मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ( Maharashtra Assembly Budget Session 2022 ) दुसऱ्या दिवशी सुद्धा विरोधकांनी मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. ( Opposition protest Vidhan Bhavan ) मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधक फार आक्रमक दिसले. या दरम्यान ठाकरे सरकार विरोधात सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली. पहिल्या दिवशी विरिधकांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून धरत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली होती. ते आजही विरोधक आक्रमक दिसले.
नवाब मलिकांविराधात सह्यांची मोहीम -
या दरम्यान विधिमंडळाच्या पाऱ्यांवर एक फलक ठेवण्यात आला आहे. या फलकावर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली आहे. भाजपचे आमदार या फलकावर सह्या करत आहेत. तसेच विधिमंडळ सदस्यांसाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली आहे. भाजपचे आमदार सत्ताधारी आमदारांना या फलकावर सही करण्यासाठी आग्रह करताना दिसले. परंतु भाजप सोडून सत्ताधारी पक्षातील एकही आमदार यावर सही करायला तयार नाही.
हेही वाचा - Live updates : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022; वाचा प्रत्येक मिनिटाचे अपडेट्स