ETV Bharat / state

महाबळेश्‍वर येथील नाताळावर कोरोन‍ाचे सावट, पर्यटकांनी केले बुकींग रद्द - नाताळ

महाबळेश्‍वर-पाचगणीचा नाताळ ( Christmas ) पर्यटन हंगाम अडचणीत आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधिच पर्यटकांनी महाबळेश्‍वरकडे ( Mahabaleshwar ) पाठ फिरवली आहे. त्यातही आता नव्या ओमायक्रॉनच्या ( Omicron ) घोंगावणाऱ्या संकटामुळे टाळेबंदी होईल या भितीने महाबळेश्‍वरची हॉटेल, रिसॉर्टमधील बुकींग रद्द होऊ लागली आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 14, 2021, 10:33 PM IST

Updated : Dec 15, 2021, 4:22 PM IST

सातारा - गेले दोन वर्षे अनिश्‍चिततेच्या गर्तेत अडकलेला महाबळेश्‍वर-पाचगणीचा नाताळचा पर्यटन हंगाम अडचणीत आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधिच पर्यटकांनी महाबळेश्‍वरकडे ( Mahabaleshwar ) पाठ फिरवली आहे. त्यातही आता नव्या ओमायक्रॉनच्या ( Omicron ) घोंगावणाऱ्या संकटामुळे टाळेबंदी होईल या भितीने महाबळेश्‍वरची हॉटेल, रिसॉर्टमधील बुकींग रद्द होऊ लागली आहेत.

आढावा घेताना प्रतिनिधी

नाताळचा सिझन

दिवाळी सुट्यांचा हंगाम संपला की पर्यटकांना नाताळचे वेध लागतात. महाबळेश्‍वरमध्ये तर पर्यटकांच्या दृष्टीने दिवाळी इतकेच नाताळचे आकर्षण असते. नाताळ साजरा करण्यासाठी आलेले पर्यटक इयर एन्डची पार्टी साजरी करुनच नव्या वर्षाचे स्वागत करतात. पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी महाबळेश्‍वरच्या बाजार पेठेसह प्रमुख रस्ते, हॉटेल्स, लॉज, रिसॉर्ट सजलेले असतात.

टाळेबंदी किंवा निर्बंधाची भिती

गेले दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधांमुळे महाबळेश्‍वरचा पर्यटन व्यवसाय अडचणीत होता. त्यातून कुठे उभारी घेत नाही तोच आता ओमायक्रॉनचा शिरकाव देशात झाल्याने अनामिक भितीचे सावट महाबळेश्‍वरच्या बाजार पेठेत पहायला मिळत आहे. महाबळेश्‍वरच्या एमपीजी क्लबचे जनरल मॅनेजर अमीत नेगी म्हणाले, ‘‘पर्यटकांमध्ये ओमायक्रॉनची अनामिक भीती मनात आहे. यामुळे पुन्हा टाळेबंदी किंवा प्रशासनाची बंधने येतील, अशी शंका पर्यटकांच्या मनात पहायला मिळते. 25 डिसेंबर ते 1 जानेवारी हा महाबळेश्‍वरचा नाताळचा हंगाम असतो. या सात दिवसांसाठीचे बुकींग साधारण 14-15 डिसेंबरपर्यंत महाबळेश्‍वरमध्ये फुल्ल होते. लॉजिंगला या काळात सर्वाधिक दर मिळतो. अधिक पैसे मोजूनही लोकांना लॉज उपलब्ध होत नाहीत, अशी सर्वसाधारण परिस्थिती असते.

दर पडू शकतात

महाबळेश्‍वरमध्ये आज क्षमतेच्या निम्मे बुकींगही होऊ शकलेले नाही. उलट काही पर्यटकांनी बुकींग रद्द करायला सुरूवात केली आहे. ही परिस्थिती 20 तारखेपर्यंत सुधारेल, अशी अपेक्षा आहे. लोकांच्या मनातील भीती कमी न झाल्यास लॉजींगचे दर आम्हाला पाडावे लागतील, अशी भीती श्री. नेगी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

बुकींग होताहेत रद्द

पूर्वीपेक्षा यावेळी 40 टक्के बुकींग कमी झाले असल्याचे महाबळेश्‍वरच्या फाऊंटन हॉटेलचे व्यवस्थापक अबीद डांगे यांनी सांगितले. 'साधारण 10 टक्के बुकींग रद्द झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. टाळेबंदी किंवा पर्यटनस्थळांवरील बंधने येणार नाहीत, याची अजून लोकांना खात्री वाटत नाही', असेही ते म्हणाले.

हे ही वाचा - गृहमंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या गाडीतून रोकड असलेली बॅग लंपास

Last Updated : Dec 15, 2021, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.