ETV Bharat / state

Breaking News Live : नक्षलवाद्यांकडून भाजप नेत्याची निर्घृण हत्या; घरच्यांसमोर कुऱ्हाडीने केले वार - Maharashtra news today Marathi

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News
author img

By

Published : Feb 5, 2023, 7:11 AM IST

Updated : Feb 5, 2023, 7:33 PM IST

19:32 February 05

नक्षलवाद्यांकडून भाजप नेत्याची निर्घृण हत्या; घरच्यांसमोर कुऱ्हाडीने केले वार

छत्तीसगड - नक्षलवाद्यांकडून भाजप नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. घरच्यांसमोर कुऱ्हाडीने वार करून ठार करण्यात आले. ही घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे.

18:23 February 05

रावण काढून रामायणातला राम समजावून सांगा; जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला

मुंबई - राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरून पुन्हा एकदा गदारोळ व्हायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाविरोधात निषेध नोंदवायला सुरुवात झाली. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात पुन्हा एकदा ट्विट केले आहे. रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा. आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून शिवाजी महाराजांचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वातंत्र्यलढा समजावून सांगा, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

17:46 February 05

साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात अचानक बिघडली दत्ता मेघे यांची प्रकृती

समारोह सुरु होताच प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हील चेयरच्या माध्यमातून काढण्यात आले बाहेर

दत्ता मेघे हे मराठी साहित्य संमेलनाचे आहे स्वागत अध्यक्ष

मंचच्या बाजूला असलेल्या व्हिआयपी ग्रीन रूम मध्ये सुरु आहे तपासणी

16:55 February 05

आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी; नारायण राणेंची घेतले नाव

अकोला - आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला असल्याचे त्यांनी आज माध्यमांना सांगितले. हा फोन नितेश राणे, नारायण राणे यांच्या नावाने आला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दोन जणांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या संदर्भामध्ये पोलीस तक्रार केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु, या धमकीच्या फोनमुळे जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आमदार देशमुख यांनी मंगळवारी नरिमन पॉईंट येथे येतो हिम्मत असेल तर या असे, आव्हानच धमकी देणाऱ्यांना दिले आहे.

15:56 February 05

शेतकरी मुद्द्यांवरुन केसीआर यांचा केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघात

नांदेड - आगामी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा. महाराष्ट्राच्या सरकारला झुकावेच लागेल. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन केले. त्यावर मोदी सरकराने एक शब्दही काढला नाही. त्यामुळे भाजप सरकारला शेतकऱ्यांची काहीच चिंता नसल्याची टीका केसीआर यांनी नांदेडमध्ये बोलताना केली.

14:55 February 05

माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा; आमदार मंगेश कुडाळकर यांचे आदित्य ठाकरेंना आव्हान

मुंबई - आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणे योग्य नाही. शिंदे सरकार चांगले काम करत आहे. आदित्य ठाकरे यांनी आमच्यासोबत यावे. तसेच मी आमदारकीचा राजीनामा देतो, त्यांनीही राजीनामा द्यावा आणि कुर्ल्यातून माझ्याविरुद्ध निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.

14:15 February 05

तेलंगणाचे मुख्यमंत्री गुरुद्वारामध्ये घेणार दर्शन

नांदेडमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे आगमन झाले आहेत. ते पवित्र गुरुद्वारामध्ये दर्शन घेणार आहेत.

14:13 February 05

राजस्थानने देशाला अनेक क्रीडा प्रतिभावान व्यक्ती दिले- पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजस्थानने देशाला अनेक क्रीडा प्रतिभावान व्यक्ती दिले आहेत. आणि पदके जिंकून तिरंग्याचा गौरव वाढवला. जयपूरने राज्यवर्धन राठोड या ऑलिम्पिक पदक विजेत्याची खासदार म्हणून निवड केल्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

13:56 February 05

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे विमानतळावर आगमन, सभेत काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे विमानतळावर आगमन झाले आहे. थोड्याच वेळात ते सभा घेणार आहेत. बीआरएस पक्षाची स्थापनेनंतर त्यांची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

13:53 February 05

आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान, शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे ठाकरेंना आव्हान

मी या असंवैधानिक मुख्यमंत्र्यांना (एकनाथ शिंदे) माझ्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. मी माझ्या जागेचा राजीनामा देईन आणि त्यांनी त्यांच्या जागेचा राजीनामा द्यावा आणि त्यांना वरळीतून माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, असे आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. त्यावर बाळासाहेबांची शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर म्हणाले, की आदित्य ठाकरेंना सांगू इच्छितो की आव्हाने देणे योग्य नाही. शिंदे सरकार सातत्याने काम करत आहे. मी त्यांना आमच्यासोबत काम करण्याची विनंती करतो. मी कुर्ल्यात राजीनामा देईन, त्यांनीही राजीनामा द्यावा आणि माझ्याविरुद्ध निवडणूक जिंकून सिद्ध करावे, असे कुडाळकर यांनी आव्हान दिले.

13:51 February 05

वांद्रे पोलीस विनोद कांबळीच्या निवासस्थानी पोहोचले..

वांद्रे पोलीस हे विनोद कांबळी यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांना कलम 41A CrPC अंतर्गत नोटीस बजावली. त्याला पोलिसांसमोर हजर राहण्यास आणि त्याचे म्हणणे नोंदवण्यास सांगितले.

13:50 February 05

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी राष्ट्रपती भवनाच्या अमृत उद्यानाला दिली भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विशेष निमंत्रणावरून भारताचे सरन्यायाधीश डॉ. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आज दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या अमृत उद्यानाला भेट दिली.

13:47 February 05

बंदी असलेल्या खोकल्याच्या सिरपच्या 108 बाटल्यांसह एकाला अटक

ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून बंदी लागू केलेल्या खोकल्याच्या सिरपच्या 108 बाटल्या जप्त केल्या आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली. एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी मुंब्रा परिसरात सापळा रचला आणि हातात बॅग घेऊन तीन जणांना दिसले. पोलिसांना पाहताच दोघांनी पळ काढला. तर एकाला पकडण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कृपाली बोरसे यांनी दिली.

13:39 February 05

पत्राचाळीचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर, रहिवाशांचे कुटुंबासह आंदोलन

गोरेगाव (प.) येथील पत्राचाळीचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. संगम लाइफस्पेसेसच्या एकता ट्रिपोलिस आणि द लक्सरच्या रखडलेल्या रहिवासी संकुलातील घर खरेदी करणाऱ्या कुटुंबियांसह घरांचा तात्काळ ताबा मिळावा या मागणीसाठी आंदोलन केले.

13:16 February 05

138 बेटिंग अॅप्स आणि 94 लोन लेंडिंग अॅपवर बंदी लागू होणार

गृह मंत्रालयाकडून 138 बेटिंग अॅप्स आणि 94 लोन लेंडिंग अॅप्सवर तातडीने बंदी घालण्यात येणार आहे.

12:45 February 05

भाजपसह काँग्रेस आमदाराकडून मतदारांना प्रेशर कुकरचे वाटप

भाजपचे आमदार अरविंद लिंबवली आणि काँग्रेसचे आमदार रामलिंगा रेड्डी हे 4 फेब्रुवारी रोजी आपापल्या मतदारसंघातील मतदारांना प्रेशर कुकरचे वाटप करताना दिसले. त्यासंदर्भातील व्हिडिओ समोर आला आहे.

11:43 February 05

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन, कारगिल युद्धावेळी भूषविले होते पंतप्रधान पद

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ (निवृत्त) यांचे दुबईतील रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

10:59 February 05

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची घेतली भेट..राजकीय चर्चांना उधाण

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली आहे. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

10:43 February 05

बलात्काराचा आरोप असलेला क्रिकेटपटूविरोधात नेपाळमध्ये पुन्हा वाद

बलात्काराचा आरोप असलेला क्रिकेटपटू संदीप लामिछाने याला प्रशिक्षण शिबिरात घेतल्याने मोठा वादंग निर्माण झाले आहे. नागरिकाांनी काठमांडूमध्ये निदर्शने केली आहेत.

10:38 February 05

जंगलात लागलेल्या आगीत 22 जणांचा मृत्यू

चिलीच्या जंगलात लागलेल्या आगीत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

10:38 February 05

चिलीच्या जंगलात 22 जणांचा मृत्यू

चिलीच्या जंगलात लागलेल्या आगीत 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

10:36 February 05

आसाममध्ये भाजपचे ६ वर्षांपासून सरकार, किती शाळा उघडल्या? असुद्दीन ओवैसी

गेल्या 6 वर्षांपासून तेथे भाजपचे सरकार आहे. त्यांनी काय केले? ते त्यांचे अपयश आहे. त्यांनी किती शाळा उघडल्या? त्यांच्यावर कारवाई होत असताना, ज्या मुलींचे लग्न झाले त्याबद्दल ते काय करणार? आसाम सरकार मुस्लिमविरोधी, पक्षपाती आहे, अशी प्रतिक्रिया असुद्दीन ओवेसी यांनी आसाम सरकारच्या बालविवाह कायद्याच्या कडक अंमलबजावणीवर दिली आहे.

10:26 February 05

राज ठाकरे यांनी पत्र लिहिले असले तरीही निवडणुका होणार - संजय राऊत

निवडणूक बिनविरोध करण्याचे आव्हान चांगले आहे. राज्यात घाणेरडे राजकारणाची सुरुवात कोणी केली, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजवर निशाणा साधला. भाजप आणि शिंदे गट सुडाचे राजकारण करत आहेत.

कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील वातावरण सरकारसाठी अनुकूल नाही. राज ठाकरे यांनी पत्र लिहिले असले तरीही निवडणुका होणार असल्याचेही राऊत म्हणाले.

09:48 February 05

96 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचा आज समारोप, नितीन गडकरी राहणार उपस्थित

विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्‍त विदर्भ साहित्‍य संघ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍या वर्धा येथे सुरू असलेल्‍या 96 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचा आज समारोप होत आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हाच उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. म. रा. जोशी व प्रकाशक राजीव बर्वे यांचा सत्‍कार करण्‍यात येणार आहे.

09:46 February 05

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज नांदेडमध्ये घेणार जाहीर सभा

तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने आपल्या पक्षाचा देशभरात करण्यासाठी महाराष्ट्रातून सुरुवात करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची रविवार ५ फेब्रुवारीला नांदेडातील हिंगोली गेट परिसरातील मैदानावर पहिली सभा होणार आहे. दुपारी दीड वाजता सभा सुरू होणार आहे

08:52 February 05

क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात गुन्हा दाखल

मुंबईतील वांद्रे पोलिसांनी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलिसांनी विनोद कांबळीची पत्नी अँड्रिया हिच्या जबानीवरून भादंवि कलम ३२४ आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. पत्नी अँड्रिया हिने विनोदवर दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

08:01 February 05

अवैध गर्भपात करणारे डॉक्टर दाम्पत्य फरार, महिलेची प्रकृती चिंताजनक

औरंगाबादमध्ये अवैध गर्भपात केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. तर डॉक्टर दाम्पत्य फरार झाले आहे.

07:42 February 05

पीएफआयच्या 3 संशयित सदस्यांना बिहारमध्ये अटक

पाटणा आणि रांचीच्या एनआयए पथकाने मोतिहारी जिल्हा पोलिसांसह पीएफआयच्या (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) 3 संशयित सदस्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

07:41 February 05

बीएसएफने 2.256 किलो वजनाचे हेरॉईन केले जप्त

बीएसएफ पंजाब फ्रंटियरने 4 फेब्रुवारी रोजी फाजिल्का जिल्ह्यात पांढऱ्या रंगाच्या पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले 2.256 किलो वजनाचे हेरॉईन जप्त केले.

07:36 February 05

गुलमर्ग येथे १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान भव्य क्रीडा स्पर्धा आयोजित होणार

गुलमर्ग येथे १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान खेलो इंडिया, खेलो इंडिया युथ गेम्स, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आणि खेलो इंडिया हिवाळी गेम्सच्या होणार आहेत. या खेळांमध्ये 1500 हून अधिक खेळाडू सहभागी होतील, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

07:18 February 05

पंतप्रधान आज महाखेलमधील स्पर्धकांना करणार संबोधित

पंतप्रधान आज जयपूर महाखेलच्या सहभागींना संबोधित करणार आहेत

07:14 February 05

फुग्यावरून चीन-अमेरिकेत संघर्षाची ठिणगी?

अमेरिकेने चीनचा फुगा खाली पाडल्याबद्दल चीनने तीव्र असंतोष' व्यक्त केला आहे. हा फुगा चीनकडून हेरगिरी सोडल्याचा आरोप केला जात आहे.

06:55 February 05

Maharashtra Breaking News : मुंबईचा विकास करणे हे आमचे उद्दिष्ट-एकनाथ शिंदे

मुंबई- मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा मुंबईच्या विकासाचा, लोकांच्या हिताचा अर्थसंकल्प आहे. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी एअर प्युरिफायर टॉवर उभारण्यासाठी बजेटमध्ये तरतूद आहे. मुंबईचा विकास करणे हे आमचे उद्दिष्ट अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या अर्थसकंल्पावर दिली आहे.

Last Updated : Feb 5, 2023, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.