ETV Bharat / state

Breaking News : एक्सपायरी डेट उलटून गेलेले बॉडी स्प्रे, डीओ विकणारी टोळी गजाआड - Maharashtra crime news

ब्रेकिंग न्यूज
breaking news
author img

By

Published : Jan 3, 2023, 6:53 AM IST

Updated : Jan 3, 2023, 7:56 PM IST

19:54 January 03

एक्सपायरी डेट उलटून गेलेले बॉडी स्प्रे, डीओ विकणारी टोळी गजाआड

मुंबई - वैधता संपलेले बॉडी स्प्रे डीओ ब्युटी प्रॉडक्टवर नवीन वैधता टाकून ते बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सामान्य ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या सक्रिय टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 1ने जेरबंद केले आहे.

19:23 January 03

निवासी डॉक्टरांचा राज्यस्तरीय संप मागे

मुंबई - निवासी डॉक्टरांचा दोन दिवसांपासून सुरू असलेला राज्यस्तरीय संप मागे घेतल्याची माहिती कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

18:59 January 03

ठाणे जिल्ह्यात लेबर कॉन्ट्रॅक्टर खून प्रकरणी दोघांना अटक

ठाणे - कंत्राटदाराच्या गोळीबारात झालेल्या मृत्यूप्रकरणी मंगळवारी दोघांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील यांनी सांगितले की, पीडित गणेश दुर्योधन कोकाटे हा 8 डिसेंबर 2022 रोजी कशेळी कमानीजवळ कारमधून जात होता. त्यावेळी काही जणांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. आज या प्रकरणी दोघांना अटक केली.

18:33 January 03

आदराने संभाजी राजेंना केलेले कोणतेही संबोधन योग्यच, शरद पवारांची स्पष्टोक्ती

मुंबई - अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटले किंवा स्वराज्य रक्षक म्हटले तरी दोन्ही योग्यच आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. आस्थेने आदराने केलेले संबोधन अयोग्य म्हणणे हे योग्य नाही असे पवारांनी स्पष्ट केले. उलट ठाण्यात काही नेते एका नेत्याला धर्मवीर म्हणतात, त्यावरुन काही वाद होऊ नये याची काळजी वाटते असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांचे नाव न घेता पवारांनी चिमटा काढला.

18:22 January 03

आयएसआयच्या माजी प्रमुखावर अभिनेत्रींसोबत शरीरसंबंधाचा आरोप

कराची - पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनलर कमर जावेद बाजवा आणि आयएसआयचे माजी चिफ जनरल फैज हमीद यांच्यावर पाकिस्तानी अभिनेत्रींसोबत शरीर संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानी चित्रपट सृष्टीत यामुळे खळबळ उडाली आहे. लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांनी हा आरोप केला आहे.

18:16 January 03

अभिनेता शीझान खानला तुरुंगात केस न कापण्याची कोर्टाची परवानगी

पालघर - वसई येथील न्यायालयाने मंगळवारी तुनिषा शर्माच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला अभिनेता शीझान खान याला एक महिना केस न कापण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या खानने तुरुंगनियमात शिथीलता देऊन केस कापण्यापासून सूट मागितली होती.

17:10 January 03

भिवंडीत शाळेबाहेर आंदोलनादरम्यान पाकिस्तान समर्थकांची घोषणाबाजी

ठाणे - भिवंडी शहरातील एका शाळेबाहेर झालेल्या आंदोलनादरम्यान पाकिस्तान समर्थक घोषणा देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. प्रथमदर्शनी, सोमवारी इतर लोकांसह निदर्शनात सामील झालेल्या शाळेतील एका विद्यार्थ्याने पाकिस्तानचा जयजयकार करत घोषणाबाजी केली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

16:53 January 03

राज्यातील वीज कर्मचारी अधिकारी उद्यापासून 72 तासांच्या संपावर जाणार

मुंबई - राज्यातील वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर जाणार आहेत. नुकतीच याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. तीन सरकारी वीज कंपन्यांच्या युनियनने वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ उद्या बुधवारपासून 72 तासांच्या संपाचा इशारा दिला आहे. वीज कंपनी संघटनांची महाराष्ट्र राज्य कर्मचारी, अधिकारी आणि अभियान संघर्ष समिती या कृती समितीने हा संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाचे सरचिटणीस कृष्ण भोईर म्हणाले की, राज्याच्या मालकीच्या वीज कंपन्यांमधील खासगीकरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी चालक, वायरमन, अभियंते आणि इतर कर्मचार्‍यांच्या 30 हून अधिक संघटना एकत्र आल्या आहेत.

16:49 January 03

नारायण राणे यांनी खून केल्याचा विनाय राऊत यांचा आरोप

मुंबई - नारायण राणे यांनी चुलत भावाचा क्रूर पद्धतीने खून केल्याचा आरोप खा. विनायक राऊत यांनी केला आहे. नांदगाव येथे त्याचा मृतदेह जाळून टाकल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी नारायण राणेंवर फक्त खुनाचा आरोपच केला नाही तर त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील केली आहे. नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर अनेक खुनांना वाचा फुटेल असा दावा राऊत यांनी केला.

16:37 January 03

तपासयंत्रणेने ठरवून अटक केल्याचा कोचर दाम्पत्याचा आरोप

मुंबई - आयसीआयसीआय बँक व्हिडिओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सीबीआयच्या कारवाई विरोधातील कोचर यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. सीबीआयने कोचर दांपत्याच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. ज्येष्ठ वकील राजा ठाकरे यांनी सीबीआयतर्फे मुंबई उच्च न्यायालयात विनंती केली. सीबीआयच्या कारवाईविरोधात चंदा कोचर आणि दीपक कोचर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून कोचर दांपत्यांला देण्यात 10 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 15 जानेवारीला त्यांच्या मुलाचे लग्न असतानाही तपासयंत्रणेने त्यांना ठरवून अटक केल्याचा कोचर दाम्पत्याने आरोप केला आहे. ईडीच्या प्रकरणात चंदा कोचर यांच्या कस्टडीची गरज नसल्याचे कोर्टात स्पष्ट केले आहे. 19 वेळा कोचर यांनी ईडी चौकशीला हजेरी लावलीय असेही सांगण्यात आले. कोचर दांपत्याच्या बाजूने ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि विक्रम चौधरी यांनी युक्तीवाद केला.

15:33 January 03

मे महिन्यापर्यंत २००० च्या नोटा रद्द केल्या जातील, प्रकाश आंबेडकरांचे भाकित

मुंबई - नोटा वितरित करणे, त्या चलनात आणणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे ही आरबीआयची जबाबदारी आहे. नोटा चलनातून बाद करण्याचा आरबीआयला अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केवळ कायदा बघितला, त्याचा गाभा नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या कायद्याने या बोर्डाला काही अधिकार दिलेत. केंद्राचा अधिकार केवळ गॅझेट करण्यापुरता आहे. देशातील प्रचलित व्यवस्थेला नोटाबंदीच्या घोषणेने छेद आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही व्यवस्था मोडीत काढली असेही आंबेडकर म्हणाले आहेत. मे महिन्यापर्यंत २००० च्या नोटा रद्द केल्या जातील, असे भाकितही प्रकाश आंबेडकर यांनी केले.

15:27 January 03

इंजिनियरिंगच्या विद्यार्थिनीचा भोसकून खून

बंगळुरू - येथील शहराबाहेर असणाऱ्या एका विद्यापीठातील इंजिनियरिंगच्या विद्यार्थिनीचा भोसकून खून करण्यात आला आहे. तिला दुसऱ्या एका महविद्यालयातील विद्यार्थ्याने भोसकले.

14:58 January 03

भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे फक्त धुळफेक - महेश तपासे

मुंबई - ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहीत नाही. अजित पवार काय म्हणाले हे माहीत नाही. आपण कशासाठी आंदोलन करत आहोत हे माहीत नाही त्यावरून भाजपचे आंदोलन म्हणजे फक्त धुळफेक आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

14:35 January 03

ईशान्य भागातील रस्ते सामरिक दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण - राजनाथ सिंह

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार देशातील लोकांसाठी विशेषतः ईशान्येकडील भागात चांगल्या आणि सुरळीत प्रवासाच्या सुविधा विकसित करण्यावर काम करत आहे. हे रस्ते सामरिक दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण आहेत, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

13:54 January 03

ममता बॅनर्जी राष्ट्रगीत अवमान प्रकरणी 12 जानेवारीला कोर्ट देणार निकाल

मुंबई - बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रगीत अवमान प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आरहे. आता 12 जानेवारीला कोर्ट निकाल देणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात झाली. गेल्यावर्षी 3 डिसेंबरला मुंबईत एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी राष्ट्रगीत सुरू असतानाच स्टेज सोडून निघून गेल्याचा आरोप आहे. त्यानंतर भाजप मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी राष्ट्रगीत अनादर केल्याप्रकरणी, ममता बॅनर्जी यांच्याविरोधात FIR नोंदवण्यासाठी शिवडी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर शिवडी कोर्टाने ममता बॅनर्जी यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला ममता बॅनर्जी यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.

13:49 January 03

पुणे कारागृहातील 3 अंडरट्रायल कैद्यांचा आजारामुळे रुग्णालयात मृत्यू

पुणे - येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या तीन कैद्यांचा विविध आजारांमुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

13:42 January 03

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिव दर्शनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार

पुणे - पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे पार्थिव हॉस्पिटलमधून घराकडे रवाना करण्यात आले आहे. आज दुपारी अडीच वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर साडेतीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंत्यदर्शन घेणार आहेत.

13:38 January 03

पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी एकाला अटक

पालघर - जिल्ह्यात एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 24 वर्षीय आदिवासी व्यक्तीला अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने आज ही माहिती दिली. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली तेव्हा ही 16 वर्षीय मुलगी नेहलपाडा येथील तिच्या घराबाहेर गेली होती, असे वाडा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

12:58 January 03

आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाची ताकीद

मुंबई - आ. बच्चू कडू आज कोर्टात हजर झाले नाही म्हणून पुढच्या सुनावणीस त्यांना कोर्टात हजर राहण्याचा निर्देश दिले आहेत. जर 21 जानेवारीला बच्चू कडू हजर झाले नाही तर वॉरंट बजावणार असे कोर्टाने स्पष्ट केले. मात्र बच्चू कडू आजारी असल्याचे मेडिकल रिपोर्ट कडूंच्या वकिलांनी आज कोर्टात सादर केले. वॉरंट जारी करू नका अशी विनंती कडू यांच्या वकीलाने केली. त्यावर 21 जानेवारीला कडू यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले

12:52 January 03

वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर सीबीआयचे छापे

नागपूर - वेर्स्टन कोल्ड फिल्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर सीबीआयने छापा टाकला आहे. उमरेड कोल्ड फिल्डचे एरिया प्लॅनिंग ऑफिसर एमपी नवले यांच्या नागपूरच्या घरी व कार्यालयावर सीबीआयने हा छापा टाकला आहे.

12:34 January 03

नालासोपाऱ्यात जिम ट्रेनरचा श्वास कोंडल्याने दुर्दैवी मृत्यू

पालघर - नालासोपाऱ्यात जिम ट्रेनरचा श्वास कोंडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

12:31 January 03

इंडियन सायन्स काँग्रेससाठी पालघरमधील विद्यार्थ्यांचा बाजरीवरील प्रकल्पाची निवड

पालघर - जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागातील शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या बाजरीच्या पौष्टिक पैलूंवरील प्रकल्पाची निवड नागपूर येथे होणाऱ्या १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये शास्त्रज्ञांसमोर सादरीकरणासाठी करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली.

12:12 January 03

राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच

मुंबई - राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. लेखी आश्वासन दिल्याशिवाय संप माघार घेणार नाही अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे. त्यामुळे आजही बहुतांश ठिकाणी ओपीडीवर परिणाम होत आहे.

11:50 January 03

औरंगजेबाचा पुळका आलेल्यांना त्यांची महती काय कळणार - मुख्यमंत्री

ठाणे - छत्रपती संभाजी महाराज यांना बहादूरगडावर आणून त्यांचे डोळे काढण्यात आले. बहादूरगड किल्ल्यापासून जवळच विष्णू मंदिर होते. औरंगजेब हिंदुद्रोही असता तर त्याने ते मंदिरही पाडले असते, असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगजेबाचा पुळका आलेल्यांना त्यांची महती काय कळणार असा टोला लगावला आहे.

10:49 January 03

भारत स्टार्टअप्समध्ये पहिल्या तीन राष्ट्रांमध्ये-पंतप्रधान

आज भारत स्टार्टअप्समध्ये पहिल्या तीन राष्ट्रांमध्ये आहे. 2015 पर्यंत आम्ही 130 देशांच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 81 व्या स्थानावर होतो, परंतु 2022 मध्ये आम्ही 40 व्या स्थानावर पोहोचलो आहोत. ज्ञानातून जगाचे भले करणे हे संशोधकाचे कर्तव्य असल्याचे पंतप्रधान म्हणाले आहेत.

10:39 January 03

डेटा व तंत्रज्ञानामुळे भारत प्रगतीपथावर- पंतप्रधान नरेंद्र मोदी

निरीक्षण संशोधनाचा मूळ आधार आहे. डेटा व तंत्रज्ञानामुळे भारत प्रगतीपथावर आहे.

10:24 January 03

बीएसएफ जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

आज सकाळी 8.30 च्या सुमारास, बीओपी चन्ना, गुरुदासपूर सेक्टरच्या बीएसएफच्या जवानांनी बीएस कुंपणाच्या पुढे एका सशस्त्र पाक घुसखोराची संशयास्पद हालचाल पाहिली, जो पाक बाजूने बीएस कुंपणाजवळ येत होता. त्याला बीएसएफच्या जवानांनी आव्हान दिले आणि निष्प्रभ केले.

09:04 January 03

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक

हावडा ते न्यू जलपायगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर 4 दिवसांनी दगडफेक झाली. मालदा स्थानकाजवळ ही घटना घडली.

08:57 January 03

तामिळनाडूत वाहने एकमेकांवर आदळल्याने पाच जणांचा मृत्यू

कुड्डालोर जिल्ह्यातील वेप्पूरजवळ 5 वाहने एकमेकांवर आदळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. कारमधून मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

08:20 January 03

कंझावाला अपघातात पीडिता स्कूटीवर एकटी नव्हती-दिल्ली पोलीस

कंझावाला अपघातात पीडिता स्कूटीवर एकटी नव्हती. अपघाताच्या वेळी एक मुलगी तिच्यासोबत होती. मुलीला दुखापत झाली आणि घटनास्थळावरून पळून गेली. पण पीडितेचे पाय कारमध्ये अडकले, त्यानंतर तिला ओढले गेले, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

07:20 January 03

इगतपुरीमध्ये बिबट्या जेरबंद, मृत मुलाच्या कुटुंबाला देण्यात येणार २० लाखांची नुकसान भरपाई

तळेगाव, इगतपुरी येथे बिबट्याची माहिती मिळाली. आमच्या रेस्क्यू टीमने तिथे जाऊन त्याला पकडले. 24 रोजी कथित बिबट्याच्या हल्ल्यामुळे मरण पावलेल्या 6 वर्षाच्या मुलाच्या शरीरातील गोळा केलेल्या स्वॅबशी बिबट्याचा स्वॅब गोळा करून त्याची जुळणी केली जाईल. बिबट्याचे वय सुमारे 10 वर्षे व नर आहे. त्याचा स्वॅब भारतीय वन्यजीव संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवला जाईल. मृत मुलाच्या कुटुंबाला या आठवड्यात 20 लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल, असे नाशिकचे आरएफओ केतन बिरारी यांनी सांगितले.

06:59 January 03

भारत जोडो यात्रा आजपासून उत्तर प्रदेशमधून सुरू

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो यात्रा' आजपासून उत्तर प्रदेशमधून सुरू झाली आहे. नऊ दिवसांच्या हिवाळी सुट्टीनंतर ही यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेने 110 दिवसांपेक्षा जास्त आणि 3,000 किमी हून अधिक पदयात्रा केली आहे. दक्षिणेकडील राज्यांपासून सुरू झालेली ही यात्रा सुट्टीपूर्वी राजस्थान आणि दिल्लीपर्यंत गेली

06:41 January 03

Breaking News : डॉक्टरांच्या संपाचा मोठा परिणाम नाही-बीएमसी प्रशासनाचा दावा

मुंबई : विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप केला. या संपात पालिकेचे 2 हजार निवासी डॉक्टर सहभागी झाले होते. मात्र पालिका प्रशासनाने संपाचा कोणताही मोठा परिणाम झाला नसल्याचे दावा केला आहे. दिवसभरात 71 मोठ्या, 32 छोट्या शस्त्रक्रिया, 9 प्रसूती करण्यात आल्याचे मुंबई पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

Last Updated : Jan 3, 2023, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.