ETV Bharat / state

Breaking : शुद्धीकरणाचा प्रकार शिवसेनेला शोभनीय नाही, रामदास आठवले

big breaking
बिग ब्रेकिंग
author img

By

Published : Aug 20, 2021, 9:16 AM IST

Updated : Aug 20, 2021, 8:01 PM IST

20:00 August 20

जन आशीर्वाद यात्रा : विविध 'बारा' पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हे दाखल

ठाणे - करोना महामारीची दुसरी लाट ओसरली नसून सर्वाना नियमाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करीत कारवाई केली जाते आहे. त्यातच भाजपाने ठाणे जिल्ह्यात १६ ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रा काढून नागरिकांची गर्दी जमविल्याने कोरोना नियम पायदळी तुडवले. त्यामुळे १६ ते २० ऑगस्टपर्यत ठाणे जिल्हाभरातील वेगवेगळ्या बारा पोलीस ठाण्यात दोन डझनभराच्यावर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. 

19:02 August 20

नारायण राणे हे डॅशिंग नेते - रामदास आठवले

नाशिक - नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले नेते असून त्यामुळे ते आजही डॅशिंग आहेत. नारायण राणेंनी आपल्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यानंतर शिवसैनिकांनी याठिकाणी केलेले शुद्धीकरण म्हणजे खरेच अशुद्धी असून हा प्रकार शिवसेनेला शोभनीय नसल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

18:58 August 20

त्यांच्या बोलण्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही; राज ठाकरे यांचे नाव न घेता अजित पवारांची टीका

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, की ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला माहीत आहे. काही लोक कधी वेगळे काही बोलून जातात. त्यांच्या बोलण्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असे म्हणत अजित पवारांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता उत्तर दिले.

17:37 August 20

राज्यातील कुचकामी सरकार कसे लवकर जाईल यासाठी कामाला लागा - नारायण राणे

मुंबई - महाराष्ट्र हे देशात प्रगत असे राज्य आहे. मात्र राज्यात कुचकामी सरकार असल्याने गेल्या दोन वर्षात राज्य अधोगतीकडे चालले आहे. यासाठी राज्यातील कुचकामी सरकार कसे जाईल यासाठी कामाला लागा, अशा सूचना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केल्या. तसेच मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी महापालिका निवडणुकीत भाजपाला भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन राणे यांनी मुंबईकरांना केले.

15:07 August 20

चार काय चाळीस नवीन मंत्री झाले तरी शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही - उदय सामंत

रत्नागिरी - शिवसेना मुंबईत पाय रोवून उभी आहे. शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. चार काय चाळीस नवीन मंत्री झाले तरी शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही. शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणारच, अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज रत्नागिरीतील हातखंबा इथे तरुणांच्या लसीकरण कार्यक्रमात बोलत होते.

14:59 August 20

बुलडाण्याच्या समृद्धी महामार्गाच्या कामावरील अपघातात 13 मजूर ठार 3 जखमी

बुलडाणा - समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ड्युएल बार घेऊन जाणाऱ्या टिप्परला सिंदखेडराजा तालुक्यातील तळेगाव-दुसरबीडच्या मध्ये सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कॅम्पजवळ भीषण अपघात झाला आहे. या टिप्परमध्ये बसलेले मजूर ड्युएल बारखाली दबले आहेत, अशी माहिती मिळत आहे. यात 13 मजुरांचा मृत्यू झाला असून 3 मजूर जखमी झाले आहेत. 

13:18 August 20

गोवा - शिवोली म्हापसा येथे दोन परदेशी तरुणींचा मृत्यू

  • 24 वर्षीय तरुणी अलेक्झांन्द्र (alexandra) आपल्या प्रियकरासोबत मोरजी येथे राहत होती
  • 34 वर्षीय तरुणी मृतावस्थेत आढळून आली
  • दोन्ही तरुणी रशियन
  • लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकून पडल्या होत्या
  • याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत

13:01 August 20

किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगड व शाई फेक -

वाशिम - शिवसेना खासदार भावना गवळी  यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आज भाजप नेते किरीट सोमय्या याची पाहणी करण्याकरिता याठिकाणी येणार होते. मात्र, भावना गवळी यांचे समर्थक किरीट सोमय्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. यामुळे ते याठिकाणी न थांबताच निघून गेले. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता लाठीचार्ज करावा लागला.

13:00 August 20

मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम :

वाशिम - जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात असलेले आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रातून केल्यानंतर वाशिम दौऱ्यावर असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या पुलाची पाहणी केली.

12:04 August 20

मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न :

मुंबई - मंत्रालयाच्या गेटवर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

  • पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात केले दाखल; विष पिण्याचे कारण अस्पष्ट

11:55 August 20

किरीट सोमय्या वाशिम दौरा :

रिसोड तालुक्यातील देगाव येथील खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या ताब्यात असलेला बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड या कारखान्यावर 100 कोटी रुपये भ्रष्ट्राचाराचा  आरोप झाला आहे. यानंतर आज भाजप नेते किरीट सोमय्या आज वाशिम दौऱ्यावर आहेत. 

दरम्यान, किरीट सोमय्या देगाव येथील बालाजी पार्टीकल बोर्ड भेट देणार असल्याने रिसोड मालेगाव-रोडवर खासदार समर्थकांनी रास्ता रोको करत किरीट सोमय्यांच्या विरोधात प्रचंड घोषणा देत निषेध केला.

11:47 August 20

सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री बैठक :

मुंबई - देशातील मुख्य विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. या बैठकीत पेगासस, महागाई यांसारख्या अनेक विषयावर चर्चा होणार आहे. बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, झारखंड,  केरळ, छत्तीसगढचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहे. आज चार वाजता ही बैठक आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.  

10:30 August 20

अफगाणिस्तान संकट :

पंढरपूर - अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी वर्चस्व मिळवल्यानंतर त्याचा थेट परिणाम सोलापूर जिल्ह्यातील केळी निर्यातीवर झाला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानात होणारी 15 कन्टेनर केळी निर्यातीचे करार रद्द केले आहेत. याचा आर्थिक फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

08:57 August 20

गोव्यात दोन परदेशी तरुणींचा मृत्यू,

नागपूर - सुरक्षेच्या कारणावरून नागपुरातील गँगस्टर संतोष आंबेकरसह त्याच्या टोळीतील पाच सदस्यांची राज्याच्या विविध कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. यामध्ये संतोष आंबेकरचा भाचा निलेश केदारचा सुद्धा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कारागृहात टोळीयुद्ध, आणि हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. संतोष आंबेकरची नाशिकच्या कारागृह तर त्याच्या भाच्याची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Last Updated : Aug 20, 2021, 8:01 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

BREAKING
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.