ETV Bharat / state

Maharashtra Assembly Speaker Election : राज्यपालांच्या निर्णयाची वाट पहावी लागणार - नाना पटोले - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक  ( Maharashtra Assembly Speaker Election ) आता सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) पार पडणार आहे. या निवडणूकीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress President Nana Patole ) यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्ष पदाचा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्याकडे असून, त्यांनी मंजुरी दिल्यावर तात्काळ ते पद भरले जाणार आहे.

नाना पटोले
नाना पटोले
author img

By

Published : Dec 24, 2021, 4:27 PM IST

Updated : Dec 24, 2021, 4:46 PM IST

मुंबई - मुंबईत विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक ( Maharashtra Assembly Speaker Election ) पार पडणार आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress President Nana Patole ) यांनी माहिती दिली आहे.

प्रसारमाध्यमांना बोलताना नाना पटोले ( Congress President Nana Patole ) म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्या हाती असून, त्यांची मंजुरी भेटल्यावर ते पद त्वरित भरले जाईल. निवडणुकीबाबातची सर्व प्रक्रिया पूर्ण करायची होती ती पुर्ण झाली आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्याकडून आदेश आल्यावर निवडणूक घेतली जाणार आहे.

आमच्या उमेदवारावर इतरांना आक्षेप नको
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Former Cm Prithviraj Chavan ), आमदार संग्राम थोपटे ( Mla Sangram Thopate ) यांची नावं सध्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित न केल्याने राष्ट्रवादी, शिवसेना नाराज असल्याचं बोललं जात आहे, असा प्रश्न केला असता त्यावर बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, "विधानसभेचे अध्यक्षपद मजबुत माणसाकडे असायला हवं. त्यासाठी हायकमांड सांगतील तो उमेदवार निश्चित केला जाणार आहे. आमच्या उमेदवारावर शिवसेना किंवा राष्ट्रवादीला आक्षेप घ्यायची गरज नाही. कारण ते पद आमच्या वाटेला आहे त्यावर आमचाच उमेदवार बसणार," असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण
गेल्या 9 महिन्याच्या कालावधीपासून विधानसभा अध्यक्ष हे पद स्थगित आहे. याबाबत राज्यपाल आज निर्णय घेऊ शकतात. तदनंतर, 27 अथवा 28 तारखेला अध्यपदासाठी निवड केली जाईल. दरम्यान, अध्यक्षपद निवडणुकीसाठी कायद्यात बदल करून ही निवडणूक आता गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने होणार आहे. त्याविरुध्द विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे.

हेही वाचा - Corona Fresh Guidelines Maharashtra : सावधान! सरकार आज जारी करणार नवी नियमावली

Last Updated : Dec 24, 2021, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.