ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मदरसा शिक्षकाला 5 वर्षांचा कारावास - अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पीडित विद्यार्थिनी एकटीच मदरशामध्ये थांबली. त्यानंतर आरोपी खानने मुलीला वॉशरूममध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. मुलगी रडायला लागली आणि खानने धमकी दिली की तिने तिला कुणालाही सांगितले तर तिला मारहाण करू, असे धमकावले होते.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
author img

By

Published : Mar 18, 2021, 9:24 AM IST

मुंबई - शहरातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी स्पेशल पॉक्सो न्यायालयाने (पीओसीएसओ) एका मदरशातील शिक्षकाला 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने शिक्षकाला 20 हजार रुपये दंडही ठोठावला. ही घटना मुंबईतील एका मदरशामध्ये घडली जिथे ती अल्पवयीन मुलगी आणि तिचे मित्र शिक्षण घेत होते.
मोहम्मद रियाज कायमाली खान (वय 24) हा शिक्षक मदरशामध्ये अरबी भाषा शिकवत होता.

काय आहे घटनाक्रम?

16 मार्च 2018 या दिवशी सकाळी 9.30 ते 11 या वेळेत तिच्या वर्गात शिक्षण घेतल्यानंतर ती घराकडे जात होती. त्यापूर्वीच आरोपी शिक्षकाने तिला बोलावून घेतले. इतर विद्यार्थी बाहेर गेले. मात्र, पीडित विद्यार्थिनी एकटीच मदरशामध्ये थांबली. त्यानंतर आरोपी खानने मुलीला वॉशरूममध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. मुलगी रडायला लागली आणि खानने धमकी दिली की तिने तिला कुणालाही सांगितले तर तिला मारहाण करू. त्यानंतर मुलगी घरी गेली आणि तिच्या आईला याबद्दल सांगितले.

या घटनेने हादरलेल्या तिच्या पालकांना तत्काळ पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य समजून घेत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.
त्यानंतर सुनावणी अंती न्यायालायने आरोपीस शिक्षा ठोठावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.