मुंबई: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) अर्थात भारतीय तंत्रज्ञान शिक्षण संस्था येथे अत्याधुनिक सोयीसुविधा आणि नवीन ज्ञानाची निर्मिती यासाठी देशभरातून विद्यार्थी प्रवेश घेतात. या सारख्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा दिल्यानंतरच प्रवेश मिळतो. (IIT Admission). यंदा आयआयटी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांमध्ये राजस्थान आघाडीवर आहे. राजस्थान येथून सर्वाधिक विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी बसले आहेत
प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या: राजस्थान 13,801 प्रत्यक्ष विद्यार्थी प्रवेश 2,184 याची यशाची टक्केवारी 15.8 टक्के इतकी तर उत्तर प्रदेशात विद्यार्थ्यांची नोंदणी 22,860 तर त्यापैकी प्रत्यक्ष यशाचा दर 2131 म्हणजे 9.3 टक्के इतका आणि महाराष्ट्र 16341 विद्यार्थी नोंदणी तर प्रत्यक्ष यशाचा दर 1747 म्हणजे 10.8 टक्के इतका आहे. तेलंगणा राज्यात 17891 विष्यार्थ्यांपैकी 1644 म्हणजे 9.2 टक्के विद्यार्थी प्रवेशासाठी आहेत. तर आंध्र प्रदेश या राज्यातील 14364 विद्यार्थ्यांपैकी 14428 एवढे विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेश घेतील. मध्यप्रदेश मध्ये सर्वात कमी नोंदणी झालेली आहे 8,893 इतकी तर प्रवेश परीक्षेच्या यशाचा दर या ठिकाणी 1038 म्हणजे 11.7 टक्के इतका आहे. JEE(A) साठी नोंदणी केलेल्या राजस्थानमधील सहा पैकी एक विद्यार्थी असतो. चंदीगडचा यशाचा दर 15.7 टक्के हा राजस्थानच्या 15.8 टक्के पेक्षा थोडा कमी आहे. तर नंतरच्या 2,184 विद्यार्थ्यांमध्ये मध्ये या वर्षी आयआयटी प्रवेश करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे. त्यानंतर गुजरात टक्के 13.5 टक्के पंजाब 12.9 टक्के आणि हरियाणा 12.9 टक्के आहेत.
महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर गेला हे चिंताजनक - यासंदर्भात विद्यार्थी संघटनेचे आणि पीएचडीचे शिक्षण घेणारे विकास शिंदे यांच्याशी ईटीवी भारतने संवाद साधला असता ते म्हणाले, "महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर गेलेला आहे, हे चिंताजनक आहे. एरवी आयआयटी मुंबई सर्व प्रकार मध्ये टॉप वर येत असते. मात्र एंट्रन्स एक्झाम मध्ये जे यश मिळालेले आहे त्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. अधिकाधिक सर्वसामान्य घटकातील विद्यार्थी या अशा उच्च शिक्षण संस्थांमध्ये जायला हवे असे आम्हाला वाटतं."
या मागचे कारण काय? - महाराष्ट्राचा क्रमांक का खालावला यासंदर्भात विचारले असता प्राध्यापक मधुप्रसाद दिल्ली विद्यापीठ यांनी सांगितले की, "विविध राज्यात आयआयटी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे आयआयटी मध्ये सरकारने प्रचंड प्रमाणात गुंतवणूक आणि तरतूद केली पाहिजे. आता विद्यार्थ्यांना बऱ्या प्रमाणात फी भरावी लागते. पण तरीही प्रचंड स्पर्धा आहे आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा अशी त्यांची धडपड असते. त्यामुळे प्रगतिशील म्हटले जाणारे राज्य ज्या ठिकाणी आयआयटी आहेत, त्यांनी आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लक्ष दिले पाहिजे.