ETV Bharat / state

माघी गणेश जयंती : मुंबईत सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी - magh ganesh jayanti latest news mumbai

आज (मंगळवारी) पहाटे चार वाजल्यापासूनच सिद्धीविनायक मंदिरात गणेशाला सनईच्या सुरावटीने अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर महादुग्धाभिषेक करण्यात आला. हा जन्मसोहळा पुष्पवर्षावाने तसेच विविध पाळणा गीतांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंदिरातील पुजारींनी दिली.

magh ganesh jayanti
माघ गणेश जयंती
author img

By

Published : Jan 28, 2020, 7:39 AM IST

Updated : Jan 28, 2020, 3:20 PM IST

मुंबई - गणपती बाप्पाची आज मंगळवारी माघी महिन्यातील जयंती आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त पहाटे विशेष आरती करण्यात आली. तसेच मंदिराला फुलांनी सजवण्यात आले. माघी गणेश जयंतीनिमित्त मुंबईकरांनी पहाटेपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.

माघी गणेश जयंती : मुंबईत सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

आज (मंगळवारी) पहाटे चार वाजल्यापासूनच सनईच्या सुरावटीने गणेशाला अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर महादुग्धाभिषेक करण्यात आला. हा जन्मसोहळा पुष्पवर्षावाने तसेच विविध पाळणा गीतांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंदिरातील पुजारींनी दिली. आकर्षक फुलांच्या माळांनी सजवलेल्या पाळण्यात पहाटे गणेशाला विराजमान करण्यात आले. यानंतर पाळणा आरती करून गणेशाचा सर्वत्र जयजयकार करण्यात आला.

हेही वाचा - 'शिवभोजन'ला बोगस लाभार्थ्यांचं ग्रहण, ठेकेदाराचीचं माणसं घेत आहेत लाभ

माघातील गणेश जयंती -

स्कंद पुराणात एक कथा आहे. नरांतक या राक्षसाला ठार करण्यासाठी कश्यपाच्या पोटी गणपतीने विनायक या नावाने अवतार घेतला. म्हणून ही माघी गणेश जयंती माघी गणेशोत्सव म्हणून साजरी केली जाते. गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे म्हटले जाते. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते. दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते, अशी भक्तांची भावना आहे.

हेही वाचा - आरएसएस ही भारतामधील दहशतवादी संघटना, डॉ. आंबेडकरांच्या पणतूचा हल्लाबोल

भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते, तर तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंतीचा असतो. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे. त्याबाबत या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारल्याचेही सांगितले जाते.

Intro:माघी गणेश जयंतीनिमित्त मुंबईत सिद्धीविनायक मंदिरात भाविक मोठ्या संख्येने

चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती आज आहे.मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त पहाटे विशेष आरती करण्यात आली तसेच मंदिराला फुलांनी सजवले आहे.माघी गणेश जयंतीनिमित्त मुंबईकरानी बाप्पाचा दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

आज पहाटे चार वाजल्यापासूनच सनईच्या सुरावटीने गणेश देवतेला अभ्यंगस्नान, महादुग्धाभिषेक सिद्धीविनायक मंदिरात करण्यात आले. भगवंताचा जन्म सोहळा पुष्पवर्षावाने तसेच विविध पाळणा गीतांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंदिरातील पुजारीनी दिली. आकर्षक फुलांच्या माळांनी सजवलेल्या पाळण्यात पाहटे गणेशाला विराजमान करण्यात आले व पाळणाआरती करून गणेशाचा सर्वत्र जयजयकार करण्यात आला.

माघातील गणेश जयंतीबद्दल जाणून घ्या

नरांतक या राक्षसाला ठार करण्याकरिता कश्यपाच्या पोटी गणपतीने विनायक या नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती माघी गणेशोत्सव म्हणून साजरी केली जाते. गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे म्हटले जाते. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते. दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते.या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते.

भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते, तर तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे.
त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. Body:लाईव्ह हवं असेल तर व्हाट्सएपवर लिंक पाठवतो सिद्धिविनायक मंदिर माघी गणेशोत्सव Conclusion:।
Last Updated : Jan 28, 2020, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.