विरार - विरार येथील जीवदानी देवीच्या दर्शनासाठी पायी डोंगर चढणाऱ्या एका १९ वर्षीय मुलाचा धाप लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नायगाव-दादर येथे राहणारा सोनू जयस्वाल हा आपल्या मोठ्या भावासोबत शुक्रवारी विरारमधील जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आला होता. दुपारी दोनच्या वाजताच्या सुमारास पायरी मार्गावरून दोनशे पायऱ्या चढून झाल्यावर त्याला दम लागला. व त्यानंतर चक्कर येऊन तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला त्वरित विरार पश्चिमेच्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी देण्यात आले, मात्र उपचाराआधीच तो मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. विरार पोलिस ठाण्यात या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Breaking News : माहिमच्या सेंट मायकल चर्चच्या नजीकच्या कब्रस्थानची नासधूस करणाऱ्यास अटक
19:27 January 08
जीवदानी मंदिराच्या पायऱ्या चढताना भाविकाचा मृत्यू
17:58 January 08
पालघरजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
पालघर - जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशन परिसरात कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
16:41 January 08
प्रेयसी समोरच एका प्रियकराने दुसऱ्या प्रियकराचा केला निर्घृण खून
ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्वेतील खडेगोळवली मधील मुख्य रस्त्यावर प्रेम प्रकरणातून खून (Despicable murder in Kalyan) झाल्याची घटना घडली आहे. प्रेयसी समोरच एका प्रियकराने दुसऱ्या प्रियकराच्या छातीत चाकू भोसकून निघृणपणे खून (murder of one lover in front of another lover) केला आहे. याप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून आरोपी प्रियकरासह त्याच्या तीन मित्राविरोधात खुनाचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. (Thane Crime)
15:46 January 08
एखादा उद्योग बाहेर गेल्याने फरक पडत नाही - राज ठाकरे
जागतिक मराठी संमेलनात ( World Marathi Conference ) आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांची रोखठोक मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील एखादे दोन उद्योग बाहेर गेले तरी काही फरक पडत नाही. ( reaction to political situation in Maharashtra ) पण, आपण गुजरातचे आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) शोभत नाही. नुसते एकसंघ म्हणायचे, असा जोरदार टोला राज ठाकरेंनी मोदी सरकारला लगावला आहे. (Raj Thackeray attacked Modi government )
15:45 January 08
जलेबी बाबाचा 120 महिलांवर बलात्कार; न्यायालय कोणती शिक्षा सुनावणार? उद्या निकाल...
हरियाणातील फतेहाबादमध्ये तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांवर अत्याचार (Atrocities on women) करणाऱ्या जलेबी बाबाला न्यायालय आता 9 जानेवारीला शिक्षा (Jalebi Baba Punishment) सुनावणार आहे. शनिवारी या खटल्याची चर्चा पूर्ण न झाल्याने दोषी बाबाला शिक्षा सुनावणे () बाकी राहिले. जलेबी बाबावर (Jalebi Baba Rape Case Haryana) १२० महिलांवर बलात्कार (convicted rape with 120 women) केल्याचा आरोप आहे त्याच्या आश्रमातून ३० हून अधिक सेक्स सीडीही सापडल्या (Sex CD seized Fatehabad ashram) आहेत.
15:45 January 08
१९९३ प्रमाणे बॉम्बस्फोट होतील असा कॉल करणाऱ्यास एटीएसकडून अटक
मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्ब ब्लास्ट धमकीचा कॉल ( ATS Arrest Bomb Blasts Caller Arrest ) आला. मुंबईत १९९३ सालासारख्या दंगली आणि 4 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचे कॉलमध्ये सांगण्यात ( Bomb Blasts Will Happen Like 1993 ) आले. याप्रकरणी नबी याहया खान उर्फ के. जी. एन. लाला याला अटक करण्यात आली ( Mumbai Police Bomb blast threat call ) आहे.
13:49 January 08
नागपाडा परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अल्पवयीन मुलाला अटक
नागपाडा परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी नालासोपारा भागातून एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. आयपीसी कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
13:24 January 08
जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या इमारतीमागे आढळला मृतदेह
ठाणे जिल्ह्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या इमारतीमागे एक मृतदेह आढळून आला आहे. राजा बाबू (20) असे मृताचे नाव असून त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले.
12:11 January 08
वाद सोडविण्यासाठी २.८ कोटी रुपये घेऊन फसवणूक, गुन्हा दाखल
पीडित महिमतुरा यांनी आरोप केला आहे की त्यांच्या फर्मच्या व्यवस्थापकीय संचालक रेश्मा गांगजी यांनी त्यांचा आणि काकू यांच्यातील वाद सोडवण्यासाठी त्यांच्याकडून 2.8 कोटी रुपये घेतले. पण त्यांच्यासोबत फसवणूक केली आणि त्यानंतर त्यांचे कॉल उचलत नव्हते. लिबास डिझाईनचे चेअरमन निशांत मित्रसेन महिमतुरा यांच्यासोबत २.८ कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेश्मा गांगजी आणि कबीर सिंग भोमिया यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 420, 406 आणि 34 अंतर्गत मुंबईतील गमदेवी पीएस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12:09 January 08
जोशीमठ शहरातील भूस्खलनावर आज पंतप्रधान कार्यालयाकडून उच्चस्तरीय बैठक
जोशीमठ शहरातील भूस्खलनावर आज पंतप्रधान कार्यालयाकडून उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा आज दुपारी पंतप्रधान कार्यालयात कॅबिनेट सचिव आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्यांसोबत उच्चस्तरीय आढावा घेणार आहेत.
12:03 January 08
ठाण्यात आज हौसिंग फेडरेशनचची निवडणुक
भाजपच्या सीताराम राणे यांच्या समर्थ सहकार पॅनेल विरोधात महाविकास आघाडी पुरस्कृत परिवर्तन पॅनेलमध्ये चुरस आहे. ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीच्या २१ जागांसाठी आज रविवारी मतदान होत आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा हौसिंग फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष सीताराम राणे यांच्या समर्थ सहकार पॅनेल आणि महाविकास आघाडी पुरस्कृत परिवर्तन पॅनेलमध्ये चुरशीची लढत रंगली आहे. समर्थ पॅनेलचे २१ उमेदवार तर परिवर्तन पॅनेलचे १९ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपच्या सीताराम राणे यांच्या समर्थ सहकार पॅनेल साठी कपबशी चिन्ह तर महाविकास आघाडी पुरस्कृत परिवर्तन पॅनेलसाठी रिक्षा हे निवडणुकीचे चिन्ह आहे.
11:39 January 08
व्यक्त होण्यावर पैसे लावले पाहिजेत-राज ठाकरे
व्यक्त होण्यावर पैसे लावले पाहिजेत. कुणीही समोर आले की व्यंगचित्रातील प्रतिमा मनात येते. कल्पनेतील उतरविता न येणे हा पराभव असतो. सध्याची स्थिती पाहून घंटी नाही घंटा वाजते, अशी मिश्किल टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
11:05 January 08
साखर झोपेत भूकंपाचे धक्के ; कळमनुरी, वसमत औंढा नागनाथ तालुका हादरला
हिंगोली- कळमनुरी व औंढा नागनात तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज पहाटे साडेचार च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. याची तीव्रता 3.6 स्केल एवढी भूमापक केंद्रावर नोंद झाली आहे. जवळपास 40 ते 50 गावांमध्ये हे धक्के जाणवले आहेत. अचानक पहाटे- पहाटे साखर झोपेमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
10:48 January 08
नोटीस जशी जाहीर केली, तसे माझे उत्तर जाहीर करावे-चित्रा वाघ
भाजपने नेहमीच महिलांना न्याय दिला आहे. मंत्रिमंडळात ३ ते ४ महिलांना स्थान द्यावे, अशी अपेक्षा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.
09:48 January 08
निवडणूक आयोगात शिवसेनेला न्याय मिळेल-संजय राऊत
केंद्राच्या दबावापोटी सुरू असलेला डाव उधळला जाईल. निवडणूक आयोगात शिवसेनेला न्याय मिळेल. अजूनही संविधान आणि कायदा जिवंत आहे. पूर्ण शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
09:34 January 08
पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांचे निधन
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांचे निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री योगी यांनी शोक व्यक्त केला आहे. केशरी नाथ त्रिपाठी यांचा मुलगा नीरज त्रिपाठी यांनी सांगितले की, त्यांनी (केशरी नाथ त्रिपाठी) ८ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता अखेरचा श्वास घेतला.
09:31 January 08
छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणण्यात चुकीचे नाही-शरद पवार
छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणण्यात चुकीचे नाही. सत्तेतील काही लोक टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी पाय जमिनीवर ठेवावेत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुका महाविकास आघाडीकडून एकत्रित लढविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
09:14 January 08
धुक्यामुळे विमानसेवेसह रेल्वे सेवेवर परिणाम
खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावर सुमारे 20 उड्डाणे उशीर झाली आहेत. धुक्यामुळे उत्तर रेल्वेच्या 42 गाड्या उशिराने धावत आहेत.
09:12 January 08
पुण्यात ई-सिगारेट विक्रेत्यांवर गुन्हे शाखेचा छापा, १० लाख ५२ हजारांचा मुदेमाल जप्त
पुणे - सध्या शहरातील महाविद्यालयीन तरुण तरुणी यांच्यात ई सिगारेट पिण्याचे प्रमाण वाढले असून छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित ई-सिगरेटची विक्री होत असल्याच्या तक्रारी सर्वसामान्य नागरिकांकडून पोलिसांना प्राप्त होत होत्या. याची गंभीर दखल घेत पुणे शहर परिसरात अवैधरीत्या ई सिगारेट विक्री करणाऱ्या विविध ९ ठिकाणी छापेमारी करत गुन्हे शाखेने तब्बल १० लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
09:11 January 08
प्रियकराच्या सततच्या त्रासाला कांटाळून प्रेयसीची आत्महत्या.
पुण्यातील मांजरी परिसरात प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने रेल्वे पटरीवर आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
09:11 January 08
ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डे परेडला राज्यपालांनी दाखविला हिरवा झेंडा
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथे ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डे परेडला हिरवा झेंडा दाखवला.
08:10 January 08
जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवादी ठार, आज सापडले मृतदेह
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LOC fire ) लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. शनिवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैन्याच्या जवानांना पुढे गावात संशयास्पद हालचाल दिसली आणि त्यांनी गोळीबार केला. दोन दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्यात आले, असे ते म्हणाले. आज सकाळी लष्कराने परिसरात शोध मोहीम सुरू केली तेव्हा ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
07:37 January 08
कोल्हापुरात आंब्याच्या पहिल्या पेटीला महाराष्ट्रातील सर्वाधिक ५१,००० रूपये दर
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा शनिवारी दाखल झाला. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यामध्ये पाच डझनाच्या पेटीला ५१,००० रुपयांचा दर निघाला. पहिला सौदा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते काढला. कुंभारमठ (ता. देवगड) येथील शेतकरी सुहास दिंदास गोवेकर यांचा हापूस आंबा खासदार धनंजय महाडिक यांनी बोली लावत ५१,००० खरेदी केला असून राज्यातील यावर्षीचा सर्वात उच्चांकी दर हा कोल्हापुरात मिळाला आहे.
07:36 January 08
चर्चच्या स्मशानभूमीतील क्रॉसची तोडफोड
मुंबई- माहीमच्या उपनगरातील एका चर्चला लागून असलेल्या स्मशानभूमीतील क्रॉसची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सेंट मायकल चर्चच्या कर्मचाऱ्यांना सकाळी किमान 18 क्रॉस तुटलेले आढळले.
07:34 January 08
महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन ११ रुग्ण, एकही मृत्यू नाही
महाराष्ट्रात शनिवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार कोरोनाचे नवीन ११ रुग्ण आढळले आहेत. तर एकही मृत्यू नाही. राज्यातील रुग्णांची संख्या 81,36,791 झाली, असे आरोग्य विभागाने येथे सांगितले. कोणत्याही नवीन साथीच्या रोगाशी संबंधित मृत्यूची नोंद झाली नाही.
07:33 January 08
दुसरी मुलगी झाल्याने नाराज झालेल्या महिलेने ३ दिवसांच्या अर्भकाची हत्या केली
लातूरमध्ये एका महिलेला तिच्या तीन दिवसांच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी दिली. 25 वर्षीय महिलेने 29 डिसेंबर रोजी बाळाचा गळा दाबून खून केला कारण ती दुसरी मुलगी जन्माला आल्याने नाराज होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे, असे गोटेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
07:04 January 08
भुवनेश्वर ते राउरकेला थेट विमान सेवेचे उद्घाटन
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (व्हिडिओ-कॉन्फरन्सिंगद्वारे) आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ओडिशा हॉकी विश्वचषकापूर्वी भुवनेश्वर ते राउरकेला थेट विमान सेवेचे उद्घाटन केले.
07:04 January 08
हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार
हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे.
07:03 January 08
श्रीराम सेनेच्या अध्यक्ष आणि वाहनचालकावर बेळगावमध्ये गोळीबार
श्रीराम सेनेचे बेळगावचे अध्यक्ष रविकुमार कोकितकर आणि चालक यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस रुग्णालयात पोहोचले आहेत.
06:41 January 08
Breaking News : मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी गोलमेज परिषद
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी गोलमेज परिषद आज जालनामध्ये होणार आहे. कायमस्वरुपी टिकणाऱ्या आरक्षणासाठी राज्यातील विविध संघटना, अभ्यासक आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर दिशा ठरविणार आहेत. महापुरुषांच्या अवमाना प्रकरणी भूमिका जाहीर केली जाणार आहे.