ETV Bharat / state

Breaking News : बारावीचा गणिताचा पेपर फुटीप्रकरणी सिंदखेड राजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Mar 3, 2023, 6:50 AM IST

Updated : Mar 3, 2023, 9:24 PM IST

21:23 March 03

बारावीचा गणिताचा पेपर फुटीप्रकरणी सिंदखेड राजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

बुलढाणा - जिल्ह्यात आज बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. गटशिक्षणाधिकारी सिंदखेडराजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या विविध कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेगाव येथून एका शाळेतून हा पेपर फुटला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून तक्रारीत नमूद प्रमाणे राजेगाव हा भाग साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने सदर गुन्हा साखरखेर्डा पोलिसांकडे वर्ग करणार असल्याची माहिती सिंदखेड राजा पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी दिली आहे.

20:31 March 03

चोर मंडळामुळे विधीमंडळाची प्रतिष्ठा खालावली; संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

सातारा - चाळीस चोर ज्या पद्धतीने शिवसेनेशी बेईमानी करून पळून गेले. त्यांनी पैशाच्या जोरावर शिवसेना आणि धनुष्य बाण विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्या चोरांविषयी मी चोर मंडळ म्हटले होते. त्यांनी शिवसेना पक्ष नव्हे तर शिवसेना विधीमंडळ पक्ष फोडला. अशा चोर मंडळामुळेच विधीमंडळाची प्रतिष्ठा खालावली असल्याचा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला. ते कराडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

19:46 March 03

नवी मुंबईत बिबट्याची कातडी जप्त; दोघांना अटक

ठाणे - नवी मुंबई पोलिसांनी बिबट्याची कातडी जप्त केली आहे. प्राण्याची हत्या आणि कातडी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 28 फेब्रुवारी रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोल नाक्याजवळ एका आरोपीला पकडले. पनवेल पोलिसांच्या गुन्हे युनिट II चे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी ही माहिती दिली. त्यानंतर ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

19:42 March 03

नंदुरबार जिल्ह्यात PWD इंजिनियर ठेकेदाराकडून 3.50 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

नंदुरबार - सरकारी नोंदणीकृत कंत्राटदाराकडून प्रलंबित बिले काढण्यासाठी आणि नवीन प्रकल्प मंजूर करण्यासाठी 3.50 लाख रुपयांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) कार्यकारी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

19:24 March 03

ट्विटरने विविधरंगी टिकची संकल्पना चोरल्याचा मुंबईतील पत्रकाराचा दावा, मस्कवर केली केस

मुंबई - एका पत्रकाराने ट्विटर आणि त्याचे मालक इलॉन मस्क यांच्याविरुद्ध चक्क फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर आरोप केला आहे की त्यांनी मान्यवर व्यक्तींच्या खात्यांसाठी नवीन लेबल किंवा 'टिक' ही संकल्पना चोरली आहे. Twitter सध्या सामान्य लोकांना निळ्या रंगाची टिक देते. परंतु किंवा इतर मोठ्या व्यक्ती-संस्थांना तपकिरी टिक देते. ही मुळात संकल्पना आपली असल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार रुपेश सिंग यांनी केला आहे. त्यांनी अंधेरी येथील न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक), ४०६ (गुन्हेगारी विश्वासभंग), १२०बी (गुन्हेगारी कट) आणि कॉपीराइट कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.

19:22 March 03

नागपुरात २ कोटींहून अधिक किमतीच्या मेफेड्रोन ड्रग्जसह दोघांना अटक

नागपूर - शहरात २ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी सेलने (ANC) गुरुवारी रात्री सोनेगाव येथील मेट्रो रेल्वे स्थानकावरून आरोपीला पकडले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. एएनसीच्या पथकाने या दोघांकडून 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 2 किलो मेफेड्रोन आणि तीन मोबाईल फोन आणि 5,000 रुपयांची रोकड जप्त केली, असे ते म्हणाले.

18:58 March 03

मुंबई उच्च न्यायालयाच्या 4 अतिरिक्त न्यायाधीशांची न्यायमूर्तीपदी नियु्क्ती

मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश राजेश नारायणदास लड्ढा, संजय गणपतराव मेहरे, गोविंदा आनंदा सानप, शिवकुमार गणपतराव डिगे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

18:35 March 03

बजोरियांचा व्हिपसंदर्भातील निर्णय कोणत्या बैठकीत झाला, नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटाला सवाल

मुंबई - विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या कार्यालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विप्लव बाजोरिया यांची वरिष्ठ सभागृहात शिवसेनेचा व्हिप म्हणून नियुक्ती करण्याच्या मागणीच्या पत्रासंदर्भात अधिक तपशील मागितला आहे. ठाकरे गटाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. राज्य विधिमंडळातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ठाकरे गटाने यापूर्वीच विलास पोतनीस यांची पक्षाचा व्हिप म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्र पाठवून विप्लव बाजोरिया यांची पक्षाचा व्हीप म्हणून नियुक्ती करण्याची विनंती केली. तेव्हा हा निर्णय कोणत्या बैठकीत घेण्यात आला याची माहिती प्रशासनाला हवी आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे गोर्‍हे ह्या ज्येष्ठ आमदार ठाकरे गटाचा भाग आहेत. तसेच सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिंदे गटाकडे सध्या विधानपरिषदेत बहुमत नाही.

18:04 March 03

रुग्णवाहिका बंद पडल्याने शिवसेना माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे डोंबिवलीत निधन

ठाणे : शिवसेनेचे परळ लालबाग विधानसभा मतदार संघातील माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे शुक्रवारी डोंबिवलीत निधन झाले. देसाई यांच्यावर डोंबिवली पूर्वेकडील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णलयाने देसाई यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास कुटुंबियांना सांगितले. मात्र दुसऱ्या रुग्णालयातून देसाई यांना घेऊन जात असताना रुग्णवाहिका बंद पडली. रुग्णवाहिका बंद पडल्याने देसाई यांना रुग्णवाहिकेतून दुसऱ्या खाजगी रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका ढकल्याची वेळ कुटुंबीयांवर आली होती. त्यातच रुग्णवाहिकेच्या प्रवासातच माजी आमदार सूर्यकांत देसाई यांनी शेवटचा श्वास घेतला.

17:43 March 03

लातूरमध्ये लवकरच 120 वंदे भारत गाड्या होणार तयार, अधिकाऱ्यांची माहिती

लातूर - येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या मुख्य भागासह 200 प्रगत वंदे भारत गाड्या बनविण्याच्या योजनेने निर्णायक पाऊल उचलले आहे. सर्वात कमी आणि दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात कमी बोलीदारांची 58000 कोटी रुपयांमध्ये निवड करण्यात आली आहे. याची माहिती एका अधिकाऱ्या दिली.

17:38 March 03

मोदींना लता मंगेशकर पुरस्कार दिल्यानेच संगीत विद्यालयाची परवानगी केली होती रद्द - शेलार यांचा गौप्यस्फोट

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला स्व. लता मंगेशकर पुरस्कार दिला. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालयाची दिलेली परवानगी रद्द केली होती. विधानसभेत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ही धक्कादायक माहिती आज उघड केली.

17:28 March 03

वाहनचोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, सुमारे 5 कोटी रुपयांची 53 चोरीची वाहने जप्त

ठाणे - मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांनी राजस्थानमधून दोन चालकांना अटक केल्यानंतर त्यांनी 4.75 कोटी रुपयांची 53 चोरीची वाहने जप्त केली आहेत. फारुके तय्यब खान (३६) आणि मुबीन हॅरिस खान (४०) या दोघांना वाहन चोरीच्या काही तक्रारींवरून जानेवारी महिन्यात अलवर येथून अटक करण्यात आली होती, असे MBVV आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले.

17:04 March 03

धनंजय मुंडे यांनी कांद्यावरुन सभागृहात सरकारला सुनावले खडे बोल

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी कांद्यावरुन सभागृहात सरकारला सुनावले. ते म्हणाले की, राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शेतकरी संकटात आहे. कांद्याचा प्रश्न पेटल्यानंतर नाफेडने खरेदी सुरू केल्याचे सरकार सांगत आहे. रब्बी हंगामातील रांगडा कांदा खरेदी करण्याची सुरुवात नाफेडने दोनच दिवसापूर्वी केली असल्याचे स्वतःहून जाहीर केले. त्यामुळे हे सरकार कांदा उत्पादन शेतकऱ्यांची चेस्टा करत असल्याचे ते म्हणाले.

15:54 March 03

महाराष्ट्र सरकारच्या बोधचिन्ह, घोषवाक्यात बदल - अंबादास दानवेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

मुंबई - राज्य सरकारचे प्रतीक असलेल्या बोधचिन्हाऐवजी मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवरील सरकारचे बोधचिन्ह, घोषवाक्यात बदल करण्यात आला असल्याकडे आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तातडीच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. पूर्वी सरकारचे बोधचिन्ह नंदादीप व बाजूला कमळ असे होते. ते काढून मंत्रालयाची इमारत ठेवण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुद्रेवर हे बोधचिन्ह होते. मात्र घोषवाक्य बदलण्याचे कारण काय असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.

15:43 March 03

बुलडाणा जिल्ह्यात बारावीच्या पेपरफुटीवर विधानसभेत चर्चा, कारवाईची मागणी

मुंबई - बुलडाणा जिल्ह्यात इयत्ता 12वीच्या गणिताच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणावर विधानसभेतही चर्चा झालीी. आणि यामागे असलेल्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली.

15:39 March 03

मुंबईत 2022 मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये 70 टक्क्यांनी वाढ - फडणवीस

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईत 2022 मध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2022 पर्यंत एका वर्षाच्या कालावधीत मुंबईत सायबर फसवणुकीची किमान 4,286 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, असे फडणवीस यांनी राज्य विधान परिषदेत आमदार भाई गिरकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

14:52 March 03

जगाला हेवा वाटेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणार - मुख्यमंत्री

मुंबई - जगाला हेवा वाटेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील उद्योग कोणामुळे बाहेर गेले हे उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले, असे ते म्हणाले. दिवाळीप्रमाणेच आनंदाचा शिधा सर्वसामान्य जनतेला देणार असेही ते म्हणाले. पाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शिधा वितरण केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. महामार्गाच्या दोन्ही बाजूला पंचतारांकित शौचालयांची उभारणी करणार आहे. शौचालय उभारणीसाठी काम सुरू केले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. ते विधानसभेत बोलत होते.

14:43 March 03

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

नव दिल्ली - यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना तापामुळे दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे रुग्णालयाने सांगितले. त्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. त्यांची तपासणी सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉ डी एस राणा यांनी स्पष्ट केले.

14:25 March 03

देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात - आदित्य ठाकरे

मुंबई - जगभरातील प्रत्येकाला आज माहीत आहे की आपल्या देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. राहुल गांधींचा फोन टॅप झाला की नाही माहीत नाही, पण जे खरे बोलतात, त्यांचा आवाज केंद्रिय तपास संस्था वापरून दाबला जातो, असा घणाघात आ. आदित्य ठाकरे यांनी केला.

14:18 March 03

आम्ही केलेले चांगले काम विरोधकांना दिसणार नाही - मुख्यमंत्री

मुंबई - राज्यपाल अभिभाषण चर्चेवरील ठरावाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर. आम्ही केलेले चांगले काम विरोधकांना दिसणार नाही. त्यांना केवळ विरोधच करायचा आहे. मुंबई ट्रान्स हार्बर शिवडी नावाशेवा लिंक रोड, 22 किलोमीटरचा महत्त्वाचा रस्ता अशी कामे केली आहेत. देशातील सर्वात पहिला सागरी मार्ग होत आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प प्रवासाचा वेळ अर्धा तासाने वाचणार आहे.

14:00 March 03

गृहमंत्री फडणवीस कुचकामी ठरत आहेत का, संदीप देशपांडेंवरील हल्ल्याच्या निमित्ताने सुषमा अंधारेंचा सवाल

अकोला - गृहमंत्री फडणवीस कुचकामी ठरत आहेत का, असा सवाल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की जर अशाप्रकारे मुंबई शहरात एखाद्या नेत्यावर हल्ला होत असेल, तर ते राज्याच्या गृहमंत्रालयाचे अपयश आहे.

13:56 March 03

बारावीचा पेपर फुटी प्रकार हा गंभीर आहे-सत्यजित तांबे

बुलढण्यामध्ये बारावीचा पेपर फुटी प्रकार झाला तो गंभीर आहे. शासनाने चौकशी करावी. सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन काम केलं पाहिजे, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे.

12:56 March 03

झेलेन्स्कींच्या आडमुठेपणामुळेच युद्धविरामात अडचण - रशिया

नवी दिल्ली - रशिया युक्रेन युद्धात युक्रेनच्या आडमुठेपणामुळे वाटाघाडी होत नाहीत अशी प्रतिक्रिया रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केली आहे. प्रत्येकजण विचारत आहे की रशिया कधी वाटाघाटी करण्यास तयार आहे का. मात्र झेलेन्स्की कधी वाटाघाटी करणार आहेत हे कोणीही विचारत नाही. गेल्यावर्षी, झेलेन्स्की यांनी एका दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आहे, त्यानुसार जोपर्यंत पुतिन अध्यक्ष आहेत तोपर्यंत रशियाशी वाटाघाटी करणे हा फौजदारी गुन्हा ठरणार आहे. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांना तुम्ही कधी विचारणार असा सवाल रशियाचे परराष्ट्रमंत्री लावरोव्ह यांनी केला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

12:39 March 03

ठाण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली - जितेंद्र आव्हाड

मुंबई - पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याने त्याचा आवाज आ. जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत उठवला. पोलिसांनी दीपक भिंगारेदिवे या इसमाला केलेल्या मारहाणी त्याचा मृत्यू झाला. गेल्या चार दिवसात ठाण्यात हल्ला झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ठाण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. ठाण्यातील बार पहाटे सहा वाजेपर्यंत सुरू राहतात असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला. येऊरच्या जंगलात परवानगी नसताना बार सुरू असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

12:35 March 03

पोलीस भरती शारीरिक चाचणी भर उन्हात घेऊ नये - अजित पवार यांची मागणी

मुंबई - विधानसभेत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी औचित्य मुद्दा उपस्थित करुन पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना दिलासा देण्याची मागणी केली. पोलीस भरतीत उमेदवारांना त्रास होतो. त्यामुळे पोलीस भरती चाचणी भर उन्हात घेऊ नये अशी मागणी अजित पवारांनी विधानसभेत केली. पहाटे पाच ते दहा वाजेपर्यंत आणि दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत उमेदवारांची शारीरिक चाचणी घ्यावी असे ते म्हणाले.

12:29 March 03

परीक्षेला जाताना मुलांची गॅस टँकरला जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू

नाशिक - दहावीच्या पहिल्याच पेपरला दोन जिवलग मित्र दुचाकीवरून जात असताना गॅस टँकरशी त्यांची समोरासमोर धडक होऊन दुचाकी टँकरखाली दबली गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना सिन्नर-घोटी महामार्गावरील शताब्दी इंग्लिश स्कूल समोर घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

12:13 March 03

अंगणवाडी सेविकांना सरकारने 20 टक्के पगार वाढ दिली - मंत्री लोढा

मुंबई - मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अंगणवाडी सेविकांच्यासाठी केलेल्या भरीव कामांचा पाढाच आज विधानसभेत वाचला. अंगणवाडी सेविकांना सरकारने 20 टक्के पगार वाढ दिली. दीडशे कोटी रुपये ग्रॅज्युटी दिली. अंगणवाडीच्या वीज देयकांसाठी पंधरा कोटी रुपये दिले. अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल आता पुन्हा सुरू. मोबाईलद्वारे भरण्यात येणारे अर्ज पूर्णतः मराठीत असावा यासाठी केंद्राकडे विनंती. महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली सभागृहात माहिती. गेल्या सरकारने एकही बैठक घेतली नाही मंगल प्रभात लोढा यांचा दावा. मंगल प्रभात लोढा यांच्या उत्तरांनी समाधान न झाल्याने विरोधकांनी केला सभात्याग.

12:11 March 03

संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित कट - नितेश राणे

मुंबई - संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला म्हणजे पूर्वनियोजित कट. या हल्ल्यात जखमी झालेल्या देशपांडे यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यांचा परिणाम. गुंडांनी काही नावे घेतल्याचा नितेश राणे यांचा दावा. वरून सरदेसाई यांचा या प्रकरणात हात आहे का चौकशी करण्याची केली सभागृहात मागणी.

12:07 March 03

वसईत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये वडिलांवर लैंगिक शोषणाचे आरोप

पालघर - वसई तालुक्यात एका 14 वर्षीय मुलीने तिच्या घरी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली आहे. त्यामध्ये तिने तिच्या वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

12:00 March 03

नागपूर गुन्हे शाखेने केले १ किलो ९११ ग्रॅम MD ड्रग्स जप्त

नागपूर - नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. एका आरोपीकडून १ किलो ९११ ग्राम मेफेड्रोन (MD) ड्रग्स जप्त. जप्त ड्रग्सची किंमत अंदाजे 1 कोटी 91 लाख 10 हजार रुपये. 3 मोबाईलही केले जप्त. रोख रक्कम 5000 रुपये असा एकूण 1 कोटी 91 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. रात्री उशिरा माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन सोनेगाव हद्दीत एअरपोर्ट स्टेशनजवळ झाली कारवाई.

11:59 March 03

नागपुरात प्रसिद्ध व्यापारी रामदेव अग्रवाल यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

नागपूर - प्रसिद्ध व्यापारी रामदेव अग्रवालच्या निवासस्थानी ईडीचा छापा. रामदासपेठ येथील गौरी हाईट्स येथे इडीचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल. रामदेव अग्रवाल यांच्या निवासस्थानी कागदपत्रे तपासली जात आहेत. रामदेव अग्रवाल यांच्या शहरात मोक्याच्या ठिकाणी इमारती आहेत.

11:57 March 03

उड्डाणपूल पाडण्याच्या कामामुळे कराडजवळ महामार्गावर वाहनांच्या सात किलोमीटर पर्यंत रांगा

सातारा - पुणे-बंगळुरू महामार्गावरील मलकापूर (कराड) येथील उड्डाणपूल पाडण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामुळे महामार्गावर पुणे आणि कोल्हापूर बाजूकडे वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे नाेकरदार, विद्यार्थ्यांचे माेठे हाल झाले. पुणे आणि कोल्हापूर बाजूकडील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

11:53 March 03

हक्क भंग समितीची दुपारी साडेबारा वाजता बैठक, राउतांच्या वक्तव्यावर होणार खल

मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे अर्थसंकल्पी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनी गदारोळ केला होता. त्यांच्या वक्तव्याविरोधात हक्क भंग आणण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर हक्क भंग कारवाई चालवण्यासाठी हक्क भंग समितीची निर्मिती देखील करण्यात आली. समितीची आज पहिली बैठक दुपारी साडेबारा वाजता विधान भवनात होणार आहे. या बैठकीत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर चर्चा केली जाईल. या सर्वांची चर्चा आज होणाऱ्या पहिल्या हक्कभंग समितीच्या बैठकीत होईल अशी माहिती हक्कभंग समितीचे सदस्य आणि भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी दिली आहे.

11:24 March 03

33 वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या झोपडीत आढळला..

ठाणे शहरातील कळवा येथे एका 33 वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या झोपडीत आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. कमलीबाई पवार असे मृत महिलेचे नाव असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

11:22 March 03

14 वर्षीय मुलीची आत्महत्या, वडिलांवर केला गंभीर आरोप

पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात एका 14 वर्षीय मुलीने तिच्या घरी आत्महत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे आणि पोलिसांनी एक "सुसाईड नोट" जप्त केली आहे. त्यामध्ये तिने तिच्या वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

11:21 March 03

नायजेरियन नागरिकाला अटक, 58.74 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त

पालघर जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांनी नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 58.74 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

11:19 March 03

विधानसभेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक, संजय राऊत यांच्यावर कारवाई होणार?

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक होणार आहे. बैठकीत संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंगाच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

11:07 March 03

संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून कारवाई करा-आमदार सरवणकर

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याबाबत शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

10:46 March 03

नागपूरचे प्रसिद्ध व्यापारी रामदेव अग्रवाल यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

नागपूरचे प्रसिद्ध व्यापारी रामदेव अग्रवाल यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. रामदासपेठ येथील गौरी हाईट्स येथे इडीचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. रामदेव अग्रवाल यांच्या निवासस्थानी कागदपत्रे तपासले जात आहेत.रामदेव अग्रवाल यांचे शहरात मोक्याच्या ठिकाणी इमारती आहेत

10:02 March 03

कसब्यामुळे भाजपची झोप उडाली-खासदार संजय राऊत

शरद पवारांनी नाराजी केली नाही. तर भूमिका मांडली आहे. कसब्यामुळे भाजपची झोप उडाल्याची सांगत खासदार संजय राऊत यांनी भाजपची खिल्ली उडविली आहे.

08:24 March 03

माझ्या फोनमध्ये पेगासस होता-राहुल गांधींचा गौप्यस्फोट

मोठ्या संख्येने राजकीय नेत्यांच्या फोनमध्ये पेगासस आहे. माझ्या फोनमध्ये पेगासस होता. मला गुप्तचर अधिकार्‍यांनी बोलावले होते. कृपया तुम्ही फोनवर काय बोलता याची काळजी घ्या. कारण आम्ही सामग्री रेकॉर्ड करत आहोत, असे केंब्रिज विद्यापीठात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

08:18 March 03

भाजप आमदार मादल विरुपक्षप्पा यांच्या मुलाच्या कार्यालयातून १.७ कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त

लोकायुक्तांच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने काल भाजप आमदार मादल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मादल याला ४० लाखांची लाच घेताना अटक केली. त्याच्या कार्यालयातून 1.7 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त करण्यात आले. प्रशांत मादल हे बंगळुरूमध्ये मुख्य लेखापाल आहेत.

08:02 March 03

सेलिब्रिटींची माहिती घेऊन ५० लाखांची फसवणूक, दिल्ली पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

दिल्ली पोलिसांनी महेंद्र सिंह धोनी, अभिषेक बच्चन, सोनम कपूर, सचिन तेंडुलकर, सैफ अली खान, हृतिक रोशन, आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी आणि इतर यांसारख्या सेलिब्रिटींच्या तपशीलांचा वापर करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने 50 लाखांहून रकमेची बँकांची फसवणूक केली आहे.

07:52 March 03

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला, हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. जखमी झालेल्या देशपांडे यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

07:02 March 03

शाहरुख खानच्या मन्नत निवासस्थानात घुसखोरी करणाऱ्या दोघांना अटक

शाहरुख खानच्या मन्नत निवासस्थानात घुसखोरी केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्याच्या सुरक्षा रक्षकाने दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीदरम्यान, त्यांनी सांगितले की ते गुजरातमधून अभिनेत्याला भेटण्यासाठी आले होते.

07:01 March 03

मेघालयात निकालानंतर राजकीय वातावरण तापले, सहस्नियांग गावात संचारबंदी लागू

मेघालयात निवडणुकीच्या निकालानंतर वातावरण तापले आहे. मतमोजणीनंतरच्या हिंसाचारानंतर पश्चिम जैंतिया हिल्सच्या जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत सहस्नियांग गावात संचारबंदी लागू केली आहे.

06:35 March 03

Maharashtra Breaking News : बस आणि टेम्पोची धडक होऊन टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

मुंबई : बस आणि टेम्पोची धडक होऊन टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. बसमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी दिली.

Last Updated : Mar 3, 2023, 9:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.