ETV Bharat / state

काळ्या फिती लावून मंत्रिमंडळ देणार सीमावासीयांना पाठिंबा- एकनाथ शिंदे - support to Marathi

राठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून १ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारमधील सर्व मंत्री काळ्या फिती लावून काम करणार आहेत. षावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेला. त्याचा निषेध म्हणून सीमा भागातील मराठी भाषिक ५७ सालापासून १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. त्याला राज्य सरकारकडून देखील पाठिंबा देण्यात येणार आहे.

eknath shinde
काळ्या फिती लावून मंत्रिमंडळ देणार सीमावासीयांना पाठिंबा-
author img

By

Published : Oct 31, 2020, 6:28 AM IST

Updated : Oct 31, 2020, 6:51 AM IST

मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात राहणाऱ्या मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून १ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारमधील सर्व मंत्री काळ्या फिती लावून काम करणार आहेत. राज्याचे नगरविकासमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली सांगितलं

१ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती. तेव्हापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात राहणाऱ्या ८६५ गावांमधील मराठी भाषिकांवर कर्नाटक राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय, अत्याचार होत आहेत. भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेला. त्याचा निषेध म्हणून सीमा भागातील मराठी भाषिक ५७ सालापासून १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. त्याला राज्य सरकारकडून देखील पाठिंबा देण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ देणार सीमावासीयांना पाठिंबा

काळी फीत लावून करणार काम-

याबाबत अधिक माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले, की सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार समर्थपणे उभे आहे. त्यासाठी राज्य सरकारमधील सर्व मंत्री १ नोव्हेंबर रोजी काळी फित लावून कारभार करणार आहेत. सीमा भागातील ८६५ गावात राहणारे मराठी भाषिक महाराष्ट्रात सामील होण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करत आहेत. परंतु कर्नाटक सरकार सातत्याने दडपशाही करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार करत आहे. या दडपशाहीचा निषेध म्हणून सीमावासीयांकडून १ नोव्हेंबरला काळा दिवस पाळण्यात येतो. त्यांच्या पाठिशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार ठामपणे उभे आहे.

मंत्रिमंडळात प्रस्ताव संमत-

मराठी भाषिक सीमावादाचा हा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून न्यायालयीन पातळीवर सर्वोपतरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सीमावासीयांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीमावासीयांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार सर्व मंत्री १ नोव्हेंबरला काळी फित लावून काम करणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

Last Updated : Oct 31, 2020, 6:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.