ETV Bharat / state

Kharghar Heatstroke Deaths: खारघर श्री सदस्यांचा मृत्यू कशामुळे झाला? शवविच्छेदनाच्या अहवालात धक्कादायक माहिती!

author img

By

Published : Apr 21, 2023, 7:54 AM IST

Updated : Apr 21, 2023, 9:46 AM IST

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात उष्माघातामुळे १४ जणांचा बळी गेला. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. याच दरम्यान मृत्यू झालेल्या १४ जणांचा पोस्ट मोर्टम रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये दुर्घटनेत मृत्यू झालेल्या १४ पैकी १२ जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाल्लेलं नव्हते, त्यांच्या पोटात अन्न नव्हते, असे पोस्ट मॉर्टम अहवालात स्पष्ट झाले आहे.

Kharghar Heatstroke Deaths
श्री सदस्यांच्या मृत्यूचे कारण आले समोर
खारघर येथील १४ जणांचा पोस्ट मोर्टम रिपोर्ट समोर आला आहे

नवी मुंबई: नवी मुंबईतील खारघर सेंट्रल पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मृत्यू झालेल्या श्री सदस्यांचे पोस्ट मोर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये 14 पैकी 12 श्री सदस्यांचा मृत्यू सात ते आठ तास उपाशी राहिल्यामुळे झाला आहे. तर कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याचेही व्हिडिओ समोर आला आहे. खारघर परिसरात महाराष्ट्र भूषण सोहळ्यात 14 श्री सदस्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. या लोकांचा मृत्यू उष्माघाताने झाला असा दावा राज्य शासनाने केला होता. मात्र या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे नक्की उष्माघाताने की चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला ही प्रश्न समोर उभा आहे.

काहीही न खाल्ल्याने मृत्यू: महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या 14 पैकी 12 जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाल्ले नव्हते, असे पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित दोन जणांनी काही खाल्ले होते की नाही ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्याचबरोबर यातील काही श्रीसदस्यांना अगोदरपासून विविध व्याधी होत्या. त्यातच वेळेवर न खाणे आणि अतिउष्ण वातावरण याची भर पडली, त्यामुळे मृत्यू झाला आहे.

रुग्णालयात दाखल 18 रुग्णाना डिस्चार्ज: महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी आलेल्या श्री सदस्यांना अचानक निर्जलीकरण झाल्यानंतर उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे रुग्णांना खारघर परिसरात व जवळपास असणाऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात एकूण 21 रुग्ण आले होते. त्यापैकी एका महिला रुग्ण यांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. मात्र इतर वीस रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तर 18 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच दोन रुग्णांची प्रकृती सुधारत आहे.

समितीवर प्रश्नचिन्ह? - सरकारने ही एक सदस्य समिती नेमून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असला, तरी सुद्धा या समितीवरूनच विरोधक आक्षेप घेणार यामध्ये दुमत नाही. इतक्या मोठ्या प्रकरणाची चौकशी एक सदस्य समिती कशी करू शकते? हा सुद्धा प्रश्नच आहे. तसेच या प्रकरणातील तथ्य लपवण्याचा सरकार खुद्द प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना या एक सदस्य समितीवरच सरकारकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Heatstroke Death Case उष्माघात मृत्यू प्रकरण वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन

Last Updated : Apr 21, 2023, 9:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.