ETV Bharat / state

Breaking News : काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीवरील जप्तीची कारवाई टळली - Maharashtra political news

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Jan 13, 2023, 7:12 AM IST

Updated : Jan 13, 2023, 9:40 PM IST

21:27 January 13

काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीवरील जप्तीची कारवाई टळली

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील काँग्रेस चे माजी आमदार राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणी वर बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेकडून आज जप्तीची कारवाई होणार होती, मात्र सूतगिरणी चे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आज वसुली पथकाला एक कोटी रुपयांची वसुली आणि 30 जानेवारी पर्यंत अकरा कोटी रुपयांचा धनादेश दिल्याने आजची जप्तीची कारवाई तूर्तास टळली आहे.. मात्र उर्वरित रकमेसाठी पुन्हा बँकेला सूतगिरणी कडे तगादा लावावा लागणार आहे..

19:28 January 13

माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई - मध्य रेल्वेवर रविवार 15 जानेवारी रोजी देखभालीचे काम करण्यासाठी माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत तर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ येथे रूट रिले इंटरलॉकिंगच्या कामासाठी शनिवारी रात्री १४ जानेवारीला पहाटे ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मेगाब्लॉकची नोंद प्रवाशांनी घेऊन प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

18:53 January 13

कोल्हापुरात सर्किट बेंचच्या पाठपुराव्यासाठी सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई - कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांकरिता कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक झाली होती. त्यानुसार न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय मुंबई यांना पत्र पाठवून कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच स्थापन करणे बाबत विनंती करण्यात आलेली होती. तसेच महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबत सकारात्मक ठराव देखील झालेला आहे. परंतु यावर अद्याप याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. तरी यावर निर्णय घ्यावा अशी मागणी करणारे पत्र माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

18:48 January 13

मैत्रिणींना थांबवून घेण्यासाठी केला विमानात स्फोटके असल्याचा फोन

नवी दिल्ली - स्पाईसजेटच्या विमानातील स्फोटकांच्या अफवेमागे दोन मुली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील फोन करणाऱ्या आरोपीने खुलासा केला की त्याचे मित्र राकेश आणि कुणाल मनालीला गेले होते. तिथे 2 मुलींशी मैत्री झाली. दोन्ही मुली स्पाईसजेटच्या विमानाने पुण्याला निघाल्या होत्या. मात्र त्यांना थांबवून घ्यायचे होते. त्यासाठी विमानात स्फोटके असल्याचा फोन करण्यात आला होता.

18:24 January 13

नाशिक-सिन्नर मार्गावरील अपघातातील ठार झालेल्यांमध्ये अंबरनाथचे ६ तर कल्याणामधील १ साई भक्त

ठाणे - नाशिक-सिन्नर मार्गावरील भीषण अपघात ठार झालेल्यांमध्ये अंबरनाथच्या ६ तर कल्याणामधील १ साई भक्ताचा समावेश आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

17:12 January 13

आदित्य ठाकरे यांची शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका

मुंबई - माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत आहेत. खोके सरकारला सर्वच बाबींचे टेन्शन आहे. राज्यात मोगलाई आली आहे असे वाटत आहे. गणपती उत्सवात गद्दार आमदारांनी गोळी चालवली, मात्र अद्याप कारवाई झाली नाही. स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके दिले असा आरोपही ठाकरे करत आहेत. राज्यपालांना अद्याप बदलेले नाही. मुंबईला लुटणे या सरकारकडून सुरू आहे. नागपूर अधिवेशनात आम्ही घोटाळे काढले. मात्र लाज वाटूनही संबंधितांचे राजीनामे घेतले नाहीत असेही आदित्य ठाकरे म्हणाले. खोके सरकारने पाच हजार कोटींची कामे काढली. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. आता पुन्हा नवीन टेंडर काढली आहेत असेही ते म्हणाले. रस्त्यांची कामे पावसाळ्याआधी होणे गरजेचे आहे. मात्र आता कामे सुरू केल्यास ती होणार नाहीत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

17:02 January 13

चित्रा वाघ यांच्या विरोधात उर्फी जावेदची धमकावल्याची तक्रार

मुंबई - चित्रा वाघ यांच्या विरोधात उर्फी जावेदने दाखल तक्रार दाखल केली आहे. चित्रा वाघ यांनी धमकावल्याची तक्रार उर्फीने दाखल केली आहे.

16:56 January 13

स्पॅनिश महिलेने अवयव दान केल्याने 5 जणांचा जीव वाचला

मुंबई: स्पॅनिश महिला टेरेसा फर्नांडिस यांनी अवयव दान केल्याने 5 जणांचा जीव वाचला आहे. त्या 5 जानेवारी रोजी पहाटे मुंबईत आल्या होत्या.त्या एलिफंटा लेणी पाहण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र बसमधून उतरत असताना 7 जानेवारीला त्या पडल्या. त्यानंतर त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्यांनी आता अवयव दान केल्याने 5 जणांना जीवदान मिळाले आहे.

15:56 January 13

आनंद परांजपे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी तूर्तास अटक करणार नाही असे राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले. कल्याण डोंबिवलीतील चार विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे एकत्र करून रद्द करण्यासाठी परांजपे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणी 18 जानेवारीपर्यंत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाने निर्देश दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना काळजी घ्यायला हवी. यात सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि वेळ वाया जातो, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. अशा पोलीस अधिकाऱ्यांना आर्थिक दंड लावून ती रक्कम त्यांच्या पगारातून वगळायला हवी, असाही सज्जड दम मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

15:53 January 13

अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

नागपूर - माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांना न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना 14 हजारांचा दंड ही ठोठावला आहे. त्यांना २०१७ सालीच्या घटनेत ही शिक्षा झाली आहे. सुनील केदार यांनी आंदोलनात महावितरणच्या एका अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. त्या प्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सुनील केदार यांच्यासह अन्य तिघांनाही शिक्षा सुनावली.

15:50 January 13

शिवशाही बस आणि मोटारसायकल अपघातात मोटरसायकलस्वार ठार

बीड - शिवशाही बस आणि मोटारसायकलचा भीषण अपघात येथे झाला. या अपघातात मोटरसायकलस्वार ठार झाला आहे.

15:48 January 13

श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई - श्रद्धा वालकर खून प्रकरणी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील वर्षा बंगल्यावर भेट घेतली.

15:11 January 13

ठाण्यात लाच घेताना दोन पोलिसांना रंगेहात पकडले

ठाणे - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका व्यक्तीला अटक करण्यापासून वाचवण्यासाठी लाच घेताना दोन पोलिसांना अटक केली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार येथील हवालदार योगेश गोकुळ देवरे आणि जितेंद्र बनसोडे यांनी तक्रारदाराकडे ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. ठाणे एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक माधवी राजेकुंभार यांनी ही माहिती दिली.

15:03 January 13

नाशिक रोड दुर्घटनेतील जीवितहानी अत्यंत दुःखद - राष्ट्रपती मुर्मू

नवी दिल्ली - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल अत्यंत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली आहे.

15:00 January 13

शीझान खानचा जामीन अर्ज वसई न्यायालयाने आजही फेटाळला

पालघर - तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी आरोपी शीझान खानचा जामीन अर्ज वसई न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणी तपासात सर्व सहकार्य करत असल्याने जामीन मिळावा असा दावा कोर्टात करण्यात आला. मात्र त्याचा जामीन आजही नाकारण्यात आला.

14:55 January 13

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात लागलेले बॅनर पालिकेने काढले

ठाणे - मुंब्रा विभागात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात लागलेले बॅनर पालिकेने काढले आहेत. माजी नगरसेवक नईम खान यांनी बॅनर उतरवायला विरोध केला होता. मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक कडलक व ठाणे पालिका सहआयुक्त सागर साळुंखे यांच्या उपस्थितीत बॅनर काढले.

14:31 January 13

उर्फी जावेदच्या कपड्यांना आपला कायम विरोध - चित्रा वाघ

मुंबई - उर्फी जावेदच्या कपड्यांना आपला कायम विरोध असेल असे चित्रा वाघ यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात नंगा नाच चालू देणार नाही, ही आपली भूमिका आहे. ही भूमिका कायम आहे आणि राहील असे वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

13:21 January 13

बंडातात्या कराडकरांना अर्धांगवायुचा झटका, उपचारासाठी पुण्याला हलवले

सातारा - व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक, वारकरी नेते हभप प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडातात्या कऱ्हाडकर यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तथापि काही वैद्यकीय चाचण्या आणि उपचारांसाठी त्यांना पुणे येथे हलविण्यात आले आहे.

12:43 January 13

धूत यांच्या अटकेसंदर्भातील याचिकेवर निकाल ठेवला राखून

मुंबई - आयसीआयसी बँक घोटाळा प्रकरणी व्हिडिओकॉन समूहाचे व्यवस्थापक वेणूगोपाल धूत त्यांच्या बेकायदेशीर अटक याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. वेणूगोपाल धूत यांना करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा धूत यांचे वकील संदीप लड्डा यांनी युक्तिवाद केला. तर वेणूगोपाल धूत यांनी तपासात सहकार्य केले नसल्याने त्यांना अटक केल्याचा युक्तीवाद सीबीआयच्या वकिलांनी केला.

12:40 January 13

ऑनलाइन नोकरीच्या आमिषाने महिलेला घातला 5 लाख रुपयांचा गंडा

ठाणे - एका 26 वर्षीय महिलेला नोकरीचे आमिष दाखवून अज्ञात ऑनलाइन भामट्याने 5 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. पोलिसांनी ही माहिती आज दिली. या महिलेने ४ जानेवारीला तिच्या इन्स्टाग्राम पेजवर नोकरीची जाहिरात पाहिली. त्यानुसार तिने नोकरीसाठी तिला सांगण्यात येत असलेल्या गोष्टी करत गेली. त्यातच तिची 5 लाख रुपयांची फसवणूक झाली.

12:33 January 13

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून

नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होईल. हे अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत चालेल. सुट्ट्यांसह अधिवेशन एकूण 66 दिवस चालेल. अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

12:11 January 13

शिंदे-फडणवीस सरकारकडून ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही; कुठे गेले सदावर्ते पडळकर - महेश तपासे

मुंबई - जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी विचारला आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही, त्यामुळे त्यानी हा सवाल विचारला आहे.

11:13 January 13

सत्यजित तांबेंना काँग्रेसने पाठिंबा दिलेला नाही, सर्व रिपोर्ट हायकमांडला पाठविले- नाना पटोले

काँग्रेसकडून बंडखोरांना उमेदवारी नाही. सर्व रिपोर्ट हायकमांडला पाठविले आहेत. सत्यजित तांबेंना काँग्रेसने पाठिंबा दिलेला नाही. तांबेंनी पक्षासोबत फसवेगिरी केली आहे. भय दाखवून घरे फोडण्याची काम भाजपकडून होत आहे.

10:47 January 13

22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तीन महिने वारंवार बलात्कार

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात येणाऱ्या एका गावातील 22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तीन महिने वारंवार बलात्कार करण्यात आला. ही तरुणी आता स्वतःची सुटका करून घरी परतली आहे. तिच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

10:40 January 13

तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम

तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम आहे. महाबळेश्वरात सलग दोन दिवस दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळाले. नदीकाठच्या गावांना देखील हुडहुडी भरली आहे. पहाटे नदीच्या पाण्यातून निघणाऱ्या वाफांमुळे नद्या गोठल्याचा भास होत आहे.

10:39 January 13

मुंबई मॅरेथॉनसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे रात्रीही धावणार

लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत ही सेवा बंद असते. गणेशोत्सव, महापरिनिर्वाण दिन आदी विशेष दिवसात रात्रीही लोकल ट्रेन सुरु ठेवल्या जातात. येत्या रविवारी मुंबईत मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने २ तर पश्चिम रेल्वेने २ अशा एकूण ४ लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठा दिलासा मिळणार आहे

10:39 January 13

इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर-बंगळूर या मार्गावर विमानसेवा सुरू

कोल्हापूर: गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली कोल्हापूर बंगळूर विमान सेवा आज पुन्हा सुरू होत आहे. इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर-बंगळूर या मार्गावर विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्यातील सातही दिवस ही सेवा पुरवण्यात येणार आहे. बंगळूरवरून हे विमान पुढे दक्षिण भारतातील कोईमतुरला ही जाणार आहे.

10:11 January 13

माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांना राहुल गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली

माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

10:02 January 13

कर्नाटक विधानसभेच्या आवारात केम्पेगौडा यांच्या पुतळ्याची पायाभरणी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेच्या आवारात समाजसुधारक बसवण्णा आणि बंगळुरूचे संस्थापक केम्पेगौडा यांच्या पुतळ्याची पायाभरणी केली आहे.

10:01 January 13

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

प्रतिकूल हवामान आणि रामबन सेक्टरमध्ये झालेल्या दगडफेकीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. उधमपूरमध्ये महामार्गाच्या विविध ठिकाणी वाहने अडकल्याचे जम्मू आणि काश्मीर वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.

09:00 January 13

सिन्नर शिर्डी मार्गावर पाथरेजवळ भीषण अपघात, पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती

अहमदनगर : सिन्नर शिर्डी मार्गावर पाथरेजवळ भीषण अपघात झाला आहे. खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे. इशानेश्वर मंदिरा जवळ अपघात झाला आहे.

अपघातात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. प्रवाशांना शिर्डी येथील सुपर हॉस्पिटल आणि नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याची प्राथमिक माहिती आहे. वावी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

08:29 January 13

पुण्याला जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणाच्या वेळी पसरली बॉम्बची अफवा

पुण्याला जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणाच्या वेळी बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीती पसरली होती. या प्रकरणात, शेवटी फ्लाइटच्या आतून काहीही सापडले नाही. मात्र हे प्रवासी पुण्याला कोणत्या विमानातून जात होते, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर विमानतळावर ती सर्व खबरदारी घेण्यात आली, जी सहसा बॉम्बच्या फोननंतर केली जाते. स्पाइस जेटचे विमान IGI विमानतळावरून पुण्यासाठी सायंकाळी साडेसहा वाजता उड्डाण करणार होते.

08:17 January 13

सिंहगड रस्त्यावर गॅस पाईपलाईन फुटल्याने लागली आग

पुण्यातील सिंहगड रोडवरील सिंहगड रस्त्यावर राजाराम पुलाजवळ एमएनजीएल गॅस पाईपलाईनला आग लागल्याची घटना घटली आहे. ही घटना रात्री 12 वाजण्याच्या घडली. गॅस पाईपलाईन फुटल्यामुळं जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत होते.

07:24 January 13

अजमेरहून मालेगावला येणाऱ्या बसमधून ३१ शस्त्रे जप्त, मालेगाव पोलिसांची कारवाई

पवारवाडी पोलिसांनी अजमेरहून येणाऱ्या बसमधून परवेझ आलम नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून 8 तलवारी आणि 10 चाकूंसह एकूण 31 शस्त्रे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या शस्त्रांची किंमत 17,400 रुपये आहे. पुढील तपास सुरू असल्याचे मालेगावचे एएसपी अनिकेत भारती यांनी सांगितले.

07:14 January 13

शरद यादव यांच्या निधनाने देशभरातील राजकीय वर्तुळात शोक

माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांच्या निधनाबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यांनी शोक व्यक्त केला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि अनेक दशके उत्कृष्ट संसदपटू म्हणून देशाची सेवा करत त्यांनी समानतेचे राजकारण मजबूत केले, असे ट्विट काँग्रेस अध्यक्षांनी केले. माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांच्या निधनाबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. शरद यादवजी हे समाजवादाचे नेते असण्यासोबतच नम्र स्वभावाचे व्यक्ती होते. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.

07:12 January 13

दोन गुन्हेगारांना अटक, सात पिस्तुले जप्त

पोलिसांनी गुन्हेगारांच्या टोळीतील बंधन शर्मा आणि अमन सोनकर या दोघांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून सात अवैध देशी पिस्तुले आणि पाच काडतुसे जप्त केली. दोघांनाही सीआयए पथकाने वेगवेगळ्या प्रकरणात अटक केल्याचे हरियाणा पोलिसांनी सांगितले.

06:55 January 13

Breaking News : सत्तांतरानंतरही महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा

मुंबई : राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय तपासणी करण्याचा ससेमिरा होता. मात्र हा ससेमिरा राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतरही कायम आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याघरी ईडी आणि आयटी अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. यानंतरही अशा कारवाई इतर नेत्यांवर होण्याची शक्यता महाविकास आघाडीकडून वर्तवण्यात येत आहे.

Last Updated : Jan 13, 2023, 9:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.