ETV Bharat / state

शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवण्यावर ठाम, गल्लीबोळातील नेत्यांचं कोण ऐकणार - संजय राऊत - Sanjay Raut today news

लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना ( ठाकरे गट) लोकसभेत २३ जागांवर ठाम असल्याचं खासदार राऊत यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी अयोध्येतील कार्यक्रमावरून राजकारण केले जात असल्याचा आरोप करत भाजपाला टोला लगावला.

Maharaashtra Politics Sanjay Raut
Maharaashtra Politics Sanjay Raut
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 12:30 PM IST

मुंबई - शिवसेनेला ( ठाकरे गट) लोकसभा निवडणुकीत २३ जागा दिल्या तर आमचं काय? असा प्रश्न काँग्रेसचे नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रीय नेत्यांबरोबर आमचं बोलणं सुरू आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. ते निर्णय घेणारे आहेत. त्यांच्याबरोबर आमचा संवाद व्यवस्थितपणे सुरू आहे. मग, आम्ही किती जागा लढणार ते किती जागा लढणार याचा निर्णय दिल्लीतील नेते घेणार आहेत. इथे गल्लीबोळातील नेते बडबड करत आहेत. त्यांची बडबड कोण ऐकणार, असा अप्रत्यक्ष टोलाही संजय राऊत यांनी काँग्रेस नेते संजय निरुपम यांना लगावला आहे.

काँग्रेसला शून्यापासून सुरुवात करायची- आम्ही नेहमी महाराष्ट्रमध्ये लोकसभेच्या २३ जागा लढत आलो आहोत. दादरा नगर हवेलीही सुद्धा एक जागा आम्ही लढवतो, या जागा कायम राहतील. यापूर्वीच आमची चर्चा झाली आहे. तेव्हा ज्या जागेवर विद्यमान खासदार निवडून आले आहेत. त्याविषयीनंतर चर्चा केली जाईल, असं ठरवलं होतं. अशा अनुषंगाने काँग्रेसची एकही जागा महाराष्ट्रामध्ये नाही. त्यामुळे काँग्रेसला शून्यापासून सुरुवात करायची आहे. तरीसुद्धा काँग्रेस महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असल्यानं राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्रित निवडणुकीला सामोरे जातील. म्हणून जागा वाटपाबाबत इतर लोक जे बडबड करतात त्यांच्यावर लक्ष द्यायची गरज नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर यांची साथ महत्त्वाची- प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीबरोबर सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांची भूमिका या देशातून हुकूमशाही नष्ट करायची अशी आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मांडत आहेत. आम्हीसुद्धा तीच भूमिका मांडत आहोत. यामध्ये मतभेद असण्याचं काही कारण नाही. या पद्धतीचं राजकारण करून प्रभू श्रीरामाला त्रास होऊन ते वनवासात जातील. असं कृत्य करू नका, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. परंतु अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे यांना आमंत्रण आले आहे की नाही? यावर संजय राऊत यांनी काही बोलण्यास नकार दिला.

राममंदिर उद्घाटनासाठी आम्ही आमंत्रणाची वाट बघत बसलेलो नाही. हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे. ती काही १५ ऑगस्टची परेड नाही आहे. अथवा २६ जानेवारीचा प्रजासत्ताक सोहळा दिन नाही. खरं म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम अयोध्येत असायला हवा होता-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

राहुल गांधी यांच्यात पंतप्रधानपदाचे गुण- मोदींच्या विरोधात संपूर्ण देश संघर्ष करत आहे. २०२४ मध्ये आम्ही परिवर्तन करून दाखविणार आहोत. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, ही इच्छा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली असेल तर त्यामध्ये चुकीचं काय आहे? भारत जोडो यात्रेने देशात लोकांना एकत्र आणण्याचे काम राहुल गांधी यांनी केलं. राहुल गांधी संघर्ष करणारे नेते आहेत. लोकांना संघर्ष आवडतो. ते सत्य बोलणारे आणि प्रामाणिक नेते आहेत. ते जर पंतप्रधान पदाचा चेहरा असतील तर त्यात गैर काय आहे? असेही संजय राऊत म्हणाले आहेत. परंतु इंडिया आघाडीमध्ये आम्हाला सर्वांना एकत्र येऊन काम करायचं आहे. या आघाडीचा चेहरा कोण असेल हे आम्ही सर्व एकत्र येऊन ठरवू.

कमळा बाईच्या पदराखाली जावेच लागेल- शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवावे लागेल. त्यांना कमळा बाईच्या पदराखाली जावेच लागेल. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. आमची शिवसेना खरी आहे, हे सर्व नौटंकी आहे. याची स्क्रीप्ट दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लिहून दिली आहे. परंतु जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा सिनेमा पूर्णपणे कोसळेल. त्यांचे स्वाभिमान आणि हिंदुत्व हे सर्व शब्द खोटे असून त्यांना कमळाबरोबरच जावे लागेल. अजित पवार गट असेल किंवा एकनाथ मिंधे गट असेल त्यांना भारतीय जनता पक्षाच्या चरणाजवळ बसल्याशिवाय पर्याय नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

पवार-अदानी भेटीवर राजकारण नको- उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, गौतम अदानी हा कळीचा मुद्दा नाही आहे. धारावी प्रकल्पातील ज्या अटी व शर्ती आहेत त्याला आमचा विरोध आहे. कोण कोणाला भेटते याच्यावर महाविकास आघाडीचं भविष्य नाही आहे. शरद पवार व गौतम अदानी यांचे फार जुने संबंध आहेत. ते सामाजिक, कौटुंबिक, विकासाच्या दृष्टीनं संबंध असू शकतात. ते काही पहिल्यांदा भेटले नाहीत अनेक वर्षापासून भेटत आहेत. म्हणून त्यावर राजकारण करण्याची गरज नसल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा-

  1. ब्रिटीश काळात भाजपा होती का? मंत्री गिरीश महाजनांचा संजय राऊतांना सवाल
  2. अयोध्येत पापी लोकांना बोलावलं नाही; नितेश राणे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.