ठाणे : उल्हासनगर आणि कल्याण पोलिसांच्या पथकाने दमदार कामगीरी करून दोन मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे यातील एका २२ वर्षीय गुन्हेगारावर ८० गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून त्याला परभणीमधून सापळा रचून अटक केली आहे. अब्दुल्ला संजय ईराणी उर्फ सय्यद, (वय २२, रा. ईराणी वस्ती, कल्याण) तर दुसऱ्या गुन्हेगाराला कल्याण पोलिसांनी भिवंडी तालुक्यातील सोरगांव येथे सापळा रचून अटक केली. सौरभ उर्फ सोन्या मनोज साळुंके असे अटक गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर ११ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे.
Breaking News : दोन मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार गजाआड; एका २२ वर्षीय गुन्हेगारावर ८० गुन्हे, तर दुसऱ्यावर ११ गंभीर गुन्हे - Maharashtra live updates today
21:13 January 19
दोन मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार गजाआड; एका २२ वर्षीय गुन्हेगारावर ८० गुन्हे, तर दुसऱ्यावर ११ गंभीर गुन्हे
19:13 January 19
राखी सावंत पोलीस स्टेशनमधून पडली बाहेर; 6 तास झाली चौकशी

तब्बल 6 तासाच्या चौकशीनंतर राखी सावंत आंबोली पोलिस ठाण्याच्या बाहेर
राखी सावंत पोलिस तपासात पोलिसांना सहकार्य
पुन्हा पोलिसांनी बोललास चौकशीला हजर राहावे लागेल
17:58 January 19
पुढील तीन वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट करणार - मुख्यमंत्री शिंदे
मुंबई - मुंबईचा विकास करायचा आहे तसेच पुनर्विकासाचे प्रकल्पही पुढे नेत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बीकेसीमधील सभेत बोलत होते. कुणी कितीही टीका केली तरी आपण काम करत आहोत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. पुढील तीन वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्राचे पाठबळ आपल्याकडे असणार आहे. येणाऱ्या काही दिवसात महापालिकेच्या निवडणुका होतील. विकासाचे डबल इंजिन ट्रिपल इंजिनमध्ये परिवर्तित होईल असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
16:35 January 19
राज्यातील एकमेव मसूरचे लोकनियुक्त सरपंच पंकज दीक्षित यांची हैदराबादमधील कार्यशाळेसाठी निवड
कराड - तालुक्यातील मसूरचे लोकनियुक्त सरपंच पंकज दीक्षित यांची संपूर्ण राज्यातून हैदराबादमधील चर्चात्मक कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. केंद्रिय ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत हैदराबादमध्ये आजपासून सुरू झालेल्या कार्यशाळेमध्ये आपले विचार मांडण्यासाठी आलेले आहेत. महाराष्ट्रातून या चर्चासत्रासाठी निमंत्रित असलेले ते एकमेव सरपंच आहेत. मसूर गावाचा विकास करण्यासाठी जिल्हापरिषदेचे माजी अर्थ, शिक्षण आणि क्रीडा समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन होत असते. मूळचे अभियंता असलेले पंकज दीक्षित त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे देशपातळीवर पोहोचल्याने पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
16:27 January 19
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कोर्टाचा दिलासा
मुंबई - एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टाने दिलासा दिला आहे. NIA ची मेडिकल बोर्ड मागणी विशेष NIA कोर्टाने फेटाळली आहे. प्रदीप शर्मा यांच्या मेडिकल रिपोर्ट आणि मेडिकल बोर्डाची NIA ने मागणी केली होती. विशेष NIA कोर्टात याची सुनावणी झाली. एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात आहे.
15:55 January 19
हैदराबादमध्ये रामगोपालपेट परिसरात एका इमारतीला भीषण आग, मोठ्या नुकसानीचा अंदाज
हैदराबाद - येथील रामगोपालपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभाग आणि इतर अधिकाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
14:22 January 19
विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर
काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये नागपूर- सुधाकर अडबाले, अमरावती - धीरज लिंगाडे, औरंगाबाद - विक्रम काळे, नाशिक - शुभांगी पाटील, कोकण - बाळाराम पाटील यांचा समावेश आहे.
14:11 January 19
महाविकास आघाडीचा नाशिकमध्ये शुभांगी पाटील तर नागपुरात सुधाकर अडबाल यांना पाठिंबा
मुंबई - महाविकास आघाडीने नाशिकमध्ये शुभांगी पाटील तर नागपुरात सुधाकर अडबाल यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच काँग्रेस आजच बंडखोर सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली.
14:08 January 19
मोदी यांच्या बीकेसी येथील कार्यक्रमात एक कमान कोसळली
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसी येथील कार्यक्रमात एक कमान कोसळली आहे. स्टेजच्या मागच्या बाजूने बांधलेली लोखंडी कमानी कोसळली आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी असल्याची माहिती आहे.
13:27 January 19
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडीतून डिस्चार्ज
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दहा दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
13:11 January 19
मुंबई पोलिसांकडून अभिनेत्री राखी सावंतला केली अटक
मुंबई पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला अटक केली आहे. काही वेळाने पोलीस सावंतला अंधेरी न्यायालयात हजर करणार आहेत. राखी सावंतवर काही काळापूर्वी एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदार मॉडेलच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
13:01 January 19
माजी मंत्री नवाब मलिक यांची आज कोठडी संपणार की मिळणार जामिन?
माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मेडिकल तपासणी मुद्द्यावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी सुरू आहे. मलिक कुटुंबीय कोर्टात हजर आहेत. नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी आज संपत आहे.
12:25 January 19
राम सेतू हे राष्ट्रीय वारसा स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया सुरू- केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती
राम सेतू हे राष्ट्रीय वारसा स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सुरू असल्याचे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांना मंत्रालयाकडे या विषयाशी संबंधित अतिरिक्त साहित्य दाखल करण्याची परवानगी दिली आहे
12:23 January 19
तामिळनाडुच्या राज्यापालांनी डीएमके नेत्याविरोधात दाखल केला मानहानीचा दावा
राज्यपालांविरुद्ध केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्याबद्दल निलंबित डीएमके नेते शिवाजी कृष्णमूर्ती यांच्याविरुद्ध तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी चेन्नई न्यायालयात फौजदारी मानहानीचा दावा दाखल केला आहे.
12:22 January 19
अरुणा मिलर ठरल्या मेरीलँडच्या पहिल्या भारतीय अमेरिकन लेफ्टनंट गव्हर्नर
अरुणा मिलर यांनी इतिहास रचला आहे. मेरीलँडच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून निवडून आलेल्या पहिल्या भारतीय अमेरिकन बनल्या आहे.
11:37 January 19
29 आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात येऊ शकते का, सर्वोच्च न्यायालयाचे एम्सला आदेश
अविवाहित 20 वर्षीय बीटेक विद्यार्थिनीची 29 आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणली जाऊ शकते की नाही. हे तपासण्यासाठी 20 जानेवारी रोजी डॉक्टरांचे एक पथक तयार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने एम्सच्या दिल्लीच्या संचालकांना सांगितले आहे.
11:01 January 19
कुस्तीपटुचे दुसऱ्या दिवशी जंतर मंतर येथे आंदोलन सुरू
कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिकख, बजरंग पुनिया आणि इतर कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघ (WFI) आणि त्याचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जंतर-मंतर येथे दुसऱ्या दिवशी मूक आंदोलन करत आहेत. त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत.
10:18 January 19
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावांसाठी बाईक अॅम्ब्युलन्स सुविधा
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावांसाठी बाईक अॅम्ब्युलन्स सुविधा सुरू करण्यात आली आहे. भामरागड, गडचिरोलीमध्ये 122 गावे आहेत. त्यांना पावसाळ्यात कनेक्टिव्हिटीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खड्डेमय रस्ते नसलेल्या गावांमध्ये आम्ही बाईक अॅम्ब्युलन्स सुरू केल्याचे भामरागडचे वैद्यकीय अधिकारी डॉ भूषण चौधरी यांनी सांगितले.
10:06 January 19
पंजाबमधील बड्या नेत्यांना लक्ष्य करण्याची योजना आखणाऱ्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांकडून अटक
2019 मध्ये अटक केलेला दहशतवादी संशयित नौशाद पाकिस्तानला जाण्यासाठी नेपाळी पासपोर्ट घेण्यासाठी सुहेलच्या निर्देशानुसार दोनदा नेपाळला गेला होता. परंतु, तो ते करू शकला नाही कारण नेपाळमधील संबंधित अधिकारी ज्याने त्याला पासपोर्ट काढण्यासाठी मदत करायची होती, त्याला लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. 12 जानेवारीला जहांगीरपुरी येथे दहशतवादी संशयित पकडले गेले. दहशतवादी संशयित नौशाद पाकिस्तानस्थित अशफाक आणि सुहेल यांच्या संपर्कात होता. सुहेलने पंजाबमधील बड्या नेत्यांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती.
09:13 January 19
शिवसेनेच्या कार्यकाळामध्येच सुरू झालेल्या प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन करणार-संजय राऊत यांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगावे की बेळगावमधील मराठी भाषिक जनतेवर अन्याय अत्याचार होऊ देऊ नका. या प्रकारच्या सूचना कर्नाटक मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आहेत हे, पंतप्रधानांनी सांगावे. पंतप्रधान ज्या प्रकल्पांचे उद्घाटन आज करणार आहेत, यातील प्रमुख प्रकल्प शिवसेनेच्या कार्यकाळामध्येच सुरू झालेले आहेत. त्याची पायाभरणी शिवसेनेची सत्ता असताना झालेली असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
08:06 January 19
कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपांवर पुढील 72 तासांत उत्तर द्या, क्रीडा प्राधिकरणाचे कुस्ती संघटनेला निर्देश
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडून (WFI) स्पष्टीकरण मागितले आहे. ऑलिम्पिक आणि सीडब्ल्यूजी पदक विजेत्यांसह कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपांवर पुढील 72 तासांत उत्तर देण्याचे निर्देश दिल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने म्हटले आहे.
08:05 January 19
कुस्ती संघटनेचे अध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर महिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर रद्द
लखनौ येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाज नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (NCOE) मध्ये 18 जानेवारी 2023 पासून 41 कुस्तीपटू आणि 13 प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसह महिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर होणार होते. हे शिबीर रद्द करण्यात आले
08:05 January 19
७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमाचा होणार प्रीमियर
७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छत्रपाल निनावे यांचा मराठी चित्रपट घाटचा प्रीमियर होणार आहे.
08:01 January 19
मुंबई, गोवा महामार्गावर भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू
मुंबई, गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
07:12 January 19
गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी हेमा मालिनींचे आवाहन...
आम्ही सर्व गुंतवणूकदारांना आश्वासन दिले आहे की, त्यांना येथे उद्योग उभारण्यासाठी सर्व सुविधा पुरविल्या जातील. पूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता. पण आता ती नाही आणि येथे चांगली विकासकामे होतील, असे मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी सांगितले.
07:12 January 19
अल्पवयीन मुलीवर गँगरेप प्रकरणात ५ आरोपींना अटक
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुलीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तिची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा प्रशासन तिला सर्वतोपरी मदत करत आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे दुमकाच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
07:10 January 19
बुरखा घालून येणाऱ्या मुलींना कॉलेजमध्ये नाकारला प्रवेश
बुरखा घालून येणाऱ्या मुलींना मुरादाबादच्या कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. याबाबत कॉलेजच्या प्राध्यापकांनी युनिफॉर्म घालण्याचा नियम असल्याचे सांगितले आहे.
07:09 January 19
त्रिपुरामध्ये घरातूनच करता येणार मतदान
ज्येष्ठ नागरिक, अपंग लोकांना घरातूनच मतदान करण्याचा पर्याय त्रिपुरा निवडणुकीत घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
07:09 January 19
शिव घेला मंदिरात भक्तांकडून खेकडे अर्पण
गुजरातमधील सुरत येथील रामनाथ शिव घेला मंदिरात भक्त भगवान शिवाला खेकडे अर्पण करतात. अनेक भक्तांनी मंदिरात खेकडे अर्पण केले आहेत.
06:44 January 19
Breaking News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबईत वाहतुकीत असा होणार बदल
मुंबई : पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी नवीन सूचना जारी केल्या आहेत. आज दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत, पश्चिम उपनगरातील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसह सर्व रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.