक्षिकेला अश्लील हावभाव करून शारीरिक सुखाची मागणी केली जात असल्याचा प्रकार उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये घडला आहे.

15:18 January 11

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विक्रम काळेंना राष्ट्रवादीची उमेदवारी

औरंगाबाद - शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काळे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

15:14 January 11

हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अत्यंत चुकीची - सतेज पाटील

कोल्हापूर - आमदार मुश्रीफ यांच्यावर झालेली ईडीची कारवाई झाली हा सर्व प्रकार पूर्व नियोजित होता हे स्पष्ट आहे. केवळ सूडबुद्धीने केलेली ही कारवाई निश्चितच निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून अशा खेळी करून केला जात आहे. ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने कसा वापर केला जातो, याचे आजची ही कारवाई म्हणजे एक उदाहरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही सतेज पाटील यांनी दिली.

15:10 January 11

कारवाईला राजकीय रंग आहे का असा प्रश्न उपस्थित होतो - अजित पवार

चंद्रपूर - तपास यंत्रणांना कोणाचीही चौकशी करण्याचे अधिकार आहेत. पण जे घडत ते पाहिले तर कारवाईला राजकीय रंग आहे का असा प्रश्न उपस्थित होतो, असे मत अजित पवार यांनी मांडले आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले. त्यावर पवार प्रतिक्रिया देत होते. लोकांना नाहक त्रास होता कामा नये. जे आरोप केले गेले त्याचे पुरावे दिले गेले नाहीत. संजय राऊत यांना काही दिवस आत ठेवले. ते जामिनावर बाहेर आले. अशा गोष्टी आपल्या राज्याला देशाला परवडणाऱ्या नाहीत, असेही अजित पवार म्हणाले.

14:56 January 11

MV गंगा विलास क्रुझला पंतप्रधान मोदी शुक्रारी हिरवा झेंडा दाखवणार

वाराणसी - MV गंगा विलास या नदीतील क्रुझला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. जगातील सर्वात लांबचा पल्ला गाठणारे हे क्रुझ वाराणसी ते दिब्रुगड असे प्रवास करणार आहे.

14:02 January 11

माझा घोटाळ्याशी काहीही संबंध नाही, पत्रकार परिषद घेऊन यापूर्वीच उत्तरे दिली-हसन मुश्रीफ

किरीट सोमैय्या यांनी दीड वर्षापूर्वी आरोप केले होते. तेव्हा पत्रकार परिषद घेऊन उत्तरे दिली होती. कुठलीही नोटीस आणि समन्स दिलेले नाही. किरीट सोमैय्या यांच्यावर दीड कोटीचे दावे न्यायालयात आहेत. माझा घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

13:26 January 11

खोल दरीत कोसळल्याने तीन जवानांना वीरमरण

कुपीबारा येथील माचल सेक्टरमध्ये खोल दरीत कोसळल्याने नायब सुभेदार परस्तम कुमार, हवालदार अमर सिंग आणि कॉन्स्टेबल अमित शर्मा यांना वीरमरण आले.

13:23 January 11

इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे निधन

नाशिक- इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास 77 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. 50 वर्षाहून अधिक काळ त्यांनी काँग्रेससाठी काम केले. दुपारी दोन वाजता अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवन येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पाच वाजता अंत्ययात्रा निघेल यानंतर अमरधाम येथे अंत्यसंस्कार होतील असं काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले आहे.

13:20 January 11

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, बेबी पावरडच्या वितरण आणि विक्रीस परवानगी

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे. बेबी पावरडच्या वितरण आणि विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. एफडीएने बंदी घातलेले आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. आक्षेप घेण्यात आलेल्या संचातील पावडरचा एकही डब्बा बाजारात विक्रीसाठी जाता कामा नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

13:07 January 11

मुलीला वाचवण्यासाठी आईने घेतली विहिरीत उडी, मात्र आईचा दुर्दैवी अंत

बुलढाणा - शेतातील विहिरीमध्ये पाणी काढताना तोल गेल्याने 14 वर्षीय मुलगी विहिरीत पडली. दरम्यान क्षणाचाही विलंब न करता मुलीला वाचविण्यासाठी आईने थेट विहिरीत उडी घेतली. परंतु दुर्दैवाने खोल तळाशी जाऊन अडकल्यामुळे या घटनेत आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मुलगी सुदैवाने वाचली. ही गंभीर घटना खामगाव तालुक्यातील कोंटी येथे घडली आहे. बेबीबाई उमा खताळ , वय ४० असे मृत आईचे नाव आहे.

12:47 January 11

संघटनात्मक निवडणुका होऊ द्या, ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे विनंती

उद्धव ठाकरे यांच्या पुन्हा पक्षप्रमुख होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. संघटनात्मक निवडणुका होऊ द्या, अशी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे विनंती केल्याचे ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले आहे.

12:34 January 11

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये मंगळवारी धमकीचा कॉल, गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये मंगळवारी धमकीचा कॉल आला आणि एकच खळबळ उडाली. अज्ञात कॉलरने शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या लँडलाईनवर दुपारी साडेचार वाजता फोन आला. फोन करणाऱ्याने शाळेत टाईम बॉम्ब पेरल्याचा दावा केला होता. यानंतर, कॉल डिस्कनेक्ट करण्यात आला

11:10 January 11

हसन मुश्रीफ यांचे काउन्टडाऊन सुरू झाले, घोटाळेबाजांना धर्म नसतो- किरीट सोमैय्या

हसन मुश्रीफ यांचे काउन्टडाऊन सुरू झाले आहे. माफिया सरकारमधील आणखी एकावर कारवाई होणार आहे. मुश्रीफांच्या खात्यात अवैधपणे १३ कोटी रुपये असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. घोटाळेबाजांना धर्म नसतो असेही सोमैय्या यांनी म्हटले.

11:00 January 11

हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घर आणि कार्यालयावरदेखील ईडीची छापेमारी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पहाटे 6 वाजताच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीसह आयकर विभागाकडून छापेमारी सुरू असून पुण्यातील कोंढवा, हडपसर तसेच कोरेगाव पार्क येथील त्यांच्या घर आणि कार्यालय येथे ईडीची छापेमारी सुरू आहे. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावरही आयकर विभागाकडून छापेमारी सुरू असल्याचे सांगितलं जात आहे.

10:49 January 11

धीरूभाई अंबानी शाळेत बॉम्बची धमकी देणाऱ्याला लवकरच अटक होईल-मुंबई पोलीस

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील धीरूभाई अंबानी शाळेला काल संध्याकाळी 4.30 च्या सुमारास बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर आयपीसीच्या कलम 505 (1) (बी) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. फोन करणाऱ्याची ओळख पटली असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

10:49 January 11

हॉटेलच्या खोलीत पुरुष आणि महिलेचे मृतदेह आढळले.

दिल्लीतील बवाना पीएस परिसरातील हॉटेलच्या खोलीत पुरुष आणि महिलेचे मृतदेह आढळले. महिलेच्या मानेवर जखमेच्या खुणा होत्या तर पुरुषाच्या तोंडावर फेसाच्या सुकलेल्या खुणा होत्या आणि त्याच्या अंगातून दुर्गंधी येत होती. घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकू आणि सल्फा पावडर सापडली आहे.

10:09 January 11

हसन मुश्रीफ या संकटातून बाहेर पडतील-संजय राऊत

विरोधकांवर छापे टाकण्यात येत आहेत. मुश्रीफ या संकटातून बाहेर पडतील. देशात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

09:49 January 11

पोलिसांसह बीएसएफसकडून 5.92 किलो हेरॉईन जप्त

सीमापार अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नेटवर्कच्या विरोधात पंजाबच्या तरणतारन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांसह बीएसएफसने 5.92 किलो हेरॉईन जप्त केले. भारत-पाक सीमा रेषेजवळ 3 वेगवेगळ्या ठिकाणांहून हेरॉईन जप्त करण्यात आले. 3 स्वतंत्र एफआयआर नोंदवले गेले आहेत.

09:12 January 11

कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे

सकाळी साडेसहा वाजल्यापासून हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. यापूर्वी किरीट सोमैय्या यांनी मुश्रीफ यांच्या घरावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

08:52 January 11

बच्चू कडू यांच्या वाहनाला अपघात

अचलपूरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाहनाला मंगळवारी पहाटे कठोरा नाका परिसरात अपघात झाला आहे. त्यांचे वाहन रस्ता दुभाजकावर आढळून उलटले. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

07:18 January 11

गोल्डन ग्लोबमध्ये आरआरआरमधील नाटू नाटूला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार

गोल्डन ग्लोबमध्ये आरआरआरमधील नाटू नाटूला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे.

06:57 January 11

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारतीय रेल्वे कोच निर्मितीचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत भारतीय रेल्वे कोच निर्मितीचे कौतुक केले. 130 कोटी भारतीयांचे सामर्थ्य आणि कौशल्य तसेच आत्मनिर्भर बनण्याचा संकल्प दर्शवणारा उत्कृष्ट ट्रेंड असल्याचे पंतप्रधान मोदींनी रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटला उत्तर देताना ट्विट केले.

06:56 January 11

सुदर्शन पटनाईक यांनी कलाकृतीमधून तयार केली जगातील सर्वात मोठी हॉकी स्टिक

ओडिशामध्ये एफआयएच हॉकी पुरुष विश्वचषक २०२३ चे आयोजन करण्यात येत आहे. वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी जगातील सर्वात मोठी हॉकी स्टिक तयार केली. सुदर्शन पटनाईक यांनी शिल्पासाठी 5000 हॉकी बॉल आणि पाच टन वाळू वापरून 105 फूट लांब हॉकी स्टिक तयार केली.

06:56 January 11

जोडप्याला धमकावणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

मुंबईतील मुलुंड परिसरात कारमध्ये बसलेल्या जोडप्याला धमकावणाऱ्या नवनाथ मारुती शिंदे या तोतया पोलिसाला नवघर पोलिसांनी अटक केली. बनावट अधिकारी दाम्पत्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

06:55 January 11

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारीला गंगा विलास लक्झरी क्रूझला दाखविणार हिरवा झेंडा

22 डिसेंबरला कोलकाताहून निघालेली गंगा विलास लक्झरी क्रूझ वाराणसीच्या रामनगर बंदरात पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारीला एमव्ही गंगा विलास क्रूझ यात्रेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.

06:54 January 11

धुके आणि थंडीमुळे दिल्लीहून उड्डाण होणाऱ्या विमानांना उशीर

काही फ्लाइट्सला (दिल्ली-शिमला, दिल्ली-काठमांडू, दिल्ली-चेन्नई, दिल्ली-जैसलमेर, दिल्ली-बरेली, दिल्ली-मुंबई, दिल्ली-वाराणसी, दिल्ली-श्रीनगर, दिल्ली-जयपूर, दिल्ली-गुवाहाटी) धुके आणि थंडीमुळे उशीर होत आहेत.

06:43 January 11

Breaking News : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारतीय रेल्वे कोच निर्मितीचे कौतुक

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सागर बंगल्यावर भेट घेतली. जवळपास अर्धा वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीपूर्वी राज ठाकरे यांनी मंगळवारी संध्याकाळी उद्योगपती गौतम अदानी यांचीही भेट घेतली होती. राज ठाकरेंच्या एकाच दिवसात दोन महत्त्वाच्या बैठका झाल्या आहेत. त्यामुळे गौतम अदानी व राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Last Updated : Jan 11, 2023, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.