अभिनेत्री तुनिषा शर्मावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहे. मीरा रोड येथील स्मशानभूमीत तुनिषावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Breaking News : अभिनेत्री तुनिषा शर्मावर उद्या होणार अंत्यसंस्कार
21:24 December 26
अभिनेत्री तुनिषा शर्मावर उद्या होणार अंत्यसंस्कार
19:58 December 26
मुख्य प्रशांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी तुनिषा मृत्यूला 'लव्ह जिहाद' चे रुप - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
नागपूर - भारतीय जनता पक्ष महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूसारख्या प्रकरणांना ‘लव्ह जिहाद’ सारखे रूप देत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.
19:58 December 26
उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिशा सालियन प्रकरण दाबले - सोमैया
पुणे - दिशा सालियन मृत्यू प्रकरण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने दडपल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक असलेल्या सालियन (28) हिने 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड भागातील एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती.
19:33 December 26
गोव्यात टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचा तरुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक
पणजी - गोव्यात टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याने आरोपीला अटक केली आहे. पणजी पोलिसात तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीत पीडितेने म्हटले आहे की, ती आणि तिच्या मैत्रिणी पणजीला आल्या होत्या. त्यांनी टेम्पो ट्रॅव्हलर भाड्याने घेतली. त्याच्या चालकाने अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल कली आहे तसेच आरोपींना अटक केल्याचे उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
19:19 December 26
एसआयटी मार्फत तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी तपासाची ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी
मुंबई - टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
19:08 December 26
हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी घरात किमान धारदार चाकू तरी ठेवावे - प्रज्ञासिंह ठाकूर
शिवमोग्गा : भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटले आहे की हिंदूंना त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. मध्य प्रदेशातील भोपाळचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार ठाकूर म्हणाल्या की, हिंदूंनी किमान त्यांच्या घरात धारदार चाकू तरी ठेवले पाहिजेत, कारण प्रत्येकाला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे.
18:51 December 26
भारतीय तटरशक्षक दलाने गुजरातच्या समुद्रात पकडली पाकिस्तानी बोट, 300 कोटींचे अमलीपदार्थ
गांधीनगर - भारतीय तटरक्षक दलाने ATS गुजरातच्या गुप्तचर माहितीच्या आधारे शस्त्रे, दारुगोळा आणि सुमारे 10 कर्मचारी असलेल्या एका पाकिस्तानी बोटीला भारतीय पाण्यात पकडले आहे. त्यांच्याकडून 300 कोटी रुपयांचे ४० किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. आहेत. ही कारवाई 26 तारखेच्या पहाटे गुप्तचर माहितीवरून करण्यात आली. ICGS Arinjay या तटवर्ती दलाच्या बोटीने पाकिस्तानसोबतच्या काल्पनिक आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ ही जप्तीची कारवाई केली. ICG टीमने अल सोहेली ही पाकिस्तानी मासेमारी बोट रोखली आणि 300 कोटी रुपये किमतीची शस्त्रे, दारूगोळा आणि सुमारे 40 किलो अंमली पदार्थ जप्त केले. नौका क्रूसह पकडण्यात आली असून पुढील चौकशीसाठी ती ओखा येथे आणण्यात आली आहे.
18:37 December 26
उद्या देशभरातील सर्व कोविड रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल
नवी दिल्ली - उद्या देशभरातील सर्व कोविड रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. सर्व राज्यांचे आरोग्य मंत्रीही त्यांच्या स्तरावर यामध्ये सहभागी होतील, असे ट्विट केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केले आहे.
18:21 December 26
कोचर दाम्पत्य आणि धूत यांना 3 दिवस सीबीआय कोठडी
मुंबई - चंदा कोचर, दीपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांची 3 दिवस सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणात त्यांना अटक केले आहे. या अगोदरही त्यांना सीबीआय कोठडी देण्यात आली होती. मात्र धूत यांना आजच कोठडी देण्यात आली असून त्यांना पहिल्यांदा सीबीआय कस्टडी देण्यात आली आहे. विशेष सीबीआय कोर्टाने हा निर्णय दिला.
17:30 December 26
घशात जेली चॉकलेट अडकल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
सातारा - घशात जेली चॉकलेट अडकल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू.
17:25 December 26
बिहारमध्ये आलेल्या 11 परदेशी नागरिकांना कोरोना
पाटणा - धार्मिक यात्रेसाठी बिहारमध्ये आल्यावर अकरा परदेशी नागरिकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी चार थायलंडचे आणि एक म्यानमारचा आहे. गयाचे जिल्हा शल्य चिकित्सक रंजन कुमार सिंग यांनी याची माहिती दिली. त्यांना कोणतीही कोरोनाची लक्षणे नसलेल्याचेही त्यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे विलगीकरण करण्यात आल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.
17:22 December 26
ग्रामविकास विभागातील 13,400 पदे भरण्यास मान्यता - मंत्री गिरीष महाजन
नागपूर - ग्रामविकास विभागातील 13 हजार 400 पदे भरण्यास मंत्री गिरीष महाजन यांनी मान्यता देण्यात आली असल्याचे सांगितले आहे. तत्काळ ही पदे भरली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.
17:10 December 26
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण - शीझान खानची बहीण वालीव पोलीस ठाण्यात
पालघर - टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी आरोपी शीझान खानची बहीण वालीव पोलीस ठाण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात तिला पोलिसांनी बोलावले आहे.
16:34 December 26
मदर डेअरीचे दूध उद्यापासून प्रति लिटर २ रुपयांनी महागले
मदर डेअरीने उद्यापासून दुधाचे दर प्रति लिटर २ रुपयांनी वाढवले आहेत. गाईचे दूध आणि टोकन मिल्क वेरिएंटच्या एमआरपीमध्ये मात्र कोणतीही सुधारणा केलेली नाही.
16:15 December 26
जपानमधील हिमवादळात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू
टोकियो - जपानमधील हिमवादळात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या वादळात अनेक जखमी झाले आहेत. तसेच सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
15:58 December 26
आयटीआय विद्यार्थ्यांचे विद्यावेतन 40 रुपयांवरुन थेट 500 रुपये होणार
नागपूर - औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्यावेतनात मोठी वाढ होणार आहे. आयटीआय विद्यार्थ्यांना सध्या 40 रुपये विद्यावेतन देण्यात येते. आता, त्यात वाढ करुन ते 500 रुपयांचे करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली.
15:17 December 26
मुंबईत किरकोळ वादातून चाकूने भोसकून खून
मुंबई - मालवणी भागात एका 35 वर्षीय व्यक्तीचा नातेवाईकाने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. रविवारी रात्री उशिरा मालवणीच्या राठोडी गावात ही घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पीडित आणि आरोपी हे मजूर असून एकाच परिसरात राहतात, असे त्यांनी सांगितले.
14:56 December 26
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या महिलेचा मृत्यू
जालना - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. कस्तुराबाई बळवंत गायकवाड असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. चाळीस दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू होते. आयटीआय काॅलेच्या प्राचार्यांनी धमकावल्या प्रकरणी कारवाईची त्यांनी मागणी केली होती.
14:50 December 26
खा. राहुल शेवाळेंची चौकशी करा आरटीआय कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांची न्यायालयात लेखी तक्रार
खा. राहुल शेवाळे यांच्याविरोधात MCOC अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. राहुल शेवाळे यांचे ज्या महिलेशी प्रेम संबंध आहेत, त्या महिलेचा दाऊदशी संबंध असलेल्याची बाब लपवल्याबद्दल गुन्हा दाखल करा, अशीही मागणी केली आहे. शेवाळे हे खासदार असून त्यांनी दाऊद संदर्भातील माहिती केंद्रीय तपास यंत्रणा, पोलिसांना का दिली नाही, असाही प्रश्न यामध्ये विचारण्यात आला आहे. राहुल शेवाळे दुबईला कितीवेळा गेले, कोणाला भेटले, यासंदर्भातील माहिती देखील विचारण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांकडे चौकशीकरता लेखी तक्रार केली आहे.
14:47 December 26
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एम्समध्ये दाखल
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना नियमित तपासणी आणि पोटाच्या किरकोळ संसर्गासाठी एम्समध्ये दाखल केले आहे. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
14:17 December 26
सत्तार यांच्या राजीनाम्यावरुन विरोधकांचा गदारोळ, विधानसभेचे कामकाज तहकूब
नागपूर - मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजिनामा द्यावा या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. मंगळवारी सकाळी ९ वाजता कामकाजाला सुरुवात होईल.
14:12 December 26
वीर बाल दिवस कार्यक्रमात मुख्यंत्र्यांनी केला महाराष्ट्र पंजाब संबंधांचा गौरव
नवी दिल्ली - येथील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंजाब आणि महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाबरोबर दोन्ही राज्यातील आत्मिक संबंधांची माहिती दिली. संत नामदेव महाराजांच्या ग्रंथसाहिबमधील पदांचा उल्लेख त्यांनी केला. त्याचवेळी शीख गुरू गोविंद सिंह यांच्या नांदेडमधील वास्तव्याचा दाखला देऊन दोन्ही राज्यांचे संबंध किती जवळचे आहेत हे सांगितले.
14:04 December 26
किरीट सोमैया यांनी घेतली रुग्णालयात खा. गिरीश बापट यांची भेट
पुणे - भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे गिरीश बापट यांच्या तब्येतीबाबत विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
13:58 December 26
ठाण्यातील बिल्डरची ३१ लाखांची फसवणूक, ट्रॅव्हल फर्मच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल
ठाणे - जिल्ह्यातील एका महिला बिल्डरला 31 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ट्रॅव्हल कंपनीच्या मालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिल्डर आणि तिच्या कुटुंबीयांनी फेब्रुवारी 2020 मध्ये ट्रॅव्हल फर्मसोबत यूएस टूरसाठी बुकिंग केले होते. तिने कंपनीला फ्लाइट, व्हिसा, प्रवास, दर्शन आणि इतर खर्चासाठी 31,71,972 रुपये दिले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र त्याचा लाभ सदर महिलेला मिळालाच नाही.
13:05 December 26
राज्य सरकार सीमा प्रश्नी मजबूत ठराव आणणार - पृथ्वीराज चव्हाण
नागपूर - उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की सीमावर्ती भागांवरील महाराष्ट्र सरकारच्या दाव्यांचे समर्थन करणारा मजबूत ठराव सभागृहात मांडला जाईल. सर्व राजकीय पक्षांनी एकमताने तो मंजूर केला जाईल. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना वातावरण बिघडवू नये यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांवर दबाव आणणे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर अवलंबून आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
12:59 December 26
दहा वर्षानंतर भारतात मुस्लिम पंतप्रधान असेल - कालीचरण महाराज
अमरावती - आज भारताची लोकसंख्या ही 140 कोटी आहे. यापैकी 94 कोटी हे हिंदू आहेत तर इतर हे बौद्ध किंवा ख्रिश्चन असतील अशा भ्रमात राहू नये. भारतात 46 ते 47 कोटी लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे. आज भारतात दररोज जन्माला येणाऱ्या 65 हजार पैकी 40,000 मुलंही मुस्लिमांची असून दहा वर्षानंतर भारतात मुस्लिम पंतप्रधान असेल. देशात शरीया कायदा लागू होईल असे खळबळजक भाकीत कालीचरण महाराज यांनी नांदगाव पेठ येथे केले.
12:56 December 26
शरद पवार घेणार भाजप खासदार गिरीश बापटांची भेट
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजप खासदार गिरीश बापटांची भेट घेणार आहेत. श्वसनाचा त्रास होत असल्याने गिरीश बापट गेले 20 ते 25 दिवसांपासून दीनानाथ रुग्णालयात ऍडमिट आहेत. काही महिन्यापूर्वी शरद पवार यांनी बालगंधर्व येथे प्रकृतीबाबत गिरीश बापट यांनी काळजी घेण्याची सल्ला दिला होता. गिरीश बापट यांची प्रकृती बरी नसल्याने शरद पवार दीनानाथ रुग्णालयात जाऊन विचारपूस करणार आहेत.
12:47 December 26
तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणाचा कथित 'लव्ह जिहाद' दृष्टीकोनातूनही तपास - पोलीस
पालघर - वालीव पोलीस तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात कथित 'लव्ह जिहाद' दृष्टीकोनातूनही तपास करत आहेत, असे वालीव पोलिसांनी स्पष्ट केले.
12:43 December 26
श्रद्धा हत्या प्रकरणानंतर तुनिशासोबत ब्रेकअप - शीझान खान
मुंबई - टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपीने केलेल्या एका मोठ्या खुलाशात, तिचा माजी प्रियकर शीझान खान याने पोलिसांना सांगितले की तो, देशातील वातावरणामुळे खूप अस्वस्थ झाला होता. श्रध्दा वालकरच्या निर्घृण हत्येनंतर तिच्या लिव्ह-इन पार्टनरने कथितपणे खून केल्यावर खानने त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला, असे सूत्रांनी सोमवारी सांगितले.
12:36 December 26
अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आईने शिजान खानच्या विरोधात कठोर चौकशीची केली मागणी
मुंबई - अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आईने शिजान खानच्या विरोधात कठोर चौकशीची मागणी केली आहे. अलीबाबा टीव्ही मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आईने या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिजान खानच्या विरोधात कठोर चौकशीची मागणी करणारा व्हिडिओ संदेश जारी केला आहे. शिजानचे इतर मुलींशी संबंध होते आणि तिने लग्नाच्या बहाण्याने तुनिषाचा वापर केला, असा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे.
12:28 December 26
जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी, विरोधकांनी सभात्याग
नागपूर - राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना हे अधिवेशनसंपेपर्यंत जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे निलंबन लगेच मागे घ्यावे अशी मागणी करत विरोधकांना सभात्याग केला.
11:45 December 26
व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना अटक
मुंबई - आयसीआयसीआय बँक फसवणूक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना अटक केली आहे. सीबीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
11:16 December 26
सीमावादाचा लढा दोन भाषांमधील नाही, उद्धव ठाकरे यांचे विधानपरिषदेत वक्तव्य
विधानभवनात आल्यावर पेनड्राईव्ह येतात. सीमावादाचा लढा दोन भाषांमधील नाही, उद्धव ठाकरे यांचे विधानपरिषदेत वक्तव्य
10:43 December 26
सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन सुरू
हिवाळी अधिवेशाचा आजचा दिवस चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे.
10:30 December 26
आफताब पूनावाला याला सीबीआय मुख्यालयात आणले
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आफताब पूनावाला याला व्हॉईस सॅम्पलिंग चाचणीसाठी सीबीआय मुख्यालयात आणण्यात आले.
10:28 December 26
मनसुख मांडविया आज इंडियन मेडिकल असोसिएशनसोबत घेणार बैठक
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज इंडियन मेडिकल असोसिएशनसोबत कोविड 19 ची परिस्थिती आणि तयारी यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत.
09:46 December 26
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दिल्लीसाठी रवाना होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता नागपूर अधिवेशनात उपस्थित रहाणार असल्याची माहीती. उद्धव ठाकरेंची ताकद वाढवण्यासाठी संजय राऊत देखील नागपुरात रात्रीच दाखल झाले आहेत
09:26 December 26
अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा बसवण्यावरून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
भिलाई येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा बसवण्यावरून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
08:56 December 26
अज्ञात हल्लेखोरांकडून एका व्यक्तीची हत्या
मंगळुरूच्या बाहेरील कटिपल्ला येथे काल रात्री दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या केली. जलील असे मृताचे नाव असून तो त्याच्या दुकानासमोर उभा असताना त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
08:55 December 26
स्ट्राईक ड्रिल आयोजित करण्याचे चीनने सांगितले कारण
तैवान आणि युनायटेड स्टेट्सकडून चिथावणी दिल्याच्या प्रतिक्रिया म्हणून रविवारी तैवानच्या आसपासच्या समुद्रात आणि हवाई क्षेत्रात "स्ट्राइक ड्रिल" आयोजित केले होते, असे चीनने म्हटले आहे.
08:09 December 26
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.
06:47 December 26
युक्रेनमधील निरर्थक युद्ध मागे घ्या-पोप फ्रान्सिस
पोप फ्रान्सिस यांनी ख्रिसमसच्या संदेशादरम्यान युक्रेनमधील निरर्थक युद्ध मागे घेण्याचे आवाहन केले
06:44 December 26
लुधियाना येथे लुटारूंनी शस्त्रे घेऊन दरोडा टाकला
लुधियाना येथील बाजार समितीचे माजी अध्यक्ष दर्शनलाल बावेजा यांच्या कार्यालयावर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोन मुखवटाधारी लुटारूंनी शस्त्रे घेऊन दरोडा टाकला. कार्यालयात ठेवलेले सुमारे ८०,००० रुपये चोरले. आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
06:19 December 26
Breaking News : सीमावादाचा लढा दोन भाषांमधील नाही, उद्धव ठाकरे यांचे विधानपरिषदेत वक्तव्य
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माचे मृत्यू प्रकरण हे 'लव्ह जिहाद'चे प्रकरण असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशी प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपण पाहत आहोत. त्याविरोधात कठोर कायदा आणण्याचा विचार करत आहोत, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये बोलताना दिली.