मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बालबुद्धी आहेत, असे पवार म्हणाले. तर मग मुख्यमंत्र्यांच्या याच बालबुद्धीने साडेचार वर्षात राज्यातले सर्व पेचप्रसंग अत्यंत कुशलतेने सोडवलेत. जे पवारांसारख्या जाणत्या राजाला जमलं नाही, असा टोला भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी पवारांना लगावला.
अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराजयाला घाबरुन शरद पवार यांनी उमेदवारी मागे घेतल्याची टीका केली होती. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार बालबुद्धीने विधाने करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही, असे म्हणाले होते.
यावेळी शरद पवार यांनी देशात बुलेट ट्रेनवर सव्वालाख कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा इतर रेल्वेच्या पायाभूत सुविधा पुरवल्या पाहिजे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांना फटकारले होते. त्यावर भंडारी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी गेल्या साडेचार वर्षात राज्यातील सर्वच पेचप्रसंग अत्यंत कुशलतेने सांभाळले. त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफी, इतक्या वर्षात रखडलेला मराठा अरक्षणासारखे प्रश्न सोडवले, जे पवारांसारख्या जाणता राजाला जमले नाही, हे सांगत यावरून बालबुद्धी कोण हे जनतेने ठरवावे, असा टोला भंडारींनी पवरांना लगावला.