ETV Bharat / state

अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात? विखे पाटील यांच्यासह राजळे, जगताप, लंघे, खताळ, काळे मंत्रिपदाच्या रेसमध्ये - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीच्या आमदारांना आता मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात १२ पैकी १० ठिकाणी महायुती वरचढ ठरल्यानं अनेकजण रांगेत आहेत.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2024, 3:17 PM IST

अहिल्यानगर - सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 12 जागांपैकी 10 जागांवर महायुतीनं घवघवीत यश संपादन केलं. जिल्ह्यात विखे पाटील पॅटर्न काय असतो हे केंद्रासह राज्यातील जनतेला दाखवून दिलं.

महायुती सरकारमध्ये आता अहिल्यानगर जिल्ह्यात विखे पाटील यांच्या व्यतिरिक्त मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता लागली आहे. शपथ विधी सोहळ्याकडे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचं लक्ष लागलं आहे. सहकाराची पाळंमुळं रुजलेल्या या अहिल्यानगर जिल्ह्यात साखर कारखानदारांची संख्या मोठी आहे. बहुतांश ठिकाणच्या मतदारसंघात साखर कारखानदारीवरच प्रस्थापित उमेदवारांचं राजकीय अस्तित्व आजतागायत टिकून आहे.

आता झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी याउलट चित्र दिसून आलं. प्रस्तापित 'साखर सम्राटांना' पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये विशेषतः संगमनेर मतदार संघात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नेवासा येथे शंकरराव गडाख, राहुरी येथे प्राजक्त तनपुरे, तर शेवगावमध्ये माजी आ. चंद्रशेखर घुले आदींचा समावेश आहे. तर कर्जत जामखेडमध्ये भाजपाचे राम शिंदे यांचाही निसटत्या मतांनी पराभव झाला.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभेला झालेल्या पराभवाचा वचपा विधानसभेला भरुन काढला आहे. मागील अडीच वर्षाच्या महायुतीच्या कार्यकाळात जिल्ह्यात एकच मंत्रिपद होतं. आता जिल्ह्यात भाजपाचे शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील, राहुरीमध्ये शिवाजी कर्डीले, श्रीगोंदा येथे विक्रम पाचपुते, शेवगावमध्ये मोनिका राजळे असे चार आमदार असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कोपरगावात आशुतोष काळे, अकोलेमध्ये डॉ. किरण लहामटे, नगरमध्ये संग्राम जगताप, पारनेरमध्ये काशिनाथ दाते असे चार आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे संगमनेरमध्ये अमोल खताळ तर नेवासा येथे विठ्ठल लंघे आहेत. असे एकूण दहा आमदार आहेत.

आता तीनही पक्षातील पक्षश्रेष्ठी जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यासाठी मंत्रिपदाची माळ नेमकी कोणत्या आमदाराच्या गळ्यात टाकतात हे लवकरच समजणार आहे. असे असले तरी देखील शिर्डी, संगमनेर, नेवासा आणि पारनेर येथील उमेदवार निवडून आणण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा महसूल खाते की उपमुख्यमंत्रिपद मिळणार याबाबत जिल्ह्यात तर्क लढवले जात आहेत.

आठवेळा आमदार झालेले मंत्री विखे पाटील यांच्या व्यतिरिक्त शेवगाव पाथर्डी मतदार संघात तीन टर्म आमदारकी मिळालेल्या मोनिका राजळे, तसंच नगर शहरात तिसऱ्यांदा आमदार झालेले संग्राम जगताप, नेवासा येथील शिंदे शिवसेनेचे विठ्ठल लंघे किंवा संगमनेर मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार खताळ, कोपरगाव येथील आशुतोष काळे यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा..

  1. पुणे जिल्ह्याला तीन कॅबिनेट अन् दोन राज्यमंत्री मिळण्याची शक्यता
  2. मुख्यमंत्री पदासाठी दबाव वाढला ? एकनाथ शिंदे की देवा भाऊ? अमित शाह करणार मध्यस्थी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.