ETV Bharat / state

धारावीतील 'त्या' चार इमारतींचे पूर्णपणे पुनर्वसन करा; मधु चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

धारावीतील सेक्टर पाचमध्ये म्हाडाने बांधलेल्या इमारतींचा तिढा अजूनही सुटलेला नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत (डीआरपी) सेक्टर पाचमधील म्हाडाने बांधलेल्या चार इमारतीविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी पत्र पाठवले आहे.

धारावीतील सेक्टर पाचमध्ये म्हाडाने बांधलेल्या इमारतींचा तिढा अजूनही सुटलेला नाही.
author img

By

Published : Jul 5, 2019, 10:04 AM IST

मुंबई - धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत (डीआरपी) सेक्टर पाचमधील म्हाडाने बांधलेल्या चार इमारतींविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या इमारतींचे बांधकाम वेळेत झाल्यास म्हाडाकडे संक्रमण शिबिराच्या अनुषंगाने सुमारे १३०० घरे उपलब्ध होतील. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी पत्र पाठवले आहे.

धारावीतील सेक्टर पाचमध्ये म्हाडाने बांधलेल्या इमारतींचा तिढा अजूनही सुटलेला नाही.

धारावीतील सेक्टर पाचमध्ये म्हाडाने बांधलेल्या इमारतींचा तिढा अजूनही सुटलेला नाही. राज्य सरकारने यापूर्वी डीआरपीमधील पथदर्शी प्रकल्प म्हणून सेक्टर पाचच्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडावर सोपवली होती. तेव्हा म्हाडाने स्थानिक झोपडीधारकांचे एका इमारतीत योग्यरित्या पुनर्वसन केले. त्यापाठोपाठ दोन इमारती बांधून आणखी दोन इमारती उभारणीची तयारी चालविली. पण मधल्या कालावधीत सेक्टरचा पुनर्विकास हक्क काढून घेण्यात आल्याने म्हाडाची पंचाईत झाली. त्यामुळे म्हाडाकडे या इमारतींसाठी सुमारे १५० कोटी रुपयांची गुंतवणूक अडकून पडली आहे. ही गुंतवणूक वसूल होण्याविषयी साशंकता निर्माण झाली असतानाच या चारही इमारतींचे नेमके काय करायचे हा प्रश्नही निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने २००४ मध्ये डीआरपीची स्थापना केल्यानंतर त्याअंतर्गत चारही इमारतींचे पुनर्वसन अपेक्षित आहे. पण एकूणच हा प्रकल्प रखडल्याने या चारही इमारतींविषयी निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मधु चव्हाण यांनी १७ नोव्हेंबर मुख्यमंत्र्यांना २०१८ मध्ये सर्वप्रथम या चार इमारतींचा म्हाडाकडून स्वतंत्रपणे विकास करण्याविषयी पत्र पाठविले होते. त्यानंतर २९ जून २०१९ रोजी पाठविलेल्या पत्रातही त्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यात या इमारतींतून वेगवेगळ्या घटकांसाठी संक्रमण शिबिरातील १,३३२ घरांचा साठादेखील उपलब्ध होतील, असेही नमूद केले आहे.

Intro:मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) अंतर्गत सेक्टर पाचमधील म्हाडाने बांधलेल्या चार इमारतींविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. या इमारतींचे बांधकाम वेळेत झाल्यास म्हाडाकडे संक्रमण शिबिराच्या अनुषंगाने सुमारे १३०० घरे उपलब्ध होतील. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी पत्र पाठवले आहे. Body:धारावीतील सेक्टर पाचमध्ये म्हाडाने बांधलेल्या इमारतींचा तिढा अजूनही सुटलेला नाही. राज्य सरकारने यापूर्वी डीआरपीमधील पथदर्शी प्रकल्प म्हणून सेक्टर पाचच्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडावर सोपडली होती. तेव्हा म्हाडाने स्थानिक झोपडीधारकांचे एका इमारतीत योग्यरित्या पुनर्वसन केले. त्यापाठोपाठ दोन इमारती बांधून आणखी दोन इमारती उभारणीची तयारी चालविली. पण मधल्या कालावधीत सेक्टरचा पुनर्विकास हक्क काढून घेण्यात आल्याने म्हाडाची पंचाईत झाली. त्यामुळे म्हाडाने या इमारतींसाठी सुमारे १५० कोटी रुपयांची गुंतवणूक् अडकून पडली आहे. ही गुंतवणूक वसूल होण्याविषयी साशंकता निर्माण झाली असतानाच या चारही इमारतींचे नेमके काय करायचे हा प्रश्नही निर्माण झाला.

राज्य सरकारने २००४ मध्ये डीआरपीची स्थापना केल्यानंतर त्याअंतर्गत चारही इमारतींचे पुनर्वसन अपेक्षित आहे. पण एकूणच हा प्रकल्प रखडल्याने या चारही इमारतींविषयी निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मधु चव्हाण यांनी १७ नोव्हेंबर मुख्यमंत्र्यांना २०१८मध्ये सर्वप्रथम या चार इमारतींचा म्हाडाकडून स्वतंत्रपणे विकास करण्याविषयी पत्र पाठविले होते. त्यानंतर २९ जून २०१९ रोजी पाठविलेल्या पत्रातही त्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यात या इमारतींतून वेगवेगळ्या घटकांसाठी संक्रमण शिबिरातील १,३३२ घरांचा साठादेखील उपलब्ध होतील, असेही नमूद केले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.