ETV Bharat / state

आदर्श विद्यार्थी ते घटनातज्ज्ञ, पत्रकारिता ते अर्थकारण क्षेत्रात चौफेर संचार! डॉ. बाबासाहेबांचे 'असे' होते अष्टपैलू व्यक्तिमत्व - बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन

Mahaparinirvan Diwas 2023 : दलितांचे कैवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 ला महापरिनिर्वाण झालं. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यास मुंबईतील चैत्यभूमीवर लाखो नागरिक गर्दी करतात. जाणून घेऊ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाविषयी!

Mahaparinirvan Diwas 2023
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 10:20 AM IST

मुंबई Mahaparinirvan Diwas 2023 : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन आहे. ज्ञानाच्या या अथांग महासागरास अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आज जनसागर लोटला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजकारण, राजकारण, कायदा, पत्रकारिता अशा सगळ्याच क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यामुळे गोरगरीब जनता आणि तरुणांचे ते दीपस्तंभ ठरले आहेत. आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे, त्यानिमित्त जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू इथं झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सकपाळ हे सैन्यात सुभेदार होते. त्यामुळे त्यांनी इंग्रजी सैन्याची वसाहत असलेल्या महू इथल्या छावणीत आपली सेवा बजावली. तिथचं भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. त्यांचं गाव रत्नागिरीमधील आंबडवे असं होतं. मात्र रामजी संकपाळ यांनी साताऱ्यात त्यांना शाळेत पाठविलं. शाळेतील शिक्षकांनी गावाच्या नावावरुन त्यांचं नाव भीमराव रामजी आंबडवे असं नाव दिलं. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी आपलं आंबेडकर नाव त्यांना दिलं.

बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू इथल्या सैनिकी छावणीत झाला, मात्र त्यांचं शिक्षण सातारा इथल्या शाळेत पार पडलं. रामजी संकपाळ यांनी छोट्या भिमरावांना सातारा इथल्या हास्कूलमध्ये शिकण्यासाठी पाठवलं. तिथचं त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर त्यांचं काही शिक्षण मुंबईतही झालं. महाराष्ट्राच्या या थोर सुपुत्रानं त्यानंतर मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स आदी जगातील नामांकित शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलं. जगातील सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ख्याती होती. त्यांनी बीए, एम ए, पीएचडी, एसएस्सी, बार अॅट लॉ, डी एस्सी, आदी पदव्या मिळवल्या. तर त्यांना एलएलडी, आणि डी लिट. या पदव्या देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, समाज, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, पत्रकारिता, कामगार चळवळ आदी सगळ्याच विषयात विपुल लेखन केलं आहे. त्यांनी लिहिलेल्या "द प्रॉब्लेम ऑफ रुपी" हा शोधप्रबंध आजही अनेक अर्थतज्ज्ञांना मार्गदर्शक ठरत आहे. तर त्यांचं 'वेटींग फोर अ व्हिसा' हे आत्मचरित्र सुप्रसिद्ध आहे. त्यांचं हे आत्मचरित्र 20 पानी असून ते कोलंबिया विद्यापीठात अभ्यासक्रमाला शिकवण्यात येत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी असंख्य पुस्तकं आणि ग्रंथाचं लिखाण केलं आहे. यात 'द बुद्ध आणि त्यांचा धम्म, रिडल्स इन हिंदुइझम, अन्हिलेशन ऑफ कास्ट, थॉट्स ऑफ पाकिस्तान, शूद्र पूर्वी कोण होते? आदी अनेक ग्रंथ संपदा त्यांनी लिहिली आहे.

शाहु महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांनी केली मदत- बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेत शिक्षण घेणं सुलभ गेलं. त्यानंतर सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना बडोदा पब्लिक सर्व्हिसेसमध्ये नोकरीही दिली. कोल्हापुरच्या शाहु महाराजांनी बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रासाठी मदत केली. तसेच बाबासाहेब इंग्लंडला शिक्षणासाठी गेल्यानंतरही शाहु महाराजांनी मदत सुरुच ठेवली.

बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्लीत 6 डिसेंबर 1956 ला निधन झालं. त्यांच्या निधनानं गोरगरीब दीन दुबळ्या दलित समाजाचा कैवारी पोरका झाला. त्यांच्या निधनाच्या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असं संबोधलं जाते. बौद्ध धर्मात परिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण असा अर्थ होतो. जो व्यक्ती निर्वाण होतो, तो सगळ्या सांसारिक भ्रमापासून मुक्त होत असल्याची संकल्पना आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाच्या दिवसाला 'महापरिनिर्वाण दिवस' असं संबोधतात.

हेही वाचा :

  1. Dhammachakra Pravartan Din 2023 : का साजरा केला जातो 'धम्मचक्र प्रवर्तन दिन'; काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर
  2. Meditation Center In Melghat : मेळघाटात ध्यान साधना; बारा वर्षात आठ हजार धम्मचाऱ्यांनी घेतलं प्रशिक्षण
  3. महापरिनिर्वाण दिन; कोल्हापुरातील 'या' गावात आहेत डॉ आंबेडकरांच्या अस्थी, 6 डिसेंबरला घेता येणार दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.